अमांचा धागा हायजॅक झाल्यामुळे आणि काही सदस्यांनी सुचवल्याप्रमाणे नवा धागा काढत आहे.
इथे सगळ्या भूभू आणि माऊ पालकांचे स्वागत आहे. ज्यांना व्हावं वाटतय त्यांचेही स्वागत
आपल्या बाळांच्या गमंती जमती, त्यांचे फोटो आणि किस्से मायबोलीकरांशी शेअर करण्यासाठी हा धागा. बाकीच्यांनी नुसता आनंद घ्यावा. तुम्हाला या बाळांचा त्रास झाला असेल, राग असेल तरी हरकत नाही पण तुम्ही तुमच्या तक्रारी वेगळ्या धाग्यावर टाकू शकता. ऑलरेडी तसा धागा आहे. इथे फक्त पॉझीटीव्ह गोष्टीच शेअर व्हाव्यात अशी इच्छा आहे.
हे वाचून कुणाला भूभू किंवा माऊ पालक व्हावेसे वाटले तर आनंदच आहे
या आधी अमांच्या धाग्यावर टाकलेले काही किस्से इथे पुन्हा टाकत आहे.
=====
माझा आणि ओडीन चा साधा फंडा आहे
तुम्ही आमच्या वाट्याला जाऊ नका
आम्ही तुमच्या वाट्याला जाणार नाही
लोकं उगाचच ओव्हररिऍक्ट होतात असाही अनुभव
एकदा फिरायला जात असताना समोरून छोटी मुलगी आणि तिचे बाबा येत होते म्हणून आम्ही रस्त्याची साईड बदलून पलीकडे गेलो
त्याला व्यवस्थित लीश बांधलेला होता आणि शांतपणे तो इकडे तिकडे बघत चालत होता
पण इकडे येताच एक आजोबा अचानक पिसाळले आणि ए हाड हाड म्हणत त्यांनी काठी उगारली
तो काठीला घाबरत असल्याने बिचारा फुल स्पीडणे उलट्या दिशेला पळाला तो त्या मुलीच्या दिशेने
ती किंचाळली तिचा बाबा ओरडायला लागला
तरी मी काही बोललो नाही
सॉरी म्हणून तिथून निघून आलो
======
आज सकाळपासून धोधो पडतोय
आणि नेहमीप्रमाणे ओडीन ने त्याच्या ठरलेल्या वेळी बाहेर फिरायला न्यायचा हट्ट सुरू केला
एरवी आम्ही पाऊस असला तर घरातच खेळतबसतो पण आज म्हणलं चल आणि रेनकोट घालून आम्ही गेलो ट्रॅक वर
इतक्या पावसात फिरायला येणारे आम्हीच दोघे येडे
तयामुळे एरवी माणसांनी फुललेला ट्रॅक आज अक्षरशः सुनसान होता
ओड्या इतका खुष झाला की निवांत त्याला बागडायला मिळत होत
मग पावसाने चिंब होणं पण त्याला चालत होत
या भूभाऊंची बाहेर हिंडण्याची इच्छाशक्ती अजब आहे
======
आज ओडीन ने एका पोराचा सिक्रेट बाहेर काढलं
ग्राउंड वर काही मुलं खेळत होती, ओडीन गेल्यावर सगळे जण खेळले त्याच्याशी पण हा एकाच्या मागेमागे लागला, तो पळायला लागला तर ओडिन पण मागे, सोडेच ना
मी कसातरी जाऊन त्याला धरलं
म्हणलं असं का करतोय ??
