झी मराठी वर नुकतीच येऊ कशी तशी मी नांदायला ही नवी मालिका सोमवार ते शनिवार रोज रात्री ८ च्या टाईम स्लॉटवर सुरू झाली. मालिकेचं टायटल साँग सुद्धा बरंच बरं जमलंय कि बघताना मिसेस मुख्यमंत्रीच्या ठसकेदार टायटल साँगची आठवण आल्याशिवाय रहात नाही इतकं ते कॉपी झालंय..!
मालिकेतील लिड स्टारकास्ट अगदीच नवीन परंतु चॅलेंजिंग आहे. स्वीटु (अन्विता फलटणकर) आणि ओंकार (शाल्व किंजवडेकर) हे दोघे या मालिकेचे लिड आहेत तर त्यांना साथ द्यायला खंबीर आधारस्तंभ म्हणुन स्वीटुची आई नलू साळवी (दिप्ती केतकर), ओमची आई शकुंतला खानविलकर (शुभांगी गोखले), ओमची बहीण मालविका खानविलकर (आदिती सारंगधर) आहेत. त्याच सोबत स्विटुचे बाबा, काका, काकू, चुलत भाऊ चिन्या हे सर्व साळवी कुटुंबीय दहा बाय बाराच्या हॉल अन सहा बाय सहाच्या किचन या वन आरके मधे रहात आहेत(हेच घर झीमच्या बर्याच सिरियल मधे या आधिही पहायला मिळालेलं आहे..!)
तिकडे खानविलकरांच्या घरात ओमसोबत त्याचे आई-बाबा-बहीण, त्याची होऊ घातलेली इंडो-अमेरिकन बायको, बहिणीचा होऊ घातलेला नवरा (याला या आधी कुठे बघितला आहे हेच आठवत नाही.. ) अन बहिणीचा ऑफिस कम घरातील चमचा/नोकर असे कलाकार आहेत. खानविलकरांचा व्हिला जबरदस्त आहे. त्यांच्या घराची, अंतर्गत सजावटीची अन समस्त खानविलकर कुटुंबियांच्या ड्रेपरीची रंगसंगती ही फिकट रंगससंगतीत आहे ज्यातुन त्यांच्या रहाणीमानावर गडगंज संपत्तीचा अन हाय क्लास जीवनशैलीचा प्रभाव जाणवतो.
सो मिडलक्लास साळवी कुटुंबीय अंबरनाथ मधे रहात आहेत. कर्मदरिद्री स्वभावामुळे आठराविश्व दारिद्र्य हे त्यांच्या पाचवीला पुजलेले असते (कसे ते कालच्या भागात कळाले.. पुढे सांगतोच..!). या कर्मदरिद्री कुटुंबात सर्वांचे खायचे वांधे झालेले असतात पण दोन्ही साळवी जोड्यांची मुले - स्विटू अन चिन्या हे मात्र खात्या-पित्या घरातले ओव्हरवेट वाटावेत असे कसे हे मात्र न सुटलेलं कोडंच आहे. सगळे साळवी स्वभावाने चांगले असतात त्यामुळे त्यांना कशातच वाईटपणा दिसत नसतो. अगदी बिनकामाचे आयुष्य कंठण्यात देखील त्यांना काहीच वाईट वाटत नसतं. स्वीटूच्या बाबांची नोकरी अगदी पहिल्याच भागातच जाते अन ते हताश होऊन दुसर्या नोकरीसाठी कसलेही प्रयत्न न करता नुसते सुतकी चेहर्याने घरी बसुन असतात. त्यांना साथ देणारी नलू ही अंबरनाथमधे चपात्या बनवून विकत असते. स्विटु कुठेतरी थातूर-मातूर नोकरी करत असते अन या दोघींच्या पैशांवर हे सगळे साळवी आयते गिळत असतात. स्विटूचा काका हा एक नंबरचा आळशी अन फाल्तू कामं करणारा इसम असतो (जो कुठल्याही अँगलने अंबरनाथमधे रहणारा मराठी माणुस वाटत नाही - ठार गुज्जु वाटतो..!) ज्याची बायको दम्याचा रोग घेऊन उसउसत जगत असते अन जावेला (नलुला) पडेल ती मदत करण्याची कसरत करत असते. अशा या माठ काका-काकुचा मुलगा चिन्या हा महामाठ असतो अन गुंडांकडून २ लाख रुपये हारलेला असतो. घरात खरेतर हार्पिकची देखील गरज लागु नये अशी गांजलेली परिस्थिती असताना चिन्याच्या उद्योगाला वैतागून घरात सगळे चिंतेत असतात. हाता-तोंडाची गाठ पडण्याचे वांधे झालेल्या साळवींना खानविलकरांच्या कृपेने देव तारायला बघत असतो.
