मडमिणीच्या पाककृती: ऑटोलेंघीचे दही-वांगे.

Submitted by Barcelona on 28 December, 2021 - 12:41

फौदा टीव्ही शो पाहिला म्हणून म्हणा किंवा इस्राएलचे लसीकरण फार बारकाईने वाचायचे म्हणून म्हणा ‘योटम ऑटोलेंघी’चे नाव मला यूट्यूबने सुचवले. बरेच दिवस दुर्लक्ष केल्यावर एक दिवस किचन.कॉम वर फोटो पाहिला नि माझी विकेट गेली. I gave in!

खरं तर वांग्याचं भरीत-पोळी चविष्ट पण.. नाही, अंगात मडमिण संचारली होती जणू. ‘आटा मी वांगे भाजटे’ ऍक्सेंट नि अ‍ॅटीट्यूड सहित ऑटोलेंघीचे दही-वांग केलं. भिजवणे, मळणे अशा हात बरबटणाऱ्या स्टेप्स नाहीत. सुरी नि चमचा पुरे.

घटक

2 मोठी वांगी
1/3 कप ऑलिव्ह ऑइल (प्रमाण बदलू नये, तेलाचा प्रकारही बदलू नये)
1 1/2 चमचे लेमन थाईम. (उपलब्ध नसल्यास पर्याय टीपेत आहे)
समुद्री मीठ (उर्फ दाणेदार विना-आयोडीन मीठ)
काळी मिरी
1 डाळिंब
1 टीस्पून झटार (उपलब्ध नसल्यास पर्याय टीपेत आहे)

सॉससाठी:
9 टे. चमचे ताक
१/२ कप ग्रीक दही
1 1/2 टे. चमचे ऑलिव्ह ऑइल, तसेच सजावटीसाठी गरजेनुसार अधिक
1 लहान लसूण पाकळी, ठेचून
चिमूटभर मीठ

कृती:
१. ओव्हन 400°F/ २०४ सेल्सिय्स वर गरम करा. वांगी लांबीमध्ये कापून घ्या, हिरव्या देठातून सरळ कापून घ्या. नंतर देठ खाऊ नका (“प्रॉपर” काय ते सांगितल्याशिवाय मडमिण गप बसत नाही). आता भाजताना सोयीचं म्हणून देठ राहू दे. प्रत्येक वांग्याच्या पांढऱ्या भागावर चौकटीच्या आकारात सुरीने खाचा पाडून घ्या.

२. बेकिंग शीटवर वांग्याचे अर्धे भाग, कट-साइड वर ठेवा. त्या खाचात तेल सोडा व बाकी पांढऱ्या भागास ही तेल ब्रशने/स्पॅच्युलाने लावा. तेलात कंजुषी नको. लेमन थाईम आणि थोडे मीठ आणि मिरपूड शिंपडा. 35 ते 40 मिनिटे भाजून घ्या. मऊ, आणि छान तपकिरी झाले पाहिजे. ओव्हनमधून काढा आणि पूर्णपणे थंड होऊ द्या.

३. डाळिंब सोला. सुरी, चमचा वापरा. https://youtu.be/WF7Yg3jXW1o?t=78
डाळिंबाला धोपटून पण दाणे काढता येतात. ऑटोलेंघी तशी पद्धत वापरतो.
https://youtu.be/0rNgoed_pX8
दोन्ही जमत नसेल नि हात बरबटेल वाटल्यास आऊटसोर्स करा. (मडमिण कोपेल असे काही करू नका).

४. आता सॉस चे घटक एकत्र करा. वांग्यावर ओता. डाळिंब, झटार, ऑलिव्ह ऑइल घाला नि …. ‘ए मला काय माहित तुझा कॅमेरा ऑन होता’ म्हणून कुणाच्याही, कुठल्याही झूम मिटींग मध्ये नेऊन बिनदिक्कत वाढा… बनता है बॉस!!

तळटीपा:
झटार नसल्यास, लेमन थाईम नसल्यास कुठलेही इटालियन सिझनिंग चालते. थोडा लिंबू रस ही वापरा. आवडत असल्यास थोडे तिखटही (पाप्रिका इ) टाकू शकता.

ओव्हन नसल्यास जसा केक कुकर मध्ये भाजता/वाळूवर भाजता तसे वांगे भाजता येईल. तापमान ४०० वर जात नाही म्हणून जरा जास्त वेळ ठेवावे लागेल. चेक करा कारण भरीताइतके पचपचीत होऊ द्यायचे नाही.

सोबत कुसकुस, बकव्हीट, किंवा साधा उपमा अशी कुठलीही जोड चालते. इथे फोटोत बकव्हीट उर्फ कुट्टू आहे.

स्रोत:
https://www.thekitchn.com/plenty-cookbook-club-eggplant-with-buttermilk-...

Eggplant.jpeg (ही आमची स्नेहा उल्लाल दही वांगे. मुख्यचित्र ऑटोलेंघीचे दही-वांग आहे.)

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भारी!

छान दिसतंय. लेखन खास सी टच, खुसखुशीत.

