ज्योतिष शास्त्र खरे आहे का नाही? - दूध का दूध, पानी का पानी, असे एक संशोधन

Submitted by AstrologyYesOrNo on 26 December, 2021 - 05:45

ज्योतिष शास्त्र खरे आहे का नाही? - दूध का दूध, पानी का पानी, असे एक संशोधन
डॉ. नागेश राजोपाध्ये
—------------------------------------------------------------------------------------------------------------------------
मायबोलीवर ज्योतिष विषयावर अनेक लेख आणि प्रतिसाद वाचले. TV वर पण अनेक परिसंवाद ऐकले. वाद घालून डेड एन्ड आल्यावर सगळे शेवटी हेच म्हणताना दिसतात कि ज्योतिषावर संशोधन व्हायला पाहिजे. आणि म्हणूनच तुमच्या मनाचे पूर्ण समाधान होईल असे आणि आम्ही स्वतः केलेले असे असे हे संशोधन आपल्या समोर ठेवत आहे. अतिशय शास्त्रोक्त, हजारो पत्रिका घेऊन कॉम्प्युटरच्या साहाय्याने केलेले हे परीक्षण वैदिक ज्योतिष शास्त्राच्या इतिहासात पहिलेच असेल. अगदी ज्याला आपण दूध का दूध पानी का पानी म्हणतो असे! वास्तविक पहाता हे संशोधन कोणीतरी या पूर्वीच करायला पाहिजे होते. आणि कोणीतरी कशाला ज्योतिषांनीच हे संशोधन खरेतर करायला हवे होते कारण ते या विद्येचा व्यावसायिक वापर करत आले आहेत त्यामुळे ती त्यांची प्राथमिक जबाबदारी होती. पण असो,आपण सरळ मुद्द्यावर येऊया.

मी तुम्हाला आम्ही केलेला प्रयोग थोडक्यात सांगतो - सर्व प्रथम पत्रिकांचे दोन मोठे संच (groups) केले कीजे एकमेकाच्या अगदी विरुद्ध गुणधर्माचे आहेत. म्हणजे 338 पत्रिका मतिमंद विरुद्ध 338 पत्रिका हुशार लोकांच्या या दोन्ही संचाना ज्योतिष शास्त्रात बुद्धीचे अशुभ फळ मिळण्यासाठी असलेले नियम लावले आणि ते दोन्हीकडे किती लागू पडले याची तुलना केली. अर्थातच ज्योतिष विद्या खरी असेल तर ते नियम मतिमंद पत्रिकांना जास्तीत जास्त लागू पडताना दिसतील आणि त्याउलट हुशार लोकांच्या पत्रिकांना फारसे लागू पडणार नाही. असे झाले तर ते शास्त्र आहे असे मान्य केले पाहिजे नाहीतर नाही. बघा इतका सोपा हा प्रयोग आहे.

आता इथून पुढे जायच्या अगोदर मी तुम्हाला एक इशारा देतो - जर असे कुठले एक कारण असेल कि ज्यामुळे सर्व सामान्य माणसे ज्योतिष शास्त्र खरे आहे का नाही या प्रश्नापासून दूर राहिली असतील तर ते म्हणजे आपला (म्हणजे आपल्या सर्वांचाच) मानसिक आळशी पणा. जरा शास्त्रीय concept समोर आली कि ‘कशाला डोक्याला ताण द्यायचा’ असे म्हणून आपण आपली विचार प्रणाली switch off करतो. या एकाच कारणाने सर्वसामान्य माणूस या विषयातले सत्य शोधू शकलेला नाही आणि आयुष्यभर त्याची किंमत पण मोजत आला आहे. पण आपण आज इथे असं नको करायला. हा विषय सोप्यातला सोपा करून सांगायची जबाबदारी माझी, पण त्याच बरोबर त्यासाठी थोडा तल्लख विचार करायची जबाबदारी तुमची. आणि तुम्ही ते केले तर पुढच्या 5 मिनिटांमध्ये हा विषय तुम्ही तुमच्या आयुष्यासाठी कायमचाच मिटवून टाकाल आणि लग्न, करिअर, business असे महत्वाचे निर्णय घेताना मनाचा गोंधळ उडणार नाही.

आपण इथे जे करत आहोत त्याला एम्पिरिकल टेस्टिंग (Empirical Testing) म्हणतात. कुठल्याही शास्त्राला ‘शास्त्र’ म्हणून सिद्ध होण्यासाठी ही परीक्षा पास करावी लागते. परदेशामध्ये पाश्चिमात्य ज्योतिष शास्त्राची अशी चाचणी अनेक वेळा घेतली गेली (आणि ते कधीच पास होऊ शकले नाही). आपल्याकडे मात्र वैदिक ज्योतिष शास्त्राची अशी चाचणी घेण्यासंदर्भात कुठल्याच स्तरावर कसलीही चर्चा नाही (मौनम सर्वार्थ साधनम) आणि म्हणूनच आम्ही हा प्रयोग करणे महत्त्वाचे मानले.

आपल्या suspense स्टोरीचा भाग १ (episode 1) म्हणजे आपण ज्योतिषातले प्रत्येक महत्वाचे तत्व किंवा नियम घेणार आणि त्याला तपासून बघणार. तुम्ही ज्योतिषाकडे कधी गेला असाल तर ते पत्रिकेकडे बघत त्यांच्या एका विशिष्ट भाषेत स्वतःशी कम आपल्याशी संवाद करतात बघा! उदाहरणार्थ 'अमुक अमुक ग्रह नीचेचा आहे आणि शिवाय तो शनीच्या युतीत आहे. इतका बिघडल्यावर बरोबर आहे ..त्रास होणारच...' हे जे ग्रहाचे ‘निचेचे असून शनि बरोबर (किंवा पापग्रहा बरोबर) युतीमध्ये असण्याने’ बिघडणे आहे आणि त्यामुळे आपल्याला त्या ग्रहाच्या कारकत्वा संबंधात अशुभ फळ मिळणे आहे - ते झाले ज्योतिष शास्त्राचे तत्व. हे अगदी fundamental तत्व आहे म्हणजे प्रत्येक ज्योतिषी ते वापरणारच. आता मतिमंद विरुद्ध हुशार लोकांच्या पत्रिकांचा प्रयोगात जर हे तत्व चेक करायचे असेल तर कुठल्या ग्रहासाठी चेक करायचे हे जर मला तुम्हाला समजावून सांगायचे असते तर परत ‘ कारक ग्रह’ वगैरे शास्त्रीय आणि ज्योतिषीय भाषा वापरावी लागली असती पण सुदैवाने आपल्याकडे कॉम्पुटरजी असल्याने आपण त्याला सांगितले कि बाबा सगळ्या ग्रहांसाठीच चेक कर. कारण बुध, चंद्र बुद्धीचे कारक म्हणून आपण त्यांच्यासाठी चेक करायचो आणि मग कोणीतरी येऊन म्हणणार अहो गुरु पण बुद्धिसाठी महत्वाचा असतो तो तुम्ही टेस्ट केला नाही. आपल्याला कुठलीही शंका ठेवायची नाहीये म्हणून आपण सगळेच ग्रह टेस्ट केले.

