Submitted by मी फुलराणी on 4 January, 2022 - 03:41
साधारण ३ महिन्यांपासून माझी lower back आणि उजवीकडचा पोटाचा भाग, पाय आणि मांडी मध्ये वेदना (स्ट्रेस) जाणवते. पाय मुडपून बसले कि उजवा पाय आणि गुडघा दुखतो. वजन जास्त आहे. उंची ४.१० नि वजन ६५ आहे. एका आयुर्वेदिक डॉक ला दाखवलं तिने वजनामुळे होतंय अस सांगितलं. पण वजन जास्त असल्यास एकच बाजू जास्त दुखू शकते का?
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
सायटिका आहे हे तपासण्या करून
सायटिका आहे हे तपासण्या करून कळेलच. शेवटच्या चारपाच मणक्यात पायाकडची नस ( उजवी/डावी )दबली की हा त्रास होतो.
इथे औषधे सांगायची नसतात. पण होमिओपॅथिक औषध नक्की आहे एवढेच सांगतो.
तुमच्या गावात डॉक्टर नाही का
तुमच्या गावात डॉक्टर नाही का?
स्पेशालिस्ट अॅलो पॅथिक
स्पेशालिस्ट अॅलो पॅथिक डॉक्टर ला दाखवा. पेट स्कॅन करून घ्या. मधुमेह आहे का? असल्यास न्युरोपथी असू शकते. आधीची कॅन्सर वगैरेची हिस्टरी असल्यास तो कॅन्सर बोन मध्ये मेट झाल्यासही दुखते. पण पेट स्कॅन व तज्ज्ञ डॉक्टरनेच निदान केले पाहिजे. लिव्हर फंक्षन किडनी, पँक्रिआज गॉल ब्लॅडर संबंधाने सर्व टेस्ट करून घ्या.
घाबरवत नाही. काही त्रास असल्यास लवकर निदान होउन उपचार मिळावेत हीच शुभेच्छा.
तुमच्या गावात डॉक्टर नाही का?
तुमच्या गावात डॉक्टर नाही का? >>> मानव जी, डॉक्टर चा शॉर्ट फॉर्म मी डॉक असा लिहिला आहे. तुम्हाला समजला नसल्यास क्षमस्व.
अमा धन्यवाद
अमा धन्यवाद
@Srd धन्यवाद
@Srd धन्यवाद
ताई आयुर्वेदिक वैद्यकीय
ताई आयुर्वेदिक वैद्यकीय सल्ल्याच्या पुढे भरपूर ट्रीटमेंट आहे प्लीज डॉक्टर म्हणजे एक तर स्त्रीरोग तज्ञ एम्डी गायनॅक ला दाखवा.
स्त्रियांच्या जनन संस्थेचे आजार असले तर ओटिपोटात दुखते. एंडो मेट्रिआसिस व इतर आजार आहेत. पीसी ओडी आहे का? ते बघा त्याने वजन वाढू शकते.
त्यांंच्या सल्ल्याने इतर पुढील डॉक ला दाखवून ट्रीटमेम्ट घ्या व रिपोर्ट अनुसार पुढे जा हा कळकळीचा सल्ला. प्राक्टो अॅप डाउन लोड करून अॅलो पथिक डॉक्ट्रचा सल्ला घेता येइल २५० रु चार्ज असतो बहुतेक.
वजन वाढणे हा आजार नाही तो सिम्टम असू शकतो किंवा परीणाम असू शकतो.
आधी जीपीला दाखवा
आधी जीपीला दाखवा
बेसिक ब्लड टेस्ट , कोलेस्टेरॉल , थायरॉईड करून घ्या , मग पाठीचा एक्स रे
डॉक्टर म्हणजे ते MBBS आणि
डॉक्टर म्हणजे ते MBBS आणि त्या पुढे शिकलेले हो.
इतर डॉक्टरना जसे आयुर्वेदिक डॉक्टर, होमिओपॅथी डॉक्टर स्पेसिफाय करावे लागते, नुसते डॉक्टर म्हटले की किमान MBBS.
