स्पीड रीडिंग - आतला आवाज

Submitted by च्रप्स on 30 January, 2022 - 23:59

नमस्कार.. मागील काही दिवसांपासून मी पुस्तके वाचायला सुरु केले आहे... माझा वाचन स्पीड तसा चांगला आहे पण मी जेंव्हा वाचतो तेंव्हा मनातल्या मनात एका आवाजात ते बोलले जाते...
म्हणजे मी वाचायला सुरु करतो तर सेम टाईम डोक्यात ते शब्द आणि वाक्य उच्चरले जातात... त्यामुळे माझा वाचण्याचा स्पीड हा त्या बोलण्याच्या स्पीड इतकाच राहतो..
हा इनर व्हॉइस टाळण्याच्या काही अनुभव? युक्त्या?

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ईंटरेस्टींग आहे. या कन्सेप्टबद्दल कधी ऐकले नव्हते वा असा विचार केला नव्हता.
हे माझ्याशी लिहिताना होते. बोलावे तसे लिहिले जाते. माझा बोलण्याचा स्पीड खूप जास्त आहे. त्यामुळे लिहिण्याचा स्पीडही आपसूक वाढतो. अक्षर त्यामुळेच कोंबडीचे पाय झाले आहे ते वेगळे. पण आता मराठी टायपिंगचा स्पीडही त्यामुळेच चांगला आहे. तेच ईंग्लिश टायपिंगचा स्पीड सुमार आहे Happy

वाचताना हे असे होते का चेक करावे लागेल. पण माझा वाचनाचा स्पीड खूप आहे हे नक्की. कारण लहानपणी गोष्टीची पुस्तके भावंडाचे एक वाचले जायचे तेव्हा माझी तीनचार संपलेली असायची. त्यामुळे वाक्य मनातल्या मनात बोलले जात नसावे. चित्रावरून नजर फिरवावे तसे वाचले जाते. डोक्यात कथानक शिरत जाते. अर्थात हा स्पीड कथेबाबत आणि अभ्यासाच्या पुस्तकाबाबत वेगवेगळा होतो. ते स्वाभाविकच आहे. समजून घेत वाचण्याने स्पीड मंदावणारच. हे मायबोलीवरच्या एखाद्या क्लिष्ठ लेखाबाबतही होते. आपण सवयीने झरझर वाचतो. मग कळते हे वेगळे प्रकरण आहे. समजून ऊमजून सावकाश वाचावे लागणार..

चांगला आहे पण मी जेंव्हा वाचतो तेंव्हा मनातल्या मनात एका आवाजात ते बोलले जाते...>>> मीही अशीच वाचते आणि हा प्रॅाब्लेम आहे हे मला आताच कळले.
हा इनर व्हॉइस टाळण्याच्या काही युक्त्या…..> आतला आवाज चांगला असतो म्हणतात. तो टाळू नये Happy (अवांतर झाले पण रहावले नाही)

हो. कळले.
हम्म! मला ठरवूनही जलद वाचता येत नाही म्हणजे.