झी मराठी वर नुकतीच येऊ कशी तशी मी नांदायला ही नवी मालिका सोमवार ते शनिवार रोज रात्री ८ च्या टाईम स्लॉटवर सुरू झाली. मालिकेचं टायटल साँग सुद्धा बरंच बरं जमलंय कि बघताना मिसेस मुख्यमंत्रीच्या ठसकेदार टायटल साँगची आठवण आल्याशिवाय रहात नाही इतकं ते कॉपी झालंय..!
मालिकेतील लिड स्टारकास्ट अगदीच नवीन परंतु चॅलेंजिंग आहे. स्वीटु (अन्विता फलटणकर) आणि ओंकार (शाल्व किंजवडेकर) हे दोघे या मालिकेचे लिड आहेत तर त्यांना साथ द्यायला खंबीर आधारस्तंभ म्हणुन स्वीटुची आई नलू साळवी (दिप्ती केतकर), ओमची आई शकुंतला खानविलकर (शुभांगी गोखले), ओमची बहीण मालविका खानविलकर (आदिती सारंगधर) आहेत. त्याच सोबत स्विटुचे बाबा, काका, काकू, चुलत भाऊ चिन्या हे सर्व साळवी कुटुंबीय दहा बाय बाराच्या हॉल अन सहा बाय सहाच्या किचन या वन आरके मधे रहात आहेत(हेच घर झीमच्या बर्याच सिरियल मधे या आधिही पहायला मिळालेलं आहे..!)
तिकडे खानविलकरांच्या घरात ओमसोबत त्याचे आई-बाबा-बहीण, त्याची होऊ घातलेली इंडो-अमेरिकन बायको, बहिणीचा होऊ घातलेला नवरा (याला या आधी कुठे बघितला आहे हेच आठवत नाही.. ) अन बहिणीचा ऑफिस कम घरातील चमचा/नोकर असे कलाकार आहेत. खानविलकरांचा व्हिला जबरदस्त आहे. त्यांच्या घराची, अंतर्गत सजावटीची अन समस्त खानविलकर कुटुंबियांच्या ड्रेपरीची रंगसंगती ही फिकट रंगससंगतीत आहे ज्यातुन त्यांच्या रहाणीमानावर गडगंज संपत्तीचा अन हाय क्लास जीवनशैलीचा प्रभाव जाणवतो.
सो मिडलक्लास साळवी कुटुंबीय अंबरनाथ मधे रहात आहेत. कर्मदरिद्री स्वभावामुळे आठराविश्व दारिद्र्य हे त्यांच्या पाचवीला पुजलेले असते (कसे ते कालच्या भागात कळाले.. पुढे सांगतोच..!). या कर्मदरिद्री कुटुंबात सर्वांचे खायचे वांधे झालेले असतात पण दोन्ही साळवी जोड्यांची मुले - स्विटू अन चिन्या हे मात्र खात्या-पित्या घरातले ओव्हरवेट वाटावेत असे कसे हे मात्र न सुटलेलं कोडंच आहे. सगळे साळवी स्वभावाने चांगले असतात त्यामुळे त्यांना कशातच वाईटपणा दिसत नसतो. अगदी बिनकामाचे आयुष्य कंठण्यात देखील त्यांना काहीच वाईट वाटत नसतं. स्वीटूच्या बाबांची नोकरी अगदी पहिल्याच भागातच जाते अन ते हताश होऊन दुसर्या नोकरीसाठी कसलेही प्रयत्न न करता नुसते सुतकी चेहर्याने घरी बसुन असतात. त्यांना साथ देणारी नलू ही अंबरनाथमधे चपात्या बनवून विकत असते. स्विटु कुठेतरी थातूर-मातूर नोकरी करत असते अन या दोघींच्या पैशांवर हे सगळे साळवी आयते गिळत असतात. स्विटूचा काका हा एक नंबरचा आळशी अन फाल्तू कामं करणारा इसम असतो (जो कुठल्याही अँगलने अंबरनाथमधे रहणारा मराठी माणुस वाटत नाही - ठार गुज्जु वाटतो..!) ज्याची बायको दम्याचा रोग घेऊन उसउसत जगत असते अन जावेला (नलुला) पडेल ती मदत करण्याची कसरत करत असते. अशा या माठ काका-काकुचा मुलगा चिन्या हा महामाठ असतो अन गुंडांकडून २ लाख रुपये हारलेला असतो. घरात खरेतर हार्पिकची देखील गरज लागु नये अशी गांजलेली परिस्थिती असताना चिन्याच्या उद्योगाला वैतागून घरात सगळे चिंतेत असतात. हाता-तोंडाची गाठ पडण्याचे वांधे झालेल्या साळवींना खानविलकरांच्या कृपेने देव तारायला बघत असतो.