वर ब्लॅककॅट यांनी सांगितले ते पण डॉक्टर आहेत.
प्रत्यक्ष तपासणी आणि चाचण्या शिवाय डॉक्टर तरी इथे काय सल्ला देणार बरे?
Manav plus one
Manav plus one
लोक ( सभासद) डॉक्टरांकडे
लोक ( सभासद) डॉक्टरांकडे जाणारच असतात . इकडे क्राउड सोर्सिंग करून स्वत:च काही करत नसतात. काय होऊ शकते याचा एक अंदाज येतो.
माझ्यापुरते सांगायचे तर मला लहानपणापासून होमिओपॅथी डॉक्टर घराजवळच मिळाले. त्यांची परीक्षा चांगली होती. ते वेळीच औषध देत आणि योग्य ठिकाणी पाठवत. त्यामुळे विश्वास. नंतर आता नवीन ठिकाणी दोन होमिओपॅथिक डिस्पेन्सरीतून ओवर-द-काउंटर मिळणारे औषधही प्रथम घेऊन पाहतो. ४-७ दिवसांत गुण येतोच. आयुर्वेदिक मात्र माझे मीच घेतो. तीन दिवसांत गुण आला नाही तरच डॉक्टर. जबाबदारी माझीच.
बाकी डॉक्टरांकडे जाच.
व्हेरिकोज व्हेन्स असू शकेल.
व्हेरिकोज व्हेन्स असू शकेल.
पोस्चर चुकत असेल (दुचाकीवर/खुर्चीवर बसताना, जमिनीवर उभं राहताना एका बाजूला रेलून उभं राहणे.)
चांगल्या स्पाईन क्लिनीक ला लवकर दाखवा,
पुण्यात असल्यास स्पाईनॉलॉजी क्लिनीक औंध किंवा बिबवेवाडी जवळ डॉक्टर भगली.
(घाबरवायचं नाहीये. एक शक्यता.) पाठीत दुखणं हे सर्व्हायकल कॅन्सर चं सुरुवातीचं लक्षण असू शकतं.
जमल्यास वेलनेस वुमन पॅकेज घेऊन फुल चेकप (थायरॉईड इसीजी ब्लड प्रोफाईल पॅप स्मीअर चेस्ट एक्सरे मॅमोग्राम) करुन घ्या.
लोवर बॅक पेन हे अनेक आजारांचं लक्षण आहे. त्यामुळे एक एक शक्यता डॉक्टरी सल्ल्याने एलिमिनेट करुन चिंता फ्री लवकर व्हालच. बहुधा काही नसेल.
अमृतधारा चे ३ खडे पिशवी (ओवार्क पुदिनार्क भीमसेनी कापूर), ते एकत्र केले की एक तेल बनते, ते खोबरेल तेलात मिसळून गुडघ्याला लावणे.पायात घरात मोजे/चप्पल घालणे. कोमट पाणी पिणे.
रुमॅक्स म्हणून एक तेल आहे. आमच्या कामवाल्या मावशींना दिले होते.त्यांना खूप फरक पडला.
मी फु,
मी फु,
मलाही असाच त्रास झाला होता.(पोट वगैरे दुखायचा भाग वगळून.)प्राणायाम करताना एका साईडची मांडी घालून बसायला त्रास व्हायचा. वेळे अभावी आणि अंगावर काढायच्या सवयीने लवकर डॉ कडे गेले नाही.
शेवटी पाठीच्या आणि पायाच्या दुखण्याने कंटाळून फॅमिली डॉक्टरकडे गेले.न्युरोपथी असावे बोलले पण पाठीच्या एक्सरे नंतर ऑर्थो कडे गेले.स्लीप डिस्क होते.त्यांच्या औषधाने आठवड्यात पायही दुखायचे थांबले.
तुम्हाला तसेच असेल असे नव्हे.माझा अनुभव शेयर केला फक्त.
