४६ वे राष्ट्राध्यक्ष जो बायडन आणि ११७ वी काँग्रेस

Submitted by webmaster on 2 April, 2021 - 12:04

४६ वे राष्ट्राध्यक्ष जो बायडन , ११७ वी काँग्रेस (सध्याची काँग्रेस) आणि अमेरिकेतलं राजकारण

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

**राष्ट्राध्यक्ष कोण आहे, त्यामुळे सामान्य लोकांच्या आयुष्यात फार काही फरक पडतो का कधी?**
जेव्हा म्हातारा जो राष्ट्राध्यक्ष होतो तेव्हा त्याचं दिवशी कॅनडा हून येणाऱ्या गॅस पाईप लाईन चा प्रकल्प रद्द करतो तेव्हा किमान दहा हजार लोकांच्या नोकऱ्या गेल्या. केवळ भ्रमिष्ट जो राष्ट्राध्यक्ष झाल्यामुळे.
म्हातारा जो जेव्हा सीमारेषा खुल्या करतो तेव्हा लाखो बेकायदा घुसखोर दूरदूरच्या देशातून संधी मिळेल तिथून अमेरिकेत घुसतात. सीमारेषेवर राहणाऱ्या लाखो अमेरिकन लोकांचे जिणे असह्य होते. केवळ बाय डन राष्ट्राध्यक्ष झाल्यामुळे.
अफगाणिस्तानातून पाय काढता घेतल्यामुळे अनेक अमेरिकन, अफगाणी लोकांचे जीव धोक्यात आले. अब्जावधी डॉलरची शस्त्रे अतिरेकी लोकांना मिळाली. त्याकरता पैसे देणारे अमेरिकन ह्यांचे पैसे पाण्यात गेले, केवळ म्हाताऱ्या, हेकेखोर जो च्या राष्ट्राध्यक्ष बनाण्यामुळे.
राष्ट्रीय पातळीवर लस सक्तीची केल्यामुळे हजारो, कदाचित लाखो केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या गेल्या, उदरनिर्वाहाचे साधन गेले. हेच लोण राज्यात, खाजगी उद्योगात पसरून तिथेही लाखो लोकांनी नोकऱ्या गमावल्या आणि त्यामुळे जिथे ते नोकरीला होते तिथे टंचाई झाली, कामे ठप्प झाली केवळ अर्धवट जो राष्ट्रपती झाल्यामुळे.
राष्ट्राध्यक्ष अमुक माणूस झाला म्हणून सामान्य लोकांच्या जीवनावर काय परिणाम होतो ह्याची ही उदाहरणे पुरे आहेत का आणखी काही हवी आहेत?

<< जेव्हा म्हातारा जो राष्ट्राध्यक्ष होतो तेव्हा त्याचं दिवशी कॅनडा हून येणाऱ्या गॅस पाईप लाईन चा प्रकल्प रद्द करतो तेव्हा किमान दहा हजार लोकांच्या नोकऱ्या गेल्या. केवळ भ्रमिष्ट जो राष्ट्राध्यक्ष झाल्यामुळे. >>

------- ज्यो बायडेन यांचा गॅस पाईप लाईनला विरोध सर्वांना माहित होता. अध्यक्ष झाल्यावर सर्वात आधी हा प्रकल्प रद्द करण्याचे त्यांनी कितीतरी आधी- अनेक वेळा सांगितले होते. त्याच भुमिकेबद्दल मतदारांनी त्यांना भरभरुन मते दिली होती. आता अध्यक्ष झाल्यावर त्यांनी मतदारांना दिलेले वचन पुर्ण केले.

या निर्णयामुळे दहा हजार (किंवा जास्तही असेल) लोकांच्या नोकर्‍या जाणे हे ओघाने आलेच पण नव्या निर्माण होणार्‍या क्षेत्रात लाखोनी नोकर्‍या तयार होणार आहेच. आज थोडा त्रास जरुर होणार आहे पण झालेच तर त्याचे दुरगामी फायदेच आहेत.

fossil fuel च्या मागे धावण्यात अर्थ नाही. वापर जेव्हढा कमी करता येईल तेव्हढे चांगले. अर्थात एका देशाकडून (अमेरिका) किंवा एका व्यक्तीकडून (बायडेन ) बदल अपेक्षित नाही, प्रत्येकाचे योगदान आवश्यक आहे.

क्लायमेट चेंज आणि त्याचे होणारे परिणाम सर्वांना दिसत आहे. मागच्या वर्षी, जून महिन्यात, लिटन-ब्रिटिश कोलंबिया (Canada) येथे तापमान ४९.६ से. पर्यंत गेले होते, त्याच आठवड्यात तापमानाच्या उच्चांकाचे अनेक नवे विक्रम तयार झालेत. याच वर्षात, wild-fire ने पण दणाका दिला होता, आणि त्याच राज्याला विक्रमी वेळेत मुसळधार पाऊस झोडपतो. महत्वाचे रस्ते दहा ठिकाणी वाहून गेले, पुल कोसळले, आणि भूस्खलनाच्या अनेक घटना घडल्या आहेत. एकाच महिन्यात निव्वळ तापमान वाढीमुळे किमान ६०० जादा मृत्यु ओढवले आहेत. हे सर्व एकाच वर्षात, एका राज्यात घडले आहे.
याचा क्लायमेट चेंजशी संबंध आहे. wild-fire, extreme temp, record temp, record rain, land slide, flooding - याला कुठेतरी आपली जिवनशैली जबाबदार आहे. हे बदलायला हवे.

असे आधी क्वचित घडायचे पण आता त्याची वारंवारता वाढत आहे. कुठल्याही एका नैसर्गिक आपत्तीला क्लायमेट चेंज जबाबदार आहे असे म्हणता येत नसले तरी तसा ट्रेंड स्पष्ट दिसतो आहे.

