कदाचित कधी ना कधी आपण सर्वांनीच कोणत्या ना कोणत्या सिनेकलाकाराच्या दिसण्यावरून चांगली वाईट कॉमेंट केली असेलच. सई, स्वप्निल, शाहरूख(?), सुबोध भावे, कंगणा राणावत, गेला बाजार अमेय वाघ, कोण तो एक प्रभाकर, लेटेस्ट जॅकलीन आणि अजूनही लिस्ट निघेल... पण हे चटचट आठवणारे.
प्रत्यक्षात ही लोकं आपल्यापेक्षाही कैक पटीने सुंदर असतात, वा असू शकतात, तरीही आपण त्यांच्यावर कॉमेंट करायचा आनंद उचलतो. यामागे बरेचदा हेतू निखळ आनंद मिळवणे हाच असतो. पण काहीवेळा हा हेतू तितक्या ताकदीने पोहोचत नाही आणि वाद होतात.
बरेच दिवसांपासून हा धागा काढायचा होताच, कारण वरच्या लिस्ट मध्ये माझेच फेव्हरेट लोकं जास्त भरले आहेत. त्या त्या वेळी तो तो धागा भरकटू नये म्हणून विषय वाढवायचो नाही, पण आज दुसर्या एका धाग्यावर (कुठला ते शोधायला जाऊ नका) हा विषय पुन्हा आल्याने राहावले नाही आणि यावर तो धागा न भरकटता स्वतंत्र चर्चा घडावी यासाठी वेगळा धागा काढला.
चर्चा सुरू करायला माझे स्वत:चे मत मांडतो.
मला एखाद्या कलाकाराच्या दिसण्यावरून कॉमेंट करण्यात फार काही आक्षेपार्ह वाटत नाही. फक्त कधीकधी त्यामागचा हेतू कमी जास्त आक्षेपार्ह वाटू शकतो.
मी स्वत: कधी फारशी अशी कॉमेंट केल्याचे आठवत नाही, पण जाणीवपूर्वक टाळलीही नाही. किंवा एखाद्याने केलेली कॉमेंट आवडली तर हसलो देखील असेन.
मला स्वत:ला माझ्या आवडत्या कलाकारांच्या दिसण्यावरून केलेली कॉमेंट त्रास देऊन गेली नाही. कारण वर लिहिले आहे तेच. प्रत्यक्षात सई, स्वप्निल, शाहरूख वगैरे हे कॉमेंट करणार्यापेक्षा कैक पटींनी सुंदर असण्याची शक्यताच जास्त असते. आणि हे त्या कॉमेंट करणार्यांनाही ठाऊक असतेच. पण होते काय, बरेच वेळा आपण मनात आलेली एखादी विनोदी तुलना कागदावर उतरवायच्या प्रयत्नात असतो. आपल्या नजरेला जे दिसले ते ईतर कोणाला दिसले का हे चाचपत असतो.
तसेच सौंदर्याच्या व्याख्या प्रत्येकाच्या वेगळ्या असतात हे सांगायला नकोच. मला सर्वात मोठा धक्का तेव्हा बसला जेव्हा लहानपणी सलमान आम्हाला जगातला दुसर्या की तिसर्या क्रमांकाचा चिकणा हिरो वाटायचा पण माझी आत्या एकदा बोलता बोलता सहज बोलून गेलेली, "हा दिसायला काही खास नाही पण अभिनय चांगला करतो.. म्हणून भाव खाऊन जातो
त्या आत्येसाठी सौंदर्याचे बेंचमार्क मधुबाला आणि देव आनंद होते !
बरेचदा काय होते, सिनेकलाकारांबद्दल बोलण्याचा आपला हक्क आपण बजावत असतो. आपण ज्यांना पडद्यावर २०० रुपये खर्चून बघायला जातो जर ते आपल्या डोळ्यांना वा मनाला आल्हाददायक नाही दिसले तर एक ग्राहक म्हणून आपण आपला असंतोष व्यक्त करू शकतो. वेगळ्या भाषेत सांगायचे झाल्यास त्यांचे सौंदर्य हे आपल्यासाठी एक प्रॉडक्ट असते. निदान आपण तरी तसे समजतो.