मग त्या पोराला म्हणलं खिशात काही खायला आहे बिस्कीट वगैर
आधी काही बोलला नाही मग हळूच खिशातून बिस्किटे काढली
तोवर बाकीची पोरं आली म्हणे एकटा एकटा खातोय का रे
आणि सगळ्यानी पटापट संपवून टाकली
मी म्हणलं ओड्या तो पोरगा लै शिव्या देणार बघ तूला आता
========
ओडीन च्या वासावरून शोधण्यावरून पोराने भारी खेळ सुरू केलाय
लपाछपी चा
पूर्वी एकाने ओडीन ला पकडून ठेवायचं आणि पोरगा लपला की सोडायचं, तो वासावरून अर्ध्या मिनिटात शोधून काढायचा
मग पोराला लक्षात आले की वासावरून शोधतो मग आता तो पळत वरच्या खोलीत जातो आणि मग परत खाली येऊन वेगळीकडे लपतो
हा वेडा वास घेत घेत आधी वरच्या खोलीत जातो मग खाली येतो तोवर याने जागा बदललेली असते
असला तासन्तास खेळ चालतो
मग आता तो शेजारच्या कॉलनीत जातो मुलांसोबत खेळायला
सगळे लपतात इकडे तिकडे आणि हा एकेक करून शोधून काढतो
आणि येड्या वर सारखंच राज्य असतं तरी कळत नाही
उलट आपल्याला खेळायला घेतात, सगळे हाक मारतात एवढं अटेंशन मिळतंय याने तुडुंब खुश असतो
चेहऱ्यावरचे भाव तेव्हा बघण्यासारखे असतात
निरागस समाधान तोंडभर पसरलेलं असत
======
मी काम करत असेन तर येतो
चुळबुळत बसून राहतो समोर
मग त्याला मानेवर, गळ्याला थोडं खाजवलं, काय म्हणतोस, कंटाळा आलाय का तुला, माझं काम झालं की खेळू काय आपण एवढं म्हणलं की समाधान होतं मग जाऊन लोळत पडतो
अर्थात नेहमीच नाही, अगदी बोर झाला असेल तर मग पंजा हातावर ठेऊन आता बास चा इशारा देतो, तरीही नाही ऐकलं तर मग मांडीवर चढून गाल चाट, हात चाट
ढकललं तरी परत येतो
मग थोडा वेळ काम बाजूला ठेऊन अटेंशन द्यावं लागतं, बॉल खेळणे, बेली रब असलं केलं की परत कामाला जायची परवानगी मिळते
====
मांजर आणि भुभु चे काय वैर असते कळत नही
ओडीन ला मांजर दिसले की तो कंट्रोल होतच नाही
त्यात आमच्या घराच्या कंपाउंड च्या भिंतीवर एक मांजर येऊन बसत
हा जाऊन तारस्वरात भुंकत बसतो आणि ती पण असली डॅम्बिस की इतक्या वर तो येऊ शकणार नाही हे माहिती असल्याने निवांत कायमहिती कोणावर भुंकतोय असा चेहरा करून अंग चाटत बसते
इकडे ओड्या चा संतापाने जळून पापड झालेला असतो
एकदाच ती मांजर अवघड प्रसंगात सापडली
पुणेकर असल्याने ओड्या दुपारी मस्त तंगड्या वर करून झोपलेला असतो
ही वेळ साधून ती दबक्या पावलाने किचन मध्ये घुसली
किंचित भांड्याचा आवाज झाला आणि ओड्या तिरासारखा धावला
तिने त्याला झुकांडी दिली आणि हॉल मध्ये आली आणि गडबडली
एरवी जे मागच्या अंगणाचे दार उघड असायचं ते मी जस्ट बंद केलं होतं आणि ओड्या भुंकत आत का गेलो ते बघायला जात होतो
मांजर आम्हाला दोघांना ओलांडून हॉल मध्ये आली पण बाहेर पडायला मार्ग नव्हता
तिथेच सोफ्यावर बाबा झोपले होते ती त्यांना ओलांडून खिडकीकडे झेपावली आणि ओड्या तिच्यापाठोपाठ पण तो वजन राखून असल्याने त्याला झेप जमलीच नाही आणि तो बदकन बाबांच्या पोटावर पडला
ते दचकून जागे झाले
तोवर मांजर घरभर वेड्यासारखं पळत होत आणि ओड्या मागोमाग
अक्षरशः टॉम आणि ते बुलडॉग चा सिन
नशिबाने पटकन सुचलं आणि मी मागचा दरवाजा उघडला
मांजर सुसाट पळालं बाहेर
आणि ओड्या मी कसा शूरबीर असल्याच्या अविर्भावात शेपटी हलवत आला
धिंगाणा नुसता
मी तर नंतर गडाबडा लोळलो हसून हसून त्या प्रसंगानंतर
आणि बाबा एकदम सिरीयस, म्हणे मांजराला पळायला जागा मिळाली नसती तर उलटून हल्ला केला असता त्याने नेमकं माझ्यावर.
