ज्योतिष शास्त्र खरे आहे का नाही? - दूध का दूध, पानी का पानी, असे एक संशोधन
डॉ. नागेश राजोपाध्ये
—------------------------------------------------------------------------------------------------------------------------
मायबोलीवर ज्योतिष विषयावर अनेक लेख आणि प्रतिसाद वाचले. TV वर पण अनेक परिसंवाद ऐकले. वाद घालून डेड एन्ड आल्यावर सगळे शेवटी हेच म्हणताना दिसतात कि ज्योतिषावर संशोधन व्हायला पाहिजे. आणि म्हणूनच तुमच्या मनाचे पूर्ण समाधान होईल असे आणि आम्ही स्वतः केलेले असे असे हे संशोधन आपल्या समोर ठेवत आहे. अतिशय शास्त्रोक्त, हजारो पत्रिका घेऊन कॉम्प्युटरच्या साहाय्याने केलेले हे परीक्षण वैदिक ज्योतिष शास्त्राच्या इतिहासात पहिलेच असेल. अगदी ज्याला आपण दूध का दूध पानी का पानी म्हणतो असे! वास्तविक पहाता हे संशोधन कोणीतरी या पूर्वीच करायला पाहिजे होते. आणि कोणीतरी कशाला ज्योतिषांनीच हे संशोधन खरेतर करायला हवे होते कारण ते या विद्येचा व्यावसायिक वापर करत आले आहेत त्यामुळे ती त्यांची प्राथमिक जबाबदारी होती. पण असो,आपण सरळ मुद्द्यावर येऊया.
मी तुम्हाला आम्ही केलेला प्रयोग थोडक्यात सांगतो - सर्व प्रथम पत्रिकांचे दोन मोठे संच (groups) केले कीजे एकमेकाच्या अगदी विरुद्ध गुणधर्माचे आहेत. म्हणजे 338 पत्रिका मतिमंद विरुद्ध 338 पत्रिका हुशार लोकांच्या या दोन्ही संचाना ज्योतिष शास्त्रात बुद्धीचे अशुभ फळ मिळण्यासाठी असलेले नियम लावले आणि ते दोन्हीकडे किती लागू पडले याची तुलना केली. अर्थातच ज्योतिष विद्या खरी असेल तर ते नियम मतिमंद पत्रिकांना जास्तीत जास्त लागू पडताना दिसतील आणि त्याउलट हुशार लोकांच्या पत्रिकांना फारसे लागू पडणार नाही. असे झाले तर ते शास्त्र आहे असे मान्य केले पाहिजे नाहीतर नाही. बघा इतका सोपा हा प्रयोग आहे.
आता इथून पुढे जायच्या अगोदर मी तुम्हाला एक इशारा देतो - जर असे कुठले एक कारण असेल कि ज्यामुळे सर्व सामान्य माणसे ज्योतिष शास्त्र खरे आहे का नाही या प्रश्नापासून दूर राहिली असतील तर ते म्हणजे आपला (म्हणजे आपल्या सर्वांचाच) मानसिक आळशी पणा. जरा शास्त्रीय concept समोर आली कि ‘कशाला डोक्याला ताण द्यायचा’ असे म्हणून आपण आपली विचार प्रणाली switch off करतो. या एकाच कारणाने सर्वसामान्य माणूस या विषयातले सत्य शोधू शकलेला नाही आणि आयुष्यभर त्याची किंमत पण मोजत आला आहे. पण आपण आज इथे असं नको करायला. हा विषय सोप्यातला सोपा करून सांगायची जबाबदारी माझी, पण त्याच बरोबर त्यासाठी थोडा तल्लख विचार करायची जबाबदारी तुमची. आणि तुम्ही ते केले तर पुढच्या 5 मिनिटांमध्ये हा विषय तुम्ही तुमच्या आयुष्यासाठी कायमचाच मिटवून टाकाल आणि लग्न, करिअर, business असे महत्वाचे निर्णय घेताना मनाचा गोंधळ उडणार नाही.
आपण इथे जे करत आहोत त्याला एम्पिरिकल टेस्टिंग (Empirical Testing) म्हणतात. कुठल्याही शास्त्राला ‘शास्त्र’ म्हणून सिद्ध होण्यासाठी ही परीक्षा पास करावी लागते. परदेशामध्ये पाश्चिमात्य ज्योतिष शास्त्राची अशी चाचणी अनेक वेळा घेतली गेली (आणि ते कधीच पास होऊ शकले नाही). आपल्याकडे मात्र वैदिक ज्योतिष शास्त्राची अशी चाचणी घेण्यासंदर्भात कुठल्याच स्तरावर कसलीही चर्चा नाही (मौनम सर्वार्थ साधनम) आणि म्हणूनच आम्ही हा प्रयोग करणे महत्त्वाचे मानले.
आपल्या suspense स्टोरीचा भाग १ (episode 1) म्हणजे आपण ज्योतिषातले प्रत्येक महत्वाचे तत्व किंवा नियम घेणार आणि त्याला तपासून बघणार. तुम्ही ज्योतिषाकडे कधी गेला असाल तर ते पत्रिकेकडे बघत त्यांच्या एका विशिष्ट भाषेत स्वतःशी कम आपल्याशी संवाद करतात बघा! उदाहरणार्थ 'अमुक अमुक ग्रह नीचेचा आहे आणि शिवाय तो शनीच्या युतीत आहे. इतका बिघडल्यावर बरोबर आहे ..त्रास होणारच...' हे जे ग्रहाचे ‘निचेचे असून शनि बरोबर (किंवा पापग्रहा बरोबर) युतीमध्ये असण्याने’ बिघडणे आहे आणि त्यामुळे आपल्याला त्या ग्रहाच्या कारकत्वा संबंधात अशुभ फळ मिळणे आहे - ते झाले ज्योतिष शास्त्राचे तत्व. हे अगदी fundamental तत्व आहे म्हणजे प्रत्येक ज्योतिषी ते वापरणारच. आता मतिमंद विरुद्ध हुशार लोकांच्या पत्रिकांचा प्रयोगात जर हे तत्व चेक करायचे असेल तर कुठल्या ग्रहासाठी चेक करायचे हे जर मला तुम्हाला समजावून सांगायचे असते तर परत ‘ कारक ग्रह’ वगैरे शास्त्रीय आणि ज्योतिषीय भाषा वापरावी लागली असती पण सुदैवाने आपल्याकडे कॉम्पुटरजी असल्याने आपण त्याला सांगितले कि बाबा सगळ्या ग्रहांसाठीच चेक कर. कारण बुध, चंद्र बुद्धीचे कारक म्हणून आपण त्यांच्यासाठी चेक करायचो आणि मग कोणीतरी येऊन म्हणणार अहो गुरु पण बुद्धिसाठी महत्वाचा असतो तो तुम्ही टेस्ट केला नाही. आपल्याला कुठलीही शंका ठेवायची नाहीये म्हणून आपण सगळेच ग्रह टेस्ट केले.