नलूची बालमैत्रीण शकुंतला खानवीलकर ही मोठ्या हेल्थ केअर प्रॉडक्ट उद्योगाची मालकीण असते. हिने देखील नलूसारखाच संसार रेटत मार्गी लावलेला असतो. तिची मुलगी - मालविका ही हाय क्लास सोसायटीची प्रतिनिधी असते अन तिचे विचार शकुला (ती स्वतःच्या आईला ''आई'' असं न म्हणता मिसेस खानविलकर म्हणत असते यावरून त्यांच्या नात्याची कल्पना येऊ शकते..!) आजिबात पटत नसतात. मालविका अजुन अविवाहित असते पण तिचा होऊ घातलेला नवरा - रॉकी कायम तिच्या आगेमागेच असतो अन पडेल ती कामे करत असतो. त्याला जिमचे खूप वेड असते.
नलू-शकु ची मैत्री या दोन कुटुंबियांना जवळ आणते. शाळेत असताना नलूच्या घरची परिस्थिती उत्तम अन शकूच्या घरी खाण्याचे वांधे असतात. काळानुसार परिस्थिती बदलली परंतू दोघींच्या घट्ट मैत्रीत त्या बदललेल्या परिस्थितीचा लवलेशही नाही हे आईसोबत एकदा साळवींच्या घरी आलेला ओम बरोब्बर हेरतो. साळवींच्या दळभद्री आयुष्याची कणव येऊन चांगल्या मनाचा ओम त्यांना चकल्या-शेव-शंकरपाळ्या अस्ल्या ऑर्डरी मिळवून देऊन ४ सुखाचे घास खाऊ घालण्याचे पुण्य पदरात पाडून घेतो. त्याला नलू मावशी अन साळवींबद्दल नितांत आदर असतो.
असा हा ओम्या मनाने अन रुपानेही खरंच खूप चांगला असतो. त्याच्या चांगुलपणावर जाडी अन मनमिळावू स्वीटु भाळते. तिचा सर्वांची काळजी घेणारा, कामसू स्वभाव शकुलाही खूप आवडतो अन ती परिस्थितीने (खरेतर कर्मदरिद्रीपणामुळे) गांजलेल्या साळवींना अजून थोडी मदत व्हावी या हेतुने स्वीटुला 'खानविलकर हेल्थ प्रॉडक्ट्स'च्या बिझनेस युनिट मधे नोकरीला बोलावते. एवढेच नव्हे तर स्वतःच्याच बंगल्यात रहायला सांगते. शकुच्या मुलीला - मालविकेला मात्र हे आवडत नाही अन ती स्विटूला भयंकर पिडू लागते. मालविकेने भावासाठी एक माठ इंडो-अमेरिकन मुलगी (मोमो) शोधलेली असते जिचे पिताश्री एक वेलनोन बिझनेस टायकून अन ६०० करोड की कायशा संपत्तीचे मालक असतात. त्यावर डोळा ठेऊन मालविका ही मोमो-ओम्याची सोयरीक जुळवण्याच्या प्रयत्नात असते अन ती मोमोला सतत सोबत घेऊन तिला काय हवं काय नको याची काळजी घेत असते. तर अशा या इंग्रजाळलेल्या कम भंजाळलेल्या अतार्कीक मोमोची अटेंडंट म्हणुन स्विटूचे वर्णी लागते.