आता परीक्षेचा निकाल काय लागला ते बघू - जर हे तत्व खरे असेल तर असे योग आपल्याला मतिमंद पत्रिकांमध्ये जास्तीत जास्त मिळायला पाहिजे होते. पण प्रत्यक्षात दोन्ही संचांमध्ये आम्हाला ते सारख्याच प्रमाणात सापडले. म्हणजे बघा, ज्या ग्रहाच्या नीच असण्याची आणि शनी किंवा मंगळाबरोबर असण्याची आपल्याला भीती वाटत होती ते योग हुशार लोकांच्या पत्रिकेत पण तेवढीच सापडतात जेवढी मतिमंद लोकांच्या. मग हे कसले आले तत्व? नाही पण असे विधान करायची आपण इतकी घाई करायला नको, अजून प्रयोग करू आणि मग म्हणू. आणि ज्योतिषा विषयी पण काही बोलायला नको कारण अजून बाकीची तत्वे टेस्ट करायची बाकी आहेत. आणि ती आम्ही केली. ग्रहाच्या संदर्भात त्याच्या बिघडण्याची जेवढी महत्वाची तत्वे आहेत ती आम्ही सगळी one by one टेस्ट केली ( संदर्भ ३,४,५). म्हणजे ग्रहाचे क्रूर नक्षत्रात असणे (अजून एक डरावना योग) , ग्रह नीच राशीत आणि शिवाय ६,८,१२ व्या स्थानात अशी अनेक तत्वे लावून तुलना केली. आम्हाला यातील एकही तत्व लागू पडण्यात दोन्ही संचात कुठलाही फरक दिसला नाही. जी तत्वे ग्रहांची असतात तीच भावेशांच्या बाबतीत असतात आणि ती आम्ही (परत शंका नको म्हणून) बाराच्या बारा भावेशांना लावून टेस्ट केली. त्यातही कुठलाही फरक दिसला नाही. आणि शेवटी यांची काही तत्वे पत्रिकेतील स्थाना बाबतीत असतात. ती अर्थातच वेगळी असतात जसे कि स्थानात पाप ग्रह असणे, स्थानावर पाप ग्रहाची दृष्टी असणे वगैरे. त्यातही आम्हाला बारापैकी कुठल्याही स्थानात कुठलाही फरक अढळ नाही.

वर सांगितलेली तत्वे अशुभ फळासाठी होती. तशीच ज्योतिषात शुभ फळ मिळण्यासाठी पण प्रमुख तत्वे असतात आणि ती हुशार लोकांच्या पत्रिकेत जास्त आढळायला पाहिजे होती ती पण दोन्ही संचात ग्रह, भावेश आणि स्थानांसाठी सारखीच सापडली. हे एक प्रकारचे Verification होते आणि त्याने आमचे निष्कर्ष जास्तच दृढ झाले कि हि तत्वे वैध नाहीत.

इथे आपल्या सस्पेन्स स्टोरीचा भाग १ समाप्त होत आहे पण जाता जाता मी एक डायलॉग मारणार आहे - सोच लो ठाकूर - हीच ती तत्वे जी लावून तुमची आमची पत्रिका बघितली जाते.

आता सस्पेन्स स्टोरीचा भाग २ - मी पण अनेक वर्षे ज्योतिषी होतो त्यामुळे मला हे माहिती आहे कि अशुभ भाकीत करण्यापूर्वी आपण one by one अशुभ फळ देणारी सगळी तत्वे लावतो आणि त्याचा एकत्रित विचार करून भविष्य सांगतो. म्हणजे सोप्या भाषेत सांगायचे तर सगळे कुयोग मिळून एकूण किती रहाडा घालतात (किती नेगेटिव्हिटी तयार करतात) त्या basis वर भविष्य सांगितले जाते. आपल्या कडे कॉम्पुटरजी असल्याने त्याचे हि सिम्युलेशन केले आणि त्याला सांगितले दोन्ही संचांची तुलना करून सांग. तर दोन्ही कडे सारखीच नेगेटिव्हिटी मिळाली. Verification साठी वर केल्याप्रमाणे शुभ तत्वांची पण तपासणी केली ती हि सारखीच. आता बोला?

म्हणजे सगळी तत्वे एक एक करून तपासली तर ती सिद्ध होत नाहीत, एकत्र लावून बघितली तरी हि होत नाहीत मग त्यांना काय अर्थ आहे? पुढे जाण्या अगोदर आपला डायलॉग परत मारतो - सोच लो ठाकूर - हीच ती तत्वे जी लावून तुमची आमची पत्रिका बघितली जाते.

इथे आम्ही जे सांगतोय ते एकूण प्रयोगाच्या फक्त २५% आहे प्रत्यक्षात खूप काही गोष्टी केल्या. भाकीत सांगताना हमखास वापरली जाणारी अनेक मूलभूत तत्वे, वेगवेगळे ६८ शुभ अशुभतेचे मापदंड, केंद्रातील शुभ ग्रह / पापग्रह, क्रूर नक्षत्रातील ग्रह, मग काय योगकारक ग्रहांची स्थिती वगैरे जेवढे तपासता येईल ते सर्व. सगळंच इथे सांगायला बसलो तर तुम्ही कंटाळून जाल म्हणून सिम्पल सिम्पल आणि वर वर सांगतोय. या प्रयोगाची खासियत म्हणजे आपण ३३८ अधिक ३३८ अशा सगळ्या मिळून ६००+ पत्रिका घेतल्या होत्या की जे संख्याशास्त्राच्या दृष्टीने अनिर्वाय (mandatory) आहे. आत्तापर्यंत या प्रमाणात ज्योतिषशास्त्राचे परीक्षण झालेले आमच्या बघण्यात तरी नाही. आणि म्हणूनच अशा प्रकारच्या या चाचण्यांचे निकाल व अनुमान यापूर्वी आपल्यासमोर आलेले नाही. हा प्रयोग कोणीही करू शकतो आणि तो ज्योतिषांनी जरूर करावा.

