अमांचा धागा हायजॅक झाल्यामुळे आणि काही सदस्यांनी सुचवल्याप्रमाणे नवा धागा काढत आहे.
इथे सगळ्या भूभू आणि माऊ पालकांचे स्वागत आहे. ज्यांना व्हावं वाटतय त्यांचेही स्वागत
आपल्या बाळांच्या गमंती जमती, त्यांचे फोटो आणि किस्से मायबोलीकरांशी शेअर करण्यासाठी हा धागा. बाकीच्यांनी नुसता आनंद घ्यावा. तुम्हाला या बाळांचा त्रास झाला असेल, राग असेल तरी हरकत नाही पण तुम्ही तुमच्या तक्रारी वेगळ्या धाग्यावर टाकू शकता. ऑलरेडी तसा धागा आहे. इथे फक्त पॉझीटीव्ह गोष्टीच शेअर व्हाव्यात अशी इच्छा आहे.
हे वाचून कुणाला भूभू किंवा माऊ पालक व्हावेसे वाटले तर आनंदच आहे
या आधी अमांच्या धाग्यावर टाकलेले काही किस्से इथे पुन्हा टाकत आहे.
=====
माझा आणि ओडीन चा साधा फंडा आहे
तुम्ही आमच्या वाट्याला जाऊ नका
आम्ही तुमच्या वाट्याला जाणार नाही
लोकं उगाचच ओव्हररिऍक्ट होतात असाही अनुभव
एकदा फिरायला जात असताना समोरून छोटी मुलगी आणि तिचे बाबा येत होते म्हणून आम्ही रस्त्याची साईड बदलून पलीकडे गेलो
त्याला व्यवस्थित लीश बांधलेला होता आणि शांतपणे तो इकडे तिकडे बघत चालत होता
पण इकडे येताच एक आजोबा अचानक पिसाळले आणि ए हाड हाड म्हणत त्यांनी काठी उगारली
तो काठीला घाबरत असल्याने बिचारा फुल स्पीडणे उलट्या दिशेला पळाला तो त्या मुलीच्या दिशेने
ती किंचाळली तिचा बाबा ओरडायला लागला
तरी मी काही बोललो नाही
सॉरी म्हणून तिथून निघून आलो
======
आज सकाळपासून धोधो पडतोय
आणि नेहमीप्रमाणे ओडीन ने त्याच्या ठरलेल्या वेळी बाहेर फिरायला न्यायचा हट्ट सुरू केला
एरवी आम्ही पाऊस असला तर घरातच खेळतबसतो पण आज म्हणलं चल आणि रेनकोट घालून आम्ही गेलो ट्रॅक वर
इतक्या पावसात फिरायला येणारे आम्हीच दोघे येडे
तयामुळे एरवी माणसांनी फुललेला ट्रॅक आज अक्षरशः सुनसान होता
ओड्या इतका खुष झाला की निवांत त्याला बागडायला मिळत होत
मग पावसाने चिंब होणं पण त्याला चालत होत
या भूभाऊंची बाहेर हिंडण्याची इच्छाशक्ती अजब आहे
======
आज ओडीन ने एका पोराचा सिक्रेट बाहेर काढलं
ग्राउंड वर काही मुलं खेळत होती, ओडीन गेल्यावर सगळे जण खेळले त्याच्याशी पण हा एकाच्या मागेमागे लागला, तो पळायला लागला तर ओडिन पण मागे, सोडेच ना
मी कसातरी जाऊन त्याला धरलं
म्हणलं असं का करतोय ??