नलूची बालमैत्रीण शकुंतला खानवीलकर ही मोठ्या हेल्थ केअर प्रॉडक्ट उद्योगाची मालकीण असते. हिने देखील नलूसारखाच संसार रेटत मार्गी लावलेला असतो. तिची मुलगी - मालविका ही हाय क्लास सोसायटीची प्रतिनिधी असते अन तिचे विचार शकुला (ती स्वतःच्या आईला ''आई'' असं न म्हणता मिसेस खानविलकर म्हणत असते यावरून त्यांच्या नात्याची कल्पना येऊ शकते..!) आजिबात पटत नसतात. मालविका अजुन अविवाहित असते पण तिचा होऊ घातलेला नवरा - रॉकी कायम तिच्या आगेमागेच असतो अन पडेल ती कामे करत असतो. त्याला जिमचे खूप वेड असते.
नलू-शकु ची मैत्री या दोन कुटुंबियांना जवळ आणते. शाळेत असताना नलूच्या घरची परिस्थिती उत्तम अन शकूच्या घरी खाण्याचे वांधे असतात. काळानुसार परिस्थिती बदलली परंतू दोघींच्या घट्ट मैत्रीत त्या बदललेल्या परिस्थितीचा लवलेशही नाही हे आईसोबत एकदा साळवींच्या घरी आलेला ओम बरोब्बर हेरतो. साळवींच्या दळभद्री आयुष्याची कणव येऊन चांगल्या मनाचा ओम त्यांना चकल्या-शेव-शंकरपाळ्या अस्ल्या ऑर्डरी मिळवून देऊन ४ सुखाचे घास खाऊ घालण्याचे पुण्य पदरात पाडून घेतो. त्याला नलू मावशी अन साळवींबद्दल नितांत आदर असतो.
असा हा ओम्या मनाने अन रुपानेही खरंच खूप चांगला असतो. त्याच्या चांगुलपणावर जाडी अन मनमिळावू स्वीटु भाळते. तिचा सर्वांची काळजी घेणारा, कामसू स्वभाव शकुलाही खूप आवडतो अन ती परिस्थितीने (खरेतर कर्मदरिद्रीपणामुळे) गांजलेल्या साळवींना अजून थोडी मदत व्हावी या हेतुने स्वीटुला 'खानविलकर हेल्थ प्रॉडक्ट्स'च्या बिझनेस युनिट मधे नोकरीला बोलावते. एवढेच नव्हे तर स्वतःच्याच बंगल्यात रहायला सांगते. शकुच्या मुलीला - मालविकेला मात्र हे आवडत नाही अन ती स्विटूला भयंकर पिडू लागते. मालविकेने भावासाठी एक माठ इंडो-अमेरिकन मुलगी (मोमो) शोधलेली असते जिचे पिताश्री एक वेलनोन बिझनेस टायकून अन ६०० करोड की कायशा संपत्तीचे मालक असतात. त्यावर डोळा ठेऊन मालविका ही मोमो-ओम्याची सोयरीक जुळवण्याच्या प्रयत्नात असते अन ती मोमोला सतत सोबत घेऊन तिला काय हवं काय नको याची काळजी घेत असते. तर अशा या इंग्रजाळलेल्या कम भंजाळलेल्या अतार्कीक मोमोची अटेंडंट म्हणुन स्विटूचे वर्णी लागते.
