Submitted by मी फुलराणी on 4 January, 2022 - 03:41
साधारण ३ महिन्यांपासून माझी lower back आणि उजवीकडचा पोटाचा भाग, पाय आणि मांडी मध्ये वेदना (स्ट्रेस) जाणवते. पाय मुडपून बसले कि उजवा पाय आणि गुडघा दुखतो. वजन जास्त आहे. उंची ४.१० नि वजन ६५ आहे. एका आयुर्वेदिक डॉक ला दाखवलं तिने वजनामुळे होतंय अस सांगितलं. पण वजन जास्त असल्यास एकच बाजू जास्त दुखू शकते का?
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
एक वेगळाच प्रश्न विचारीत आहे.
एक वेगळाच प्रश्न विचारीत आहे. अवांतरासाठी क्षमस्व.
इथे सदस्यांशी e mail वरून संपर्क साधण्याची सुविधा अजूनही अस्तित्वात आहे का? निकड आहे म्हणून ह्या चालत्या धाग्यावर लिहिले.
आणखी काही लिहणार नाही. योग्य
आणखी काही लिहणार नाही. योग्य सर्च दिले आहेत. आपण इथे फक्त शक्यताच वर्तवतो.
मलाही नवीन काहीतरी शिकायला
मलाही नवीन काहीतरी शिकायला मिळेल असे वाटते.
<<
किडनी बरोबर काम न केल्यामुळे रक्तात वाढते ते .
<<
कुणी?
किडनी बरोबर काम न करता एकट्याने केले तर काय होते?
"येतो धावून" असे ऐकून घाबरलो.
घाबरू नका. मी फक्त माझ्यावरच
घाबरू नका. मी फक्त माझ्यावरच प्रयोग करतो!
<<बाकी डॉक्टरांकडे जाच.
<<बाकी डॉक्टरांकडे जाच.

Submitted by Srd on 4 January, 2022 - 19:25 >> यातील शेवटला शब्द क्रियापदाचे रूप आहे की नाम?
आता आपण अवांतर धागा काढायचा
आता आपण अवांतर धागा काढायचा का?
माबो वर पण trolling होतं का
माबो वर पण trolling होतं का असं ?
अहो Srd ती फक्त शब्दवरील कोटी
अहो Srd ती फक्त शब्दवरील कोटी आहे. अमोनिया - NH3 अपघात सारखी. मला वाटले तुम्हीही हसाल.
फुलराणी ताई, तुम्ही डॉक कडे जाऊन आल्यावर काय निदान केले अथवा काय काय रूल आउट केले त्यांनी इथे लिहा. इथे तुम्हाला चांगले सल्ले मिळतील.
लौकर ठीक होण्यास शुभेच्छा.
मी जाऊन आले डॉक्टर कडे. नस
मी जाऊन आले डॉक्टर कडे. नस दबली गेली आहे पण खूप कमी प्रमाणात आहे त्यामुळे काही व्यायाम प्रकार सांगितले आहेत. कॅल्शिअम आणि व्हिटॅमिन डी च्या गोळ्या दिल्या आहेत. पेनकिलर पण आहे १० दिवस घ्यायची आहे ती. माझं काम पण खूप वेळ बसून करायचं आहे आणि घरून काम करत असल्यामुळे खुर्ची प्रॉपर असायला हवी म्हणाले. माझ्याकडे आहे ती जरा हार्ड आहे. मागे टेकायला उशी घेतली कि खूप गरम होत म्हणून मी तशीच बसायचे. पाय खाली टेकत नाहीत तर पाय रेस्ट करायला खाली छोटा स्टूल घ्या हे पण सांगितलं. पोश्चर करेक्ट ठेवा कायम, ब्रेक घ्या अफ्टर २० मिन हे सल्ले दिले. वजन कमी करा त्याला काही पर्याय नाही. हा फुकटचा सल्ला पण दिला
ह्या धाग्यावर प्रतिक्रिया दिलेल्या सगळ्यांचे अगदी मनापासून आभार.
माझ्या ओळखीच्या स्त्री ला हा
माझ्या ओळखीच्या स्त्री ला हा त्रास होता पाय दुखण, पाय सुजणे .कमरेत दुखणे .