<< म्हातारा जो जेव्हा सीमारेषा खुल्या करतो तेव्हा लाखो बेकायदा घुसखोर दूरदूरच्या देशातून संधी मिळेल तिथून अमेरिकेत घुसतात. सीमारेषेवर राहणाऱ्या लाखो अमेरिकन लोकांचे जिणे असह्य होते. केवळ बाय डन राष्ट्राध्यक्ष झाल्यामुळे. >>
-------- जो पर्यंत सर्वांना समान संधी मिळणार नाही तो पर्यंत असे प्रकार होत रहातील. त्यांच्या येण्यामुळे तुम्हाला असुरक्षित वाटायला नको. ते आले नाहीत तर तुमची कामे कोण करणार ?

<< अफगाणिस्तानातून पाय काढता घेतल्यामुळे अनेक अमेरिकन, अफगाणी लोकांचे जीव धोक्यात आले. अब्जावधी डॉलरची शस्त्रे अतिरेकी लोकांना मिळाली. त्याकरता पैसे देणारे अमेरिकन ह्यांचे पैसे पाण्यात गेले, केवळ म्हाताऱ्या, हेकेखोर जो च्या राष्ट्राध्यक्ष बनाण्यामुळे. >>
------- अफगाणिस्थानातून माघारीचा निर्णय योग्यच होता... हिंसाचार टाळता आला असता तर चांगले झाले असते.
कधीतरी माघार घ्यावीच लागणार होती, आणि ज्यो बायडेन यांनी धाडस दाखविले त्याबद्दल त्यांचे कौतुकच व्हायला हवे.

<< राष्ट्रीय पातळीवर लस सक्तीची केल्यामुळे हजारो, कदाचित लाखो केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या गेल्या, उदरनिर्वाहाचे साधन गेले. हेच लोण राज्यात, खाजगी उद्योगात पसरून तिथेही लाखो लोकांनी नोकऱ्या गमावल्या आणि त्यामुळे जिथे ते नोकरीला होते तिथे टंचाई झाली, कामे ठप्प झाली केवळ अर्धवट जो राष्ट्रपती झाल्यामुळे. >>
------ सर्वांनी लस घ्यावी या उद्देशाने तसा निर्णय घेणे आवश्यक होते. नोकरी टिकवायची असेल तर लस घ्यावी आणि नोकरी सुरक्षित ठेवावी. लस न घेण्याचे काही ठोस कारण असेल त्यालाही उपाय आहेतच.

गाडी चालवतांना सिट बेल्ट वापरणे आवश्यक आहे अगदी तसेच...

<<राष्ट्राध्यक्ष अमुक माणूस झाला म्हणून सामान्य लोकांच्या जीवनावर काय परिणाम होतो ह्याची ही उदाहरणे पुरे आहेत का आणखी काही हवी आहेत? >>
------- असतील तर जरुर द्या...

>>राष्ट्रीय पातळीवर लस सक्तीची केल्यामुळे हजारो, कदाचित लाखो केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या गेल्या, उदरनिर्वाहाचे साधन गेले. हेच लोण राज्यात, खाजगी उद्योगात पसरून तिथेही लाखो लोकांनी नोकऱ्या गमावल्या आणि त्यामुळे जिथे ते नोकरीला होते तिथे टंचाई झाली, कामे ठप्प झाली केवळ अर्धवट जो राष्ट्रपती झाल्यामुळे.

शेंडेनक्षत्र, तुमची अनेक मते पटत नसली तरीही निदान सेन्सिबल असतात. हे मात्र चुकिचे आहे. मला सिगारेट ओढणे आवडत असेल तर घरी किंवा ऑफिस समोर वगैरे ओढण्याचे स्वातंत्र्य आहेच, पण ऑफिस मध्ये , सिनेमागृहात, वगैरे सिगारेट पेटवली तर मला हाकलून देतील आणी ते योग्यच आहे. कारण असे करून मी इतरंचा जीव धोक्यात घालत आहे. मी ऑफिस मध्ये सिगारेट ओढायला सुरुवात केली आणी कामावरून काढून टाकले की मग फ्रीडम फ्रीडम असा कांगावा केला तर ते चूक आहे. लस न घेता कामावर येणारे लोकही स्व्तः बरोबर इतरांचा जीव धोक्यात घालत असतात

मुद्दा असा आहे की लशीची सक्ती बायडन ने केली. माझा कयास/अंदाज असा आहे की ट्रम्पसारखा रिपब्लिकन सत्तेवर असता तर त्याने अशी सक्ती केली नसती. जरी ट्रम्प स्वतः लस घेतो आणि इतरांना घ्यायची शिफारस करतो तरी त्याने लस घ्या नाहीतर नोकरीतून कटाप असा अतिरेकी तुघलकी नियम लादला नसता. हा मुख्य मुद्दा आहे. वेगवेगळ्या राष्ट्रपतींमुळे सामान्य लोकांवर होणारे परिणाम. कुणीतरी असा दावा केला की असे काही होत नाही ते खोडून काढण्याचा हा प्रयत्न.

आता लशीची सक्ती असावी का नाही. धूम्रपानाचे उदाहरण कितपत बरोबर हे वेगळे मुद्दे आहेत.
करोना होऊन गेला असेल तर नैसर्गिक प्रतिकारशक्ती बनलेली असते तरी लसीची सक्ती का? लस घेतलेल्यांनाही करोना होतोच आहे. मग लसीची सक्ती का? लस ही भविष्यातील तमाम व्हेरियंट पासून रक्षण करते हा दावा पूर्ण खोटा आहे. लस निर्धोक असल्याची ग्वाही लोकांना पुरेशी पटत नाही असे दिसते आहे. लसीमुळे मायो कॉर्डाइटिस, रक्तातल्या गाठी असले प्रकार होत आहेत. काही पूर्वी धडधाकट असणारे लोक हृदयविकाराने मरत आहेत. अशा प्रकारांची आकडेवारी सरकार लोकांपासून लपवते आहे. ओमिक्रोन व्हेरियंट लस घेतलेल्यांना किती होतो आणि न घेतल्याना किती होतो ही आकडेवारी नीट सांगितली जात नाही. लस घेतली नसेल आणि करोना झाला तर तुम्ही मेलातच हे दावेही तद्दन खोटे आहेत.