आता परीक्षेचा निकाल काय लागला ते बघू - जर हे तत्व खरे असेल तर असे योग आपल्याला मतिमंद पत्रिकांमध्ये जास्तीत जास्त मिळायला पाहिजे होते. पण प्रत्यक्षात दोन्ही संचांमध्ये आम्हाला ते सारख्याच प्रमाणात सापडले. म्हणजे बघा, ज्या ग्रहाच्या नीच असण्याची आणि शनी किंवा मंगळाबरोबर असण्याची आपल्याला भीती वाटत होती ते योग हुशार लोकांच्या पत्रिकेत पण तेवढीच सापडतात जेवढी मतिमंद लोकांच्या. मग हे कसले आले तत्व? नाही पण असे विधान करायची आपण इतकी घाई करायला नको, अजून प्रयोग करू आणि मग म्हणू. आणि ज्योतिषा विषयी पण काही बोलायला नको कारण अजून बाकीची तत्वे टेस्ट करायची बाकी आहेत. आणि ती आम्ही केली. ग्रहाच्या संदर्भात त्याच्या बिघडण्याची जेवढी महत्वाची तत्वे आहेत ती आम्ही सगळी one by one टेस्ट केली ( संदर्भ ३,४,५). म्हणजे ग्रहाचे क्रूर नक्षत्रात असणे (अजून एक डरावना योग) , ग्रह नीच राशीत आणि शिवाय ६,८,१२ व्या स्थानात अशी अनेक तत्वे लावून तुलना केली. आम्हाला यातील एकही तत्व लागू पडण्यात दोन्ही संचात कुठलाही फरक दिसला नाही. जी तत्वे ग्रहांची असतात तीच भावेशांच्या बाबतीत असतात आणि ती आम्ही (परत शंका नको म्हणून) बाराच्या बारा भावेशांना लावून टेस्ट केली. त्यातही कुठलाही फरक दिसला नाही. आणि शेवटी यांची काही तत्वे पत्रिकेतील स्थाना बाबतीत असतात. ती अर्थातच वेगळी असतात जसे कि स्थानात पाप ग्रह असणे, स्थानावर पाप ग्रहाची दृष्टी असणे वगैरे. त्यातही आम्हाला बारापैकी कुठल्याही स्थानात कुठलाही फरक अढळ नाही.
वर सांगितलेली तत्वे अशुभ फळासाठी होती. तशीच ज्योतिषात शुभ फळ मिळण्यासाठी पण प्रमुख तत्वे असतात आणि ती हुशार लोकांच्या पत्रिकेत जास्त आढळायला पाहिजे होती ती पण दोन्ही संचात ग्रह, भावेश आणि स्थानांसाठी सारखीच सापडली. हे एक प्रकारचे Verification होते आणि त्याने आमचे निष्कर्ष जास्तच दृढ झाले कि हि तत्वे वैध नाहीत.
इथे आपल्या सस्पेन्स स्टोरीचा भाग १ समाप्त होत आहे पण जाता जाता मी एक डायलॉग मारणार आहे - सोच लो ठाकूर - हीच ती तत्वे जी लावून तुमची आमची पत्रिका बघितली जाते.
आता सस्पेन्स स्टोरीचा भाग २ - मी पण अनेक वर्षे ज्योतिषी होतो त्यामुळे मला हे माहिती आहे कि अशुभ भाकीत करण्यापूर्वी आपण one by one अशुभ फळ देणारी सगळी तत्वे लावतो आणि त्याचा एकत्रित विचार करून भविष्य सांगतो. म्हणजे सोप्या भाषेत सांगायचे तर सगळे कुयोग मिळून एकूण किती रहाडा घालतात (किती नेगेटिव्हिटी तयार करतात) त्या basis वर भविष्य सांगितले जाते. आपल्या कडे कॉम्पुटरजी असल्याने त्याचे हि सिम्युलेशन केले आणि त्याला सांगितले दोन्ही संचांची तुलना करून सांग. तर दोन्ही कडे सारखीच नेगेटिव्हिटी मिळाली. Verification साठी वर केल्याप्रमाणे शुभ तत्वांची पण तपासणी केली ती हि सारखीच. आता बोला?
म्हणजे सगळी तत्वे एक एक करून तपासली तर ती सिद्ध होत नाहीत, एकत्र लावून बघितली तरी हि होत नाहीत मग त्यांना काय अर्थ आहे? पुढे जाण्या अगोदर आपला डायलॉग परत मारतो - सोच लो ठाकूर - हीच ती तत्वे जी लावून तुमची आमची पत्रिका बघितली जाते.
इथे आम्ही जे सांगतोय ते एकूण प्रयोगाच्या फक्त २५% आहे प्रत्यक्षात खूप काही गोष्टी केल्या. भाकीत सांगताना हमखास वापरली जाणारी अनेक मूलभूत तत्वे, वेगवेगळे ६८ शुभ अशुभतेचे मापदंड, केंद्रातील शुभ ग्रह / पापग्रह, क्रूर नक्षत्रातील ग्रह, मग काय योगकारक ग्रहांची स्थिती वगैरे जेवढे तपासता येईल ते सर्व. सगळंच इथे सांगायला बसलो तर तुम्ही कंटाळून जाल म्हणून सिम्पल सिम्पल आणि वर वर सांगतोय. या प्रयोगाची खासियत म्हणजे आपण ३३८ अधिक ३३८ अशा सगळ्या मिळून ६००+ पत्रिका घेतल्या होत्या की जे संख्याशास्त्राच्या दृष्टीने अनिर्वाय (mandatory) आहे. आत्तापर्यंत या प्रमाणात ज्योतिषशास्त्राचे परीक्षण झालेले आमच्या बघण्यात तरी नाही. आणि म्हणूनच अशा प्रकारच्या या चाचण्यांचे निकाल व अनुमान यापूर्वी आपल्यासमोर आलेले नाही. हा प्रयोग कोणीही करू शकतो आणि तो ज्योतिषांनी जरूर करावा.
आता तुम्ही म्हणाल की एक प्रयोग करून एवढे मोठे हजारो वर्षे चालत आलेले शास्त्र खोटे कसे ठरवता? म्हणूनच आम्ही अनेक प्रयोग केले. अविवाहित (350 पत्रिका) विरुद्ध दीर्घकाळ लग्न टिकलेले (350 पत्रिका) यातही आम्हाला हेच रिझल्ट मिळाले. त्यानंतर साठ वर्षांच्या आत कर्करोग झालेले (254 पत्रिका) विरुद्ध कर्करोग कधीही न झालेले (498 पत्रिका), घटस्फोटित (३५० पत्रिका) विरुद्ध दीर्घ विवाहित (३५० पत्रिका), सेलेब्रिटी विरुद्ध सर्वसाधारण लोक असे अनेक प्रयोग केले. आणि त्या सर्व प्रयोगात तीच तत्वे तपासली (आठवा नाहीतर डायलॉग मारावा लागेल). पण त्या सर्व प्रयोगात वर सांगितलेलेच रिझल्ट मिळाले. म्हणूनच आम्ही ठाम पणे सांगू शकतो की या शास्त्रात, त्यांच्या तत्वात, नियमात काहीही तथ्य नाही. हे सर्व माझ्या दहा वर्षांच्या संशोधनाचे सार आहे.