आता तुम्ही म्हणाल की एक प्रयोग करून एवढे मोठे हजारो वर्षे चालत आलेले शास्त्र खोटे कसे ठरवता? म्हणूनच आम्ही अनेक प्रयोग केले. अविवाहित (350 पत्रिका) विरुद्ध दीर्घकाळ लग्न टिकलेले (350 पत्रिका) यातही आम्हाला हेच रिझल्ट मिळाले. त्यानंतर साठ वर्षांच्या आत कर्करोग झालेले (254 पत्रिका) विरुद्ध कर्करोग कधीही न झालेले (498 पत्रिका), घटस्फोटित (३५० पत्रिका) विरुद्ध दीर्घ विवाहित (३५० पत्रिका), सेलेब्रिटी विरुद्ध सर्वसाधारण लोक असे अनेक प्रयोग केले. आणि त्या सर्व प्रयोगात तीच तत्वे तपासली (आठवा नाहीतर डायलॉग मारावा लागेल). पण त्या सर्व प्रयोगात वर सांगितलेलेच रिझल्ट मिळाले. म्हणूनच आम्ही ठाम पणे सांगू शकतो की या शास्त्रात, त्यांच्या तत्वात, नियमात काहीही तथ्य नाही. हे सर्व माझ्या दहा वर्षांच्या संशोधनाचे सार आहे.

जाते जाते last time - सोच लो ठाकूर, हि तीच तत्वे आहेत जी वापरून तुमची आमची पत्रिका बघितली जाते ...... मग आता तुम्हीच ठरवा, पत्रिका बघून लग्न करायचे का नाही, करिअर कुठल्या विभागात करायचे ते ज्योतिषाला विचारायचे का आपले आपण ठरवायचे. नातेसंबंधीचे निर्णय घेताना second opinion ज्योतिषाकडे जाऊन घ्यायचे का counselor कडे जाऊन घ्यायचे तेही ठरवा. शुभेच्छा !
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
Latest Update - येणाऱ्या प्रतिसादांवरून समजते कि या विषयावर अजून बरेच लिहायला पाहिजे होते. शास्त्रीय कल्पना या plane लिखाणापेक्षा audio - visual ने जास्त चांगल्या समजतात म्हणून अधिक माहिती पाहिजे असल्यास खालील youtube video जरूर बघा.
Title - Astrology Yes Or No (Marathi) ज्योतिषशास्त्र खरे आहे का नाही?
https://youtu.be/RBKuOeOF79w
संदर्भा खाली ज्योतिष समर्थकांचे ‘अपेक्षित (नेगेटिव्ह) प्रतिसाद आणि त्यावर माझा खुलासा’ हे हि दिलेले आहे त्यात बऱ्याचशा शंकांचे निरसन होईल.
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
आभार -
श्री. प्रकाश घाटपांडे यांचा या संशोधनामधील एका महत्वाच्या प्रयोगात म्हणजे ‘मतिमंद विरुद्ध हुशार लोकांच्या पत्रिकांचा तुलनात्मक अभ्यास’ या प्रयोगात प्रत्यक्ष सहभाग होता. त्यांच्या योगदानाशिवाय हा प्रयोग पूर्ण होऊ शकला नसता.
—--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
लेखकाची ओळख -डॉ. नागेश राजोपाध्ये हे गेले 20 वर्षे ज्योतिषविद्येचा अभ्यास करत आहेत. (सुरवातीला एक ज्योतिषी म्हणून आणि नंतर एक टीकाकार म्हणून). त्यांनी पुणे विद्यापीठातून पदार्थविज्ञान विषयात Ph.D. केली आहे. त्यांनी आपल्या कार्यकाळाची सुरवात ISRO मध्ये शास्त्रज्ञ म्हणून केली परंतु नंतर बहुतेक सर्व वेळ IT क्षेत्रात व्यतीत केल्यानंतर ते Accenture मधून Associate Director म्हणून निवृत्त झाले. सध्या आपला सर्व वेळ ते ज्योतिषविद्येच्या empirical परीक्षणाला आणि संशोधनाला देत आहेत.
संपर्क - astrobasedresearch@gmail.com
—-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
संदर्भ -
१. वरील संशोधनाविषयी आपल्या मित्रांना, नातेवाईकांना सांगायचे असेल तर खालील Youtube विडिओ ची लिंक फॉरवर्ड करा.
Astrology Yes Or No (Marathi) ज्योतिषशास्त्र खरे आहे का नाही?

https://youtu.be/RBKuOeOF79w

हिंदी व्हिडिओ लिंक - https://youtu.be/5iVmPUo42aE

२. या संशोधनाचे अधिक तपशील म्हणजे - कुठले नियम तपासले, डेटा कसा घेतला, कुठून घेतला, संख्याशास्त्रीय चाचण्या (statistical tests) कशा केल्या वगैरे तपशील बघायचा असल्यास www.astrologyyesorno.com ला भेट द्या. त्यातील मराठी वेबसाईटवर ‘संशोधन’ या वेब पेज वर सर्व तपशील दिला आहे. किंवा प्रकाशित पेपर बघू शकता

३. An article in The Skeptic, UK, June 2021 by Dr. Nagesh Rajopadhye
When put to the test, the predictive powers of Indian astrology simply don’t hold up
Link - https://www.skeptic.org.uk/2021/06/when-put-to-the-test-the-predictive-p...