बाकी वर ब्लॅककटनी सांगितले आहेच.बेस्ट लक.
मला हा त्रास होतो.
मला हा त्रास होतो.
मला डॉ नी cervical spondylosis मुळे नस दाबली जाऊन पाय दुखतो असे सांगितले आहे. काही व्यायाम सांगितले आहेत जे lower back strength वाढायला मदत करतात. ते मी नियमित करते. एका जागी जास्त वेळ बसत नाही. थोड्या थोड्या वेळाने उठून एक फेरी मारून येते. वजन कमी करते आहे. विट बी, कॅल्शियम च्या गोळ्या घेते. विट डी महिन्यातून एकदा घेते. पण हे सगळे रक्त तपासणी केल्यानंतर डॉ नी सांगितले म्हणून करते आहे.
तुम्ही लवकरात लवकर डॉक्टर कडे जाऊन, एक्स रे करून निदान करून घेणे योग्य.
आयुर्वेदिक, होमिओपॅथी, युनानी
आयुर्वेदिक, होमिओपॅथी, युनानी हे डॉक्टर नाहीत. खऱ्याखुऱ्या डॉक्टरकडे जा. नाहीतर उद्या कुणी सांगितले म्हणून ज्योतिष्याकडे पण जाल पत्रिका दाखवायला.
लोक ( सभासद) डॉक्टरांकडे
लोक ( सभासद) डॉक्टरांकडे जाणारच असतात . इकडे क्राउड सोर्सिंग करून स्वत:च काही करत नसतात. काय होऊ शकते याचा एक अंदाज येतो. >> @srd - अगदी बरोबर. आणि मला वाटत आपला हा धागा पण त्यासाठीच आहे. सगळे डॉक्टर कडे जातातच पण इथे अनुभव असलेले लोक (सभासद) आहेत . सगळे आपुलकीने सांगतात अगदी.
सर्वांचे मनापासून आभार. मी खऱ्याखुऱ्या डॉक्टरकडे जाणार आहे. खरतर मी नेहमी आयुर्वेदिक उपचार घेणे पसंत करते कारण side effects नसतात. पण ह्या दुखण्याच्या बाबतीत मी अलोपॅथी उपचार घेईन कारण खरंच काही सिरीयस असेल तर नंतर पश्चाताप नको.
नाहीतर उद्या कुणी सांगितले
नाहीतर उद्या कुणी सांगितले म्हणून ज्योतिष्याकडे पण जाल पत्रिका दाखवायला. >> @उ.बो .. मी ते पण करेन जर त्याने मला बर वाटणार असेल तर.
आयुर्वेदिक, होमिओपॅथी, युनानी
आयुर्वेदिक, होमिओपॅथी, युनानी हे डॉक्टर नाहीत. खऱ्याखुऱ्या डॉक्टरकडे जा. - Submitted by उपाशी बोका .
भारत मेडीकल असोसिएशन मध्ये नोंदणी झाले, चार वर्षे शरीरशास्त्र शिकलेले ( अधिकृत वैद्यकीय महाविद्यालयांत), मृत्यचे प्रमाणपत्र देण्यास पात्र,तरीही डॉक्टर नाही हे कोण ठरवतो?
बाकी हा धाग्याचा विषय नाही. जाऊ दे.
केस गळताहेत, आजकाल तळपायाची
केस गळताहेत, आजकाल तळपायाची जळजळ होते, किंवा डॉक्टरांनी डायग्नोसिस केलेला असा एखादा आजार आहे तो तुम्ही कसा मॅनेज करता, अथवा त्या आजारावर काही उपाय नाही तर कुणाला काही अनुभव असे धागे इथे नेहमीच येतात.
पण तुम्ही लिहिलेले एवढे सिमटम्स, त्यात उजव्या बाजूला पोट दुखणे (ते वर, खाली, की मध्ये वगैरे नमूद नाही आणि लोक अंदाज बांधताहेत) याचे कित्येक कारणे असतील, चुकीच्या पोस्चर मुळे स्पॉंडीलायटीस आणि काहीतरी ऍक्युट होऊन पोटातील मसल कॅ्रम्प, एवढेच ते गाल ब्लाडर /किडनी , अपेंडीसायटीस अन अजून काय असू शकते.