त्यानंतर एकेदिवशी शकू अन ओम्या साळव्यांना थोडा चेंज म्हणुन स्वतःच्या व्हिलात पाहुणचारासाठी बोलावतात. या भेटीत साळाव्यांच्या कर्मदरिद्रीपणाच्या कडक आवरणाखाली खळाळणार्या चांगुलपणाची झलक ओम्याला दिसते. आपल्या कुटुंबियांना शकु मावशीने अन ओम्याने चांगला पाहुणचार दिला हे बघून स्विटूही सुखावते. त्याचवेळी मालविकाला व्हिलाची धर्मशाळा झाल्याचा संताप अनावर होऊन ती साळव्यांना सळो की पळो करून सोडते. साळव्यांना त्यांची जागा दाखवायचा प्रयत्न करते परंतु साळवे इतके इतके नतद्रष्ट असतात की त्यांना त्यांची जागाच माहित नसते . त्यामुळे मालविकेकडून साळवी यथेच्छ सळो-की-पळो करून घेतात . शेवटी हायक्लास असलेल्या ३ मैत्रीणींना बोलावलेल्या जंगी(?) पार्टीत मालविका साळव्यांना अपमानीत करु लागते त्यावेळी लेकीचे प्रताप हताशपणे पहात उभ्या असलेल्या शकूला स्विटूची साथ मिळते अन मालविकेचा डाव तिच्यावरच उलटवत थोड्या विनोदी अंगाने तो कसनुसा प्रसंग अन साळव्यांचा खानविलकर व्हिला मधला स्टे एकदाचा संपतो अन आपणाला हुश्श वाटतं.
खरं सांगायचं तर पहिले काही भाग अतिशय बाळबोध वाटत होते परंतु त्यात पुढील भागांची बिजं खुबीने पेरण्यात दिग्दर्शकाला यश आलं. जाडी स्विटु अन शेलाटा ओम्या यांचं कसं काय बुवा जमणार. कैच्या कै सिरियल दिसते असं वाटत असतानाच स्विटू अन ओम्या आपल्याला आवडू लागतात यात दिग्दर्शन, संवादलेखन अन कॅमेर्याचाही हात आहे.
दिप्ती केतकर यांनी नलूच्या गेटअपवर खरेच खूप कष्ट घेतले आहेत. त्या अगदी नलूच वाटतात इतकं बेअरिंग त्यांनी पकडलं आहे त्याबद्दल त्यांचं विषेश कौतुक..! शुभांगी गोखलेंची शकू देखील अगदी सफाईदार आहे. मालविकेचं कॅरेक्टर लाऊड आहे पण आदिती सारंगधरने ते बरोब्बर साधलं आहे. अन्विता फलटणकर अन शाल्व किंजवडेकरचे स्विटू-ओम्या अगदी पर्फेक्ट आहेत असं जाणवतं याचा अर्थ त्यांची केमिस्ट्री चांगलीच जुळली आहे. झी मराठीवर असं जाडं-शेलाटं प्रकरण पहिल्यांदाच आल्यामुळं काहीतरी नवीन आहे या उत्सुकतेपोटी आपण त्यात गुंतू लागतो. आपल्याप्रमाणे शकूला पण स्विटूच ओम्यासाठी योग्य वाटू लागते जेणेकरून खानविलकरांच्या घराला घरपण देण्यासाठी (डि.एस.कें.च्या घरांना डावलून ) एक चांगली सून मिळेल हे त्यामागचं कारण असतं.
स्विटू अन ओम्याच्या लग्नाचा प्रस्ताव घेऊन शकु अंबरनाथच्या चपातीवाल्या साळव्यांच्या घरी मिठाईचे बॉक्स अन भेटवस्तू घेऊन पोचते. किचन ओट्याशी थांबून अगदी आनंदात शकू-नलू या घट्ट मैत्रीणी स्विटूच्या लग्नाबद्दल सेम पिंच सेम पिंच करत बोलत असतात. नलू-शकूची मैत्री त्या दोघींच्या मुलांना बांधतेय असं वाटत असतानाच कर्मदरिद्री साळव्यांची नलू बावळटासारखी शकूसमोर स्वतःचा फोन धरत त्या फोन मधे कुणा स्थळाचा फोटो दाखवत हे स्थळ स्विटूसाठी किती योग्य आहे ते दाखवते अन ते बघून आपलीही अवस्था शकूसारखी (काय ही नली दलिंदर आहे बघा.. कुबेर शकुच्या रुपाने नलीच्या पदरात आपले धन टाकू पहात आहे अन ह्या कर्मदरिद्री नलीचा पदर फाटका रे बाबा..!!) होते. शकू आवंढा गिळत नलीच्या हो ला हो-हो (हे शुभांगी गोखलेंना नेहमी छानच जमतं ) करत रहाते अन आपण मात्र दळभद्री नलीला लाखोल्या वाहत उद्या पासून नकोच बाबा ही येऊ-कशी-तशी असा विचार करतो खरा पण 'आज काय होणार?' ही उत्सुकता पुन्हा उद्या रात्री ८ वाजता आपली बोटे रिमोटवरील १२०४ हा आकडा दाबून आपला मोर्चा झी मराठीकडेच वळवणार हे माहित असुनही उद्याचा प्रीकॅप बघून झाला की आजच्या पुरतं तरी आपण चॅनेल बदलतो.