म्हणलं त्याला तुम्ही दिसलाच नव्हता, त्याचं पूर्ण लक्ष ओड्या वर होतं
त्यालाच फिस्करून चावला असतं किंवा ओरबाडल असतं
त्यालाही एक धडा मिळाला असता चांगला
त्याचा तर इतका राग आहे मांजरावर की दिवसा रात्री कधीही म्हणलं, ओड्या मांजर आलं
की जातो मागच्या अंगणात आणि भुंकून येतो
म्हणलं दर वेळी कसं याला मांजर दिसतं म्हणून पाठोपाठ गेलो एकदा तर मांजर कुठंही नव्हतं पण हा हिरो ते नेहमी जिथं बसतं तिथे बघून भुंकून आला
म्हणलं की कुठली पद्धत लेका निषेध व्यक्त करायची
====
टीव्ही सुद्धा बघत नाही
त्याच्यासाठी म्हणून डॉग चे व्हीडिओ लावले तरी ढिम्म
आवाज आला तर बाहेर जाऊन बघून येतो कोण भुंकतोय
त्याला किती वेळा दाखवलं टीव्ही वर चे भुभु भुंकतंय तरी तो मान्यच करत नाही
एकदा तर तो टीव्हीच्या मागे जाऊन बघत होता भुभु कुठं लपलंय ते
हा व्हॅनिला सिनेमा मस्त आहे
हा व्हॅनिला सिनेमा मस्त आहे भुभुवर.
https://www.primevideo.com/detail/0JMXRC3J7ZXDXPIKN01K1V0HJY/ref=atv_dp_...
(No subject)
हा आमच्या बोक्याचा काका/आजोबा
हा आमच्या बोक्याचा काका/आजोबा मित्र. अधूनमधून येतो कठड्यावर.
आणि हा आमचा फिशफिश
लगेच खिडकीतून टकुरं बाहेर काढून
मग टुणकन खिडकीतून उडी मारून
मग टुणकन खिडकीतून उडी मारून कठड्यावर
( या फोटोला काय लिहावं मला सुचत नव्हतं एका मैत्रिणीने सुचवलं )
असं असतंय व्हय आरारारा !
आता कसं सांगू तुला मित्रा
(इथे मी आधी लिहिलेलं "देवा आता तूच सांग ,कस सांगू मित्राला की श्रावण चालू आहे ,सध्या फक्त दूध पोळी खातो"
मैत्रिणीने सुचवलेल आवडलं म्हणून बदललं)
भारी आहेत मीम्स
भारी आहेत मीम्स
भारी फोटो आणि कॅप्सशन
भारी फोटो आणि कॅप्सशन
क्षमा असावी ,
क्षमा असावी ,
कदाचित मी चुकीचा धागा निवडला असेल .
माझ्याकडे एक टर्किश अंगोरा जातीची मांजर आहे . पांढरीशुभ्र , एक वर्षाची .
तिला कोणी ऍडॉप्ट करू शकेल का ? विशेषतः ज्यांच्याकडे बोका असेल ?
कळावे
आभार
फेसबुकवर एक गृप आहे - Free
फेसबुकवर एक गृप आहे - Free Adoption,Pune. (Cats). जर तुम्ही पुण्यात असाल तर तिथे पोस्ट करा. मी आमचे दुसरे माऊ तिथे पोस्ट बघून दत्तक घेतली आहे.
फोटो टाकणार का
फोटो टाकणार का
माझ्या भावाकडे आहे एक बोका
त्याला विचारतो
पुण्यातच आहे ना
भिकार गमती जमती सुरु आहेत तर
भिकार गमती जमती सुरु आहेत तर अजुन
बन्या, तुम्हाला आवडत नसेल तर
बन्या, तुम्हाला आवडत नसेल तर न वाचायचा ऑप्शन आहे की.
मी कधी प्राणी पाळेन असे वाटत नाही ,भुभु माऊंची फार भीती वाटते. पण हा धागा फार आवडतो. सॉलिड स्ट्रेसबस्तर आहे.