मग त्या पोराला म्हणलं खिशात काही खायला आहे बिस्कीट वगैर
आधी काही बोलला नाही मग हळूच खिशातून बिस्किटे काढली
तोवर बाकीची पोरं आली म्हणे एकटा एकटा खातोय का रे
आणि सगळ्यानी पटापट संपवून टाकली
मी म्हणलं ओड्या तो पोरगा लै शिव्या देणार बघ तूला आता
========
ओडीन च्या वासावरून शोधण्यावरून पोराने भारी खेळ सुरू केलाय
लपाछपी चा
पूर्वी एकाने ओडीन ला पकडून ठेवायचं आणि पोरगा लपला की सोडायचं, तो वासावरून अर्ध्या मिनिटात शोधून काढायचा
मग पोराला लक्षात आले की वासावरून शोधतो मग आता तो पळत वरच्या खोलीत जातो आणि मग परत खाली येऊन वेगळीकडे लपतो
हा वेडा वास घेत घेत आधी वरच्या खोलीत जातो मग खाली येतो तोवर याने जागा बदललेली असते
असला तासन्तास खेळ चालतो
मग आता तो शेजारच्या कॉलनीत जातो मुलांसोबत खेळायला
सगळे लपतात इकडे तिकडे आणि हा एकेक करून शोधून काढतो
आणि येड्या वर सारखंच राज्य असतं तरी कळत नाही
उलट आपल्याला खेळायला घेतात, सगळे हाक मारतात एवढं अटेंशन मिळतंय याने तुडुंब खुश असतो
चेहऱ्यावरचे भाव तेव्हा बघण्यासारखे असतात
निरागस समाधान तोंडभर पसरलेलं असत
======
मी काम करत असेन तर येतो
चुळबुळत बसून राहतो समोर
मग त्याला मानेवर, गळ्याला थोडं खाजवलं, काय म्हणतोस, कंटाळा आलाय का तुला, माझं काम झालं की खेळू काय आपण एवढं म्हणलं की समाधान होतं मग जाऊन लोळत पडतो
अर्थात नेहमीच नाही, अगदी बोर झाला असेल तर मग पंजा हातावर ठेऊन आता बास चा इशारा देतो, तरीही नाही ऐकलं तर मग मांडीवर चढून गाल चाट, हात चाट
ढकललं तरी परत येतो
मग थोडा वेळ काम बाजूला ठेऊन अटेंशन द्यावं लागतं, बॉल खेळणे, बेली रब असलं केलं की परत कामाला जायची परवानगी मिळते
====
मांजर आणि भुभु चे काय वैर असते कळत नही
ओडीन ला मांजर दिसले की तो कंट्रोल होतच नाही
त्यात आमच्या घराच्या कंपाउंड च्या भिंतीवर एक मांजर येऊन बसत
हा जाऊन तारस्वरात भुंकत बसतो आणि ती पण असली डॅम्बिस की इतक्या वर तो येऊ शकणार नाही हे माहिती असल्याने निवांत कायमहिती कोणावर भुंकतोय असा चेहरा करून अंग चाटत बसते
इकडे ओड्या चा संतापाने जळून पापड झालेला असतो
एकदाच ती मांजर अवघड प्रसंगात सापडली
पुणेकर असल्याने ओड्या दुपारी मस्त तंगड्या वर करून झोपलेला असतो
ही वेळ साधून ती दबक्या पावलाने किचन मध्ये घुसली
किंचित भांड्याचा आवाज झाला आणि ओड्या तिरासारखा धावला
तिने त्याला झुकांडी दिली आणि हॉल मध्ये आली आणि गडबडली
एरवी जे मागच्या अंगणाचे दार उघड असायचं ते मी जस्ट बंद केलं होतं आणि ओड्या भुंकत आत का गेलो ते बघायला जात होतो
मांजर आम्हाला दोघांना ओलांडून हॉल मध्ये आली पण बाहेर पडायला मार्ग नव्हता
तिथेच सोफ्यावर बाबा झोपले होते ती त्यांना ओलांडून खिडकीकडे झेपावली आणि ओड्या तिच्यापाठोपाठ पण तो वजन राखून असल्याने त्याला झेप जमलीच नाही आणि तो बदकन बाबांच्या पोटावर पडला
ते दचकून जागे झाले
तोवर मांजर घरभर वेड्यासारखं पळत होत आणि ओड्या मागोमाग
अक्षरशः टॉम आणि ते बुलडॉग चा सिन
नशिबाने पटकन सुचलं आणि मी मागचा दरवाजा उघडला
मांजर सुसाट पळालं बाहेर
आणि ओड्या मी कसा शूरबीर असल्याच्या अविर्भावात शेपटी हलवत आला
धिंगाणा नुसता
मी तर नंतर गडाबडा लोळलो हसून हसून त्या प्रसंगानंतर
आणि बाबा एकदम सिरीयस, म्हणे मांजराला पळायला जागा मिळाली नसती तर उलटून हल्ला केला असता त्याने नेमकं माझ्यावर.