तुम्ही विचारलेल्या समस्येवर एखादा डॉक्टरही तपासल्या शिवाय काही सांगता येणार नाही म्हणणार.
अर्थात तरीही आधी क्रावूड कन्सल्टेशन घेणं तुमचा हक्क आहे, आणि त्यावर अशा पोस्ट करणे हा सुद्धा मोबाकरांचा हक्क आहे.
त्यावर अशा पोस्ट करणे हा
त्यावर अशा पोस्ट करणे हा सुद्धा मोबाकरांचा हक्क आहे. ......हे बाकी खरंय.
जास्त शक्यता सायाटिकाचीच
जास्त शक्यता सायाटिकाचीच वाटते. पण मॉडर्न मेडीसीननुसार तपासून घेणे केव्हाही चांगले.
चांगला धागा आणि प्रतिसाद.
चांगला धागा आणि प्रतिसाद.
काँप्युटर एलबो नावाचा नवाच त्रास सुरू झालाय, (वायरलेस माऊस वापरते तरीही उजव्या हाताच्या कोअपरा च्या विशिश्ठ अँगल मुळे बहुधा हा त्रास होतोय) वेगळा धागा काढला तर लोक मलाही डॉक कडे जायला सांगतील
ती मी जाऊन आलेय पण जीपी एक्स रे काढायला सांगतात आणि त्यात काही नसेल तर शेकायला/पेन किलर देतात असा अनुभव आला.
कुणाला माहिती असल्यास सांगा.
स्वउपचार सांगत नाही पण
स्वउपचार सांगत नाही पण
१. What is sciatica,
२. Homeopathic treatment for sciatica
शोधल्यास बरीच माहिती मिळेल. लक्षणं आणि कारणे.
साधे व्यायामही दिलेले आहेत.
थोडक्यात सांगायचे तळ उपाय आहेत आणि महिन्याच्या आत बरे व्हाल.
कधीकधी अचानक मोठे वजन उचलल्यावरही त्रास सुरू होतो तो नंतर जातो. ( मी तीस किलोंचा पाण्याने भरलेला फिश टँक उचलून दुसरीकडे ठेवल्यानंतर त्रास झाला होता.) कुणी सांगितले की खारीक ,सुकं खोबरं, गुळ खा. तर लगेच सुरू केले. असली औषधं सर्व रोगांवर शोधायला हवीत.
१. डिंक लाडू
२.अंजिर खजूर लाडू
३. उडीद खारीक लाडू.
४. अडदियोपाक ( गुजराती पदार्थ)
५. करजन ( कर्नाटकात मिळते. सुका मेवा आणि ताडाचा गुळ याची वडी.)
असा मनगट टेकणारा पॅड, सकाळ
असा मनगट टेकणारा पॅड, सकाळ/संध्याकाळ डंबेल्स (फक्त ३ किलोचे), दर तासाला पंजा खांद्यावर ठेवून कोपरा फिरवणे, हात आडवा ठेवूनकोपऱ्यातून वाकवून पंज्याचा खांद्याला स्पर्श परत आडवा सरळ असे १५ वीस वेळ,। हात पूर्ण खालीवर करणे, लंच ब्रेकला हात पूर्ण गोल फिरवणे
याने मला एल्बोला पूर्ण आराम मिळाला.
माऊसचा किती वापर, खुर्ची टेबलची उंची इत्यादि फॅक्टर्स ही असतील.
निदान होऊन अनुभव विचारणे आणि निदान माहीत नसताना + ज्याच्या अनेक शकत्या असू शकतात असे सिम्पटम्स असताना सल्ला विचारणे / देणे यात फरक आहे, एवढे बोलून मी माझे आठ शब्द संपवतो.