त्यानंतर एकेदिवशी शकू अन ओम्या साळव्यांना थोडा चेंज म्हणुन स्वतःच्या व्हिलात पाहुणचारासाठी बोलावतात. या भेटीत साळाव्यांच्या कर्मदरिद्रीपणाच्या कडक आवरणाखाली खळाळणार्या चांगुलपणाची झलक ओम्याला दिसते. आपल्या कुटुंबियांना शकु मावशीने अन ओम्याने चांगला पाहुणचार दिला हे बघून स्विटूही सुखावते. त्याचवेळी मालविकाला व्हिलाची धर्मशाळा झाल्याचा संताप अनावर होऊन ती साळव्यांना सळो की पळो करून सोडते. साळव्यांना त्यांची जागा दाखवायचा प्रयत्न करते परंतु साळवे इतके इतके नतद्रष्ट असतात की त्यांना त्यांची जागाच माहित नसते . त्यामुळे मालविकेकडून साळवी यथेच्छ सळो-की-पळो करून घेतात . शेवटी हायक्लास असलेल्या ३ मैत्रीणींना बोलावलेल्या जंगी(?) पार्टीत मालविका साळव्यांना अपमानीत करु लागते त्यावेळी लेकीचे प्रताप हताशपणे पहात उभ्या असलेल्या शकूला स्विटूची साथ मिळते अन मालविकेचा डाव तिच्यावरच उलटवत थोड्या विनोदी अंगाने तो कसनुसा प्रसंग अन साळव्यांचा खानविलकर व्हिला मधला स्टे एकदाचा संपतो अन आपणाला हुश्श वाटतं.
खरं सांगायचं तर पहिले काही भाग अतिशय बाळबोध वाटत होते परंतु त्यात पुढील भागांची बिजं खुबीने पेरण्यात दिग्दर्शकाला यश आलं. जाडी स्विटु अन शेलाटा ओम्या यांचं कसं काय बुवा जमणार. कैच्या कै सिरियल दिसते असं वाटत असतानाच स्विटू अन ओम्या आपल्याला आवडू लागतात यात दिग्दर्शन, संवादलेखन अन कॅमेर्याचाही हात आहे.
दिप्ती केतकर यांनी नलूच्या गेटअपवर खरेच खूप कष्ट घेतले आहेत. त्या अगदी नलूच वाटतात इतकं बेअरिंग त्यांनी पकडलं आहे त्याबद्दल त्यांचं विषेश कौतुक..! शुभांगी गोखलेंची शकू देखील अगदी सफाईदार आहे. मालविकेचं कॅरेक्टर लाऊड आहे पण आदिती सारंगधरने ते बरोब्बर साधलं आहे. अन्विता फलटणकर अन शाल्व किंजवडेकरचे स्विटू-ओम्या अगदी पर्फेक्ट आहेत असं जाणवतं याचा अर्थ त्यांची केमिस्ट्री चांगलीच जुळली आहे. झी मराठीवर असं जाडं-शेलाटं प्रकरण पहिल्यांदाच आल्यामुळं काहीतरी नवीन आहे या उत्सुकतेपोटी आपण त्यात गुंतू लागतो. आपल्याप्रमाणे शकूला पण स्विटूच ओम्यासाठी योग्य वाटू लागते जेणेकरून खानविलकरांच्या घराला घरपण देण्यासाठी (डि.एस.कें.च्या घरांना डावलून ) एक चांगली सून मिळेल हे त्यामागचं कारण असतं.