४. Empirical testing of few fundamental principles of Vedic astrology through comparative analysis of astrological charts of cancer diseased persons versus persons who never had it
International Journal of Applied Research - 2021; 7(5): 74-85
Link - DOI - https://doi.org/10.22271/allresearch.2021.v7.i5b.8548

५. Comparison of Vedic astrology birth charts of celebrities with ordinary people: An empirical study, International Journal of Jyotish Research, 2021; 6(1): 104-116
(Volume 6, Issue 1, Part B, pages 104-116)
DOI : https://doi.org/10.22271/24564427.2021.v6.i1b.114

६. ज्योतिष’शास्त्र’ म्हणायचे असेल तर Empirical (अनुभवसिद्ध) परीक्षण अपरिहार्य
आजचा सुधारक, ऑगस्ट, 2021 चळवळ, परीक्षण, विज्ञान, विवेक विचार, शिक्षण, श्रद्धा-अंधश्रद्धा - डॉ. नागेश राजोपाध्ये
https://www.sudharak.in/2021/08/7477/

७. जर तुम्हाला किंवा तुमच्या जवळच्या कोणाला पत्रिका न बघता लग्न करण्यासाठी किंवा निर्णय घेण्यासाठी खरोखर मदत पाहिजे असेल तर लिहा – astrologyyesorno@gmail.com
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

अपेक्षित प्रतिसाद आणि खुलासा
या विषयावर मी अनेक webinars दिले आहेत, सोशल मीडिया (Quora, reddit, FB etc) वर पण लिहिले आहे. त्या अनुभवावरून ज्योतिष समर्थकां कडून खालील प्रतिसाद येतो असा हमखास अनुभव आहे. सर्व सामान्य वाचक त्याने confuse होऊ नये म्हणून अपेक्षित प्रतिसाद आणि त्यावरील माझा खुलासा खालील प्रमाणे आहे
—---------------------------------------------------------------------------------------------------------------------------
अपेक्षित प्रतिक्रिया - हे एवढेच परीक्षण पुरेसे आहे का ? याशिवाय अजून परीक्षण करायला पाहिजे अशी आमच्या कडे तत्वे आहेत.
खुलासा - ज्योतिषविद्येमधील जी प्रमुख तत्वे आम्ही वैध नाहीत हे सिद्ध करून दाखवले आहे, ती इतकी fundamental आहेत कि ती वापरल्याशिवाय कुठलेही भविष्य सांगितले जाऊच शकत नाही. ज्योतिषाच्या कुठल्याही पुस्तकात ती दिलेली असतात आणि त्यांना कुठलाही ज्योतिषी अमान्य करणार नाही. त्यामुळे आजच्या मितीला जे ज्योतिष त्या तत्वांच्या आधारे सांगितले जाते ते तरी निश्चितच अर्थहीन आहे हे सरळसरळ दिसत आहे. ज्योतिषाच्या परीक्षणाचा मुख्य problem म्हणजे प्रत्येकाचे वेगळे नियम आहेत. उदा घटस्फोट घेतला तर एक standard document असे मिळणार नाही कि जे पत्रिकेतील exactly कुठल्या योगांमुळे घटस्फोट होतो याच्या नियमांची यादी देईल. अशी सर्वमान्य यादी असती तर परीक्षण करणे सोपे आहे. पण तशी नसल्यामुळे जगातील लाखो ज्योतिषांच्या लाखो याद्या अवैध सिद्ध करणे हे केवळ अशक्य आहे. त्यापेक्षा मी लेखात म्हणाल्या प्रमाणे खरेतर ज्योतिषांनीच पुढाकार घेऊन असे परीक्षण करायला पाहिजे आहे कारण त्यांच्या भविष्यावर लोक जीवनातील महत्वाचे निर्णय घेत असतात. त्यामुळे कोणाला कुठले नियम वैध आहेत वाटत असेल तर त्याने ते तसे ६००+ पत्रिका घेऊन सिद्ध करून दाखवावे. किंवा असा शास्त्रीय प्रयोग अगोदर झाला असेल तर त्याचा संदर्भ द्यावा. माझ्या बघण्यात जे ज्योतिषाच्या बाजूने संशोधन आले ते फार तर फार १०० पत्रिकांचा आधार घेऊन आणि ते सुद्धा selective data घेऊन केलेले दिसले कि जे अर्थातच शास्त्रीय नाही.
—------------------------------------------------------------------------------------------------------------------------
अपेक्षित प्रतिसाद - ज्योतिष हि प्रोबॅबिलिटी आहे, तुम्ही ती वस्तुनिष्ठ समजून objectively टेस्ट करू शकत नाही.

खुलासा - Creating confusion is one the best defense या उक्ती प्रमाणे probability हा शब्द वापरून ज्योतिषाचे समर्थन होताना हल्ली दिसते जे अर्थहीन आहे. खरेतर Empirical testing मध्ये जे test होते ती probability च टेस्ट होते. त्यामुळेच मतिमंद असण्याचे नियम हुशार लोकांच्या पत्रिकेत आढळले तर केवळ त्याच एका गोष्टीला दाखवून आपण कधीच म्हणत नाही कि ते नियम अवैध आहे. ते काही % विरुद्ध संचात आढळणे ठीक आहे (इथे probability येते कि जी आपण मान्य करतो) पण आपली अपेक्षा हि आहे कि दिलेला नियम मतिमंदसाठी असेल तर तो मतिमंद लोकांच्या पत्रिकांमध्ये हुशार लोकांच्या पत्रिकांपेक्षा सिग्निफिकन्टली जास्त % ने लागू पडला पाहिजे. म्हणजेच त्याची मतिमंद लोकांच्या पत्रिकांमध्ये आढळून यायची probability हि significantly जास्त असली पाहिजे. ते तसे आहे का नाही हे आपण test करतो. ह्याचा अर्थच असा आहे कि आपण probability च टेस्ट करत आहोत.
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
अपेक्षित प्रतिसाद - ज्योतिषांना हे कधीच पटणार नाही, आपल्या कडच्या लोकांनाही हे पटणार नाही, मग या सगळ्या संशोधनाचा काय उपयोग?

खुलासा - माझ्या मते समाजात ४०-५० % अशी लोक आहेत जे ज्योतिष किंवा त्यांचे कट्टर समर्थक या वर्गात मोडतात. त्यांना आपण सोडून देऊ. त्यांच्या साठी मी हे संशोधन केलेले नाही कारण मी आकाश पातळ एक केले तरी त्यांना हे पटणार नाही याची मला कल्पना आहे. या उपर १० ते १५ % अशी लोक आहेत जे कधीही ज्योतिषावर विश्वास ठेवणार नाहीत. यांना पटवून द्यायचा प्रश्नच येत नाही. उरली ३५-४० % लोक जे confused आहेत. जे आज घाबरून ज्योतिषाच्या मागे जातात, विषाची परीक्षा नको म्हणून ज्योतिषाचे ऐकून काही थोडेफार पाळतात, पण एका बाजूला त्यांना खरेतर ते पटत नसते आणि त्यांना आपले स्वतःचे असे मत अजून बनवायचे आहे. माझे संशोधन हे ह्या लोकांसाठी आहे. लक्षात ठेवा आजची तरुण पिढी हि बरीसचशी या वर्गात मोडते.