धूम्रपानाचे उदाहरण साफ चूक आहे. धूम्रपान करण्याला बंदी आहे. इथे शरीरात काहीबाही टोचून घ्यायची सक्ती आहे. जर लस परिणामकारक असेल तर लस न घेतलेले लोक लस घेतलेल्या लोकांना घातक कसे असतील? लस परिणामकारक नसेल तर लशीची सक्ती का?

ज्यो बायडेन यांचा गॅस पाईप लाईनला विरोध सर्वांना माहित होता. अध्यक्ष झाल्यावर सर्वात आधी हा प्रकल्प रद्द करण्याचे त्यांनी कितीतरी आधी- अनेक वेळा सांगितले होते. त्याच भुमिकेबद्दल मतदारांनी त्यांना भरभरुन मते दिली होती. आता अध्यक्ष झाल्यावर त्यांनी मतदारांना दिलेले वचन पुर्ण केले.
<<
मुद्दा असा आहे की राष्ट्रपती कोण आहे ह्यावर सामान्य लोकांचे जीवन बदलत असते. कुणी का राष्ट्रपती होईना आपल्याला काय फरक पडतो हा जो दावा आहे तो अत्यंत बिनबुडाचा आहे हे दाखवण्याचा हा प्रयत्न. बायडन जे काही करतो ते अत्यंत महान, समस्त मानवजातीच्या उत्थानाकरताच केलेले कार्य असते हा आपला दृष्टिकोन आपल्याला लखलाभ असो. पण बहुतेक डेमोक्रॅट लोक मध्यावधी निवडणुकात आपले पानिपत होणार म्हणून चिंताग्रस्त आहेत तेव्हा बायोडनचे काम लोकांना कितपत गौरवास्पद वाटते याविषयी त्यांनाही शंका वाटते हे नमूद करणे इष्ट ठरेल.

**असे आधी क्वचित घडायचे पण आता त्याची वारंवारता वाढत आहे. कुठल्याही एका नैसर्गिक आपत्तीला क्लायमेट चेंज जबाबदार आहे असे म्हणता येत नसले तरी तसा ट्रेंड स्पष्ट दिसतो आहे.**

क्लायमेट चेंज चे नाव घेत लोकांचे आयुष्य बरबाद करणे थांबवले पाहिजे. मुळात हे जे मूर्ख उपाय केले जात आहेत त्याने क्लायमेट चेंज धीमे होत आहे वा थांबत आहे ह्याला कुठलाही पुरावा नाही. मुळात क्लायमेट चेंज चे मॉडेल हे वादातीत नाही. अनेक AOC सारखे अक्षरशत्रू लोक बिनबुडाचे दावे करतात आणि त्यांचे भक्त त्याला ब्रह्मवाक्य मानतात. वर्तमान पिढीला बरबाद करून नातवंडे पतवंडे ह्यांचे भविष्य उज्ज्वल होऊ शकते ह्या दाव्यात काही तथ्य नाही. अमेरिकेने फॉसिल इंधन निर्माण करणे थांबवायचे आणि ऊर्वरित जगणे ते बनवायचे. अमेरिकेने ते चढ्या दराने विकत घ्यायचे आणि क्लायमेट चेंज थांबवला म्हणून आनंदोत्सव करायचा हा बिनडोकपणा आहे.

******जो पर्यंत सर्वांना समान संधी मिळणार नाही तो पर्यंत असे प्रकार होत रहातील. त्यांच्या येण्यामुळे तुम्हाला असुरक्षित वाटायला नको. ते आले नाहीत तर तुमची कामे कोण करणार ?
**अमेरिकेत इमिग्रेशन कायदे आहेत. जर हिम्मत असेल तर ते रद्द करा आणि मग जी काही वाट लावायची आहे देशाची ती लावा. कायदे तसेच ठेवायचे, ते दुर्लक्षित ठेवायचे आणि घुसखोरांना पायघड्या घालायच्या हा शुद्ध हलकटपणा आहे. इतकी मोठी कोरोना साथ आहे असा गवगवा करायचा आणि ह्या घुसखोरांना साधी लशीची सक्तीही नाही हा काय प्रकार आहे?

व्यक्तीश: माझी कामे व्हावीत म्हणून इमिग्रेशन कायदे धुडकावून टाकावेत असे मला कणभरही वाटत नाही. जर असल्या बेलगाम, बेफाट घुसखोरीला थांबवल्यामुळे जर काही माझी गैरसोय होणार असेल तर ती मी आनंदाने सोसेन. काळजी नसावी.

<<<कुणी का राष्ट्रपती होईना आपल्याला काय फरक पडतो हा जो दावा आहे>>>
माझ्यापुरता तरी हा दावा पटला. मला स्वतःला काही फरक पडला नाही ५० वर्षात.
अहो ८ डॉ. घेऊन ५० वर्षांपूर्वी या देशात आलेली माणसे. तेंव्हा कुठे काय माहित होते डेमोक्रॅट नि रिपब्लिकन? जसे असेल त्यातून मार्ग काढायचा. अर्थात् मी एक सामान्य माणूस. माझ्या जवळ पैसे ते किती नि त्याच्यावर कर तो काय, नि त्याने काय फरक पडतो. जेव्हढे पैसे लागतात तेव्हढे मिळवता येतात. तिकडे युनिवर्सल हेल्थ केअर येवो, वा खाजगी इन्श्यू रन्स असो, परवडतो. कुठ्ठे काही कमी नाही. कुठलेहि बेकायदेशीर आलेले घुसखोर किंवा भारतातले लोक माझी नोकरी घेऊ शकले नाहीत, त्यामुळे मला काही फरक पडत नाही.
नि माझ्यासारखे बरेच आहेत - जोपर्यंत स्वतःची काळजी घेण्याची अक्कल आहे तोपर्यंत त्यांना काही फरक पडत नाही डेमोक्रॅट्स जिंकले काय नि रिपब्लिकन. गंमतच झालीये आजकाल तर. उगीचच देशाचे भले वगैरे मोठमोठे शब्द आपले विरंगुळा म्हणून बरे आहेत. त्यासाठी मारामारी करायची गरज नाही.