स्विटू अन ओम्याच्या लग्नाचा प्रस्ताव घेऊन शकु अंबरनाथच्या चपातीवाल्या साळव्यांच्या घरी मिठाईचे बॉक्स अन भेटवस्तू घेऊन पोचते. किचन ओट्याशी थांबून अगदी आनंदात शकू-नलू या घट्ट मैत्रीणी स्विटूच्या लग्नाबद्दल सेम पिंच सेम पिंच करत बोलत असतात. नलू-शकूची मैत्री त्या दोघींच्या मुलांना बांधतेय असं वाटत असतानाच कर्मदरिद्री साळव्यांची नलू बावळटासारखी शकूसमोर स्वतःचा फोन धरत त्या फोन मधे कुणा स्थळाचा फोटो दाखवत हे स्थळ स्विटूसाठी किती योग्य आहे ते दाखवते अन ते बघून आपलीही अवस्था शकूसारखी (काय ही नली दलिंदर आहे बघा.. कुबेर शकुच्या रुपाने नलीच्या पदरात आपले धन टाकू पहात आहे अन ह्या कर्मदरिद्री नलीचा पदर फाटका रे बाबा..!!) होते. शकू आवंढा गिळत नलीच्या हो ला हो-हो (हे शुभांगी गोखलेंना नेहमी छानच जमतं ) करत रहाते अन आपण मात्र दळभद्री नलीला लाखोल्या वाहत उद्या पासून नकोच बाबा ही येऊ-कशी-तशी असा विचार करतो खरा पण 'आज काय होणार?' ही उत्सुकता पुन्हा उद्या रात्री ८ वाजता आपली बोटे रिमोटवरील १२०४ हा आकडा दाबून आपला मोर्चा झी मराठीकडेच वळवणार हे माहित असुनही उद्याचा प्रीकॅप बघून झाला की आजच्या पुरतं तरी आपण चॅनेल बदलतो.
अशा या नवीन सिरियल वर चर्चा करण्यासाठी हा धागा थोडा उशिराच उघडला असला तरी सिरियलची खरी सुरुवात तर आजच्या भागापासून होणार आहे
मी ज्या शिव्या मनात देतेय
मी ज्या शिव्या मनात देतेय त्या इथे लिहू शकत नाही. निर्बुद्ध!
ज्या शिव्या मनात देतेय त्या
ज्या शिव्या मनात देतेय त्या इथे लिहू शकत नाही. निर्बुद्ध!>>
अजुनही "फक्त सही करुन, कागदपत्र एकमेकांना देउन" घर नावावर करण्याच्या ट्रॅक चा धक्का मला पचला नाहिये..त्यात आता हे नवीनच>>
महामाठ काका-काकीच्या स्वप्नासाठी दिग्दर्शकाने निर्मात्यांना लग्नाचा एवढा खर्च करायला लावला असेल तर भयंकर कमाल आहे.
तायडा छान दिसत होती
तायडा छान दिसत होती
तायडा छान दिसत होती>> +++१११
तायडा छान दिसत होती>> +++१११
कोणी रात्रीस खेळ चाले३ बघतंय की नाही..? अगदी शेवटचा टाईम स्लॉट दिलाय परंतू झी५ वर बघण्यासारखा नक्कीच आहे. हा सिझन चुकवू नये असा वाटतोय.
कालचा महाएपिसोड न बघुन महा
कालचा महाएपिसोड न बघुन महा शहाणपणा केला मी
मुलीचे वडील गायब आहेत आणि नलीला काय एवढी लग्नाची घाई आहे
स्वीटू फोन उचलत नाही तर माठ
स्वीटू फोन उचलत नाही तर माठ ओम इतर कोणालाही फोन करत नाही.
महत्त्वाच्या दिवशी असं बाहेर
महत्त्वाच्या दिवशी असं बाहेर जातांना सांगून जायची यांच्यात पद्धत नाहीये का ?