अशा या नवीन सिरियल वर चर्चा करण्यासाठी हा धागा थोडा उशिराच उघडला असला तरी सिरियलची खरी सुरुवात तर आजच्या भागापासून होणार आहे
मी सोडली ही सिरियल. सहन नाही
मी सोडली ही सिरियल. सहन नाही होत तो मठ्ठपणा.
मालविका वेडयाच नाटक करुन
मालविका वेडयाच नाटक करुन जेलमधून परत येते. सध्याही तेच करतेय.
तायडा आता भारतीय कपडे तेही साधे सुती घालते >>>>>>>> हो. वादळवाटमधली रमा आठवली तिला बघताना.
बादवे, ह्यान्चा हनिमून नाही झाला का?
व्याख्या विक्ख्ही वुखू
व्याख्या विक्ख्ही वुखू श्विटू माझ्या कुत्र्याचे नाव आहे. चला फिरवून आणते. आज ब्रेकफास्ट फोडणीचा भात.
विटू माझ्या कुत्र्याचे नाव
श्विटू माझ्या कुत्र्याचे नाव आहे.>> ते पण लठ्ठ आहे का हो अमा..??
बादवे, ह्यान्चा हनिमून नाही झाला का?>> काहीच कळायला मार्ग नाही... कोणीच बघत नाही असं दिसतंय. (त्यांचा भूतकाळातील एअरपोर्ट वरील प्रेमात पडण्याचा अंगचटीचा सीन बघुनच उलटी आली होती... हनीमूनचा एपिसोड बघणे म्हणजे हॉस्पिटल मधे अॅडमिट व्हायची वेळ येईल )
आहे आहे हनिमून नसला तरी
आहे आहे हनिमून नसला तरी मधुचंद्राची रात्र....... 'छुओ ना.... छुओ ना' असे करत शिफॉन ची साडी नेसलेली स्वीटू आणि ओम्याचे अंगलट करणारे गाणे प्रोमोमद्यें दाखवत आहे
अरे देवा.. म्हणजे हा त्या४
अरे देवा.. म्हणजे हा आत्या४ सहन करावा लागणार तर..!!
शिफॉनची साडी काय म्हणता.. मी तर त्या श्वीटूला चक्क बेडशीट नेसून आलेली पाहिली.. साडी तशीही तिला कुठं पुरी पडणार (आठवा... श्वीटुला मोहित अन त्या आधी बघायला आलेल्या मुलावेळी नेसवलेली साडी पुरत होती का ते..!!).. नॅपतॉलच्या जाहिरातींमधे सेम बेडशीटं बघितली होती आम्ही... १९९९ रुपयांमधे ६ मिळत होती.
रॉकी पण बदलला आहे का?
रॉकी पण बदलला आहे का?
बाकी प्रतिसाद Lol
Submitted by केया on 7 January, 2022 - 09:54
नाही..... त्याने बहुदा हेअर ट्रान्सप्लांट केलंय ...
हल्ली त्या केसांचे दुकान
हल्ली त्या केसांचे दुकान चिन्यांचे काहीतरी झेंगट दाखवले आहे (कोण माहित नाही) पण फोन वर तो गुलुगुलु करताना दाखवतात। नेमके काय प्रकरण आहे हे ??
इथे वाचून की काय...
इथे वाचून की काय...
आजच्या भागात झाला बरं हनिमून...
आणि सकाळी ओले केस,रोमान्स...
तिकडे नाशिक ला ओम च्या आईला गुरुजींनी good news येणार सांगून ही झालं
तिकडे नाशिक ला ओम च्या आईला
तिकडे नाशिक ला ओम च्या आईला गुरुजींनी good news येणार सांगून ही झालं>> इश्श....! काहीतरीच क्क्क्क्क्काय्य्य्य्य्य्य्य.....!!! घरात बिनलग्नाची तायडा बसलेली असताना अन श्वीटू सारखी सून आलेली असताना या वयात शकीला शोभता का हे..??