बरेचदा आणखी एक प्रकार होतो. एखाद्याचा चेहराच नकोसा वाटणे. जे माझे कोणे एके काळी शक्ती कपूरबाबत फार व्हायचे. म्हणजे तो पडद्यावर आला की मला ईरीटेट व्हायचे. त्याने काहीही केले तरी ते डोक्यातच जायचे. आणि त्याच्या बाबतीत त्याने चांगले काही केले असण्याची शक्यता कमीच असायची. मी माझे पैसे वेळ खर्च करून एखादा सिनेमा बघतोय, मला तो आवडतोय, माझे पैसे वसूल होत आहेत, पण त्यासोबत मला न आवडणारा हा एक माणूस मला सहन करावा लागतोय, ही भावना खरेच खूप ईरीटेटींग असू शकते हे तेव्हा अनुभवलेय. खरे तर तो हिरो नाहीये, त्याने सुंदर दिसावे अशी अट नसायची, पण तरीही ईतके घाण, ओंगळवाणे दिसू नये अशी माझी अपेक्षा असायची. आणि म्हणून त्याने काम केलेला एखादा चित्रपट बघून आल्यावर चित्रपटाबद्दल जे काही चांगलेवाईट मत असेल ते व्यक्त करून झाल्यावर त्याला चार शिव्या हासडायला विसरायचो नाही. तो माझा पब्लिक म्हणून हक्कच समजायचो. बरेचदा त्या बोलण्यात एक विखार असायचा, ज्याची काही गरज नव्हती हे आता मला जाणवतेय. अर्थात, आजही तो माझा नावडताच आहे, आणि आजही तो मला ईरीटेटच करतो. पण आता मी ते ईरीटेशन हॅण्डल करायला शिकलो आहे
अजून मुद्दे आठवतील तसे ईथे किंवा प्रतिसादात भर टाकतो ...
अरे बापरे, हा धागा परत शाखा
अरे बापरे, हा धागा परत शाखा शाखांतून जाणार असं दिसतंय...!
राज,
राज,
नाही हं. आम्ही शाखाच्या ईस्टाईलला ईस्टाईलच समजतो आणि त्याला डोक्यावर घेतो. कारण त्याच्यासारखी स्टाईल त्याचीच आहे. अभिनय करणारे बरेच असतात. अशी स्टाईल असलेला एखादाच
प्लांचेट वगैरे विषयांतर करु नये.....
>>>>>>
नानाकळा, तुम्ही म्हटलेय की
ही माहिती स्वतः नारसिससला भेटून विचारलेली आहे.
मला मेलेल्या माणसाला विचारायचा प्लांचेट हा एकच मार्ग माहीत आहे म्हणून विचारले. विषयाण्तर करायचा हेतू नव्हता.
बाकी तहानभूक तो विसरला तरी त्याला त्याचे घरचे कसे विसरले हा प्रश्न आहे. तो मरेपर्यंत फक्त त्याच्या मौत का तमाशा बघत बसले का?
अरे भै, तू मैथोलोजीत कुठे
अरे भै, तू मैथोलोजीत कुठे लोजिक शोधतो यार!
ओके. ही मायथॉलॉजी आहे माहीत
ओके. ही मायथॉलॉजी आहे माहीत नव्हते. मला ईतिहास वाटलेले.
एज ऑफ मायथॉलॉजी !!!
एज ऑफ मायथॉलॉजी !!!
कापूसकोंड्याची गोष्ट सांगू?
कापूसकोंड्याची गोष्ट सांगू?
सांग.
सांग काय म्हणतो! कापूसकोंड्याची गोष्ट सांगू?
नको.
नको काय म्हणतो!कापूसकोंड्याची गोष्ट सांगू?
.......
असं चाललंय इथे
राजसी कोण कापूसकोंड्या? हे
राजसी कोण कापूसकोंड्या? हे नाही समजले..
सर ! तुस्सी छा गए !!
सर ! तुस्सी छा गए !!