हो नं. जरी दादा साळव्यांनी
हो नं. जरी दादा साळव्यांनी सर्वांना आधी सांगितली असतं की ते आत्महत्त्या करायला निघालेत तर खालील पात्रांनी अशी उत्तरं दिली असती -
नली (खालचा ओठ लळत, लाल नाक आणि पिंजारलेल्या केसांनी चेहर्यावर दळभद्रीपणा ओसंडून वाहील इतका आणत) : तुम्ही आजवर आपल्या घरासाठी खूप काही केलंत. आता ही आत्महत्या की काय करणार आहात तीही कराच.. मी तुम्हाला नाही म्हणणार नाही परंतू आपल्या ष्विटूचं लग्न झाल्यावर करा.
ष्विटू (ठ्कळेबाज चेहरा करत) : दादा, आता राहु द्याना आत्महत्या. तुम्ही लग्नात नसाल तर मी लग्नच नाही करणार.
माठ चिन्या (उगिच्च टरक्या डोळ्यानी उत्साहिपणा दाखवत टणाटण उड्या मारत.. पोटावरचं मांदं गदागद हलवत) : दादांना आत्महत्या करण्या साठी डोंगर चढून कड्यावर जाण्याची काहीच गरज नाही.. विनातिकिट ट्रेन मधून जाताना वाशी ब्रिज वरून उडी टाकली तर विनात्रासात अन विनाखर्चात कार्यक्रम होईल.
महामाठ काका (आपला गुजरातीपणा लपवत) : चिन्या म्हणतो ते बरोबर आहे... पण आपण सर्वांनी मिळुन आत्महत्या केली तर नाही का चालणार..?
महामाठ काकी (लाजून तोंडाला बोटं लावत) : इश्श...!!
शकू (अभिनयात टिपरे अॅनेक्स दाखवत) : नाही मी काय म्हणत्ये.. भाओजी म्हणतात ते पटतंय मला. त्यांच्या मनाचाही जरा विचार करायलाच हवा ना आपण सर्वांनी. आत्महत्त्या करण्यात काहीच गैर नाही. परंतु ओम आणि ष्विटूच्या लग्नानंतर केली तर सर्वांनाच त्याचा आनंद लुटता येईल. नाही म्हणजे मला काय म्हणायचं ते कळतंय ना..?? काय गं नलु, बरोबर बोलतिये ना मी..??
रॉकी : दादा एकदम रॉकिंग आहेत.. या वयात असं धाडस फक्त तेच करू शकतात.
मोमो ( अत्यानंदाने उत्साहित होत): मलाह फण दादांसोबत हात्मात्या खरायची आहेय... आय वाँट टू गो विथ हिम ऑन दी हिल फॉर सुसाईड..
ओम्या (कसनुसं दात दाखवत तोंड वेंगाडत) : कम्मॉन... सगळे दादांच्या आत्महत्येवरच बोलणार आहेत की माझ्या अन ष्विटूच्या लग्नाबद्दल तयारी करणार आहेत...? कम्मॉन....
मिस्टर खानविलकर (बटाट्याएवढाल्या डोळ्यांची बुब्बुळं गोल गोल फिरवत) : "..."
मोहित (हळू आवाजात तायडाच्या कानाशी) : मॅडम, हे नक्की काय सुरु आहे..? दादा साळव्यांना मी महत्प्रयासाने तयार केलं होतं सुसाईड साठी.
तायडा (खण्णकन मोहितच्या कानाखाली आवाज काढत अन शक्य तेवढं हळू आवाजात झापत) : युसलेस... तुला कोणी सांगितलं होतं दादा साळवींना आत्महत्या करायला जाताना घरात सर्वांना सांगुन जा म्हणून..?
@dj>> एक नंबर भारी..
@dj>> एक नंबर भारी..