लशीची सक्ति मला पण आवडली नाही - लस आहे, फुकट आहे, घ्यायची तर घ्या. फार थोड्या गोष्टींमधे केंद्र सरकारने लक्ष घालावे, चांगल्या करता येतील.
न घेऊन तुम्ही आजूबाजूला रोग पसरवता असे झाले तर लोक आपोआपच तुमच्याशी संबंध टाळतील - मग करा धंदा कसा करायचा तो.
नोकरीवर असाल नि तिथे रोग पसरवता असे तुमच्या नोकरी देणार्‍याला वाटले तरी तो तुम्हाला हाकलून देऊ शकतो.
बहुतेक सर्व नोकर्‍या मालकाच्या मर्जीवर असतात. नाहीतर कोर्टात जा. हे कायदे आधीच झालेले आहेत.
लशीची सक्ति करून उगाच गोंधळ करून ठेवला. ज्याची गरज नाही असले प्रश्न निर्माण करून ठेवले. म्हणतात की सरकारने २०००, ४००० रु. दिले, पण त्याने काय खाक फरक पडतो - उगाच दाखवायला.

पण डेमोक्रॅट्स हे असलेच - लोक मूर्ख आहेत, राज्यांचे सरकार मूर्ख आहे, स्वतःलाच काय ते समजते, सगळी सत्ता इथे वॉशिंग्टनमधे पाहिजे!!

मुळात हे संयुक्त संस्थाने आहेत याचे कारणच हे की देश फार मोठा आहे, नाना प्रकारचे लोक, निरनिराळेर धर्म, निरनिराळ्या गरजा. मग दूरवर बसून कसे ठरवायचे सर्वांसाठी कायदे? लोक आहेत, राज्य सरकारे आहेत, काउंटी सरकारे आहेत पुष्कळशा गोष्टी त्यांच्या त्यांना करू द्याव्यात. जर वेड्यासारखे कायदे करून त्या काउंटीचे किंवा राज्य सरकारचे अनहित होऊ लागले तर तिथले लोक आपोआप सरकारे बदलतील, कायदे बदलतील.

आता ज्यांच्या नोकर्‍या होत्या नि जाणार असे कळल्यावर काय करायचे ते नोकर्‍या करणार्‍यांवर अवलंबून. कोणत्य्ता गोष्टीला कितपत महत्व द्यायचे ते जर कळत नसेल तर रडा. कित्येक लोकांनी नोकर्‍या सोडल्या नि दुसरा मार्ग उपजिवीकेसाठी निवडला. सगळेच काही उपाशी पोटी मेले नाहीत.
सतत दुसर्‍याला दोष देण्याची ही जी अमेरिकेतील लोकांची पद्धत आहे ती चांगली नाही.

लोक मूर्ख असतील पण घटनेत असे काही कुठे लिहीले नाही की मूर्ख असू नये. जरी काँग्रेसने असा कायदा केला तरी त्याला सुप्रीम कोर्टात जाता येते. तिथेहि काही जमले नाही तरी इथे मायबोलीवर बोंबाबोंब करून काय उपयोग?

एखाद्या पशुप्रमाणे आहार, भय, निद्रा आणि मैथुन एवढ्याच गरजा असतील तर राजकारण, अर्थकारण, धर्मकारण ह्याचा काही परिणाम होत नाही.
पण ह्याच्या बाहेर काही विचार करता येत असेल तर नक्की फरक पडेल.
राष्ट्रपती कोण आहे, तो कसे कायदे करतो, बदलतो, परकीय धोरणे काय आहेत ह्याचा अगदी नक्की परिणाम होत असतो.
उदा. जो बाबाने सत्तेवर येताच पाकिस्तानला अब्जावधी डॉलरची मदत देणे पुन्हा सुरू केले. अफगाणिस्तान अमाप शस्त्रांसहित तालिबानच्या हवाली केला. म्हणजे भारताची डोकेदुखी सुरू होणार. थंडी संपताच काश्मीर मध्ये अतिरेकी घुसणे सुरू होणार. ह्या सगळ्याचा भारतावर परिणाम होणार. ज्यांचे नातेवाईक, उद्योग धंदे,मालमत्ता भारतात आहे त्यांनाही त्रास होणार.
हे सूर्यप्रकाशाइतके स्वच्छ आहे.

चार वर्षे रिपब्लिकन लोकांकडे सत्ता होती. पैकी पहिली दोन वर्षे हाउस, सिनेट प्रेसिडेन्सी सगळे रिपब्लिकन. चार वर्षे जगातील न भूतो न भविष्यति असा ग्रेट राष्ट्राध्यक्ष (त्यांचेच शब्द, माझे नव्हेत) त्यांनी जो उजेड पाडला त्यामुळे आता हाउस सिनेट प्रेसिडेन्सी सगळे डेमोक्रॅट्स कडे गेले.
८ वर्षे बुशला दिली - सुटला का इराक, अफघानिस्तानचा प्रश्न. लोक कंटाळले शेवटी, बारा वर्षे रेगन, बुशकडे सत्ता होती. इम्मिग्रेशनचा प्रश्न सुटला का? नाहीच.
त्यांना तरी कसे सोडवता येतील हे प्रश्न? अर्ध्याहून अधिक वेळ नुसत्या दुसर्‍याला शिव्या देण्यात जातो. सात वर्षे कोकलले ओबामाकेअर विरुद्ध - वाटले सत्ता हाती आली की लगेच एखादा चांगला मार्ग शोधून काढतील. कसले काय नि कसले काय? नुसते शब्दांचे बुडबुडे.
काही फरक पडत नाही हो. हे लोक फक्त पुनः निवडून येण्यासाठी सत्तेवर येतात, नि पैसे कमावतात. जमेल तितके दिवस मजा नाहीतर परत घरी.
कुणालाहि हे प्रश्न सोडवण्याचा मार्ग माहित नाही, एकत्र येऊन विचार करण्याची इच्छा नाही! काही फरक पडणार नाही.