त्रास तसा जुनाच होता पण उपचार केले की दुखणे बंद होत असे..
म्हणून spl हाडांच्या डॉक्टर ना दाखवले त्यांनी वाकून उभे राहायला सांगून x ray काढला आणि x रिपोर्ट बघून ऑपरेशन करण्याचा सल्ला दिलं
मनक्यात अंतर पडले आहे. रॉड टाकावा लागेल ऑपरेशन करून असा सल्ला दिला.
म्हणून दुसऱ्या डॉक्टर चा सल्ला घेतला त्यांनी x ray काढला आणि.
ऑपरेशन ची गरज नाही मनका तुटला तर च ऑपरेशन केले जाते असा सल्ला दिला.
वजन लावून हळू हळू त्रास कमी होईल .तेवढेच करा असे सांगितले.
माझा स्वतःचा अनुभव.
माझा स्वतःचा अनुभव.
ह्या नस दबने हा काय प्रकार असतो त्या विषयी.
नस दबणे म्हणजे ,नस सरकणे म्हणजे काय हे अजून तरी माझ्या डोक्यात घुसत नाही.
उन्हाळा संपून पावूस सुरु झाला होता म्हणून shooes वापरायचे बंद करून sandle वापरणे चालू केले.
रोज सहा सात km वेगात चालण्याची सवय होती.
पण काही दिवसात घुटणा,आणि गुडघा दोन्ही दुखायला लागले .
Dr कडे गेलो तर त्यांचे निदान .
नस दबली असेल X रे काढावा लागेल.
Sandle आणि shooes वापरताना झालेला चालण्या मध्ये झालेला फरक कारणीभूत असावा असे मीच ठरवले .
आणि टाच असलेला पावसाळी shooes खरेदी करून ते वापरायला सुरुवात केली.
घुटना आणि गुडघा दोन्ही दुखायचे बंद झाले.
सांगायच्या हेतू कधी कधी प्रॉब्लेम खूप लहान असतो.
पोस्चरमुळे येणाऱ्या
पोस्चरमुळे येणाऱ्या समस्यांवरही (खेळ आणि इतर ऍक्टिव्हीटिजमुळे होणाऱ्या दुखापती समस्यांव्यतिरिक्त) स्पोर्ट्स मेडिसीन डॉक्टरांचा चांगला अनुभव आहे. चुकीच्या पोस्चर मुळे काही स्नायु अधिक ताणले जाणे, काही कमकुवत होणे (ज्यामुळे मग मणके, सांधे यावर प्रेशर येणे) यावर चांगले व्यायाम सांगतात, परत होऊ नये यासाठी काय काळजी घ्यावी, काय करावे करू नये सांगतात.
@मानव पृ, कोटी वगैरे लगेच
@मानव पृ, कोटी वगैरे लगेच समजले पण इथे या धाग्यावर वाढवणे बरे नाही म्हणून थांबलो. तसेच अगोदरचे प्रतिसाद शक्यतो धागा विषयाला धरूनच लिहिले आहेत.
@मीफु, आम्ही एकदम सरळ लोकं आहोत आणि गंभीर धाग्यावर ट्रोल अजिबात करत नाही. थोडी थट्टामस्करी झाली ती म्हणजे ज्यांना इथे चांगले ओळखतो ( लेखनातून). तुमच्या त्रासाचं निदान योग्य ठिकाणी होऊन उपचार सुरू झाले ते वाचून बरं वाटलं.
@Hemant 33,
नस दबणे म्हणजे ,नस सरकणे म्हणजे काय हे अजून तरी माझ्या डोक्यात घुसत नाही.
जे सर्च ओप्शन दिलेत ना त्यात सगळं सचित्र सापडेल बघा. आणखी सोपं म्हणजे पाठीच्या कण्यात एकेक मणके जोडून माळ केलेली असते त्यातल्या छोट्ट्या जागा असतात त्यातून हात,पाय यांचे स्नायू ( रज्जू)बाहेर पडतात. त्यालाच नस * nerve)म्हणतात बोली भाषेत. तर मणक्यांच्या जागा बारीक होऊन 'नस' दबली की त्या बाजूचे हात, पाय दुखतात, जोर कमी होतो.