ऑर्किड इग्नोर करा त्यांना
ऑर्किड इग्नोर करा त्यांना
ते सगळीकडे जाऊन फक्त असलंच बोलत असतात
त्यांना रिप्लाय पण द्यायची गरज नाही, पूर्णपणे फाट्यावर मारा
मिरजेत एक पांढरे पर्शियन
मिरजेत एक पांढरे पर्शियन मांजर द्यायचे आहे
कुणाला हवे आहे का ?
मी कधी प्राणी पाळेन असे वाटत
मी कधी प्राणी पाळेन असे वाटत नाही ,भुभु माऊंची फार भीती वाटते. पण हा धागा फार आवडतो. सॉलिड स्ट्रेसबस्तर आहे.>>>>
अगदी अगदी, मला तर रोजची ओड्या ची डायरी वाचायला आवडेल,पण जास्त हावरट पणा वाटेल म्हणून बोलत नाही
ओड्याचा आपण सगळ्यात भारी
ओड्याचा आपण सगळ्यात भारी पोहतो हा अहंकार मस्त ठेचला त्याच्याच आईने. दोघांना एकत्र कॅनाल ला नेले पोहायला
ती इतकी वजनी असूनही जबरा पोहते
आणि दोन तीन वेळा ओडीच्या पूढे पोहत जाऊन बाटली घेऊन आली
आपल्यापेक्षा भारी कोणी आहे हे त्याला सहनच होईना मग
इतका चिडला की त्याने तिला पाण्यात दाबायचा ट्राय केला पण तिने सुमडीत त्याला बाजूला ढकलून तू अजूनही बच्चा आहेस हे दाखवून दिले
बिचारा ओडीन
मस्त!
मस्त!
काल आम्ही इथे चालायला गेलो
काल आम्ही इथे चालायला गेलो तेंव्हा एक भूभू महाशय आपल्या बाबा/काकासह फिरायला आले होते. तेंव्हा त्यांच्या (भूच्या) पायांत चक्क बूट घातलेले दिसले. हे असे चुटुकले बूट पहिल्यांदाच पाहिले आणि फार मजा वाटली. पाऊस येऊन गेलेला आणि रस्त्यावर चिखलाचा बर्यापैकी राडा झालेला. त्यामुळे भूभूचे ते बूट एकदमच भारी वाटले.
ओड्याचा आपण सगळ्यात भारी
ओड्याचा आपण सगळ्यात भारी पोहतो हा अहंकार मस्त ठेचला त्याच्याच आईने. >>> हा भारी किस्सा आहे! ओडीन तिला ओळखतो का?
ते शूज इकडे पण मिळतात स्नो मधे वगैरे घालायला. पण सर्रास सगळी कुत्री नाही घालत. माव्या तर ते घालून घेईल असे अजिबात वाटत नाही.
हाहा ओडीन. व्हिडिओ काढायचा
हाहा ओडीन. व्हिडिओ काढायचा होतात.