<<<पशुप्रमाणे आहार, भय, निद्रा आणि मैथुन एवढ्याच गरजा असतील >>

ज्ञानार्जन, शांततापूर्ण जीवन याही गरजा आहेत. राजकारणातच पडायला पाहिजे असे नाही. विशेषतः राजकारणच काय, इतर काही आडवे आले तरी त्यातून मार्ग काढून आपले आयुष्य आनंदात व्यतीत करता येते. त्यातून राजकारण तर अगदीच फालतू लोकांचा उद्योग -़काही करणे ना सवरणे, फुकटची बोंबाबोंब!
एक पक्ष सत्तेवर येतो, काहीतरी करून ठेवतो, ते निस्तरायला दुसरा पक्ष येतो, तो इतर घोटाळे करून ठेवतो. दोन्ही पक्षाचे लोक सत्तेवर येऊन पैसा कमावतात. हे असेच चालायचे. राजकारणाने प्रश्न सुटत नाहीत.

**शांततापूर्ण जीवन?**
जर गुन्हेगारांना संरक्षण देणे, त्यांना शून्य पैसे घेऊन जामीन देऊन मोकाट सोडणे म्हणजे ते पुन्हा गुन्हे करतील, पोलिसांवरील खर्च कमी करणे आणि पोलीस दल खच्ची किंवा दुबळे करणे, बेकायदा घुसखोरांना कुठलीही शहानिशा न करता देशात आणणे, त्यांना समस्त सोयी सुविधा पुरवणे, मतदानाचा हक्क देणे. हे सगळे डेमोक्रॅट करत आहेत. ह्याने शांततापूर्ण जीवनाला बाधा येत नाही का?
शिकागो, सॅन फ्रांसिस्को , सिएटल , पोर्टलॅंड , ओकलंड असल्या अनेक शहरात जो गुन्ह्याचा बुजबुजाट झालेला आहे तो ह्या धोरणांमुळे. सगळे पापभिरू नागरिक ह्या प्रकाराला वैतागलेले आहेत. जी आपल्याला फुकटची बोंबाबोंब वाटते त्याला काही लोक जागरूक नागरिक, जागरूक मतदार म्हणतात.
आपण जे एक मत बाळगतो ते विचारपूर्वक द्यावे असे नागरिक शास्त्र सांगते. लोकशाहीचे मूलभूत तत्त्व हेच आहे की नागरिकांचा सहभाग.
वयानुरूप आपल्याला निर्लेप, स्थितप्रद्न्य वृत्ती आलेली असली तरी ते सगळ्यांनी अवलंबणे लोकशाहीकरता हितकारक नाही.
निदान एका पक्षाची एकाधिकारशाही टिकू ना देणे म्हणून सत्ताबदल करणे महत्त्वाचे आहे.

**ज्ञानार्जन ? ***
क्रिटिकल रेस थियरी, डायव्हर्सिटी, क्लायमेट क्रायसिस ह्या नावांखाली डेमोक्रॅट पक्षाने शिक्षण क्षेत्रात जो नंगानाच चालवला आहे त्यातून विज्ञान, गणित, भाषा हे मूलभूत घटक ("वर्णद्वेष्टे" असल्यामुळे) शिक्षणातून हद्दपार होऊन तिथे श्वेतवर्ण कसे वाईट, समलिंगी, उभयलिंगी, बहुलिंगी वगैरे साग्रसंगीत प्रकार अगदी बालवाडीपासून शिकवणे हे चालू झाले आहे. प्रसाधन गृहे मुलामुलींची वेगळी असली तरी कुणी विकृत मुलगा स्वतःला मुलगी म्हणवतो आणि मुलींच्या प्रसाधनघरात जाऊन तिथे बलात्कार करतो आणि ह्या प्रकारन्वर शाळा पांघरून घालते हेही प्रकार झाले आहेत.
अर्थात राष्ट्रपती कोण ह्यावर ज्ञानार्जनाचाही दर्जा ठरतो.

<< आता लशीची सक्ती असावी का नाही. धूम्रपानाचे उदाहरण कितपत बरोबर हे वेगळे मुद्दे आहेत.
करोना होऊन गेला असेल तर नैसर्गिक प्रतिकारशक्ती बनलेली असते तरी लसीची सक्ती का? लस घेतलेल्यांनाही करोना होतोच आहे. मग लसीची सक्ती का? लस ही भविष्यातील तमाम व्हेरियंट पासून रक्षण करते हा दावा पूर्ण खोटा आहे. लस निर्धोक असल्याची ग्वाही लोकांना पुरेशी पटत नाही असे दिसते आहे. लसीमुळे मायो कॉर्डाइटिस, रक्तातल्या गाठी असले प्रकार होत आहेत. काही पूर्वी धडधाकट असणारे लोक हृदयविकाराने मरत आहेत. अशा प्रकारांची आकडेवारी सरकार लोकांपासून लपवते आहे. ओमिक्रोन व्हेरियंट लस घेतलेल्यांना किती होतो आणि न घेतल्याना किती होतो ही आकडेवारी नीट सांगितली जात नाही. लस घेतली नसेल आणि करोना झाला तर तुम्ही मेलातच हे दावेही तद्दन खोटे आहेत. >>

-------- लस प्रकाराबद्दल खूप गैरसमज आहेत. कोरोना झालेल्या व्यक्तीला तो पुन्हा होण्याची शक्यता असतेच. ज्याप्रमाणे seasonal flu/ influenza मागच्या वर्षी झाला पण या वर्षी पण अनेकांना होण्याची शक्यता असतेच अगदी तसेच. आणि लस घेतली आहे म्हणजे कोरोनापासून १०० % सुरक्षित आहात असा दावा कुणीही करत नाही. लस घेतलेल्या लोकांमधे हॉस्पिटल मधे भरती होण्याचे, पुढे ICU मधे जाण्याचे आणि दगावण्याचे प्रमाण लस न घेणार्‍या लोकांपेक्षा कमी आहे.