जाते जाते last time - सोच लो ठाकूर, हि तीच तत्वे आहेत जी वापरून तुमची आमची पत्रिका बघितली जाते ...... मग आता तुम्हीच ठरवा, पत्रिका बघून लग्न करायचे का नाही, करिअर कुठल्या विभागात करायचे ते ज्योतिषाला विचारायचे का आपले आपण ठरवायचे. नातेसंबंधीचे निर्णय घेताना second opinion ज्योतिषाकडे जाऊन घ्यायचे का counselor कडे जाऊन घ्यायचे तेही ठरवा. शुभेच्छा !
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
Latest Update - येणाऱ्या प्रतिसादांवरून समजते कि या विषयावर अजून बरेच लिहायला पाहिजे होते. शास्त्रीय कल्पना या plane लिखाणापेक्षा audio - visual ने जास्त चांगल्या समजतात म्हणून अधिक माहिती पाहिजे असल्यास खालील youtube video जरूर बघा.
Title - Astrology Yes Or No (Marathi) ज्योतिषशास्त्र खरे आहे का नाही?
https://youtu.be/RBKuOeOF79w
संदर्भा खाली ज्योतिष समर्थकांचे ‘अपेक्षित (नेगेटिव्ह) प्रतिसाद आणि त्यावर माझा खुलासा’ हे हि दिलेले आहे त्यात बऱ्याचशा शंकांचे निरसन होईल.
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
आभार -
श्री. प्रकाश घाटपांडे यांचा या संशोधनामधील एका महत्वाच्या प्रयोगात म्हणजे ‘मतिमंद विरुद्ध हुशार लोकांच्या पत्रिकांचा तुलनात्मक अभ्यास’ या प्रयोगात प्रत्यक्ष सहभाग होता. त्यांच्या योगदानाशिवाय हा प्रयोग पूर्ण होऊ शकला नसता.
—--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
लेखकाची ओळख -डॉ. नागेश राजोपाध्ये हे गेले 20 वर्षे ज्योतिषविद्येचा अभ्यास करत आहेत. (सुरवातीला एक ज्योतिषी म्हणून आणि नंतर एक टीकाकार म्हणून). त्यांनी पुणे विद्यापीठातून पदार्थविज्ञान विषयात Ph.D. केली आहे. त्यांनी आपल्या कार्यकाळाची सुरवात ISRO मध्ये शास्त्रज्ञ म्हणून केली परंतु नंतर बहुतेक सर्व वेळ IT क्षेत्रात व्यतीत केल्यानंतर ते Accenture मधून Associate Director म्हणून निवृत्त झाले. सध्या आपला सर्व वेळ ते ज्योतिषविद्येच्या empirical परीक्षणाला आणि संशोधनाला देत आहेत.
संपर्क - astrobasedresearch@gmail.com
—-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
संदर्भ -
१. वरील संशोधनाविषयी आपल्या मित्रांना, नातेवाईकांना सांगायचे असेल तर खालील Youtube विडिओ ची लिंक फॉरवर्ड करा.
Astrology Yes Or No (Marathi) ज्योतिषशास्त्र खरे आहे का नाही?
हिंदी व्हिडिओ लिंक - https://youtu.be/5iVmPUo42aE
२. या संशोधनाचे अधिक तपशील म्हणजे - कुठले नियम तपासले, डेटा कसा घेतला, कुठून घेतला, संख्याशास्त्रीय चाचण्या (statistical tests) कशा केल्या वगैरे तपशील बघायचा असल्यास www.astrologyyesorno.com ला भेट द्या. त्यातील मराठी वेबसाईटवर ‘संशोधन’ या वेब पेज वर सर्व तपशील दिला आहे. किंवा प्रकाशित पेपर बघू शकता
३. An article in The Skeptic, UK, June 2021 by Dr. Nagesh Rajopadhye
When put to the test, the predictive powers of Indian astrology simply don’t hold up
Link - https://www.skeptic.org.uk/2021/06/when-put-to-the-test-the-predictive-p...
४. Empirical testing of few fundamental principles of Vedic astrology through comparative analysis of astrological charts of cancer diseased persons versus persons who never had it
International Journal of Applied Research - 2021; 7(5): 74-85
Link - DOI - https://doi.org/10.22271/allresearch.2021.v7.i5b.8548
५. Comparison of Vedic astrology birth charts of celebrities with ordinary people: An empirical study, International Journal of Jyotish Research, 2021; 6(1): 104-116
(Volume 6, Issue 1, Part B, pages 104-116)
DOI : https://doi.org/10.22271/24564427.2021.v6.i1b.114
६. ज्योतिष’शास्त्र’ म्हणायचे असेल तर Empirical (अनुभवसिद्ध) परीक्षण अपरिहार्य
आजचा सुधारक, ऑगस्ट, 2021 चळवळ, परीक्षण, विज्ञान, विवेक विचार, शिक्षण, श्रद्धा-अंधश्रद्धा - डॉ. नागेश राजोपाध्ये
https://www.sudharak.in/2021/08/7477/
७. जर तुम्हाला किंवा तुमच्या जवळच्या कोणाला पत्रिका न बघता लग्न करण्यासाठी किंवा निर्णय घेण्यासाठी खरोखर मदत पाहिजे असेल तर लिहा – astrologyyesorno@gmail.com
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
अपेक्षित प्रतिसाद आणि खुलासा
या विषयावर मी अनेक webinars दिले आहेत, सोशल मीडिया (Quora, reddit, FB etc) वर पण लिहिले आहे. त्या अनुभवावरून ज्योतिष समर्थकां कडून खालील प्रतिसाद येतो असा हमखास अनुभव आहे. सर्व सामान्य वाचक त्याने confuse होऊ नये म्हणून अपेक्षित प्रतिसाद आणि त्यावरील माझा खुलासा खालील प्रमाणे आहे
—---------------------------------------------------------------------------------------------------------------------------
अपेक्षित प्रतिक्रिया - हे एवढेच परीक्षण पुरेसे आहे का ? याशिवाय अजून परीक्षण करायला पाहिजे अशी आमच्या कडे तत्वे आहेत.