व्यायामाने बरे वाटते.
सायाटिका असेल तर व्यायामाने बरे वाटते. पायाच्या तळव्यापर्यंत पोचलेले दुखणे अथवा बधिरपणा हळूहळू आकसत जातो.
तीन जण एका प्रश्नावर विचार
तीन जण एका प्रश्नावर विचार करतात तेव्हा त्यातून सात ,अकरा,तेरा . . .शक्यता बाहेर पडतात. कारण त्या मूळ संख्या आहेत. त्यांचे गुणक पडत नाहीत किंवा ते कुणाशी जमवून घेत नाहीत. ( मूळ संख्येस एक आणि तीच संख्या यानेच भाग जातो. )
सायटीकाची शक्यता वाटतेय.
सायटीकाची शक्यता वाटतेय. मलाही सेम हाच त्रास गेले काही महिने होत होता. मान्डी घालुन बसले की गुढगा खेचल्यासारखा वाटुन बसणे अशक्य व्हायचे.
जनरल व्यायाम करताना लक्षात् आले की झोपुन पाय वर खाली, मागे पुढे वगैरे व्यायाम केल्यावर थोडा आराम मिळतोय. मग थोडे दिवस हाच व्यायाम केला. आता सुदैवाने त्रास बन्द झाला. सायटीकावर व्यायाम हाच उत्तम उपाय आहे असे नेटवर वाचले. मला एरवी काहीही त्रास जाणवत नव्हता, फक्त व्यायाम करताना त्रास व्हायचा आणि मान्डी घालता येत नव्हती. खुप
त्रास होत असेल तर डोक्टर बघितलेला बरा.
खरतर मी नेहमी आयुर्वेदिक
खरतर मी नेहमी आयुर्वेदिक उपचार घेणे पसंत करते कारण side effects नसतात.
<<
side effects नसतात.
बरं.
side effects प्रत्येक औषधाला
side effects प्रत्येक औषधाला असतात.
किती मात्रा आणि किती दिवस याला काही मर्यादा असतेच.
स्वउपचार ( सेल्फ मेडिकेशन) करताना हा धोका वाढतो.
होम्योपदीला नसतात साईड इफेक्ट
होम्योपदीला नसतात साईड इफेक्ट कारण मेन इफेक्टच प्लासिबो असतो.
होम्युपदीचे साईड इफेक्ट म्हणजे मी साबुदाणे खाऊन लोकल मध्ये माझ्या साईडला बसलेल्या माणसाला मळमळणे. 
अनेक धन्यवाद srd
अनेक धन्यवाद srd
होमिओपॅथीत डायलुशन्स
होमिओपॅथीत डायलुशन्स व्यतिरिक्त मदर टिंक्चर्स पण असतात. मी युरिक ऍसिड साठी घेतो असे औषध, पण ऍलोपथी डॉककडुन निदान करून. ७.५ ते ८.० एवढे वाढलेले युरिक ऍसिड त्याने 5.8 - 6.0 एवढे खाली येते, त्यापेक्षा कमी नाही होत. ऍलोपथिक औषधाने (ऍलोप्युरीनॉल, फॅबुक्सोस्टॅट दोन्ही ट्राय केले) ३ - ४ च्या घरात येते पण साईड इफेक्ट्स सहा महिने घेऊनही ओसरेनात म्हणुन पथ्य + होमिओपॅथी औषधाने मॅनेज करतोय सध्या.
बाकी आयुर्वेद, होमिओपॅथीचे साईड इफेक्ट्स नाहीत म्हणण्यापेक्षा साईड इफेक्ट्स रेकॉर्डेड नाहीत, वेल रेकोर्डेड नाहीत म्हणावे. साधे ज्येष्ठमध जरी नियमित घेतले तर उच्च रक्तदाब, हृदयरोग असणाऱ्यांना अपायकारक होऊ शकते, धातु असणाऱ्या औषधांनी मेटल पॉइझनिंग तर दूरची गोष्ट.
side effects प्रत्येक औषधाला
side effects प्रत्येक औषधाला असतात.