मायबोलीवरच्या लोकांचा एक प्रॉब्लेम आहे. ते सरांना नेमके काय म्हणायचे आहे हे माहीत न करता निगेटिव्ह कमेण्ट्स करतात. ते लेखकाचे नाव वाचतात. ऋन्मेष दिसले की काहीतरी फालतूपणा असणार असा अंदाज बांधतात. पैल्या दोन तीन ओळी वाचतात आणि मत बनवतात. इथेच ते फसतात.
उदा. काहीजण एव्हढेच वाचतात
प्रत्यक्षात ही लोकं आपल्यापेक्षाही कैक पटीने सुंदर असतात, वा असू शकतात, तरीही आपण त्यांच्यावर कॉमेंट करायचा आनंद उचलतो. यामागे बरेचदा हेतू निखळ आनंद मिळवणे हाच असतो. पण काहीवेळा हा हेतू तितक्या ताकदीने पोहोचत नाही आणि वाद होतात. आणि मग ते खवळतात. कारण लेखकाने असे लिहायला नको होते हे त्यांचे म्हणणे बरोबर असते. पण पुढे लेखकाने काय म्हटलेय हे वाचले असते तर हा आउटस्विंगर होता आणि तो सोडायला हवा होता हे त्यांना समजले असते.
चर्चा सुरू करायला माझे स्वत:चे मत मांडतो.
मला एखाद्या कलाकाराच्या दिसण्यावरून कॉमेंट करण्यात फार काही आक्षेपार्ह वाटत नाही. फक्त कधीकधी त्यामागचा हेतू कमी जास्त आक्षेपार्ह वाटू शकतो.
मी स्वत: कधी फारशी अशी कॉमेंट केल्याचे आठवत नाही, पण जाणीवपूर्वक टाळलीही नाही. किंवा एखाद्याने केलेली कॉमेंट आवडली तर हसलो देखील असेन.
म्हणजे चर्चा सुरू व्हायची होती. आत्ताशी कुठे मत मांडायला सुरूवात केली सरांनी. त्याआधीच जज्ज करून केलेली कमेण्ट ही स्लीपमधे कॅच देण्यासारखे झाले कि नाही ?
आता कुणाला वाटेल की आक्षेपार्ह नाही. म्हणजे करा कमेण्ट. पण तसे नाही. पुढे सरांनी म्हटलेच आहे की हेतू आक्षेपार्ह असू शकतो. इथे कन्फ्युज न होता नेमका मतितार्थ शोधता यायला हवा. आता इतक्यावरच कमेण्ट केली असेल तर मग तुम्ही हिट औट झालात. कारण पुढे काय म्हणतात सर ?
सौंदर्याच्या व्याख्या प्रत्येकाच्या वेगळ्या असतात हे सांगायला नकोच. मला सर्वात मोठा धक्का तेव्हा बसला जेव्हा लहानपणी सलमान आम्हाला जगातला दुसर्या की तिसर्या क्रमांकाचा चिकणा हिरो वाटायचा पण माझी आत्या एकदा बोलता बोलता सहज बोलून गेलेली, "हा दिसायला काही खास नाही पण अभिनय चांगला करतो.. म्हणून भाव खाऊन जातो Happy
त्या आत्येसाठी सौंदर्याचे बेंचमार्क मधुबाला आणि देव आनंद होते !
म्हणजे इथे विषय काय आहे ? कुणाचे डोळे लहान असतात, कुणाचे मोठे, कुणाचे टप्पोरे तर कुणाचे तिरळे. त्याप्रमाणे बघणार्याला सौंदर्य दिसते असामुख्य विषय होता. असा अर्थ काढून आता कमेण्ट केली असेल तर तुम्ही त्रिफळाचीत झालेला आहात.
अॅक्च्युअली सरांना म्हणायचे असते ते असे
बरेचदा काय होते, सिनेकलाकारांबद्दल बोलण्याचा आपला हक्क आपण बजावत असतो. आपण ज्यांना पडद्यावर २०० रुपये खर्चून बघायला जातो जर ते आपल्या डोळ्यांना वा मनाला आल्हाददायक नाही दिसले तर एक ग्राहक म्हणून आपण आपला असंतोष व्यक्त करू शकतो. वेगळ्या भाषेत सांगायचे झाल्यास त्यांचे सौंदर्य हे आपल्यासाठी एक प्रॉडक्ट असते. निदान आपण तरी तसे समजतो
तुम्हाला नाही वाटत थांबायला हवं होतं. जे थांबले त्यांचं अबिनंदन. आता काही काही लोक अतीशहाणे असतात. ते नेमके काय म्हणायचे आहे असे कोट करून विचारतात. अरे पण तुम्ही कुणाला विचारताय ?