खुलासा - ज्योतिषविद्येमधील जी प्रमुख तत्वे आम्ही वैध नाहीत हे सिद्ध करून दाखवले आहे, ती इतकी fundamental आहेत कि ती वापरल्याशिवाय कुठलेही भविष्य सांगितले जाऊच शकत नाही. ज्योतिषाच्या कुठल्याही पुस्तकात ती दिलेली असतात आणि त्यांना कुठलाही ज्योतिषी अमान्य करणार नाही. त्यामुळे आजच्या मितीला जे ज्योतिष त्या तत्वांच्या आधारे सांगितले जाते ते तरी निश्चितच अर्थहीन आहे हे सरळसरळ दिसत आहे. ज्योतिषाच्या परीक्षणाचा मुख्य problem म्हणजे प्रत्येकाचे वेगळे नियम आहेत. उदा घटस्फोट घेतला तर एक standard document असे मिळणार नाही कि जे पत्रिकेतील exactly कुठल्या योगांमुळे घटस्फोट होतो याच्या नियमांची यादी देईल. अशी सर्वमान्य यादी असती तर परीक्षण करणे सोपे आहे. पण तशी नसल्यामुळे जगातील लाखो ज्योतिषांच्या लाखो याद्या अवैध सिद्ध करणे हे केवळ अशक्य आहे. त्यापेक्षा मी लेखात म्हणाल्या प्रमाणे खरेतर ज्योतिषांनीच पुढाकार घेऊन असे परीक्षण करायला पाहिजे आहे कारण त्यांच्या भविष्यावर लोक जीवनातील महत्वाचे निर्णय घेत असतात. त्यामुळे कोणाला कुठले नियम वैध आहेत वाटत असेल तर त्याने ते तसे ६००+ पत्रिका घेऊन सिद्ध करून दाखवावे. किंवा असा शास्त्रीय प्रयोग अगोदर झाला असेल तर त्याचा संदर्भ द्यावा. माझ्या बघण्यात जे ज्योतिषाच्या बाजूने संशोधन आले ते फार तर फार १०० पत्रिकांचा आधार घेऊन आणि ते सुद्धा selective data घेऊन केलेले दिसले कि जे अर्थातच शास्त्रीय नाही.
—------------------------------------------------------------------------------------------------------------------------
अपेक्षित प्रतिसाद - ज्योतिष हि प्रोबॅबिलिटी आहे, तुम्ही ती वस्तुनिष्ठ समजून objectively टेस्ट करू शकत नाही.
खुलासा - Creating confusion is one the best defense या उक्ती प्रमाणे probability हा शब्द वापरून ज्योतिषाचे समर्थन होताना हल्ली दिसते जे अर्थहीन आहे. खरेतर Empirical testing मध्ये जे test होते ती probability च टेस्ट होते. त्यामुळेच मतिमंद असण्याचे नियम हुशार लोकांच्या पत्रिकेत आढळले तर केवळ त्याच एका गोष्टीला दाखवून आपण कधीच म्हणत नाही कि ते नियम अवैध आहे. ते काही % विरुद्ध संचात आढळणे ठीक आहे (इथे probability येते कि जी आपण मान्य करतो) पण आपली अपेक्षा हि आहे कि दिलेला नियम मतिमंदसाठी असेल तर तो मतिमंद लोकांच्या पत्रिकांमध्ये हुशार लोकांच्या पत्रिकांपेक्षा सिग्निफिकन्टली जास्त % ने लागू पडला पाहिजे. म्हणजेच त्याची मतिमंद लोकांच्या पत्रिकांमध्ये आढळून यायची probability हि significantly जास्त असली पाहिजे. ते तसे आहे का नाही हे आपण test करतो. ह्याचा अर्थच असा आहे कि आपण probability च टेस्ट करत आहोत.
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
अपेक्षित प्रतिसाद - ज्योतिषांना हे कधीच पटणार नाही, आपल्या कडच्या लोकांनाही हे पटणार नाही, मग या सगळ्या संशोधनाचा काय उपयोग?
खुलासा - माझ्या मते समाजात ४०-५० % अशी लोक आहेत जे ज्योतिष किंवा त्यांचे कट्टर समर्थक या वर्गात मोडतात. त्यांना आपण सोडून देऊ. त्यांच्या साठी मी हे संशोधन केलेले नाही कारण मी आकाश पातळ एक केले तरी त्यांना हे पटणार नाही याची मला कल्पना आहे. या उपर १० ते १५ % अशी लोक आहेत जे कधीही ज्योतिषावर विश्वास ठेवणार नाहीत. यांना पटवून द्यायचा प्रश्नच येत नाही. उरली ३५-४० % लोक जे confused आहेत. जे आज घाबरून ज्योतिषाच्या मागे जातात, विषाची परीक्षा नको म्हणून ज्योतिषाचे ऐकून काही थोडेफार पाळतात, पण एका बाजूला त्यांना खरेतर ते पटत नसते आणि त्यांना आपले स्वतःचे असे मत अजून बनवायचे आहे. माझे संशोधन हे ह्या लोकांसाठी आहे. लक्षात ठेवा आजची तरुण पिढी हि बरीसचशी या वर्गात मोडते.
यावर पण मी थोडे अजून संशोधन केले. ज्यांचे वय ३०+ आहे त्यांना पटवून देणे कठीणच असते. वेळ वाचवण्यासाठी आजकाल मी तिथे जास्त convince करत बसत नाही. पण त्याउलट जे तरुण आहेत (३० minus) त्यांना पटवून देण्याच्या बाबतीत माझा success rate हा ६०-७०% आहे. त्यांचे विचार by default legacy च्या विरुद्ध असतात. ते खूप technology च्या आधारे विचार करतात, शास्त्रीय कल्पना लवकर समजतात आणि आपले मत बदलायला तयार असतात असा माझा स्वतःचा अनुभव आहे. हि खूपच दिलासा देणारी बाब आहे कारण हीच पिढी आपले भवितव्य आहे.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
अपेक्षित प्रतिसाद - अमुक ज्योतिषाने आम्हाला / आमच्या नातेवाईकांना सांगितलेले भविष्य बरोबर ठरलेले आहे, कित्येकांनी website वर लिहूं ठेवललेल खरे झाले आहे मग तुम्ही ज्योतिषशास्त्र खरे नाही असे कसे म्हणता
खुलासा - माझा मुद्दा इथे हाच असेल कि शास्त्रीय परीक्षणाशिवाय आपण एक दोन अनुभवांना किंवा घटनांना त्या विद्येचे proof मानू शकत नाही. मी स्वतः संशोधन करण्या पूर्वी काही महिने असे संशोधन कोणी केले आहे का याचा शोध घेत होतो. मला तरी ज्याला आपण ‘शास्त्रोक्त’ म्हणू असे ज्योतिष विद्येच्या बाजूने असलेले संशोधन किंवा परीक्षण सापडले नाही. जे संशोधन म्हणून प्रसिद्ध झाले आहे त्या खरे तर case studies आहेत. म्हणजे एखादा योग कॅन्सरला कारणीभूत होतो असे कोणाला सिद्ध करायचे असेल तर तो तसा योग असलेल्या ४०-५० पत्रिका घेऊन ते दाखवणार कि बघा असे योग आहेत. हे शास्त्रीय परीक्षण होत नाही. त्यासाठी पत्रिकांचे कॅन्सर असलेले आणि कॅन्सर नसलेले असे दोन गट तयार केले पाहिजे, डेटा प्रत्येक संचात ३००+ घेतला पाहिजे, तुम्ही सांगत असंणारे cancer असण्याचे नियम कॅन्सर नसणाऱ्यांच्या पत्रिकेत कसे नाहीयेत किंवा त्या दोन संचात कसा लक्षणीय फरक आहे हे दाखवले पाहिजे, त्यासाठी स्टॅटिस्टिकसची सिग्निफिकन्स टेस्ट केली पाहिजे आणि अशा कितीतरी गोष्टी आहेत कि ज्या केल्याशिवाय आपण त्याला मान्यता देऊ शकत नाही. या मितीला तरी ज्योतिष सिद्ध होईल असे ‘शास्त्रीय’ परीक्षण माझ्या बघण्यात नाही.