दोन डोस घेतले आहेत याचा अर्थ कोरोना होणारच नाही असे नाही. पण जर कोरोना झालाच तर डोस घेतलेल्या व्यक्तीची वाचायची शक्यता डोस न घेतलेल्या व्यक्तीपेक्षा 'तुलनेने' जास्त आहे एव्हढेच. ICU मधे जाण्याचे प्रमाण डोस घेतलेल्यांमधे नक्की कमी आहे.
Vaccine efficacy/effectiveness परिणामकारकता आकडेवारी वरुन स्पष्ट दिसत आहे.
जगातल्या सर्व लोकांना अजूनही Vaccine मिळत नाही हाच मोठा चिंतेचा विषय आहे.

ओमिक्रॉन खूप कमी वेळात झपाट्याने पसरत आहे. तो होणे, झालेला आहे हे कळणे, त्यापासून बरे होण्याची प्रक्रिया एव्हढी वेगांत आहे कि खरे आकडे मिळणे जवळपास अशक्य आहे. दहा पैकी दोन लोक टेस्टिंग जात असतील तरी खूप आहे. (बरे झाल्यावर टेस्टिंग करण्याचा उत्साह किती लोकांकडे असतो? :स्मित:).

सरकार आणि त्यांचे प्रतिनिधी खोटानाटा प्रचार करत आहेत.
एकदा कोविड होऊन गेलेला असताना निर्माण होणारी प्रतिकारशक्ती आणि लस घेतल्याने होणारी प्रतिकारशक्ती ह्यात फरक आहे आणि लशीतून मिळणारी प्रतिकारशक्ती जास्त आहे ह्याला काय आधार आहे?
मुळात कोविड हा इतका जीवघेणा आजार आहे का? हळूहळू असे उघडकीस येत आहे की कोविड मध्ये मेलेल्या लोकांची आकडेवारी वारेमाप फुगवलेली आहे. अन्य कारणाने, रोगाने एखादा पेशंट दगावला आणि तो कोविड पोसिटिव्ह असेल तर तो कोविड ने मेला असे मोजायचे. लहान मुलांच्या बाबतीत असे फार जास्त केले गेले आहे. ७५% मेलेले लोक ह्यांना अन्य व्याधी होत्या असे आकडेवारी सांगते. म्हणजे एका प्रकारे ह्या रोगाचा बागुलबुवा केला गेला आहे. लस न घेतलेल्या व्यक्तीला कोविड झाला म्हणजे हमखास मृत्यूच ठरलेला असे खोटे मिथक पसरवले गेले आहे. फक्त लस घेतली असेलच तर जीव वाचेल नाहीतर तुम्ही मेलात असेच समजा हा अपप्रचार फार केला जात आहे.
धूम्रपान आणि लस ह्यातला मोठा फरक म्हणजे अमुक एक जागी धुम्रपानाला बंदी असेल तर ती व्यक्ती तिथे धूम्रपान करणार नाही. अन्यत्र जाऊन करेल. मात्र लस एकदा टोचली की टोचली. घरी आल्यानंतर लस अंगातून काढून टाकता येत नाही. घेतली की घेतली. ओमिक्रोन चाही असाच बागुलबुवा केला जात आहे. अगदी दक्षिण आफ्रिकेत जिथे लसीचे प्रमाण कमी आहे तिथेही हा विकार सौम्य रूपात होता. केवळ झपाट्याने पसरतो म्हणून बोंबाबोंब आणि घाबरवून टाकणाऱ्या हेडलाईन्स!

वॅक्सिन मुळे अनेक रोगांवर आपण मात केली आहे.
https://www.cdc.gov/vaccines/parents/diseases/forgot-14-diseases.html

कोविड मुळे मृत्युंच्या आकडेवारी मधे अचुकता नसेल , त्यात काही त्रुटी असतील हे मान्य. मृत्यु कोविडमुळे झालेला आहे आणि नैसर्गिक मृत्यु म्हणून नोंद असेही प्रकार झालेले आहेत. सर्वांनाच डॉक्टर, दवाखाना, बेड, ICU, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर अशा सुविधा मिळत नाही. कोविडमुळे बरे झालेले आणि घरी आल्यावर 'हार्ट अटॅक' किंवा किडनी विकाराने झालेले मृत्यु यांची नोंद काय म्हणून करणार?

कोविड झाल्यामुळेच इतर भागांवर परिणाम होतात - मागच्या दोन वर्षात आपण बरिच प्रगती केली असली तरी अजुनही आपल्याला या व्हायरस बद्दल पुर्ण आकलन व्हायचे आहे.

<< एकदा कोविड होऊन गेलेला असताना निर्माण होणारी प्रतिकारशक्ती आणि लस घेतल्याने होणारी प्रतिकारशक्ती ह्यात फरक आहे आणि लशीतून मिळणारी प्रतिकारशक्ती जास्त आहे ह्याला काय आधार आहे? >>
------ एकदा कोविड होऊन गेलेला असतांना... यासाठी कोविड व्हायला हवा, आणि त्यातून जिव वाचायला हवा हे गृहित धरले आहे. आज पर्यंत कोविडमुळे ५५ लाख लोकांचे मृत्यु झालेले आहेत. या पेक्षाही जास्त संख्या असेल.