मस्त!!! खूपच छान दिसतेय.
अरे यार!!! इथे सगळेच सुग्रण आहेत का? ढ कोणी नाही का? Wink कसला न्यूनगंड येतो.

मस्त लिहिले आहेस. Lol
वांगेही बऱ्यापैकी हॉट दिसू शकते असं वाटतंय. उल्लाल तर उल्लाल !

सगळ्यांना धन्यवाद.
सामो, लक्ष देऊन वाचलीस तर ह्या पाककृतीत वांगे भाजणे नि दही ओतणे एवढंच आहे. अजिबात काहीही सुग्रणपणा नाही Happy ढ गटात मी आहे.

वॅाव मस्त दिसतंय वांग..
पण उल्लाल वाला जोक डोक्यावरून गेला.. मी काही तरी मिसलं बहूतेक

(पुलंच्या) सोन्या बागलाणकरप्रमाणे Blackcat यांना एखादी स्वर्गातली अप्सरा भेटली आणि म्हणाली, 'काय घेणार, अमृत की बोरानी बैंजन?' तर आपले Blackcat म्हणतील, 'भरीत वाढा बाई' Wink

भारी लिहिलंय
वांगं भाजून, वर डाळिंब वगैरे बघून करायची हिंमत नाही होणार. पण दिसतंय छान.

इथल्या वांग्याचे फोटोज बघून माझ्या लहानपणीच्या आठवणी जाग्या झाल्या.. मला चिडवायला घरचे वांग्या म्हणून हाक मारायचे.. एनिवेज, मला लब्बाड वांग फार आवडतं .. माबोवर लब्बाड वांग्याची रेसिपी नसेल तर टाकेन .. मस्त झणझणीत असतं ते

लबाड वांगे न तळता करता येईल का

अप्पेपात्रात घालून वगैरे

वांगे आणि भेंडी सोडून इतर सर्व भाज्या कायद्याने बंद केल्या पाहिजेत

वांगे अमर रहे

https://www.maayboli.com/node/51971

https://www.maayboli.com/node/12438

छान . वांग मला कसंही आवडतच.

अरे यार!!! इथे सगळेच सुग्रण आहेत का? ढ कोणी नाही का? Wink कसला न्यूनगंड येतो.>>

सामो, मी आहे की. आमच्या ग्रुप मध्ये मी माझ्या ह्या न्यूनगंडा करिताच प्रसिद्ध आहे.

दही वांगे दिसतयं छान!

पण ते डाळींबाचे दाणे केवळ फोटो साठी ठीक!
विदेशी सासवांच्या मसाल्यांची जी नांवे दिली आहेत त्याचे पर्याय देखिल कळले नाही उदा. झटार.
तसेही ह्या झटाराचे जठराशी जुळेल का हे ही बघायला हवे!

Happy झटार ला पर्याय कुठलेही इटालियन सीझनिंग म्हणजे पास्ता/पिझ्झ्यावर घालतो ते ओरेगॅनो, बेसिल, थाइम, रोझमेरी इ. कुठलेही स्वतंत्र्/ एकत्र वाळवलेले हर्ब्ज.

मस्त आहे! करून बघायला पाहिजे! स्नेहा उल्लाल जोक मलापण गूगल केल्यानंतर कळला Happy
झटार हे नाव कधीच ऐकलेलं नसल्याने आधी वाटलं चुकून म चा झ झालाय. Lol
पण पाकृ मस्तच आहे.

स्नेहा उल्लाल ऐश्वर्याची डुप्लिकेट>>>>> पूर्ण संत्रं सोलल्याबद्दल धन्यवाद!

झटार हे नाव कधीच ऐकलेलं नसल्याने आधी वाटलं चुकून म चा झ झालाय>>> +१.

भारी रेसिपी लिवलीय पण मस्तच.
वांग कस ही आवडतं , दही आणि वांग कॉम्बो ही फेवरेट. डाळिंब ही प्रिय आहे पण वांग्यावर डाळिंब डाउट आहे। त्यामुळे ते वगळून दाणे घालून करू की डेअरिंग करून घालू डाळिंब ह्या पेचात आहे.

हायला, मला वाटलं मीच एकटी अडाणीमोडऑन आहे कि काय. बरेच जण आहेत माझ्या सोबत. ब्लॅककॅट धन्यवाद.
मला हल्लीच इटालियन सिझनींगची बाटली गिफ्ट मिळालीये.
झकास लिहीलयस मडमे Lol

थँक्यू सर्वांना. चुकून झ :D.
ममो, डाळींब वरूनच घालायचे आहे आणि दही-वांग चमच्याने खातात. त्यामुळे एका लहान भागात/चमच्यात डाळींब घालून खाऊन बघ. आवडलं तर सगळीकडे टाका. (आमच्या घरी आवडतं. पण गोड खाण्याची आवड आहे.) नाहीतर दाण्याचे कूट किंवा लसूण चटणीही छानच लागेल.

म्हाळसा, तू लबाड बटाटे अशी रेसिपी टाकली होतीस का? मी तुलाच कधीतरी लबाड बटाटे/वांग कशाबद्दल तरी विचारले होते. आहे रेसिपी ती इथे. तूच मला दिली होतीस पण मी केली नाही अजून Proud

Pages