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
असाच म्हणजे ज्योतिषावरचा
असाच म्हणजे ज्योतिषावरचा दुसरा एक धागा - वृश्चिक राशीचा. . . त्याला पकडून नेले वाटतं. ( वाचनमात्र केला वाटतं.)
'बंबात घालणे' हा वाक्प्रचार बंब गेले तरी कामाचा आहे.
ज्योतिषात प्राक्तन कळू शकते. पण बदलता येत नाही.
शेवटचा परिच्छेद -
//एका बाजूला ज्योतिषी नियमांची inconsistency पण जाणवत होती पण ज्योतिषविद्येची रचनाच इतकी गुंतागुंतीची आहे आणि व्याप्ती एवढी मोठी आहे कि ती तुम्हाला मृगजळासारखी पुढे पुढे नेत राहते. .. . . माझ्यातल्या ज्योतिषाचा, ज्योतिष विद्येचा टीकाकार (skeptic) झाला. //
सहमत.
घटस्फोटित (३५० पत्रिका)
घटस्फोटित (३५० पत्रिका) विरुद्ध दीर्घ विवाहित (३५० पत्रिका), सेलेब्रिटी विरुद्ध सर्वसाधारण लोक असे अनेक प्रयोग केले. आणि त्या सर्व प्रयोगात तीच तत्वे तपासली (आठवा नाहीतर डायलॉग मारावा लागेल). पण त्या सर्व प्रयोगात वर सांगितलेलेच रिझल्ट मिळाले.>>>वि म दांडेकरांकडे मी १९८८ च्या दरम्यान गेलो होतो. मतिमंदत्व , वैवाहिक सौख्या बाबत घटस्फोटित हा विषय असा वि म दांडेकरांच्या संशोधनाचा विषय होता . त्यांना ज्योतिषाबद्दल आस्था होती. मी त्यांना म्हणालो कि ज्यांचे मनातल्या मनात घटस्फोट झाले आहेत पण व्यवहारात पतिपत्नी असल्याच भासवतात असे अनेक जोडपी आहेत त्यांचे काय? (लिव्हिंग सेपरेशनशिप हा शब्द त्यावेळी सुचणे शक्य नव्हते. ) सुखाने नव्हे तर नाईलाजाने एकत्र राहणार्या जोडप्यांचा प्रश्न कसा हाताळणार? त्यांनी फक्त कायदेशीर दृष्ट्या जे घटस्फोटित आहे त्याचाच विचार करणार असल्याचे सांगितले . ज्योतिषजगतात हे मान्य होणार नाही असे मी त्यांना सांगितले होते. (ते पुढे खरेच झाले)
वि.म कधी वारले ते मला आठवत नाहि पण १९९९ पुर्वी. त्या आगोदर काही काळ भारत इतिहास संशोधक मंडळातील ज्योतिषांच्या कार्यक्रमात त्यांनी मतिमंदाच्या शंभर कुंडल्यांसाठी जर शंभर नियम असतील तर त्यात काही अर्थ नाही. असे सांगितले होते.
वि म दांडेकर अर्थशास्त्री ना?
वि म दांडेकर अर्थशास्त्री ना?
ज्यांचे मनातल्या मनात घटस्फोट
ज्यांचे मनातल्या मनात घटस्फोट झाले आहेत पण व्यवहारात पतिपत्नी असल्याच भासवतात >>>
तर मग अमुक व्यक्तीशी लग्न झाले नाही तरी मनातल्या मनात एकमेकांना पसंत केले आहे पण दुसऱ्या व्यक्तीशी लग्न लावून दिल्याने नाईलाजाने त्यांच्या सोबत रहात आहे, अशा केसेस सुद्धा अमुक व्यक्तीशी किंवा अमुक प्रकारच्या व्यक्तीशी किंवा अमक्या वयात लग्न होईल असे केलेले भाकीत खरे झाले म्हणुन ग्राह्य धरावे का?
उदा. वर/वधू उत्तरेकडील /पूर्वेकडील असेल असे सांगतात.
किंवा अमुक वयात (उदा. २६- २८) लग्न होईल असे सांगतात.
पण झाले ३२ व्य वर्षी. तर २६-२८ वयात दोघांनी एकमेकांना पसंत केले पण काही कारणाने लग्न होऊ शकले नाही तरी ते भाकीत खरे झाले असे ग्राह्य धरायचे का?
प्रकाशजी, जशी आपण अनेक वेळा
प्रकाशजी, जशी आपण अनेक वेळा चर्चा केली त्याप्रमाणे घटस्फोट विरुद्ध दीर्घ विवाहित या प्रयोगाला अशी objections येऊ शकतात. खरंतर दीर्घ विवाहितांमध्ये अशी किती टक्के असतील पण तरीपण argument तर होऊच शकते. आणि प्रश्न नेहमी disprove कारणार्यालाच विचारले जातात हे ही तितकेच खरे आहे. कारण हाच प्रश्न घटस्फोटासाठी असणारे पत्रिकेतील योग या विषयावर शेकडो नियम सांगून पानेच्या पाने ज्योतिषाची पुस्तके लिहीणार्या सर्व लेखकानाही लागू पडतो. या प्रश्नाचे निराकरण निश्चित करता येईल पण ती चर्चा इथे करणे योग्य होणार नाही कारण तो खूप किचकट आणि शास्त्रीय असेल. अशा शंका निघतील म्हणूनच बरोबरीने 50 वर्षापर्यंत अविवाहित विरुद्ध दीर्घ विवाहित असाही प्रयोग केला. इथे बाकी काहीही शंका काढल्या तरी एका 50 वर्षे अविवाहित राहिलेल्याचे आयुष्य हे दीर्घ विवाहित पेक्षा अनेक प्रकारे वेगळे असते हे निश्चित आणि ज्योतिषानुसार ते पत्रिकेत reflect व्हायला पाहिजे हे निश्चित. हाच नाहीतर आणि म्हणूनच अनेक प्रयोग केले त्यानुसार आलेले निष्कर्ष हे सर्व सामान्य माणसांसाठी आहेत जो हे genuinely समजून घेऊ इच्छितो की हे काय आहे. ज्योतिषी आणि समर्थकांना तुम्ही आकाश पातळ एक केले, त्यांच्या प्रत्येक argument ला उत्तरे दिली तरी हे आपण पटवून देऊ शकणार नाही त्यामुळे आपण आपला फोकस ठेऊन पुढे चालायचे आणि जमेल तेवढा awareness लोकांमध्ये आणायचा असा माझा approach आहे.
वि म दांडेकर अर्थशास्त्री ना?
वि म दांडेकर अर्थशास्त्री ना?>>> हो तेच. त्यांना फलज्योतिष संशोधनात रस होता
या प्रश्नाचे निराकरण निश्चित
या प्रश्नाचे निराकरण निश्चित करता येईल पण ती चर्चा इथे करणे योग्य होणार नाही कारण तो खूप किचकट आणि शास्त्रीय असेल.>>>>या विषयांवर इथे भरपूर किस पडले आहेत. नुसते वाचायचे झाल्यास भरपूर वेळ खातील.हा चर्हाट विषय असल्याने लोकही कंटाळतात नंतर.