म्हणलं त्याला तुम्ही दिसलाच नव्हता, त्याचं पूर्ण लक्ष ओड्या वर होतं
त्यालाच फिस्करून चावला असतं किंवा ओरबाडल असतं
त्यालाही एक धडा मिळाला असता चांगला
त्याचा तर इतका राग आहे मांजरावर की दिवसा रात्री कधीही म्हणलं, ओड्या मांजर आलं
की जातो मागच्या अंगणात आणि भुंकून येतो
म्हणलं दर वेळी कसं याला मांजर दिसतं म्हणून पाठोपाठ गेलो एकदा तर मांजर कुठंही नव्हतं पण हा हिरो ते नेहमी जिथं बसतं तिथे बघून भुंकून आला
म्हणलं की कुठली पद्धत लेका निषेध व्यक्त करायची
====
टीव्ही सुद्धा बघत नाही
त्याच्यासाठी म्हणून डॉग चे व्हीडिओ लावले तरी ढिम्म
आवाज आला तर बाहेर जाऊन बघून येतो कोण भुंकतोय
त्याला किती वेळा दाखवलं टीव्ही वर चे भुभु भुंकतंय तरी तो मान्यच करत नाही
एकदा तर तो टीव्हीच्या मागे जाऊन बघत होता भुभु कुठं लपलंय ते
ओडिन खुपच गोड आहे...
ओडिन खुपच गोड आहे...
वाढदिवसाच्या शुभेच्छा !
मस्त ओडिन कथा.
मस्त ओडिन कथा.
आमच्या कडे झोपताना काही पन खाउ जवळ घेउनच झोपायचे असते. काल ग्लुको ज बिस्किट चा मोठा पुडा ओढत आ ण ला. ज्यात सहा सात छोटे पुडे असतात तो. व सर्व अर्धी अर्धी उघडून ठेवली.
एकदम स्ट्रेसबस्टर धागा आहे.
एकदम स्ट्रेसबस्टर धागा आहे.
ओडिन एकदम lovable
डोळ्यात बदाम.
सर्व अर्धी अर्धी उघडून ठेवली.
सर्व अर्धी अर्धी उघडून ठेवली...... Ayyo
(No subject)
गोड दिसतेय अमा.
गोड दिसतेय अमा.
रेनडिअर हॅट भारीच!
अरे क्सल गोंडस बसलंय
अरे क्सल गोंडस बसलंय
इतक्या शांतपणे हॅट घालून
खूप खूप क्युट
आमच्याकडे दोन मिनिटात त्या हॅट च्या चिंध्या केल्या जातील
धन्यवाद सर्वांना
धन्यवाद सर्वांना
इकडे सगळ्यांना कौतुक आहे म्हणून त्याचे किस्से सांगायला आवडतं मनापासुन
अरे क्सल गोंडस बसलंय>>>>+१.
अरे क्सल गोंडस बसलंय>>>>+१.
इकडे सगळ्यांना कौतुक आहे
इकडे सगळ्यांना कौतुक आहे म्हणून त्याचे किस्से सांगायला आवडतं मनापासुन>>>>oodya ची डायरी लिहा न
ओडिन आहेच कौतुक करण्यासारखा!
ओडिन आहेच कौतुक करण्यासारखा! मी ओडीन फॅनक्लबात.
माउई चे किस्से नाही आले काहि दिवसात, इन्स्टावर व्हिडीयो बघितला होता खेळायला बोलवत असल्याचा.
ओडीनचा कॉन्फिडन्स आवडलेला आहे
ओडीनचा कॉन्फिडन्स आवडलेला आहे
भारी गोंडस बाळ
खरंच स्ट्रेसबस्टर धागा आहे हा.
मंकी सॅमीच्या गंमतीजमती चालू असतात. नेहेमी म्हणते इथे लिहावं आणि विसरायला होतं. मंकी बाहेर जातो सकाळ्च्या पारीच ते डायरेक्ट संध्याकाळी उगवतो तेही अगदी ठरलेल्या वेळीच येतो ५-५.३० च्या मधे. जणू काही ऑफिस अवर्स.
आम्ही चिडवत असतो जॉब लागलाय बाहेर बहुतेक. सॅमी काही एवढी बाहेर जात नाही. पण तो आला की त्याच्या मागे मागे फिरते वास घेत.
परवा तर अगदी पीडीए (पब्लिक डिस्प्ले ऑफ अॅफेक्शन) चालू होतं. मग मधेच सॅमीचं काहीतरी डोकं फिरलं आणि दिल्या त्याला २ टपल्या ठेवून.