यावर पण मी थोडे अजून संशोधन केले. ज्यांचे वय ३०+ आहे त्यांना पटवून देणे कठीणच असते. वेळ वाचवण्यासाठी आजकाल मी तिथे जास्त convince करत बसत नाही. पण त्याउलट जे तरुण आहेत (३० minus) त्यांना पटवून देण्याच्या बाबतीत माझा success rate हा ६०-७०% आहे. त्यांचे विचार by default legacy च्या विरुद्ध असतात. ते खूप technology च्या आधारे विचार करतात, शास्त्रीय कल्पना लवकर समजतात आणि आपले मत बदलायला तयार असतात असा माझा स्वतःचा अनुभव आहे. हि खूपच दिलासा देणारी बाब आहे कारण हीच पिढी आपले भवितव्य आहे.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
अपेक्षित प्रतिसाद - अमुक ज्योतिषाने आम्हाला / आमच्या नातेवाईकांना सांगितलेले भविष्य बरोबर ठरलेले आहे, कित्येकांनी website वर लिहूं ठेवललेल खरे झाले आहे मग तुम्ही ज्योतिषशास्त्र खरे नाही असे कसे म्हणता

खुलासा - माझा मुद्दा इथे हाच असेल कि शास्त्रीय परीक्षणाशिवाय आपण एक दोन अनुभवांना किंवा घटनांना त्या विद्येचे proof मानू शकत नाही. मी स्वतः संशोधन करण्या पूर्वी काही महिने असे संशोधन कोणी केले आहे का याचा शोध घेत होतो. मला तरी ज्याला आपण ‘शास्त्रोक्त’ म्हणू असे ज्योतिष विद्येच्या बाजूने असलेले संशोधन किंवा परीक्षण सापडले नाही. जे संशोधन म्हणून प्रसिद्ध झाले आहे त्या खरे तर case studies आहेत. म्हणजे एखादा योग कॅन्सरला कारणीभूत होतो असे कोणाला सिद्ध करायचे असेल तर तो तसा योग असलेल्या ४०-५० पत्रिका घेऊन ते दाखवणार कि बघा असे योग आहेत. हे शास्त्रीय परीक्षण होत नाही. त्यासाठी पत्रिकांचे कॅन्सर असलेले आणि कॅन्सर नसलेले असे दोन गट तयार केले पाहिजे, डेटा प्रत्येक संचात ३००+ घेतला पाहिजे, तुम्ही सांगत असंणारे cancer असण्याचे नियम कॅन्सर नसणाऱ्यांच्या पत्रिकेत कसे नाहीयेत किंवा त्या दोन संचात कसा लक्षणीय फरक आहे हे दाखवले पाहिजे, त्यासाठी स्टॅटिस्टिकसची सिग्निफिकन्स टेस्ट केली पाहिजे आणि अशा कितीतरी गोष्टी आहेत कि ज्या केल्याशिवाय आपण त्याला मान्यता देऊ शकत नाही. या मितीला तरी ज्योतिष सिद्ध होईल असे ‘शास्त्रीय’ परीक्षण माझ्या बघण्यात नाही.
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

Group content visibility: 
Public - accessible to all site users

जिद्दु मी ऐकलेले विबासं हे १२ व्या वरुन ठरते. १२ वे सारे 'हिडन/ दॄष्टीआडची सॄष्टी' असते. शिवाय शय्यासुख १२ व्यावरुनच पहातात असे काहीसे वाचलेले स्मरते.
विबासं = शय्यासुख असे मला म्हणायचे नाही.
दॄष्टीआडची सॄष्टी = १२ वे घर म्हणुन विबासं = १२ वे घर असे म्हणायचे आहे.

चुकीचे ऐकले आहे ते. दुसरा धागा काढा तुम्ही तिथे बोलू. इथे सरांच्या संशोधनावर चर्चा होऊद्या.

तुम्ही व्यावसायिक (प्रोफेशनल) वैज्ञानिक होतात. तरीही कुडमुड्या माणसाच्या सांगण्यावरून नुसते तुम्हाला 'हवं ते भविष्य' ऐकत फिरत राहिला नाहीत तर दुसऱ्यांना भविष्य सांगायचा (रीड: फसवायचा) धंदा सुरू केलात. आता तुमची समस्या राहिली नाही तर हे थोतांड आहे सांगत फिरण्याला काय अर्थ आहे?
थोतांड आहे सांगून भविष्य ऐकणारे कमी होणार नाहीत. तुम्ही जेव्हा भविष्य ऐकलं तेव्हा तुम्हाला भविष्य हे थोतांड आहे याची पूर्ण कल्पना होती तरीही तुम्ही वाहवत गेलात. ते का गेलात? त्या कारणाचा विचार करून त्यावर काही उपाययोजना सुचवाल असं अपेक्षित होतं. तुम्ही चाकाचा शोध परत एकदा लावण्याचा सोपा पर्याय निवडला.

अमित, थोतांड आहे हे त्यांनाही नंतर रिअलाईज झालं असं म्हटलंय त्यांनी.
मला त्यांचा हा प्रवास रोचक वाटला. मनाच्या दुबळ्या अवस्थेत ते ज्योतिष्यांकडे फिरत बसले, जे स्वाभाविक आहे. (जेव्हा तुमचं स्वतःचं ठाम मत फलज्योतिषाविरुद्ध नसतं तेव्हा हे असं होणं साहजिकच आहे) नंतर स्वतः अभ्यास करताना त्यातल्या गोष्टी खटकत राहिल्या, त्यातून त्यांनी हा संख्याशास्त्रीय अभ्यास केला आणि फलज्योतिषाला काहीही शास्त्रीय आधार नाही असा निष्कर्ष काढला.
काही लोकांचा ठाम विश्वास असतो की फलज्योतिष बरोबर आहे. काहींचा ठाम विश्वास असतो की ते थोतांड आहे. उरलेले बरेचसे कुंपणावर असतात. या संशोधनामुळे ते लोक कुंपणावरून फलज्योतिषाच्या बाजूला उडी मारणार नाहीत अशी आशा आहे! म्हणजे निदान कुणीतरी असा प्रयत्न केलाय ही आशादायक बाब आहे.