आपल्या शरीरातील मेंदू, पाठीचा कणा आणि यकृत (liver) अतिशय नाजूक अवयव असतात. तिथे ढवळाढवळ करणे खूप अवघड असते.
ज्याला माकडहाड म्हणतो ते कण्याचे शेवटचे खालचे टोक. तिथे कोणे एके काळी माकडासारखी हलवता येण्यासारखी शेपूट # होती. तिथे थोडे वर पायांचे रज्जू ( नस)निघतात. पायांची दुखणी निघण्याची बरीच कारणं असतात त्यापैकी एक हे म्हणजे 'नस दबणे. '
[ #शेपुट गेली शरिरातून तरी त्यावरचे विनोद आहेत. ]
Srd. माहिती आवडली
Srd. माहिती आवडली
मी जाऊन आले डॉक्टर कडे. नस
मी जाऊन आले डॉक्टर कडे. नस दबली गेली आहे पण खूप कमी प्रमाणात आहे त्यामुळे काही व्यायाम प्रकार सांगितले आहेत. कॅल्शिअम आणि व्हिटॅमिन डी च्या गोळ्या दिल्या आहेत. पेनकिलर पण आहे १० दिवस घ्यायची आहे ती. >>> चला निदान होऊन औषधोपचार सुरू झाले, आता लवकर बरं वाटेल. तुम्हाला शुभेच्छा.
चला निदान होऊन औषधोपचार सुरू
चला निदान होऊन औषधोपचार सुरू झाले, आता लवकर बरं वाटेल. तुम्हाला शुभेच्छा. >> +१००
छ्य्या!
छ्य्या!
काय ते क्याल्शियम अन पेन्किलर्स.. काय मजा नाही त्यात. लुटायचे धंदे सगळे.
मस्तपैकी काही काढे, टोटके, फेकम फॉस वगैरे हवं होतं.
मग बरं वाटलं असतं.
तुम्ही अॅरोमाथेरपी करा पाहू जरा. अजिब्बात साईड इफेक्ट्स नाहीत त्यात.
फुलराणी, शुभेच्छा.
फुलराणी, शुभेच्छा.
वर हातदुखीची चर्चा वाचली. मलाही कंप्युटरवर काम करून करून उजव्या हातात पार मानेपर्यंत दुखणे झाले होते. मनगट फार दुखायचे. कायरोप्रॅक्टरने सहा महिने ट्रीटमेंट प्लान दिला. ३-४ हजार डॉलर्स बिल होते (डिडक्टिबल जाऊन). विचार करत होते काय करावं कारण रक्कम जास्त वाटत होती.
तेवढ्यात एका नव्या मैत्रिणीने खालील माऊस वापरायला सांगितले. ते नोव्हेंबरमधे घेतले. ४ दिवसात बरे वाटु लागले. आता ९० टक्के बरे वाटते. बाकी व्यायाम करत असते.. हाताचे, टेन्शनबँड ओढायचे. हळूहळू पुर्ण बरे वाटेल असं वाटतंय. किमान असह्य दुखणार तरी नाही.
महाग आहे पण पैसा वसूल आहे. जबरदस्त आहे हे.
https://www.amazon.com/Logitech-Master-Advanced-Wireless-Mouse/dp/B07S39...
सुनिधी धन्यवाद. इकडे भारतात
सुनिधी धन्यवाद. इकडे भारतात मिळतो का ते बघते.
मी फुलराणी, काळजी घ्या. व्यायाम जरूर करा. खूप फरक पडतो. खाली जमिनीवर/ मांडी घालून जास्त वेळ बसू नका.
तुम्हांला शुभेच्छा.
मलाही सेम असाच त्रास होत होता
मलाही सेम असाच त्रास होत होता. हा धागा वाचून मनावर घेतले अन डाॕ ला दाखवले. Right पेल्वीस मधे बारीक दुखायचे . मध्यंतरी योगा stretching जास्त झाल्याने दुखत असेल म्हणून दुर्लक्ष केले होते. पण शःका दूर झाल्या. सोनोग्राफी, MRI करुन झाले. पोश्चर मुळे कुबड निघाले आहे असे म्हणाले. Excercisr सांगितले आहेत. Thanks fulrani. Troll zale tari ase dhage kadhle tar upyog hoil konala tri. Me_anu thanks for positive posts
Pages