सॅमीने मागच्या आठवड्यात बारका पक्षी मारुन आणला घरी. बाबा ओरडल्यावर दिला सोडून तिथेच. उचलून मातीत ठेवला बाहेर
असं काही केलं की जाम ताप डोक्याला. बाकी गोंड्सपणा बघायला मजा येते.
हा हा दिवसभराचे ऑफिस
हा हा दिवसभराचे ऑफिस
साहिये
हे पक्षी नुसतेच मारतात का? खात नाहीत का?
आज आमच्या भित्र्या सशाची अजून
आज आमच्या भित्र्या सशाची अजून एकदा फजिती झाली. त्याला गेटमधून बाहेर नेत होतो तर समोर रस्त्यावरून एक बारके भटके भुभु चालले होते. हा उगाच शायनिंग मारत त्याच्या अंगावर गेला भुंकत
तर उलटाच झाला, ते उलटे भुंकत याच्या अंगावर आले
दिसायला एकदम किरकोळ पण व्होकल कॉर्ड चांगल्याच मजबूत होत्या त्याच्या, कर्कश्य कान किटवणारे भुंकत तो आला
मलाही त्रास व्हायला लागला त्या आवाजाचा, ओड्या तर अजून त्रासला
मग त्याने चल जाऊ दे तुला माफ केले वगैरे थाटात पाठ फिरवली आणि गेटमधून आत आला, तर ते भटके पण पाठोपाठ आत आले
झालं हे बघताच ओडीन महाशय इतके गांगरले की सांगता सोय नाही
घराचे दार उघड होतं पण आपल्या पाठोपाठ हे घरात घुसले तर असा विचार करत तो या अंगणातच गोल गोल पळायला लागला
आणि ते भुभु काही चावत नव्हते, ते फक्त सुरक्षित अंतरावरून भुंकत त्याच्या मागे पळत होते
ओड्या इतका हवालदिल झालेला की ही पीडा कशी घालवावी हे कळेना त्याला
तो भुंकला की हे भुभु त्याच्या दुप्पट आवाजात कोकलत होते
मी सताड दरवाजा उघडला पण हे दोघेही शेपटीला आग लागल्यासारखे गोल गोल फिरत पळत होते
शेवटी बराच वेळ गारी गारी भिंगोऱ्या खेळून दमले आणि दम खात बसले
त्याचा फायदा घेत कसेतरी त्या भटक्या भुभुला बाहेर हुसकवले
गेट बंद होताच ओडीन ने लगेच भुंकून मी कसा शूरवीर वगैरे सुरू केलं
म्हणलं अजिबात आवाज नई करायचा, कशी पळापळ झाली तुझी ते मी पाहिलंय
काय मस्त किस्सा आहे. शूरवीर
काय मस्त किस्सा आहे. शूरवीर ऑडी
ऑडीनला भेटायची इच्छा होत आहे.
अजून एक हहपुवा किस्सा... ओडीन
अजून एक हहपुवा किस्सा... ओडीन रे ओडीन. किती मजेशीर आहेस तू
हे पक्षी नुसतेच मारतात का? खात नाहीत का?>>>>>>>>>>> खाल्लेलं नाही बघितलं. मुलीच्या अभ्यासानुसार ते असे हंट करून मालकासाठी ट्रीट म्हणून आणतात म्हणे खखोदेजा
मी कधीही अशा ठिकाणी गेली आहे
मी कधीही अशा ठिकाणी गेली आहे जिथे पाळलेले कुत्रे असतात तिथे नेहमीच माझे स्वागत जोरदार भुंकूनच झाले आहे. अगदी मी त्यांच्या शेजारच्या घरी जरी जात असेल तर हे महाशय खिडकीतून किंवा दारात येऊन माझ्यावर भुंकतात. त्यामुळेच मला कुत्रे कधीच आवडले नाहीत. परंतू जेव्हापासून ओडीन बद्दल वाचतेय आणि त्याचा क्यूट फोटो पाहिला आहे तेव्हापासून कुत्र्यांबद्दल भीती थोडी कमी झाली आहे आणि रागही मावळला आहे.