या मालिकेच्या लेखकाकडे एवढं
या मालिकेच्या लेखकाकडे एवढं कल्पना दारिद्रय़ आहे हे वाचून मौज वाटली. डोक्यावर पडलाय अक्षरशः
हे नक्की whatsapp वर viral
हे नक्की whatsapp वर viral होणार
ती सुनबाई ची सिरीअल संपली?
ती सुनबाई ची सिरीअल संपली?
हो... सुनबाई शनिवारी रात्री
हो... सुनबाई शनिवारी रात्री निवर्तली.
ब्रम्ह्यांच्या सिरीयलच पण राम नाम सत्य होणार आहे.
DJ... अगदी परफेक्ट
DJ... अगदी परफेक्ट
... सुनबाई शनिवारी रात्री
... सुनबाई शनिवारी रात्री निवर्तली.
ब्रम्ह्यांच्या सिरीयलच पण राम नाम सत्य होणार आहे >> great news
माठ चिन्या : दादांना
माठ चिन्या : दादांना आत्महत्या करण्या साठी डोंगर चढून कड्यावर जाण्याची काहीच गरज नाही.. विनातिकिट ट्रेन मधून जाताना वाशी ब्रिज वरून उडी टाकली तर विनात्रासात अन विनाखर्चात कार्यक्रम होईल.
Submitted by DJ....... on 23 August, 2021 - 20:07
DJ......., तुम्ही पण तीच चूक करताय जी या सीरिअलचा दिग्दर्शक करतो आहे. अंबरनाथला राहणारे साळवी 'वाशी ब्रिज' वर कशाला जातील?? तुम्हाला 'ठाणे ब्रिज' म्हणायचे आहे का? अंबरनाथ 'सेन्ट्रल लाईन' वर आहे आणि वाशी ब्रिज 'हार्बर लाईन' वर आहे जो नवी मुंबईला, पनवेलला जाताना लागतो!!!
अजुनही "फक्त सही करुन,
अजुनही "फक्त सही करुन, कागदपत्र एकमेकांना देउन" घर नावावर करण्याच्या ट्रॅक चा धक्का मला पचला नाहिये....
त्या घराच्या track वरून आठवले. ते मालविकाने पाठवलेले भाडोत्री गुंड साळवींंचे सामान घराबाहेर फेकून गेल्यावर कचरा काढून, लादी पुसून वगैरे गेले होते का? कारण जेव्हा ओमने त्यांना घर परत मिळवून दिले तेव्हा घर आतून अगदी चकाचक होते, जमिनीवर कागदाचा एकही कपटा नव्हता! जणूकाही एखादा भाडोत्री घर बघायला येणार म्हणून चकाचक केल्यासारखे! आणि कुलुपाची चावी कोणाकडून मिळवली ? त्या भाडोत्री गुंडांचा थांगपत्ता लागला काय???
तुम्हाला 'ठाणे ब्रिज'
तुम्हाला 'ठाणे ब्रिज' म्हणायचे आहे का? अंबरनाथ 'सेन्ट्रल लाईन' वर आहे आणि वाशी ब्रिज 'हार्बर लाईन' वर आहे जो नवी मुंबईला, पनवेलला जाताना लागतो!!!>> हो तेच म्हणायचं होतं मला.. मी तरी कुठे मुंबईचा आहे
Dj
Dj
@डीजे, मस्त पोस्ट.... :-):-):
@डीजे, मस्त पोस्ट.... :-):-):-)
हॉल मधे पोचलेल्या ओम्या ला कोणीही काहीही प्रश्ण विचारले नाहित.....तो दिशाहीन होउन रस्त्यावर भटकायला लागला....लोक लगेच आपापल्या घरी गेले पण... स्वीटु चा गृहप्रवेश खानविलकरांकडेच झाला शेवटी ...मोहित च्या आइने त्यांना घराबाहेर काढ्लं म्हणुन शकु त्यांना घरी घेउन आली आहे....म्हणजे आता मोहित पण कायमचा इथेच राहाणार.....तायडा ने इतका अट्टाहास करुन शेवटी या ना त्या कारणाने स्वीटु तिच्याच नशीबी आहे ..हा हा हा
नली खुपच हुशार झाली आहे.. ओम्या दादा ना सोडायला घरी आला तेव्हा काय झालं असेल ते तिच्या लगेच लक्षात आलं..ओमं कोणासाठी गायब झाला होता ते एकही डायलॉग न बोलता कळलंच तिला एकदम...आणि आता महान ओमकार साहेब नलु कडुन वचन घेणार आहेत की यातलं काहीही स्वीटु ला सांगु नकोस ई ई ई...