मला वाटतं गुणांकन पद्धतीने वापरावी. सरळ ठोक भाकीत होणार / नाही पेक्षा गुण. म्हणजे सिनेमा, मोबाईलसाठी वापरतात तसे पाचापैकी किंवा दहापैकी किती.
उदाहरणार्थ -
बालपण सुख . . ३/१०
प्राथमिक शिक्षण . . ५/१०
माध्यमिक शिक्षण . . ५/१०
उच्च शिक्षण . . .१/१०
विवाह . . . ८/१०
संतती . . ६/१०
पैसा . . .२/१०
प्रवासयोग . . ३/१०
परदेशप्रवास . . .०/१०
वाहनयोग . . .७/१०
घराचे सुख . . .३/१०
नोकरी /व्यवसाय/धंधा उत्पन्न . . .४/१०
वगैरे.
गुणांवरून जातक समजून जाईल कशात किती सुख आहे.

नंतर रियालाईज झालं हे मान्यच आहे. प्रत्येकाचा लर्निग कर्व असतो. त्याबद्दल काहीच नाही.
मला म्हणायचं आहे की ज्या लोकांचा मुलगा 'आज मरणार आहे' हे त्यांना कोणी सांगितलं आहे त्यांना भविष्यावर ते थोतांड आहे सांगणे हा उपाय आहे का? ते भविष्य ऐकायला गेले ते मुळात मानसिक समस्येसाठी. त्यावर ते थोतांड आहे सांगून काय होणार?
भविष्य थोतांड आहे सांगणाऱ्या व्यक्ती, पेपर्स, वेब साईट, लिटरेचर काय कमी आहे? ती समस्या नाहीच आहे. समस्या मानसिक आहे तर इलाज ही मानसिक हवा. शास्त्रीय शिक्षण, सारासार दृष्टिकोन शिकवला आणि अंगिकारला नाही तर आज तुमच्या थोतांड आहे वर विश्वास/ श्रध्दा ठेवतील उद्या कोणी विपरीत सांगितलं तर त्यावर.

>>>>>>मनात घटस्फोट झाले आहेत पण व्यवहारात पतिपत्नी असल्याच भासवतात असे अनेक जोडपी आहेत त्यांचे काय? (लिव्हिंग सेपरेशनशिप हा शब्द त्यावेळी सुचणे शक्य नव्हते. ) सुखाने नव्हे तर नाईलाजाने एकत्र राहणार्‍या जोडप्यांचा प्रश्न कसा हाताळणार? त्यांनी फक्त कायदेशीर दृष्ट्या जे घटस्फोटित आहे त्याचाच विचार करणार असल्याचे सांगितले .

करेक्ट ७ वे घर हे कायदेशीर रित्या असलेल्या किंवा कायद्याने बंधनकारक अशा नात्यांसाठी बघतात. हे माझे वाचन आहे.

तुमचा प्रयोग उलट्या प्रकारे करून बघता येईल का? उत्तम आरोग्य असलेल्या आणि काही आजारी व्यक्तींच्या पत्रिका घ्यायच्या आणि शक्य तितक्या ज्योतिष बघणाऱ्या व्यक्तींना त्यांच्या overall आरोग्याविषयी विचारायचं. ज्योतिष हे शास्त्र आहे विज्ञान नाही. विज्ञानाचे नियम वस्तुनिष्ठ असतात पण शास्त्र हे बऱ्यापैकी व्यक्तीनिष्ठ असतं. तुम्ही computer simulation ने वस्तुनिष्ठता आणलीत तर तुम्हाला शास्त्र तपासताच येणार नाही.
What if we conduct a double-blind, 1:1 randomized trial with 3 persons in each dataset of healthy vs terminally/chronically ill participants and show their horoscopes to as many astrologers as possible (at least 100) and check if they are able to predict any health problems. मला या प्रयोगाचे निष्कर्ष जाणून घेण्यात रस असेल.

ते भविष्य ऐकायला गेले ते मुळात मानसिक समस्येसाठी>>
तसं नसावं.
आमच्याकडे पाहुणे म्हणून आलेल्या एका ज्योतिषाने त्याच्या पत्रिकेत अल्पायुषी असण्याचे योग्य आहेत असे सांगितले.
असं म्हटलंय बघ. सहज दाखवली असेल पत्रिका. मीही हात दाखवलाय होस्टेलवरच्या हौशी मैत्रिणीला Proud

मूर्खपणा आहे. ज्यांना एखादी शाखा शास्त्र आहे हे सिद्ध करायचे असते त्यांनी डेटा, प्रयोग करून ते सिद्ध करायचे असते.
ज्यांना हे शास्त्र नाही हे माहिती आहे त्यांनी प्रयोग करून हे शास्त्र नाही म्हटल्याने ज्योतिषी मान्य करणार आहेत का ? बावळटपणा आहे. वेळ वाया गेला तो वेगळाच.

मानव आणि हरचंद →>>> घाटपांडे हे अशा प्रकारच्या प्रयोगाला ज्योतिष वर्गा कडून काय शंका येऊ शकतात याविषयी त्यांना सांगत होते. माझ्याच्याही अशा खूप चर्चा होतात. प्रयोग करताना तो संदिग्ध असावा हा त्यांचा मुद्दा आहे. ज्योतिषी लोकांबरोबर ते मिसळून असल्याने आशा प्रयोगाचे निष्कर्ष ज्योतिषाच्या विरुद्ध आले तर ते कसे react करतील याचा त्यांना चांगला अंदाज आहे. इथेही त्यांचे वाक्य तेच सांगते - "ज्योतिषजगतात हे मान्य होणार नाही असे मी त्यांना सांगितले होते. (ते पुढे खरेच झाले)". प्रकाशजी आपल्याच बाजूचे आहेत.

मुलीच्या पत्रिकेत वैधव्ययोग आहे असे ज्योतिषाचे ऐकुन लग्ने मोडली जातात. (पत्रिकेत विधुरयोग आहे असे कधी ऐकले नाही). तर पत्रिकेतील या योगावरही संशोधन झाले आहे का? >>> तुम्ही फारच interesting विषय माझ्या लक्षात आणून दिला त्याबद्दल धन्यवाद. म्हणजे विधवा योगाविषयी ज्योतिषी पुस्तकांमधून बरेच काही वाचले आहे आणि त्यानुसार लवकर वैधव्य आलेले विरुद्ध दीर्घ वैवाहिक असा प्रयोग करायचं विचार होताच पण असा योग असण्याने मुलींच्या लग्न जमण्यावर परिणाम होणार असेल तर त्याला खोडून काढलेच पाहिजे. मी निश्चित या प्रयोगाला प्रार्थमिकता देईन.

