मायबोली धागे शोधाशोधीस मदत

Submitted by मामी on 18 March, 2020 - 01:31

मायबोलीवरील एखादा धागा आठवत असतो पण नक्की कोणाचा होता, कुठे शोधावा कळत नाही. कीवर्ड्स देऊनही सापडत नाही अश्यावेळी इतर मायबोलीकरांकडे विचारणा करण्यासाठी हा धागा. एकमेकां साह्य करू...

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

<<स्वतःचेच लिहीलेले प्रतिसाद मायबोलीवर परत कसे पहाता येतील? >>>> ही सोय खुप पूर्वी अधिकृतरित्या होती असे कळते.
मी आलो तेव्हा अधिकृतरीत्या नव्हती पण कशी कुणास ठाउक परत सुरु झालेली होती. त्यासाठी https://www.maayboli.com/user/आपला-युजर-क्रमांक/track अशी url द्यावी लागे. मग अ‍ॅडमिनना जेहा हे कळले तेव्हा ते परत बंद करण्यात आले.
इतर लोकांच्याही अशा पोस्ट पाहुन त्यांचा पिच्छा पुरवणे वगैरे प्रकार झाले असावेत म्हणुन ही सोय बंद करण्यात आली असेल.

पण फ्क्त स्वतःच्या पोस्ट पहाण्या करता ती सुरु केली तर छान होइल.

त्यामुळे सिस्टमवर भार येतो म्हणून बंद केली . पूर्वी प्रत्येकाच्या सदस्यत्वात लेखनाप्रमाणेच पाउलखुणाही दिसत. आधी तो टॅब गायब झाला. पण काही हुशार मायबोलीकर तुम्ही म्हणता ते यु आर एल देऊन पाउलखुणा पाहत होते. वेमा/अ‍ॅडमिनना हे कळलं तेव्हा त्यांनी तेही डिसेबल केलं.

तो मात्र शोधावा लागेल. आपल्या आवडते लिस्ट मध्ये नसेल तर मायबोली शोध सुविधेत आयडीचे नाव देऊन शोधायचे. त्यावर क्लिक करून त्याचे हे पान हरवले आहे पान आले की URL मध्ये पुढे /created ऍड करायचे.

आजच्या Times मध्ये Elizabeth Holmes बद्दल बातमी आहे.
मायबोलीवर कोणी तरी एक लेख लिहिला होता का ? तिच्या fraud बद्दल वाचल्याच आठवतयं

फार पूर्वी, म्हणजे 2006 किंवा 2008 च्या सुमारास एक अफगाणिस्तानावर लेख आला होता. लेखक आठवत नाहीत.
परंतु अनेक अनुभव यात दिले होते. अतिशय सुंदर लेख होता.
माबो वरील बुजूर्गांना आठवतो आहे का? त्याची लिंक सापडत नाही.

माबो वरील बुजूर्गांना आठवतो आहे का? >>> नवयुवकांसाठी प्रश्न असता तर नक्कीच मदत करायला आवडले असते.
मी_आर्या, बरोबर हेच मी पण देणार होतो.

हाच लेख. कसा शोधला?
बुजुर्ग हा शब्द आदराने वापरला आहे. म्हणजे जुने जाणते.

एखादा युट्यूब व्हिडीओसाठी धागा आहे का ? कुत्र्या मांजराचे तसेच पाळलेल्या चित्ता, वाघ, सिंहाचे बरेच फनी व्हिडीओज आहेत. स्ट्रेसबस्टर्स आहेत.

<<हाच लेख. कसा शोधला?<<
हे बघा, आपण गुगल सर्च करतो तसेच, उजवीकडे आपल्या सदस्यनामाच्या खाली.. 'मायबोलीवर शोधा" अशी ब्ल्यु कलरमधे लिन्क दिसते. त्यावर क्लिक केले, अन आपण शोधत असलेल्या लेखातले एखादे नाव, एखादा शब्द, सदस्याचे नाव आठवत असेल तर ते टाकायचे. मग खाली तो पर्टीक्युलर शब्द असलेले जेवढे म्हणुन धागे आहेत, त्याची भलीमोठी लिस्ट येते. भरपुर पाने असतात. लेटेस्टपासुन जुन्या धाग्यापर्यंत. त्यात जुने धागे शोधत जायचे. थोडेसे वेळखाउ काम आहे.

https://www.maayboli.com/search#gsc.tab=0

https://www.maayboli.com/search#gsc.tab=0&gsc.q=%E0%A4%85%E0%A4%AB%E0%A4...

US/Canada इथे राहणाऱ्या लोकांच्या घराच्या मागे हरणं,अस्वलं, बदकं येतात त्यांचे विडिओज वाले धागे कुठे?

एक वैमानिक लहानशा विमानातून अटलांटिक पार करतो. झोप येऊ नये म्हणून कॉकपिट ची रचना खूप अडचणीची असते.
असं काही कंटेंट असलेला धागा/प्रतिसाद होता. पुन्हा वाचायची इच्छा आहे. कोणाला काही क्लू आहे का?

>>>> आतापर्यंत धागे शोधून मदत करणार्‍यांना धन्यवाद पण अजून हवे ते गवसले नाहीये.
मी तो नाद केव्हाच सोडला.....

अनिरुद्ध धन्यवाद. तुम्ही उत्तर दिलेले मला समजलेच नव्हते. क्षमस्व !

अजून एक मदत हवी आहे. चमचमीत नसलेले, पोटाला न बाधणारे, फारसे गोड नसणारे, मैद्याचा कमीत कमी वापर असलेले, मसाल्यांचा माफ अथवा गरजेपुरता वापर असलेले असे साधे, सात्विक अन्न असलेल्या रेसिपीजचा एखादा धागा असेल तर कृपया कळवावे ही विनंती.

मी एक धागा शोधतोय, मायबोलीवर एकापेक्षा जास्त भाषा येणाऱ् यांबद्दल चा धागा होता. शोधून बघितला पण मिळत नाहीये, धाग्याचं नावही आठवत नाहीये. पण त्यावेळी वाचून भारी वाटलेलं कि किती मायबोलीकर अनेक भाषा येणारे आहेत. प्लिज कोणाला आठवतोय का हा धागा?

सापडला
https://www.maayboli.com/node/71053

खूप पूर्वी एक कथा वाचली होती. लेखकाचे किंवा कथेचे नाव आठवत नाहीये. कथा दोन भागात होती.

एका छोट्या मुलाच्या नजरेतून होती कथा. देशावर राहणारं एक कुटुंब कोकणात राहायला जातं. शेजारच्या घरातल्या कुटुंबात मुंबईहून एक ताई येते. मग गणपतीचे दिवस येतात. पुढे कळत की त्या ताईला कोड झालाय.

खूप निरागस विश्व होतं त्या छोट्या मुलाचं.

कोणाला आठवतीये का ती कथा?

इथे काही महिन्यांपूरवी कोणीतरी एक शेरलॉक होम्सची कथा लिहीली होती. लांबचा वळसा घालून घरासमोरच्या बंद घरात लपून बसतात वगैरे. आठवतीये का कोणाला?

मी एक धागा / आयडी शोधतेय प्लिज मदत करा: एक मुलगी आहे जी भन्नाट प्रवास करते. मला तिचं प्रवास वर्णन अंधूकसं आठवतंय. साऊथ ला कुठेतरी.पॅराग्लायडींग पण बहुतेक.

Pages