कायपण कसं काय लिहितात राव हे लोक ? असले कसले लेखक.......
माझी ७ वर्षांची भाची यापेक्षा छान कथा रचुन सांगत असते आम्हाला
मोहित च्या आइने त्यांना
मोहित च्या आइने त्यांना घराबाहेर काढ्लं म्हणुन शकु त्यांना घरी घेउन आली आहे....म्हणजे आता मोहित पण कायमचा इथेच राहाणार.....तायडा ने इतका अट्टाहास करुन शेवटी या ना त्या कारणाने स्वीटु तिच्याच नशीबी आहे ..हा हा हा>>>
कायपण कसं काय लिहितात राव हे लोक ? असले कसले लेखक.......
माझी ७ वर्षांची भाची यापेक्षा छान कथा रचुन सांगत असते आम्हाला>> अगदी खरंय... त्या शिरेलीच्या प्रॉड्युसर्ला कोणीतरी सांङा... इथे माबोवरील धागा वाचला तरी बरे क्लु मिळतील.. हवं तर इथले आयडी 'वारा'वर लिखाणासाठी ठेवले तरी चांगली कंट्युनिटी मिळून शिरेलीचं आयुक्ष वाढेल
स्वीटू-मोहितच्या लग्नानंतर
स्वीटू-मोहितच्या लग्नानंतर सोशल मीडियावर भन्नाट Memes Viral
https://www.loksatta.com/photos/entertainment-gallery/2574335/marathi-tv...
ओम आणि स्वीटूचं प्रेम हा खरंच
ओम आणि स्वीटूचं प्रेम हा खरंच शाप आहे रच्याकने, प्रचंड लोकप्रिय, तुफान व्हायरल, प्रेक्षकांमध्ये उत्सुकता हे लोकसत्ताचे आवडते शब्द आहेत जे प्रत्येक मालिकेला आणि प्रत्येक कलाकारासाठी वापरले जातात.
स्वीटूला खपवायची एकदाची
स्वीटूला खपवायची एकदाची म्हणुन ओम नाही तर लग्गेच मोहितशी लग्न लावलं नलीने.
मुलीचा कंसेंट वैगेरे काही नाही. जा एकदाची. मुर्खपणाचा कळस.
असं लग्न झाल्यावरही नवरा नवरीला टाटा बायबाय करून निघुन गेले का? कारण मोहितच्या आईने घरात घेतलं नाही हे दळभद्री कुटुंबाला माहितच नाही.
स्वीटुताईपण ओम असो की मोहित, ह्याच घरात रहायला मिळतंय ना, मग आदल्लया दिवशी लग्नाचा तमाशा झालेला असताना ऊठन थालिपीठं थापतेय. दात काढुन मालविकाला शहाणपणा शिकवतेय.
मालविका ओमला शोधु शकत नाही का? घरी आणु शकत नाही का? शकुला आपल्या मुलावर एक पैशाचाही विश्वास नाही?
नलु ओमला घेऊन आली तर शकु एकही शब्द ऐकत नही. ह्याच्यात घडघडा बोलायची मनाई आहे. नली एकदाचं काय ते सांगत नाही. वर स्वीटु दिसल्यावर ईथे कशी कळल्यावर काहीही फरक पडत नाही. ब्याद गेली.