किती मात्रा आणि किती दिवस याला काही मर्यादा असतेच......+१.
अलोपथिक औषधांचे डॉक्युमेंटेशन
अलोपथिक औषधांचे डॉक्युमेंटेशन असते ती वॉर्निंग औषधावर लिहिलेली असते. लीवर ,किडनी वर अपाय होईल, किराटिन वाढेल हे उदाहरणार्थ.
इतर आयुर्वेदिक औषधांवरही वैद्यांच्या देखरेखी,सल्ल्यानूसार घेणे लिहिले असतेच.
किराटिन वाढेल << म्हंजे?
किराटिन वाढेल
<<
म्हंजे?
Do you mean to say creatinine
Do you mean to say creatinine sir?
Do you mean to say creatinine
Do you mean to say creatinine sir?
<<
नसावे.
ते स्वयंउपचार करणारे आयु-होमिओ तज्ज्ञ आहेत.
त्यांच्या अभ्यासातील काहीतरी दिस्तेय.
मलाही नवीन काहीतरी शिकायला मिळेल असे वाटते.
काही लोक तर निकोटिनपण म्हणतात
काही लोक तर निकोटिनपण म्हणतात.
अमोनिया झाला होता म्हणून 2 बाटल्या रक्त चढवले , असेही म्हणतात
म्हणजे "राष्ट्रीय महामार्ग
म्हणजे "राष्ट्रीय महामार्ग तीन" ला (NH3) अपघात झाला बरेच रक्त गेले म्हणुन रक्त चढवले असेल.
किडनी बरोबर काम न केल्यामुळे
किडनी बरोबर काम न केल्यामुळे रक्तात वाढते ते .
----–
आणि मग पुनर्नवादि काढा येतो धावून.
अमोनिया झाला >>
अमोनिया झाला >>
अमोनिया झाला >>
अमोनिया झाला >>
अमोनिया आणि राराष्ट्रीय
अमोनिया आणि राराष्ट्रीय महामार्ग तीन. ओके.
--------
सोनाराला म्हटले cadmium वापरता का?
"छेछे, आम्ही केडीएम वापरतो."
आता धागाकर्ती आषल्याला वर्गाबाहेर काढणार बहुतेक.
Keratin is a hair Protein
Keratin is a hair Protein
By the time you get a high creatinine reading the kidney function is already suffering .
सायाटीका बाजूला राहिले ,
सायाटीका बाजूला राहिले , नुसत्याच टीका सुरू आहेत
creatinine 1.5 ला पोचते
creatinine 1.5 ला पोचते तेव्हा मूत्रपिंडाचे कार्य ५०% कमी झालेले असते म्हणजे मूत्रपिंडांची ५० % हानी झालेली असते असे काही डॉक्टर सांगतात.
एक वेगळाच प्रश्न विचारीत आहे.
एक वेगळाच प्रश्न विचारीत आहे. अवांतरासाठी क्षमस्व.
इथे सदस्यांशी e mail वरून संपर्क साधण्याची सुविधा अजूनही अस्तित्वात आहे का? निकड आहे म्हणून ह्या चालत्या धाग्यावर लिहिले.
किराटिन, केडीएम बद्दल काही
किराटिन, केडीएम बद्दल काही नाही. इंग्रजी शब्दांची ती मराठीतली ती नावं झाली. अमोनिआ आणि अॅनिमिआ ह्यात वेगळीच मजा आहे.
सदस्यांशी e mail वरून संपर्क
सदस्यांशी e mail वरून संपर्क साधण्याची सुविधा अजूनही अस्तित्वात आहे का << आहे वाटते. पण सदस्य तो ईमेल id जास्त वापरत नसतील किंवा चेक करत नसतील तर त्यांना कळणार नाही. तुम्हाला त्यांना सांगावे लागेल विपु करून किंवा कोणत्या तरी धाग्यावर.
बरोबर
बरोबर
Pages