मला तर जाम भिती वाटते की ओम्या वयात येईपर्यंत श्वीटू वयस्क आजी होईल की काय म्हणुन... श्वीटू अन ओम्याकडे इतक्यात गुड न्युज येईलसं वाटत नाही....
स्वीटु चं अपहरण होणार आहे असा
स्वीटु चं अपहरण होणार आहे असा एक अ आणि अ प्रोमो आज पाहिला...
काय चाल्लय सध्या ?
चिन्या ची गर्लफ्रेंड म्हणुन "दिल दोस्ती दुनियादारी" मधली कींजल आणलेली पण पाहिली कुठेतरी ...
किती बॉडी शेमिंग आहे ह्या
किती बॉडी शेमिंग आहे ह्या धाग्यावर! कुणालाच चुकीचे वाटत नाही का?
नानबा, तुम्ही शिरेल बघाल तर
नानबा, तुम्ही शिरेल बघाल तर तुम्हाला काही वावगं वाटणार नाही. शिरेलीचा हेतुच मुळी बॉडी शेमिंग करु नका... कुणी केलंच तर दुर्लक्ष करा.. आपण आनंदी रहा भले दुसर्यांना त्याचा त्रास झाला तरी चालेल असंच आहे सगळं
सीटु सीनमधे नसते आजकाल. तिचे
सीटु सीनमधे नसते आजकाल. तिचे तेचते थोबाड कॉपीपेस्ट केल्यासारखं आणि लांबुन आल्यासारखा आवाज दाखवतात.
पाठमोरं कुणाला उभं करतात काय माहित पण फिगर सेम आहे.
बहुतेक.. श्वीटू पण शिरेल
बहुतेक.. तिच्या चेहर्यावर मोठ्ठा पिंपल उठला असावा.. गळूच असावं कदाचित.. अथवा श्वीटूच शिरेल सोडणार असेल.. किंवा हिला बघून लोकं पकलीत हे जाणवल्यामुळे ष्टोरीत हिरवीण बारीक झाली असं दाखवून जुन्या श्वीटूचा शिरेलितून पत्ता कट होणार असावा... कदाचित मोठ्ठा लिप वगैरे घेऊन शिरेलचंच ट्रान्सफॉर्मेशन होऊन ती आले कशी का होईना मी नांदायला होऊन जुने श्वीटू-ओम्या बदलले असं दाखवतील.
नानबा, तुम्ही शिरेल बघाल तर
नानबा, तुम्ही शिरेल बघाल तर तुम्हाला काही वावगं वाटणार नाही. शिरेलीचा हेतुच मुळी बॉडी शेमिंग करु नका... कुणी केलंच तर दुर्लक्ष करा.. आपण आनंदी रहा भले दुसर्यांना त्याचा त्रास झाला तरी चालेल असंच आहे सगळं >> छे छे.. इथे पण क्वचितच येते.. सिरियल बघणे वगैरे जमत/झेपत नाही.
सिरियल बंडल असेलच, त्याबद्दल काही म्हणणे नाही, पण वैयक्तिक बॉडी शेमिंग, आर्थिक परिस्थितीवरून दळभद्री म्हणणे नको वाटते.
अनेक जाड माणसं (एस्पेशियली बायका - जाड असोत वा नसोत) आयुष्यात स्वतःकडे फक्त "जाड व्यक्ती" म्हणून पहाताना दिसतात.. स्वतःच्या दिसण्याबद्दल आणि त्यामुळे एकूणच न्यूनगंड प्रचंड प्रमाणात दिसतो.. त्यात हेल्थ कन्सर्न कमी आणि आजूबाजूच्यांच्या नजरे चा /अपेक्षां चा परिणाम अधिक असे वाटते.
सीटुओम सासवांना मावशी मावशी
सीटुओम सासवांना मावशी मावशी म्हणतात ते डोक्यात जातं.
कायतर म्हणे तु माझी सासु नंतर आधी माझी मावशी आहेस.
तिकडे अंघापण ताईच म्हणतेय.
इशापण सरच म्हणायची नवर्याला.
नातेसंबंध काही उरलेच नाहीत या
नातेसंबंध काही उरलेच नाहीत या शिरेलींमधे.