फुकटेगिरीचालुच.
#ज्याकाहीशिव्यायेतातत्या
स्वीटुताईपण ओम असो की मोहित,
स्वीटुताईपण ओम असो की मोहित, ह्याच घरात रहायला मिळतंय ना, मग आदल्लया दिवशी लग्नाचा तमाशा झालेला असताना ऊठन थालिपीठं थापतेय. दात काढुन मालविकाला शहाणपणा शिकवतेय.>>
नली एकदाचं काय ते सांगत नाही. वर स्वीटु दिसल्यावर ईथे कशी कळल्यावर काहीही फरक पडत नाही. ब्याद गेली.>>
खरंय... ब्याद गेली.. आतातरी साळव्यांच्या घरात ८०-८५ किलो पर्यंचा दळभद्रीपणा कमी होईल ही आशा बाळगुया.
नलु ओमला घेऊन आली तर शकु एकही
नलु ओमला घेऊन आली तर शकु एकही शब्द ऐकत नही. ह्याच्यात घडघडा बोलायची मनाई आहे. नली एकदाचं काय ते सांगत नाही. >>
एकमेकांशी घडाघडा न बोलणे या एकाच तत्वावर ही सिरीअल अजुनही उभी आहे ...
खरंय... ब्याद गेली.. आतातरी साळव्यांच्या घरात ८०-८५ किलो पर्यंचा दळभद्रीपणा कमी होईल ही आशा बाळगुया >> हो स्वीटु गेल्यापासुन नली जरा लॉजिकल विचार करते आहे....ओम्या ने काहिही न सांगता तिला ओम्या लग्नातुन कुठे गेलेला हे बरोब्बर कळलं हाच त्याचा पुरावा.
पण साळव्यांच्या घरात आल्या मुळे ओम्या कडे मट्ठपणा करयची जबाबदारी आलेली आहे. त्यामुळे त्याने वचन वगैरे दिलं आहे.
मोहीत ने केलेला अपमान, दुष्टपणा सगळे जणुकाही विसरुनच गेले आहेत .आणि तो स्वीटु ला अगदी सुखात ठेवेल याची सगळ्यांना खात्री आहे........त्यामुळे हे सगळे लोक दळभद्री असण्यासोबत त्यांचा गझनी पण झालेला आहे....
पण साळव्यांच्या घरात आल्या
पण साळव्यांच्या घरात आल्या मुळे ओम्या कडे मट्ठपणा करयची जबाबदारी आलेली आहे. त्यामुळे त्याने वचन वगैरे दिलं आहे.>>
मोहीत ने केलेला अपमान, दुष्टपणा सगळे जणुकाही विसरुनच गेले आहेत .आणि तो स्वीटु ला अगदी सुखात ठेवेल याची सगळ्यांना खात्री आहे........त्यामुळे हे सगळे लोक दळभद्री असण्यासोबत त्यांचा गझनी पण झालेला आहे....>> +१११११
बाकी राहूदे पण ती नलू सारखी
बाकी राहूदे पण ती नलू सारखी तोंड उघडं टाकून बघते ना...तिला कोणी ओळखत असेल तर सांगा..प्लीज, बोलत नसताना तोंड मिटत जा.
https://www.loksatta.com
https://www.loksatta.com/manoranjan-news/priya-marathe-enter-in-yeu-kash...
नवीन पात्राची एन्ट्री होते आहे....त्याच त्याच लोकांबद्दल बोलुन कंटाळा आला होता...आता नवीन कोणीतरी भेटेल
अरे बापरे... प्रिया मराठे..?
अरे बापरे... प्रिया मराठे..? झी च्या स्वभावानुसार प्रसिद्ध कलाकारांना कॅटॅलिस्ट म्हणुन वापरून ४०-५० एपिसोड काम देऊन सिरियल पळवायचे जुने तंत्र वापरणार वाटतं...!!
Pages