तुमच्यापेक्षा लेखक कित्येक पटीने शहाणा असू शकतो हे धाग्याच्या लॉजिकमधेच आहे की. धाग्यात दोन तीन प्रकारचे लॉजिक हे कमेण्ट करणार्यांसाठी सूचक दिलेले असते. तो काही धाग्याचा विषय नसतो.
धाग्याचा विषय वेगळाच असतो. तो माहिती करून घ्यायला पाहीजे. म्हणजे पुढे बारकाईने वाचायला पाहीजे.
बरेचदा आणखी एक प्रकार होतो. एखाद्याचा चेहराच नकोसा वाटणे. जे माझे कोणे एके काळी शक्ती कपूरबाबत फार व्हायचे. म्हणजे तो पडद्यावर आला की मला ईरीटेट व्हायचे. त्याने काहीही केले तरी ते डोक्यातच जायचे. आणि त्याच्या बाबतीत त्याने चांगले काही केले असण्याची शक्यता कमीच असायची. मी माझे पैसे वेळ खर्च करून एखादा सिनेमा बघतोय, मला तो आवडतोय, माझे पैसे वसूल होत आहेत, पण त्यासोबत मला न आवडणारा हा एक माणूस मला सहन करावा लागतोय, ही भावना खरेच खूप ईरीटेटींग असू शकते हे तेव्हा अनुभवलेय.
हे न वाचताच लोक घाई करतात. मग धाग्याचे शीर्षक एकीकडे, धागा दुसरीकडे, प्रतिसाद तिसरीकडे आणि सरांची उत्तरे चौथीकडे असा प्रकार सुरू होतो. कारण धाग्याचा विषय कुणालाच कळालेला नसतो.
धाग्याचा विषय तर एका लाईनमधे असतो. ती ओळखता यायला हवी. सरांचा धागा हा युपीएससीच्या बुद्धीमापन चाचण्यांच्या प्रश्नपत्रिकेसारखा असतो. तर ती लाईन म्हणजे...
अजून मुद्दे आठवतील तसे ईथे किंवा प्रतिसादात भर टाकतो ...
तुम्ही सरांवर पिचडी करणार
तुम्ही सरांवर पिचडी करणार बहुदा
किंवा दवणिय अंडे सारखे पेज सुरू करणार
शांत माणूस याना वरील
शांत माणूस याना वरील प्रतिसादा साठी +१ देत आहे
नक्की शांतताभंग कशामुळे झालाय
नक्की शांतताभंग कशामुळे झालाय?
तुम्ही सरांवर पिचडी करणार
तुम्ही सरांवर पिचडी करणार बहुदा>> मलापण तेच वाटते. पण असं एकेक धागा वर आणण्यापेक्षा डायरेक प्रबंधच सादर केला तर नाही का चालणार.
>>>>>>>>>>नक्की शांतताभंग
>>>>>>>>>>नक्की शांतताभंग कशामुळे झालाय?
हाहाहा हपा
शांमा वीरु हपा
शांमा
वीरु
हपा
कापूसकोंड्याची गोष्ट सांगू?
कापूसकोंड्याची गोष्ट सांगू?
सांग.
सांग काय म्हणतो! कापूसकोंड्याची गोष्ट सांगू?
नको.
नको काय म्हणतो!कापूसकोंड्याची गोष्ट सांगू?
.......
असं चाललंय इथे>>> एकमेव उपयुक्त आणि चपखल प्रतिसाद!
आज सर कुठे व्यस्त आहेत ?
आज सर कुठे व्यस्त आहेत ? (उलथलेत हा शब्द योग्य नव्हे)
(No subject)
व्यग्र.
व्यग्र.
२४ वेळा लिहा, म्हणजे लक्षात राहील.
Pages