@AstrologyYesOrNo तुमचे
@AstrologyYesOrNo तुमचे प्रतिसाद आवडले!
मला यातील भाषा संपूर्णतः
मला यातील भाषा संपूर्णतः गंडलेली वाटते आहे, ते तेल अन बाम वाले किंवा धंद्यात खोट आली म्हणून होलसेल लावला अशी जाहिरात देतात त्या हिंदी टु मराठी अनुवादाचा यात दर्प आहे .... कुचतोबी गडबड है मामू... उदाहरणार्थ
>>>मायबोलीवर ज्योतिष विषयावर अनेक लेख आणि प्रतिसाद वाचले. TV वर पण अनेक परिसंवाद ऐकले. वाद घालून डेड एन्ड आल्यावर सगळे शेवटी हेच म्हणताना दिसतात कि ज्योतिषावर संशोधन व्हायला पाहिजे. तर मग हे घ्या संशोधन. हो हो तुम्ही बरोबर ऐकले आहे. संशोधन पाहिजे ना? तुमच्या मनाचे पूर्ण समाधान होईल असे आणि आम्ही स्वतः केलेले असे असे हे संशोधन आहे. अतिशय शास्त्रोक्त, हजारो पत्रिका घेऊन कॉम्प्युटरच्या साहाय्याने केलेले हे परीक्षण वैदिक ज्योतिष शास्त्राच्या इतिहासात पहिलेच असेल. अगदी ज्याला आपण दूध का दूध पानी का पानी म्हणतो असे>>>>>
WHAT DO YOU SAY???
रेव्यु! जोपर्यंत अनिश्चितता
रेव्यु! जोपर्यंत अनिश्चितता आहे तोपर्यंत फलज्योतिषाला मरण नाही हेच आमचे भाकित! वाचा या ज्योतिषांच काय करायचं? मधे
सुर्यमालिकेचे आकाशगंगेत
सुर्यमालिकेचे आकाशगंगेत असणारे स्थान जोपर्यंत विचारात घेतले जात नाही तोवर सगळं संशोधन व्यर्थ आहे.
सुर्यमालिकेचे आकाशगंगेत
सुर्यमालिकेचे आकाशगंगेत असणारे स्थान जोपर्यंत विचारात घेतले जात नाही तोवर सगळं संशोधन व्यर्थ आहे.
आता बोकलत सरानीच एवढं व्यवस्थित समजावून सांगित्यानंतर ज्योतिष हे थोतांड आहे हे मी जाहीरपणे मान्य करतो
तुमच्या अॅनॅलिसिस ला तुम्ही
तुमच्या अॅनॅलिसिस ला तुम्ही फ क्त आकडेमोड लक्षात घेतली आहे असे वाटते.
पूर्ण चित्र बघण्यासाठी फक्त आकडेमोड उपयोगाची नाही.
२-३ मुद्दे/उदाहरण सांगते:
तुमच्या मते प्रत्येक पत्रिकेत चांगले वाईट दोन्ही असते: प्रत्येकाच्या आयुष्यात चांगले वाईट दोन्ही असते.
पण जर माझ्या नशिबात पगारवाढ आहे तर ती ४/५ आकडी असेल, तर एखाद्या बिग शॉट व्यक्तीच्या नशिबात ती ७ आकडी असेल आणि एखाद्या भांडी घासणार्या मावशींकरता ३ आकडी.
अंबानीचा मुलगा असला तरी त्याला जाडीवरून होणारे ट्रोलिंग चुकले नाही आणि एखाद्या शाळेतल्या पोराला शाळकरी मित्राकडून होणारे बुलिंग होऊ शकते.
मानवी भावभावना (पॉझिटिव निगेटिव) आणि शारिरीक व्याधी ह्या प्रत्येकाच्या आयुष्यात कमी जास्त प्रमाणात असतातच. त्या चुकत नाहीतच. तसच व्यवहारात होणारे फायदे तोटे वगैरेही प्रत्येकाला असतातच.
माझ्या अनुभवानुसार - ही काळ्या दगडावरची रेघ नाही, तर प्रोबॅबिलिटी आहे. शक्यता लक्षात आल्यावर तुम्ही त्यावर व्यावहारिक शहाणपण वापरून योग्य त्या प्रकारे तोटा टाळू शकता / फायदा मिळवू शकता.
उदाहरणार्थ - माझे आजोबा पत्रिका बघायचे. त्यांना एकदा दिसले की खूप खर्च आहे - कर्ज हो ण्याची दाट श क्यता आहे. त्यांनी जमिन विकत घेऊन घर बांधायला काढले. त्यांचा तात्कालिक खर्च झाला पण प्रॉपर्टी झाली जिने लाँग टर्म फायदा झाला.
त्यांनी माझ्या मावस बहिणीला सांगितले की ह्या ह्या काळात सुयोग्य ठि काणी लग्न जुळू शकते (हाय प्रोबॅबिलिटी). मग ते माझ्या दुसर्या एका बहिणीला म्हणाले तुझाही योग आहे.
मावसबहिणीचे लग्न ठरले, पण ही बहिण लग्नाच्या वयाच्या न व्हती ( १८+ पण शिकताना लग्न केले नसते).
पण ह्याच काळात तिचे तिच्या आताच्या नव र्याबरोबर लग्न करण्याचे ठरले होते जे आम्हाला नंतर कळले.
अशी अनेक उदाहरण आहेत.
ह्याशिवाय काही प्रमाणात अॅस्ट्रल रेमिडिज वापरून इम्पॅक्ट चेंज करता येऊ शकतो.
धोके टाळणे/लॉसेस टाळणे आणि फायदा करून घेणे अशा रितीने ह्याचा फायदा करून घेता येतो अ शी उदाहरणे पाहिली आहेत.
सर्वसामान्य लोक सामान्यतः शा स्त्रिय दृष्टीकोन बाळगण्यापेक्षा फायदा बघून वागतात किंवा संकट टाळण्याकडे त्यांचा कल असतो.
त्यामु ळे ही गोष्ट स्टॅ टिस्टिकली न बघता व्यक्तिगत अनुभवावर बघतात.
मला गंमत म्हणून च्यावम्याव बघायला आवडते हे प्रकरण. खूप सिरिय सली बघणे, आहारी जाणे नको वाटते.
काहीजण प्रत्येक गोष्ट प त्रिका बघून करतात (अगदी छोटा प्रवास वगैरे पण) ते जरा जास्त वाटते .
पण प्रत्येकालाच आपण करतो ते योग्य प्रमाणात आणि दुसरा करतो ते जास्त असे वाटत असते , त्यामु ळे ज्या चा त्याचा प्रेफरन्स असे म्हणून खाली बसते.
<<<मग ते माझ्या दुसर्या एका
<<<मग ते माझ्या दुसर्या एका बहिणीला म्हणाले तुझाही योग आहे.