मी पण पाहिलेले असले बूट
मी पण पाहिलेले असले बूट
इथे एक हस्की घालून यायची
मी विचार केला होता ओडीन ला घ्यायचा पण तो तासाभरात त्याच्या चिंध्या करेल याची खात्री असल्याने घेतले नाहीत
ओडीन ने नाही ओळखले अजिबात, आणि कहर म्हणजे तो बाकी फिमेल सारखाच ट्रीट करत होता
मला थोडा नाही म्हणले तरी धक्काच बसला
त्यांच्यात बहीण भाऊ काका मामी असली नाती नसतात आणि वयात आल्यावर फक्त नरमादी इतकेच असते एवढं माहिती होते पण आई सोबतच तो वागेल असे अजिबात वाटलं नव्हतं
फटके देऊन बाजूला केले आणि तिनेही गुरुगरून त्याला जागा दाखवली कारण मग नंतर सुतासरखा सरळ आला
आज आमच्या कॅश्यु चा किस्सा,
आज आमच्या कॅश्यु चा किस्सा, हो हो तीच पाटीलिंबाई माऊ. मागे तिला झाली होती सर्दी, हे जोरदार शिंका चालू होत्या. म्हणून डॉक्टर कड़े घेऊन गेलो. त्यांनी एक इंजेवशन आणि एक औषध दिल. कॅश्यु ला काही औषध घ्याच नव्हतं. आम्ही तीला बळेच पकडून ड्रॉपर ने औषध दयचो. दोन दिवस खूप त्रास दिला,तिसऱ्या दिवसापासून मात्र औषध घ्याची आणि बेडरुम मध्ये जायची. आम्हाला वाटलं गुणी बाळ ते आमच. पण नंतर लक्षात आलं की ही हुशार बेडरूम मध्ये जाऊन औषध थुंकून टाकते, आणि ती थुंकी वळून जाऊन फरशी वर छान डाग पडत चालले होते. मग परत डॉक्टर कडे घेऊन गेलो आणि अजून एक इंजेक्शन देऊन आलो औषध ऐवजी
हाहा कसली हुशार आहे
हाहा कसली हुशार आहे
ओडीन पण गोळी घेतली असे दाखवायचा आणि परत बाहेर काढायचा, पण त्याला हे असे दुसऱ्या खोलीत जाऊन गुपचूप उद्योग करायला कधी सुचलं नाही बहुदा
हो भयाण हुशार आहे
हो भयाण हुशार आहे
हुषार आहे.
हुशार आहे.
भारी आहे
भारी आहे
तिने कोणत्यातरी पिक्चर मध्ये पाहिलं असेल हे.
तिने कोणत्यातरी पिक्चर मध्ये
तिने कोणत्यातरी पिक्चर मध्ये पाहिलं असेल हे.
लब्बाड कॅश्यू...
लब्बाड कॅश्यू...
सॅमीताईंना या सिझनमधे बरेच लँटर्नफ्लाय (सिझनल किडे) खेळायला मिळत होते. आता जरा कमी झालेत तरी शोधत असते पॅटीओ मधे.
मंकी सॅमी ला पाणी पिण्यासाठी एक लहान फाऊंट्न ठेवलंय. सारखं ते जागा बदलतं. जिथे ठेवलंय तिथुन नेहेमी सरकलेलं दिसतं. मुलीने विडीओ लावून ठेवला होता एक दिवस आणि सॅमी त्यात दिसली फाऊंटन हलवताना.
आमच्याकडे एक केशरी रंगाचा
आमच्याकडे एक केशरी रंगाचा पावसाळी किडा आला ओड्याची दाणादाण उडाली. हे नवीन प्रकरण किती धोकादायक असावं हे ठरवण्यात त्याचा बराच वेळ गेला आणि मग जेव्हा तो भुंकयला सुरू झाला तेव्हा ते उडून त्याच्या डोक्यावरून पडद्याआड गेलं. बापरे याला कळेच ना हे अचानक अदृश्य कसे काय झालं, बेक्कार पळापळ झाली.
तसेच तो सध्या गाळण्याला घाबरतो असा शोध लागला. आणि सगळ्या नाही, एकच गुलाबी रंगाचा बारीक गाळण आहे त्याला
ते म्हणजे माझ्यकिवा कोणाच्या हातात दिसले तर तो पळूनच जातो. एकदा तर मी पळून वरच्या खोलीत जाऊन बसला
यात काय घाबरण्यासारखे आहे हे अजून कळलं नाहीये
केनाईन डायक्रोमॅटिक असतात
केनाईन डायक्रोमॅटिक असल्याने त्यांना गुलाबी रंग कळणार नाही, तो त्यांना करड्या रंगासारखाच दिसेल.
त्यांना फक्त निळा आणि पिवळा हे दोनच रंग बर्यापैकी दिसतात बाकी रंग ह्या दोन रंगांच्या छटांमध्येच दिसतात.
हिरव्या आणि सुकलेल्या लॉनवरचे गवतही त्यांना फार वेगळे दिसत नाही.
अच्छा, पण तो एक स्टील चे पण
अच्छा, पण तो एक स्टील चे पण गाळणे आहे त्याला नाही घाबरत
त्याकडे पूर्ण दुर्लक्ष करतो
याच स्पेसिफिक गाळण्याला घाबरतो
Pages