-
अनेक जाड माणसं (एस्पेशियली बायका - जाड असोत वा नसोत) आयुष्यात स्वतःकडे फक्त "जाड व्यक्ती" म्हणून पहाताना दिसतात.. स्वतःच्या दिसण्याबद्दल आणि त्यामुळे एकूणच न्यूनगंड प्रचंड प्रमाणात दिसतो.. त्यात हेल्थ कन्सर्न कमी आणि आजूबाजूच्यांच्या नजरे चा /अपेक्षां चा परिणाम अधिक असे वाटते.>> गेला तो जमाना... आता कोणी मनाला लाऊन घेत नाही. आरशात बघून स्वतःचं वजन वाढतंय लक्षात आलं की लगेच जिमा, वेलनेस कोच, प्रोटिन डाएट असं काहीतरी करून दोन चार महिन्यत वजन कमी करतात लोकं. अन एवढं करण्याची इच्छाशक्ती नसेल तर मग कानकोंडं होऊन स्वच्छंदी जगतात...
गेला तो जमाना... आता कोणी
गेला तो जमाना... आता कोणी मनाला लाऊन घेत नाही. आरशात बघून स्वतःचं वजन वाढतंय लक्षात आलं की लगेच जिमा, वेलनेस कोच, प्रोटिन डाएट असं काहीतरी करून दोन चार महिन्यत वजन कमी करतात लोकं. अन एवढं करण्याची इच्छाशक्ती नसेल तर मग कानकोंडं होऊन स्वच्छंदी जगतात...
>> माझा असा अनुभव नाही.. क्वचितच एखादी बाई स्वतःच्या वजना विषयी आनंदी पाहिली आहे..
एक उदाहरण देते: माझ्या ओळखीची एक मुलगी हेवी आहे. मापात आहे, पण ब्रॉड स्ट्रक्चर आणि त्यामुळे ह्युज दिसते. ती ३-३ तास झुंबा करू शकते ( सर्टिफाईड झुंबा इन्स्क्ट्रक्टर आहे), ती हेवी वस्तू उचलून आरामात चालताना मी पाहिलं आहे, तिच्यात बॅलन्स, स्ट्रेंथ, इन्ड्युरन्स आणि चांगली इम्युनिटी आहे. मध्यंतरी ती सांगत होती - एका काळात तीने बाहेर जाणे सोडलेले, नातेवाईक वा मित्र मैत्रिणींच्यात मिसळणे कमी केलेले कारण लोकां च्या नजरा, काही लोकांच्या तिरकस कॉमेंट्स, इन्सेंसिटिव जोकस.
ही इन्डिकेटिव स्टोरी आहे. जरा जाड असलेल्या प्रत्येकाला लोकांच्या नजरा वा वरच्या प्रमाणे टोमणे झेलावे लागतात, विच आर टोटली अन्कॉल्ड फॉर. तुम्ही फक्त बायकांची गेट टू गेदर्स अटेंड केली तर हा एक बर्यापैकी डि स्कस होणारा (जाड आहे, बारिक आहे, डायेट करतेय, नाही करतेय वगैरे) टॉपिक आहे. डायवर्सिफाईड गृप मधले ऑब्झर्वेशन आहे हे.
दुसरे म्हणजे त्यांचे वजन त्यांचा प्रॉब्लेम.
सिरि यलचा धागा हायजॅक क रायला नको, सो शेवटचे पोस्ट..
चालतं हो नानबा. एवढं नाही
चालतं हो नानबा. एवढं नाही मनाला लाऊन घ्यायचं कोणी. जोवर आपण धडधाकट आहोत तोवर बारिक असो वा जाड काही फरक पडत नाही.. आनंदी रहायचं.. कोणी जाड म्हटलं तरी त्यांच्याकडे लक्ष द्यायचं नाही.. श्वीटू सारखं...
नानबा: माझ्या मते साळवी
नानबा: माझ्या मते साळवी कुटुंबाचा दळभद्रीपणा हा त्यांच्या आर्थिक परिस्थितीमुळे उल्लेखला जात नसून त्यांच्या वैचारिक, बौद्धिक आणि आणि तत्सम एकूणच दिवाळखोरीमुळे तसा संबोधला जातो. आर्थिक परिस्थिती कमकुवत असेल तर लोक काही ना काही मार्ग काढतात. हे मात्र वर्षानुवर्षे ३०० चपात्या करून घर चालवायचा प्रयत्न करतात. ३०० वरून ४०० वर जायचं पण बघत नाहीत. इतर जोड उद्योग करण्याचा विचारच सोडा.