मावसबहिणीचे लग्न ठरले, पण ही बहिण लग्नाच्या वयाच्या न व्हती ( १८+ पण शिकताना लग्न केले नसते).
पण ह्याच काळात तिचे तिच्या आताच्या नव र्याबरोबर लग्न करण्याचे ठरले होते जे आम्हाला नंतर कळले>>>
बघा, मी वर याबद्दल लिहिलं तर पूर्ण दुर्लक्ष केलं. पण लगेच प्रचिती आलीही. संशोधकांनी असे दुर्लक्ष करणे बरे नव्हे.
बघा, मी वर याबद्दल लिहिलं तर
बघा, मी वर याबद्दल लिहिलं तर पूर्ण दुर्लक्ष केलं. पण लगेच प्रचिती आलीही. संशोधकांनी असे दुर्लक्ष करणे बरे नव्हे.
>> नाही, तुम्हा ला टॅग करणार होते.. प ण समहाऊ राहिलं.. माफी असावी!
तुम्हाला उद्देशून नाही
तुम्हाला उद्देशून नाही म्हणालो नानबा.
आता वेगवेगळ्या विषयावर
आता वेगवेगळ्या विषयावर ज्योतिषि सन्शोधन सुरू आहे तर माझ्या डोक्यात एक किडा वळवळला.
मुलीच्या पत्रिकेत वैधव्ययोग आहे असे ज्योतिषाचे ऐकुन लग्ने मोडली जातात. (पत्रिकेत विधुरयोग आहे असे कधी ऐकले नाही).
सोशल मिडियावरच्या एका प्रख्यात ज्योतिषाने एक उदाहरण दिले होते. त्याच्याकडे एक मुलीची पत्रिका आली होती ज्यात मुलीला म्हणे वैध्यव्ययोग होता. या ज्योतिषाने उपाय सान्गितला की पत्रिका पाहुन दीर्घायुषी मुलगा शोधुन त्याच्याशी लग्न केले तर मुलगा-मुलगी दीर्घ सहजीवन अनुभवतील. म्हातारपणी दोघातले कोणितरी एक पुढे जाणार हे स्विकारलेले असतेच. ह्या मुलीच्या बाबतीत हीचा नवरा त्याचे दीर्घायुष्य भोगुन पुढे जाईल.
कवी विंदा करंदीकर गेले तेव्हा कुठेतरी वाचनात आले की त्यानी प्रथम पती निर्वतलेल्या सुमती यांच्याशी द्वितीय विवाह केला होता. नंतर कधीतरी वाचले की त्यांच्या प्रथम पत्नीचे निधन झाल्यावर काही वर्षांनी त्यांनी द्वितीय विवाह केला होता.
म्हणजे पत्रिका मानायची तर विंदांच्या पत्रिकेत विधुरयोग असणार व पत्नीच्या पत्रिकेत वैधव्ययोग. मग या दोन्ही पत्रिकांतील योगांत टक्कर होऊन त्यात वैधव्ययोग जिंकला असे मानायचे का? :). (कोणाच्याही भावना दुखवायचा हेतु नाही __/\__)
तर पत्रिकेतील या योगावरही संशोधन झाले आहे का?
हत्ती आणि सहा आंधळ्यांची
हत्ती आणि सहा आंधळ्यांची गोष्ट आठवली

नानबा, तुमचा प्रतिसाद
नानबा, तुमचा प्रतिसाद आवडला.
मी व्यक्तिश: आता पत्रिका पाहण्याच्या वयातुन/गरजेतुन बाहेर आलेय आणि जिच्यासाठी कदाचीत पाहीन त्या माझ्या लेकीचा पत्रिकेला विरोध आहे.
पण तुम्ही जे लिहीले तेच माझे मत आहे. ज्योतिष हा केवळ आकडेमोडीचा विषय नाही.
रेव्यु, मी मान्य करतो कि मी
रेव्यु, मी मान्य करतो कि मी लेखक नाहीये त्यामुळे माझ्या लिहिण्यामध्ये फार सफाई नाहीये. तुम्ही सांगितलेला परिच्छेद मी परत वाचला आणि मला तुमचे म्हणणे पटले कि message जरा जास्तच desperate झाला आहे. त्याला आता ठीक केले आहे. लक्षात आणून दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. लिखाणा प्रमाणेच संशोधनावर पण जरूर प्रतिक्रिया द्या. ते १००% genuine असल्याची मी ग्वाही देईन.
अमुक वयात (उदा. २६- २८) लग्न
अमुक वयात (उदा. २६- २८) लग्न होईल असे सांगतात. पण झाले ३२ व्य वर्षी. तर २६-२८ वयात दोघांनी एकमेकांना पसंत केले पण काही कारणाने लग्न होऊ शकले नाही तरी ते भाकीत खरे झाले असे ग्राह्य धरायचे का? >>>>>>> मानव, प्रतिक्रिया द्यायला उशीर झाला त्या बद्दल दिलगिरी. माझ्या मते खऱ्या लग्नाची तारीख हि महत्वाची आहे आणि ज्योतिषांना जर लग्न कधी होणार ते सांगता येत असेल तर ते ह्याच लग्नाविषयी सांगणार. कारण माणसांना त्या लग्नाविषयीच जाणून घ्यायचे असते. तुम्ही त्यांना असे प्रश्न विचारले तर त्याची उत्तरे तुम्हाला सावधानपणे, उद्या त्यांची भाकिते चुकली तर ती कशी explain करता याचा अंदाज घेऊन त्याप्रमाणे वेगवेगळी मिळतील. उदा जर एका दीर्घ काळ लग्न टिकलेल्यापैकी एकाच्या पत्रिकेत घटस्फोटाचे योग असतील तर म्हणतील दुसऱ्याच्या पत्रिकेमुळे तो योग मारला गेला, किंवा एकजण मनाने घटस्फोट घेऊनच राहत असेल . खरेतर यांच्या नियमानुसार ज्याच्या पत्रिकेत घटस्फोटाचे योग असतील त्याचे दुसऱ्या घटस्फोटाचे योग असलेल्या व्यक्ती बरोबरच लग्न व्हायला पाहिजे पण या विषयावर तुम्हाला वर सांगितल्याप्रमाणे अनेक वेगवेगळी उत्तरे मिळतील. काही नाही तर जी साधना सांगितली ती उपयोगाला आली असे सांगतील. इथेही दोन प्रवाह आहेत, कोणी म्हणतो विधिलिखित टाळता येत नाही, कोणी म्हणेल त्याची तीव्रता कमी करता येते वगैरे. मी तरी माझ्यासाठी या प्रश्न आणि उत्तरां भोवती फिरणे थांबवले आहे कारण पत्रिकेवरून लग्न कधी होणार हेच काय पण आयुष्याविषयी कुठलेच भविष्य सांगता येत नाही असे माझे मत आहे आणि ते मी लेखात मांडलेच आहे.
ज्योतिषांना जर लग्न कधी होणार
ज्योतिषांना जर लग्न कधी होणार ते सांगता येत असेल तर ते ह्याच लग्नाविषयी सांगणार. >> लग्न कधी होणार का लग्न कधी ठरणार..