मला का कुणास पण नेहमी असे वाटते की ओडीन घरी येणाऱ्या पाहुण्यांना पाहून भुंकत नसावा
सगळ्यांवर नाही भुंकत
सगळ्यांवर नाही भुंकत
त्याचे आता ठरलेले लोक आहेत
पूर्वी कुणीही आलं तरी शेपूट हलवत जायचा हॅ हॅ करत
पण आता लॉंद्रीवाला,पोस्टमन, ऍमेझॉन किंवा फूड डिलिव्हरी वाले याना गेट च्या आत नो एन्ट्री
ते बिचारे बाहेरूनच गेट वाजवत राहतात मग आम्ही जाऊन घेऊन येतो
तेव्हाही हा सोबत आणि लक्ष ठेऊन असतो कोणी आत येत नाही ना
पण काही जण अगदीच चालतात, आमच्याकडे प्लांम्बिंग चे काम सुरू असताना एक जण यायचा, तो आला की ओडीन एकदम खुश, फुल लाडात, मी विचारलं तुमच्याकडे आहे का कुत्रा तर म्हणे नई मला भीती वाटते पण हा काही करत नाही कळल्यावर मी खेळतो याच्याशी
त्यांना आपल्यापेक्षा जास्त माणसाची पारख करता येते असं मला वाटतं
31 च्या रात्रीची गंमत
31 च्या रात्रीची गंमत
दादू आणि त्याच्या मित्रांचे पार्टी करायला जायचं चाललं होतं मग आधी ते आमच्याकडे भेटले सगळे
सगळ्यांचे चांगले कपडे वगैरे बघून ओडीन महाशय खुश, त्याला बहुदा वाटलं परत वाढदिवस आला असावा
पण त्याला न घेता सगळे निघून गेले तेव्हा जे काही अपार दुःख झालं आहे विचारू नका
एकटाच अंगणात गेट कडे बघत बसून राहिला की आपल्याला नेतील म्हणून
मी खेळूया म्हणलं तरी लक्ष देईना
शेवटी मग गाडीवर बसवून चक्कर मारली, आल्यावर चिकन स्टिक दिली चघळायला तेव्हा कुठं जरा माणसात आला
बिच्चारा ओडीन!
बिच्चारा ओडीन!
तेव्हा कुठे जरा माणसात आला>>>
Awwwww बिच्चारा ओडीन... किती
Awwwww बिच्चारा ओडीन... किती कळतं त्याला
ही आमची बेला
ही आमची बेला
कसले क्युट फोटो आहेत. भारी
कसले क्युट फोटो आहेत. भारी स्टायलो आहे.
क्यूट आहे बेला.
क्यूट आहे बेला.
ओडिनला भेटायला आल तर भुंकतो का ?
बेला मस्तच
बेला मस्तच
डशहाउंड आहे ना ही??
ओडीन चे आराखडे वेगळे आहेत
त्याला एखादी व्यक्ती संशयित वाटली तर भुंकतो
पण आमच्या घरच्यापैकी कोणी त्याव्यक्तीशी बोलत असलो तर नाही भुंकत
आणि त्याच्याशी बोलायला लागलेत तर मग मुळीच नाही
मग फुल्ल लाडात येईल
ते लाड आता सोसवत नाहीत, वजन वाढलं आहे आकार पण
प्रेमळ ढुशी पण तोल घालवते त्याची
आणि चिरंजीव आपण मोठे झालोय हे मान्यच करत नाहीत
भयंकर गोड आहे बेला.. डोळे
भयंकर गोड आहे बेला.. डोळे कसले बोलके आहेत
डशहाउंड आहे ना ही?? >>>> हो
डशहाउंड आहे ना ही?? >>>> हो
धन्यवाद सर्वाना
<<<आणि त्याच्याशी बोलायला
<<<आणि त्याच्याशी बोलायला लागलेत तर मग मुळीच नाही
मग फुल्ल लाडात येईल
ते लाड आता सोसवत नाहीत, वजन वाढलं आहे आकार पण >>>
यावरून गेल्या आठवड्यातला किस्सा आठवला. किहीमला एका वाडीमधे (पर्यटक निवास) 3 दिवस राहिलो होतो. एकदाच तिथल्या मालकांचा सनी नावाचा भूभू भेटला. जरा बोलले त्याच्याशी तर तो मांडीवरच चढून बसला. उतरायला तयारच नाही... एवढे जड बाळ मांडीवर घ्यायची सवय नाही ना..
हा हा हा भारी किस्सा
हा हा हा भारी किस्सा
लाड आता सोसवत नाहीत, वजन
लाड आता सोसवत नाहीत, वजन वाढलं आहे आकार पण
प्रेमळ ढुशी पण तोल घालवते त्याची
आणि चिरंजीव आपण मोठे झालोय हे मान्यच करत नाहीत
Pages