अमितजी आज मी जेव्हा जेव्हा प्रतिसाद सबमिट करत होतो तेव्हा error message येत होता त्यामुळे उत्तर देऊ शकलो नाही. परंतु ‘वावे’ यांनी थोडक्यात पण अतिशय छान शब्दात काही उत्तरे दिली आहेत त्या साठी त्यांचे आभार मानावे ठेवढे थोडे. @वावे - धन्यवाद
अमितजी, मला तुमच्या लिहिण्यात थोडी रागाची भावना जाणवते आहे त्यामुळे कदाचित मी आत्ता काही सांगितले तर ते तुम्हाला पटणार नाही. तसेही हे लिहायला उशीर झाला आहे तर मी आजची रात्र जाऊ देतो आणि उद्या सविस्तर लिहितो. मी हे संशोधन का केले, काय फोकस ठेवला आहे, का ठेवला आहे हे मी वरती उत्तरांमध्ये लिहिले आहे पण कदाचित ते सर्व तुम्ही वाचले नसेल. पण मी ते निश्चित परत cover करीनच.

सावकाश लिहा, शक्यतो प्रतिसादात लिहा. मूळ लेख आवश्यकता नसेल तर बदलू नका, त्यातील बदल सहज ओळखू येत नाहीत आणि ट्रॅक करणे अशक्य असते.
आणि मला प्लीज 'जी ' म्हणू नका.

अमितव, आताही ते थोतांड आहे हे फुकट सांगत नाहीत (नसावेत). यूट्यूब, ब्लॉग, पुढे कालांतराने कार्यक्रमात स्पीकर फीज, अपियरंस फीज इ कमर्शियल अ‍ॅक्टीव्हीटीजच आहेत. एक व्यक्ती पदरचे पैसे देत नसली तरी यथावकाश ह्या संशोधन प्रसारातही आर्थिक फायदा आहेच. ज्योतिष सांगणे आणि त्या विरोधी बोलणे दोन्ही व्यवसायच. त्यात इल्लिगल काही नाही. ज्याला जे पटतं, जमतं तो ते करतो/ते. ज्योतिष सांगताना कुणाला मानसिक त्रास, लुबाडणूक होणार नाही हे सांभाळलं की झालं हे माझं मत, अर्थात थोतांड आहे म्हणून बंद करा म्हणणार्‍या गटाचाही आदरच आहे.

Screen Shot 2021-12-28 at 3.35.34 PM.png नागेशसर, हे तुमच्याच वेबसाईटवरून. नक्की कसले कंसल्टींग देता?? फ्री देता ते ठीक आहे पण ज्योतिषाबद्दल देता का? वाचून तसा समज होतो आहे. हे असं तळ्यात-मळ्यात बरं नाही. एक बाजू पकडा.
(मला सीमंतिनीमॅम म्हणू शकता Happy इथे बाकीचे ताई म्हणतात. पण मॅम छान वाटलं :D)

भरत, _/\_ काही आवडलं नसेल तर सरळ सांगा, एडिट करते. इथे कुणाला दुखवायचे नाही की स्वतःसाठी काही मिळवायचे नाही मला. नको इतकं स्पष्ट लिहीते म्हणून ख्याती आहे (आणि इथेही स्पष्ट लिहीले आहे) तर आता ऋ सटलतेची साडेसाती मागे नका लावू... Lol

@ सी, ते कन्सल्टेशन बहुतेक ज्योतिषाचा आधार घेणं कसं चुकीचं आहे हे समजून घेण्यासाठी/ लग्न बिग्न असेल तर पालकांना समजावून देण्याचा प्रयत्न करण्यासाठी असावं.
म्हणजे स्वतःचा विश्वास फारसा नसतो किंवा तेवढा विचार केलेला नसतो पण आता महत्त्वाचा निर्णय घ्यायचाय तर काही तरी भूमिका ठरवली पाहिजे (फोटोवरून/ प्रोफाइलवरून/भेटून मुलगा/ मुलगी आवडलाय/आवडलीय पण पत्रिका नेमकी जुळत नाहीये Wink )
धागालेखकच सांगू शकतील.
@धागालेखक , एरर येत असेल तर स्माईली वगैरे काढून टाकून मग प्रतिसाद सेव्ह करून बघा.

सीमांतिनी mam, तुमच्या प्रश्नाने वाचणाऱ्यांचा गैरसमज होऊ शकतो. जिथे मी फ्री consultation देतो म्हणले आहे तिथेच स्पष्ट शब्दात ' ज्योतिषाला बाजुला ठेवण्यासाठी' असे म्हटले आहे. इथे कॉपी पेस्ट करतो

-------------------------------
जर आपण एखादा अतिशय महत्त्वाचा निर्णय, जसे की लग्न, नोकरी,-व्यवसाय इत्यादी ज्योतिषशास्त्राच्या आधार घेत असताना सांशक असाल आणि ज्योतिष शास्त्राला बाजूला ठेवण्यासाठी लागणारे धैर्य माहितीअभावी होत नसेल तर आपण फोनवर सल्ला-मसलत घेण्यासाठी विनंती करू शकता. आम्ही आपल्याला जरूर संपर्क करू. काळजी करू नका आम्ही कन्सल्टेशन साठी कुठलाही मोबदला घेत नाही. ही ज्योतिष सेवा पुरविणारी व्यावसायिक वेबसाईट नव्हे. ही एक संशोधनासाठी तयार केलेली वेबसाईट आहे, त्याचा मुक्तपणे लाभ घ्यावा.
--------------------------------------------------------------------
तुम्हीच सांगा यात कुठे confusion होऊ शकते.
आणि या प्रमाणे अनेक लोकांनी फायदा घेतला आहे.

ज्योतिषाकडे लोक का वळतात हे सांगून इतके इतके ज्योतिष सांगितले तर ठीक आहे हे एक प्रकारचे समर्थनच आहे. आपल्याला ज्योतिष पटते कि नाही याचे हो किंवा नाही इतकेच उत्तर असू शकते. हो किंवा नाही असे सांगणे हा प्रामाणिकपणा आहे. टक्केवारीवर किंवा अमूक एक समर्थनीय या निसरड्या वाटा आहेत. एकतर आपण स्वतःच गोंधळलेले असू, स्वतःच स्वतःला फसवत असू किंवा नास्तिकतेचे बुरखे पांघरून ज्योतिषाची भलावण करत असू शकतो. आपले आपल्याला समजले पाहीजे. दुस-याचाही गोंधळ उडवून देऊ नये.