माझ्या प्रोबेबिलिटी च्या मता बद्दल पण बोला की..
माझ्या अनुभवानुसार - ही
माझ्या अनुभवानुसार - ही काळ्या दगडावरची रेघ नाही, तर प्रोबॅबिलिटी आहे.>>>>>> Empirical testing मध्ये जे test होते ती probability च टेस्ट होते. त्यामुळेच मतिमंद असण्याचे नियम हुशार लोकांच्या पत्रिकेत आढळले तर केवळ त्या गोष्टीला दाखवून आपण कधीच म्हणत नाही कि तो नियम अवैध आहे. तो काही % विरुद्ध संचात आढळणे ठीक आहे पण आपली अपेक्षा हि आहे कि तो नियम मतिमंदसाठी असेल तर तो मतिमंद लोकांच्या पत्रिकांमध्ये हुशार लोकांच्या पत्रिकांपेक्षा सिग्निफिकन्टली जास्त % ने लागू पडला पाहिजे. त्याची मतिमंद लोकांच्या पत्रिकांमध्ये आढळून यायची probability हि significantly जास्त असली पाहिजे. ते तसे आहे का नाही हे आपण test करतो. ह्याचा अर्थच असा आहे कि आपण probability च टेस्ट करत आहोत. बाकी ज्योतिष आहे का नाही या विषयावर आपली मते एकदम विरुद्ध आहेत.
AstrologyYesOrNo ओके.
AstrologyYesOrNo ओके.
मी ही ज्योतिषशास्त्र मानत नाही.
जर अमुक एक शास्त्र आहे तर ते सिद्ध करून दाखवण्याची जबाबदारी ते आहे असे दावा करणाऱ्यांची असावी.
घाटपांडे ज्योतिष मानत नाहीत तर मग मनाने घटस्फोट झालाय वगैरे मुद्दा त्यांनी का मांडला हे कळले नाही. त्यासाठी मग मनाने विवाह झालाय वाला मुद्दा मी काढला.
घाटपांडे ज्योतिष मानत नाहीत
घाटपांडे ज्योतिष मानत नाहीत तर मग मनाने घटस्फोट झालाय वगैरे मुद्दा त्यांनी का मांडला >> मलाही हे झेपलं नाही.
मनाने घटस्फोट झालाय हा प्रकार
मनाने घटस्फोट झालाय हा प्रकार आपल्याकडे विचारात घ्यायला हवा कारण पटत नसूनही लग्न न मोडण्याचे प्रकार आपल्याकडे अधिक असतील. घटस्फोट म्हणजे काहीतरी भयंकर अशीच समाजधारणा आहे.
मनाने लग्न असा काही प्रकार असतो का?
हस्तरेषांवरून किती वेळा प्रेम होईल, किती प्रेमभंग वगैरे सांगता येतं म्हणे.
आपल्या कडे मुळात मुला
आपल्या कडे मुळात मुला मुलींच्या पसंतीने लग्न व्हायला केव्हा सुरवात झाली? मुलाची पसंती मग सुरू झाली, पण मुलीची? म्हणजे लग्न हे मुळात एखाद्या व्यक्तीला जोडीदार पसंत पडेल आणि जोडीदारालाही व्यक्ती पसंत पडेल यावर अवलंबून नाही. मग लग्न झाल्यावर मनाने घटस्फोट झालाय याला काय अर्थ रहातो? किंवा मग दोघे एकमेकांना पसंत आहेत पण काही कारणाने लग्न होऊ शकले नाही तर मग मनाने लग्न झालेय पण एकत्र रहात नाहीत हे सुद्धा का ग्राह्य धरू नये?
ज्योतिषी ते मनातल्या मनात
ज्योतिषी ते मनातल्या मनात ग्राह्य धरत असतील.
मी फलज्योतिषाबाबत माझे विचार
मी फलज्योतिषाबाबत माझे विचार मते व भूमिका वेळोवेळी गेली 14 वर्षे उपक्रम,मिसळपाव,ऐसी अक्षरे व मायबोली या मंचावर सविस्तर मांडली आहेत.बरेच लोक ती वरवर चाळतात त्यामुळे कदाचित संगती लागत नाही. ही संगती लागण्यासाठी प्रथम हे शांतपणे वाचा.वेगवेगळ्या लोकांना तीच तीच स्पष्टीकरणे देताना मलाही कंटाळा येतो. काही लोकांनी मात्र भुमिका सविस्तर वाचून समजुन घेउन मग मतभिन्नता वा दुजोरा व्यक्त केला आहे.
माझी भूमिका राजोपाध्येंपेक्षा थोडी वेगळी आहे. ती इतक्या 37 -38 वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीत थोडी थोडी बदलत ही गेली आहे. हल्ली मी त्या विषयात फार रस घेत नाही. मी या ज्योतिषाच काय करायच मधे काही वेगळे मुद्दे मांडले होते
खालील लिंक्स या माझ्या ज्योतिषाकडे जाण्यापुर्वी... प्रश्नोत्तरातून सुसंवाद या पुस्तका च्या निमित्ताने आहेत.
लेखकाचे मनोगत
दुसऱ्या आवृत्तीच्या निमित्ताने
इथे मी ज्योतिष मानतो वा नाही हा मुद्दा नसून ज्योतिशी घटस्फोटीत व्यक्तीच्या पत्रिकेकडे कुठल्या फलज्योतिषीकीय कोनातून पहातो हा आहे. वि.म.दांडेकर कोर्टातून घटस्फोटाची डीक्री घेतली असेल तरच तो घटस्फोट अन्यथा नाही असे म्हणत होते. ज्योतिषात घटस्फोट,वैवाहिक जीवनात एकत्र न रहाणे, कटकटी,वैगुण्य,वैवाहिक जीवनातील सौख्याचा अभाव अशा सर्व बाबी एकाच प्रकारात असतात. फक्त कायदेशीर घटस्फोट ही बाब वेगळी करता येत नाही. म्हणून घटस्फोटीत म्हणजे नेमके काय याची व्याख्या करावी लागेल ती दांडेकर काय करतात असा प्रश्न मी त्यांना विचारला होता.
प्रघा मीही हाच मुद्दा
प्रघा मीही हाच मुद्दा मांडलेला मागे एक दा असाच मुद्दा मांडला होता की विवाहोपरान्त मनाने काहीजण दूर असतात मग ते घटस्फोटित समजायचे का?
पण नंतर मला असे लक्षात आले की ७ वे घर हे विवाह स्थान असते ते सगळं लिगल/कोर्ट कचेर्यांचे देखील स्थान असते. आपला धंद्यातील भागीदार व आयुष्याचा भागीदार या स्थानावरुन कळून येतो. कायदेशीर रीत्या जोडीदार/ भागीदार.
७ व्या नंतर येते ८ वे स्थान. या स्थानातून 'मर्जिंग' म्हणजे मीलन मग ते लैंगिक असो वा आर्थिक व मानसिक लक्षात येते. आता जोडपे मनाने दूर राहील का हा प्रश्न मला तरी वाटतं ८ व्या घराच्या कक्षेत येतो.
Pages