लस घेतल्याने मृत्यु चे प्रमाण अगदीच नगण्य आहे, पण त्याने रोगाला प्रतिकार करण्याची शक्ती हमखास वाढते ( vaccine effectiveness ).

मुळात कोविड हा इतका जीवघेणा आजार आहे का? हळूहळू असे उघडकीस येत आहे की कोविड मध्ये मेलेल्या लोकांची आकडेवारी वारेमाप फुगवलेली आहे. अन्य कारणाने, रोगाने एखादा पेशंट दगावला आणि तो कोविड पोसिटिव्ह असेल तर तो कोविड ने मेला असे मोजायचे. लहान मुलांच्या बाबतीत असे फार जास्त केले गेले आहे. ७५% मेलेले लोक ह्यांना अन्य व्याधी होत्या असे आकडेवारी सांगते. म्हणजे एका प्रकारे ह्या रोगाचा बागुलबुवा केला गेला आहे. लस न घेतलेल्या व्यक्तीला कोविड झाला म्हणजे हमखास मृत्यूच ठरलेला असे खोटे मिथक पसरवले गेले आहे. फक्त लस घेतली असेलच तर जीव वाचेल नाहीतर तुम्ही मेलात असेच समजा हा अपप्रचार फार केला जात आहे.

अल्बर्टा या राज्यातली आकडेवारी आहे , पण ट्रेंड सगळीकडेच सारखा आहे. शुन्य, एक, दोन डोस आणि दवाखन्यात भरती होण्याचे प्रमाण दिले आहे. या भरती झालेल्यांमधून काही % ICU मधे जातात.

https://www.cbc.ca/news/canada/calgary/alberta-severe-outcomes-covid-vac...

लस घेतल्यामुळे होणारे दुष्परिणाम, हृदयविकार, रक्तातील गाठी ह्यांचे काय? ही आकडेवारी लपवून ठेवतात. लस घेतलेला व्यक्ती मेला तर त्याचे लस घेणे बातमी तून हमखास वगळता त. पण जर लस न घेतलेला असेल तर कर्णकटू मथळे दिले जातात.
लशीचे दुष्परिणाम कुणी ट्विटर वा अन्य सोशल माध्यमांवर सांगितले तर त्याची व्यवस्थित गळचेपी होते. ह्यातून लोकांचा संशय का बळवणार नाही?

इथल्या काही पोस्ट्स वाचताना क्विनॉन/न्युजमॅक्स पसरवत/ बरळत असलेल्या भंकसपणाचा पगडा ती पोस्ट्स लिहीणार्‍यांवर किती जबरदस्त बसलेला आहे व त्या भंकस प्रचाराने ती पोस्ट्स लिहीणार्‍यांचा कसा पुर्णपणे ब्रेनवॉश झालेला आहे असे प्रकर्षाने जाणवते. तिच गलिच्छ भाषा, तेच डिसक्रेडिट केलेले मुद्दे व अगदी त्याच पँडेमिक/ कोव्हिड व्हॅक्सिन बाबतच्या क्विक्झॉटिक थिअरीज! धन्य! निवडणुक हरले म्हणुन किती थयथयाट करायचा?

<<<शांततापूर्ण जीवनाला बाधा येत नाही का?>>>
अहो गेल्या ५० वर्षात दोन्ही पक्षांचे राष्ट्राध्यक्ष, काँग्रेसमधे बहुमत सर्व काही होऊन गेले, बरेच काही काही केले, दुर्लक्षिले, कश्शाचा काहीहि फरक पडला नाही. आता रिपब्लिकन फारच चवताळले आहेत, नि ते हरले म्हणून ओरडताहेत. उद्या डेमोक्रॅट्स हरले तर तेहि तेच करतील. दोघेहि पैसे कमावतील. आपण बसू इथे ओरडत!

<<<क्रिटिकल रेस थियरी, डायव्हर्सिटी, क्लायमेट क्रायसिस>>>
इतर विषय माहित नाहीत तुम्हाला.
एकूणच शिक्षणाबद्दल, हेल्थ केअर बद्दल रिपब्लिकन उदास. सरकारने काही मदत करू नये, सर्व गोष्टींकडून पैशाच्या दृष्टीने पहायचे, मग हेल्थ केअर धंदा, शिक्षण धंदा. असू दे. मला काही फरक पडत नाही.
<<<सरकार आणि त्यांचे प्रतिनिधी खोटानाटा प्रचार करत आहेत.>>>
मागच्या सरकारबद्दल डेमोक्रॅट्स हि हेच म्हणत होते!
जरा वर्जॅनलिटी दाखवा की!

माझ्या जवळ एक पाच पानी डॉक्युमेंट आहे - ट्रंपने केलेल्या गोष्टी. इथे कुणी ट्रंपवाले असतील तर पाठवतो.
विशेषतः त्याने इस्राईल मधील अमेरिकन एम्बॅसी कुठून तरी कुठे तरी दुसरीकडे नेली याचा माझ्या जीवनावर आमूलाग्र फरक झाला आहे!!
पन्नास वर्षे एकस्च ध्यास - एम्बॅसी बदला. एकट्या ट्रंपने केले. एव्हढ्या एकाच गोष्टीबद्दल त्याला व त्याच्या वंशजांना तहाहयात राज्यपद द्यावे!!

<<<एकदा कोविड होऊन गेलेला असताना निर्माण होणारी प्रतिकारशक्ती आणि लस घेतल्याने होणारी प्रतिकारशक्ती ह्यात फरक आहे आणि लशीतून मिळणारी प्रतिकारशक्ती जास्त आहे ह्याला काय आधार आहे?>>>
अहो या गोष्टी इथे काय विचारता. इथे लिहिणार्‍यांवर तुमचा विश्वास नाही. मग कशाला विचारता? आणि सरकारवर हि विश्वास नाही!