ज्योतिष हे शास्त्र आहे कि नाही यावर जर संशोधन होत असेल तर शास्त्र आहे किंवा नाही यासाठी कोणते पॅरामीटर्स घेतले हे सांगा.
ग्रहांच्या हालचालींमुळे वैयक्तिक आयुष्यात कसा फरक पडतो याचे गणित कसे मांडायचे याची समीकरणे इथे द्या. कुणाला उत्साह असेल तर तो ही त्याचा अभ्यास करेल. शास्त्र आहे कि नाही असा अभ्यास दहा वर्षे करावा लागत असेल तर यातले काहीतरी अस्तित्वात असेल. जर काहीच नसेल तर तत्क्षणी हे शास्त्र नाही हे सांगता आले असते.

अनमानधपक्याला शास्त्रात स्थान नाही. अनमानधपक्याचा डेटा गोळा केला तरी त्यामागचा कार्यकारणाभाव, सिद्धांत मांडता आले पाहीजेत. अ‍ॅडमिन / वेमा वक्री आले तर आयडी ब्लॉक होतो हे सायन्स असेल तर तसे सिद्ध करता आले पाहीजे. तसेच ग्रहांचे पण आहे.

डीएनए ही काल्पनिक गोष्ट नाही. डीएनए मुळे पुढच्या पिढीतले गुणधर्म निश्चित होतात. मूल कसे निघणार आहे याचे अंदाज बांधले जातात. त्याचे रंग, रूप हे नात्यातच कुणासारखे तरी निघणार आहे हे सांगता येते. यामागचे शास्त्र माहिती झाले आहे.
हातावरच्या रेषांमुळे लग्न कसे ठरते, मूल कसे होते हे समजावून सांगा.

सर, दोन बदल सुचवते -
१. तुम्ही इथे मराठीत "माहितीअभावी" लिहीले आहे. मात्र इंग्रजीत करेज लिहीले आहे (मी स्क्रीनशॉट दिलेला उतारा बघा). 'करेज' हे तसे मोघम आहे. तिथे तुम्ही काय कंसल्टेशन देता ते अजिबात स्पष्ट होत नाही. We provide information about inconsistencies in astrology and/or misinformation in astrological services किंवा तत्सम काही हवे.
२. तसेच आपण पूर्वी ज्योतिष व्यवसाय करीत होता तेव्हा This is not a commercial astrology website हे वाक्य डिलिट करणे जास्त ठीक कारण हौशी म्हणजे विनामोबदला त्या सर्व्हीसेस अजूनही देता असा अर्थ होत नाही. This is a research site... हे वर्णन योग्य आहे.
"बाल की खाल" प्रकार नाही किंवा उगाच गोंधळ वाढवयचा किंवा तुम्हाला त्रास द्यावा असे काही हेतू नाहीत. मनापासून सांगते आहे. पटला विचार तर स्वीकारा, नाहीतर लोकं फायदा घेत आहेत म्हणून इग्नोरही करू शकता. माझ्या प्रश्नांचा उद्देश वाचकांचा गैरसमज करण्याचा नसून एक वाचक म्हणून माझा जो गैरसमज होतो आहे तो तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आहे.

Happy वावे, तूच छान समजावलंस... डिसीजन-मेकिंग प्रोसेस बद्दल माहिती देतात.

सीमंतिनी मॅम, मी हे समाज कार्य म्हणून करत आहे आणि यात अर्थार्जन हा कधीही भाग नव्हता, आजही नाहीये.
मी जेव्हा ज्योतिषी होतो ती १२ वर्ष पूर्वीची गोष्ट आहे आणि तेव्हा website वगैरे नव्हती. तेव्हाहि एक रुपयाही मी कधीही कोणाकडून घेतला नाही. गेले दहा वर्षे मी या project वर काम करतोय आणि त्या साठी लागणारे software स्वतःच्या पैशाने develop केले आहे. या कामासाठी दोन वर्षे लवकर निवृत्त झालो एवढे मला त्याचे महत्व वाटते. बाकी कोणी विश्वास ठेवो न ठेवो अशा संशोधनाची अत्यंत जरूर आहे असे माझे मत आहे. त्या मागची भूमिका कदाचित इथे तुम्हाला एक लेख वाचून होणार नाही. प्रत्यक्ष संवाद करायचा असल्यास मी कधीही तयार आहे. आता सुद्धा निवृत्त झाल्यावर आपल्या संशोधनाचा समाजाला उपयोग व्हावा या हेतूने फ्री consultations, webinars वगैरे चालवले आहे. तेव्हा youtube, blog हे सर्व जरी मी करीत असलो तरी पैशाचा व्यवहार आणि अपेक्षा शून्य आहे आणि तो तसाच राहील.
तुम्ही वर screen शॉट दिला आहे त्यातला message मला तरी confusing वाटत नाही पण तुम्ही वाचक आहात तेव्हा तुमचे मत मी ग्राह्य धरतो आणि त्यात सुधारणा करायची जरूर असेल तर करतो. मात्र मराठी website वरचा message, ब्लॉग खाली दिलेला message अगदी clear आहे.

Happy सर, आपला उद्देश आणि पद्धती नेक आहे. आधी कुणी पोस्टीत "ज्योतिषाचा धंदा सुरू केला" इ लिहीले तिथेच हे स्पष्टीकरण द्यायचे ना पटकन.

@वावे तुम्हाला परत एकदा धन्यवाद ! प्रतिसाद सबमिट करताना error messages अजूनही येतच आहेत. मी admin ला लिहिलेच आहे पण कदाचित तो माझा learning curve चा भाग असेल. प्रतिसाद देण्याच्या चौकटी खाली message format चा option आहे आणि त्याचा या error शी संबंध आहे असा माझा कयास आहे. हे हि संशोधन चालू आहे. पण दरम्यान माझ्या बाजूने अगदी योग्य शब्दात प्रतिसाद दिला याबद्दल मनापासून धन्यवाद.

बाकी काही म्हणा पण दूध का दूध, पानी का पानी, असे एक संशोधन असे जर शीर्षकात नसते तर लोकांनी हा धागा क्लिक केला असता का? ज्योतिष हे काय नेहमीच चर्‍हाट आहे असे म्हणुन दुर्लक्ष केले असते. या बद्द्ल तरी नागेशजींना श्रेय द्यायला हवे. हळू हळू त्यांना मायबोलीवरील आयड्यांची बलस्थाने व मर्यादा लक्षात यायला लागतीलच.काय हो रेव्यु बरोबर आहे ना? Lol Lol Lol

नागेशजी, You are welcome Happy
असा अभ्यास कुणीतरी खरोखरच केलेला आहे हे मला आवडलेलं आहे.

Pages