अशी अनेक उदाहरणं आहेत, जी वरच्या चर्चेत मिळतील. पण आता मी ही शिरेल बघणं बंद केलं आहे. त्यामुळे नवीन भर टाकणं शक्य नाही.
rr38>>>>++++ ११११११
rr38>>>>++++ ११११११
rr38 > +१११११११११
rr38 > +१११११११११
खरतर ही सिरीअल सुरु झाली तेव्हा असं वाटलं होतं की कुछ तो अलग दिखाएंगे... केवळ शरीरावरुन मुलींना न जोखता त्यांच्यातल्या ईतर गुणांबद्दल भाष्य असेल, ( झी मराठी कडुन ही अपेक्षा म्हनजे जास्तच झालं म्हणा... ) पण सिरीअल मधे नुसतच जाड पण न बघता गुण बघा असं घोकुन लोक बदलत नाहीत... अन्विता फलटणकर इंस्टा वर ज्या पोस्ट टाकते त्यावरुन तीचा स्वभाव बिंधास्त आहे असं वाटतं.. तिचे खुप फॅन्स आहेत तिथे... तिचे डान्स चे व्हिडिओ बघताना मस्त वाटत.. छान कॅरी करते ती स्वत: ला... ती जर तशीच असेल तर तिला सिरीअल मधे पण तसचं बिन्धास्त दाखवायला हवं होतं... "जाड असले म्हणुन काय झालं मुझमे भी कुछ बात है" असं स्वीटु ला प्रोजेक्ट केलं असतं तर ही सिरेअल मस्त झाली असती .. पण यात उगीच स्वीटु ला सद्गुणाची पुतळी बनवुन,लाजायला वगैरे लावुन नको त्या अँगल ने तिचे क्लोज अप घेउन चॅनेल परत परत हेच सिद्ध करतय की शेवटी दिसणं च महत्वाचं आहे... आणि शरीर च महत्वाचं आहे... मग लोक शिव्या घालणारच.....एका अर्थी बॉडी शेमिंग ला प्रोत्साहन च देतात हे लोक....
स्वीटू ला चांगलं खमकी दाखवुन मग तिने कसं समोरच्याला गप्प केलं हे दाखवलं असतं तर ते जास्त अपील झालं असतं....
उगीच तिला गोड , गुलाबी, गुडी गुडी दाखवलं आणि तेच गंडवलंय...
असो...
किती त्या अपेक्षा करायच्या चॅनेल कडुन... काहीही हं....
सिटु किडण्याप झाली म्हणे.
सिटु किडण्याप झाली म्हणे. फेबुवर बातमी कळली. आता एकता कपुर च्या सिरीलसारखं नवी स्लिमट्रीम सिटु येईल.
श्वीटुला किडनॅप करणारे खरंच
श्वीटुला किडनॅप करणारे खरंच महान असणार यात शंका नाही..!!
श्वीटू झाली का किडनॅप..?
श्वीटू झाली का किडनॅप..?
श्वीटू झाली का किडनॅप..? >>>
श्वीटू झाली का किडनॅप..? >>>>> हो
ओम ला सापडली अन दवाखान्यात
ओम ला सापडली अन दवाखान्यात पोहोचली
खूप सिरीयस आहे म्हणे स्वीटू(सिरिअल मध्ये ह)
ओह... आता दवाखान्यात चुकुन
ओह... आता दवाखान्यात चुकुन वेटलॉसची औषध असलेली सलाईन लावून तिला सडपातळ केली नाही म्हणजे मिळवली.
गेल्या आठवड्यात ५ मिनिटं
गेल्या आठवड्यात ५ मिनिटं पाहिलं तेव्हा ओम्या स्वीटूचं ज्या गाडीतून अपहरण झालेलं त्या गाडीच्या मागावर आलेला. स्वीटू अपहरणर्त्याला मारून पळाली होती. ओम्याने त्याला हलवून हलवून विचारलं, अहो बाहेर उभी आहे ती गाडी तुमची आहे का?
यापुढे बघण्याची इच्छा आणि साहस माझ्यात नाही. या मालिकेचे लेखक, दिग्दर्शक यांना सद्बुद्धी मिळो!
Pages