उद्या उगवत्या सूर्या कडे बोट दाखवून डेमोक्रॅट्स म्हणाले ही पूर्व दिशा तरी हे इतका आरडाओरडा करतील - काय पुरावा आहे हीच पूर्व दिशा? तुम्ही डिक्टेटर आहत - मी म्हणीन ती पूर्व दिशा.
किंवा मार्जरी ग्रिन टेलर म्हणेल .........
कुणास ठाउक ती काय म्हणेल? त्या लोकांचा भरोसा नाही काय म्हणतील.

**
इथल्या काही पोस्ट्स वाचताना क्विनॉन/न्युजमॅक्स पसरवत/ बरळत असलेल्या भंकसपणाचा पगडा ती पोस्ट्स लिहीणार्‍यांवर किती जबरदस्त बसलेला आहे व त्या भंकस प्रचाराने ती पोस्ट्स लिहीणार्‍यांचा कसा पुर्णपणे ब्रेनवॉश झालेला आहे असे प्रकर्षाने जाणवते. तिच गलिच्छ भाषा, तेच डिसक्रेडिट केलेले मुद्दे व अगदी त्याच पँडेमिक/ कोव्हिड व्हॅक्सिन बाबतच्या क्विक्झॉटिक थिअरीज! धन्य! निवडणुक हरले म्हणुन किती थयथयाट करायचा?
**
कुठल्याही मुद्द्याला मुद्याने उत्तर न देता त्याला तुच्छ समजणे, शिव्या घालणे, ब्रेनवॉश इ. ठरवणे, अकारण बिनबुडाची शेरेबाजी ह्यालाच थयथयाट, आकांडतांडव म्हणतात. मुद्दे नसले की लोक अशा हीन पातळीवर येऊन बोलतात असा अनुभव आहे.

>>अहो या गोष्टी इथे काय विचारता. इथे लिहिणार्‍यांवर तुमचा विश्वास नाही. मग कशाला विचारता? आणि सरकारवर हि विश्वास नाही!
<<
पुरावे मिळाल्यावर ठरवू विश्वास ठेवायचा का नाही. फायजर ने पुरस्कृत केलेले संशोधन असेल तर विश्वास का ठेवायचा? उगाच मनकवडे असल्याचा आव आणून आमच्या मनात काय आहे ते ओळखायचा प्रयत्न करू नका. आपण डेमॉक्रॅट सरकार जे सांगेल ते डोळे मिटून स्वीकारणार असलात तर आपल्याला ते स्वातंत्र्य आहेच. पुरावा तावून सुलाखून घ्यायचे आमचे स्वातंत्र्य अबाधित ठेवा म्हणजे झाले.

बाय्डन सत्तेत आल्यापासून बेबंद बेकायदा घुसखोरी आणि त्यातून होणार्या समस्या.
मोठ्या शहरात पोलिस खात्याला कात्री लावल्याने आणि बेलगाम जामीन देण्याचे धोरण ह्यामुळे वाढलेली गुन्हेगारी हे रिपब्लिकन लोकांच्या खेळ आहेत असे वाटत असल्यास त्या शहरात रहाणार्‍या लोकांशी बोलून पहा. सीमेलगतच्या गावात रहाणार्‍या लोकांशी बोलून पहा.
कुठलाही पक्ष हा कायम बरोबर वा कायम चूक नसतो. जागरुक मतदाराने परिस्थिती पाहून ते ठरवायचे असते.
उद्या रिपब्लिकन सत्तेत आले आणि उत्क्रांती न शिकवता आदम आणि इव्ह च्या गोष्टी सगळ्या अमेरिकेतील शाळात शिकवाव्यात असे म्हणू लागले तर माझा त्याला विरोधच असेल. सी आर टी ह्या बिनडोक प्रकाराला आहे तितकाच.
नोव्हेंबरची आतुरतेने वाट पहात आहे!

<<<सगळे पापभिरू नागरिक ह्या प्रकाराला वैतागलेले आहेत. >>>
बहुतेक या वैतागलेल्या पापभिरू नगरिकांचे अमेरिकेत काही चालले नाही. विरुद्ध पक्षाचे लोकच बहुमताने निवडून आले.
म्हणजे अमेरिकेत पापभिरू लोक कमी व बाकीचे जास्त.
किंवा निवडणूकांमधे काहीतरी बेकायदेशीरपणे घडले. आता पन्नासाहून अधिक कोर्टांमधे सिद्ध झाले की तसे काही नाही तरी पण तोच मुद्दा धरून भांडायचे याला काय म्हणावे? कोर्टावर विश्वास नाही, निवडणूक अधिकार्‍यांवर विश्वास नाही कश्शा कश्शावर विश्वास नाही - जे मनाला येईल तेच खरे धरून भांडत बसायचे. फॉसी जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ आहे, त्याच्या सांगण्यावर विश्वास नाही. म्हणून सरसकट विरोध. त्याचा मुद्दा तुम्ही खोडून काढत का नाही? तुम्हीहि लिहा लेख शास्त्रीय मासिकात, बघू किती लोक तुम्हाला खरे मानतात.
मार्जोरीत्टेलर ग्रीन म्हणते ज्यूविश लोकांनी लेसर गन घेऊन सँटा क्लॉजला शूट केले. आता हा मुद्दा खोडायचा कसा.

<<<डेमॉक्रॅट सरकार जे सांगेल ते डोळे मिटून>>>
असे काही नाही काही. स्वतःची अक्कल, स्वतःचा विचार असे काही असतेच!! ज्याची त्याची कारणे निराळी.
म्हणून तर लोक कधी ट्रंपला मते देतात नि नंतर बायडेनला. ट्रंपला मते देणास्रे मूर्ख, डोळे मिटून विश्वास ठेवतात म्हंटले तर राग येतो, मग इतरांनाहि तसेच म्हणायचे का? डोळे मिटून विश्वास ठेवतात म्हणे.
डोळे मिटून ऐकणारे लोक दोन्ही पक्षात आहेत - कधी एक पक्ष निवडून येतो, कधी दुसरा, मग बसतात एकमेकांना शिव्या देत.

Pages