Submitted by हप on 19 December, 2021 - 12:01
माझा दोन दिवसांपूर्वी मोटसायकलवरून पडून अपघात झाला आहे. फक्त गुडघ्याला मार लागला आहे. डॉक्टरांनी प्लेट बसवण्यासाठी ऑपरेशन सांगितले. कुणाला अशा ऑपरेशन बद्दल माहिती असल्यास सांगा. ऑपरेशन मुळे पुढे काही त्रास होईल का? माझे वय ३० वर्ष आहे.
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
हे असलं ऑपरेशन डॉक्टरांनी
हे असलं ऑपरेशन डॉक्टरांनी सांगितलं की लगेच होकार नाही द्यायचा. दोन तीन ठिकाणी दाखवून निर्णय घ्यायचा. दोन महिन्यांपूर्वी गाडी चालवताना माझ्या हातावर ताण आला आणि दुसऱ्या दिवशी हात सुजला. काही समजलं नाही नक्की का आणि कसं झालं. आज कमी होईल उद्या कमी होईल असं बोलत आठवडा गेला तरीसुद्धा कमी होण्याची लक्षणं दिसत न्हवती. मग मी ईथल्या एका प्रसिद्ध डॉक्टरकडे गेलो म्हणजे गुगलवर रिव्ह्यू चांगले होते. तर एक्सरे काढल्यावर तो मला बोलला हाडाला क्रॅक गेली आहे. ते ऐकून मला धक्का बसला कारण क्रॅक जाण्यासारखं मोठं काहीच घडलं नव्हतं. पुढे बोलला की तुला भूल देतो आणि ....... ते ऐकून मी हँग झालो होतो म्हणून आणीच्या पुढे काय बोलत होता ते मेंदूपर्यंत पोहोचलं नाही. मग मी ती चॉकलेटी पट्टी बांधून घरी आलो. बायको मेडिकल फिल्ड मध्ये आहे त्यामुळे तिचे एक डॉक्टर ओळखीचे होते त्यांना तो एक्सरे पाठवला तर ते बोलले काळजी करायचं काही कारण नाही. स्नायूंना दुखापत झाली आहे. ती आपोआपच दोन तीन आठवड्यात बरी होईल फक्त त्या हाताने जास्त काही जड उचलू नको. क्रॅक वैगेरे काही नाही.
>>>>>>>>>.हे असलं ऑपरेशन
>>>>>>>>>.हे असलं ऑपरेशन डॉक्टरांनी सांगितलं की लगेच होकार नाही द्यायचा. दोन तीन ठिकाणी दाखवून निर्णय घ्यायचा.
+११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११
हो दुसऱ्या डॉक्टरांचा सल्ला
हो दुसऱ्या डॉक्टरांचा सल्ला घेतोच. सध्या गुढग्यावर सूज आहेच. चालणे शक्य नाही मात्र थोडी हालचाल करताना दुखत नाही.
फ्रॅक्चरवरचे धनगराचे
फ्रॅक्चरवरचे धनगराचे आयुर्वेदिक औषध
X ray report share kara
X ray report share kara
(No subject)
हा city scan चा report आहे
हा ct scan चा report आहे यावरून काही सांगता येईल का?
city scan
city scan
<<
CT. खरं तर CAT. काँप्युटराज्ड अॅक्झिअल टोमोग्राफी.
छापील रिपोर्ट दाखवा
छापील रिपोर्ट दाखवा
म्हणजे अक्षरी लिहिलेला
@आरारा हो मी city समजत होतो
@आरारा हो मी city समजत होतो.
@Blackcat हो तो रिपोर्ट टाकतो
(No subject)
बहुतेक ऑपरेशन करावे लागेल
बहुतेक ऑपरेशन करावे लागेल
फ्रॅक्चर आहेच
ब्लॅक कॅट आणि हप, आपली
ब्लॅक कॅट आणि हप, आपली वैयक्तिक माहिती आणि वैद्यकीय उपचार, त्याचे रिपोर्ट्स इत्यादी आंतर्जालावर सर्वांसमोर ठेवणे सुरक्षित आहे का? - माझा एक भाबडा प्रश्न. इथे लोक असं करू नका म्हणत आहेत - https://blog.malwarebytes.com/cybercrime/2017/06/please-stop-posting-you...'t%20because%20the,friends%20is%20a%20great%20technology.
(लिंक सुरक्षित नसल्यास कृपया उडवावी)
कदाचित व्यनि किंवा इमेलने हे करणे तुलनेने बरे राहिले असते. तरीही हॅक होऊ शकतेच. पण पैसे/नोटा हातात घेऊन हिंडणे आणि पाकिटात घेऊन हिंडणे ह्यातला फरक आहे, तसा तो झाला असता.
“Depending on the facility,
“Depending on the facility, your X-ray or MRI might have your full name, date of birth, social security number, name, and the name of the facility in question” - हे खास करून अमेरिकेत लागू आहे.
इथे हप यांनी तशीही कोणती वैयक्तिक माहिती डिस्प्ले केलेली दिसत नाही.
अच्छा. मग ठीक आहे.
अच्छा. मग ठीक आहे.
काळजी घ्या हप.
@ Blackcat धन्यवाद आपण वेळ
@ Blackcat धन्यवाद आपण वेळ दिल्याबद्दल. अशा ऑपरेशन नंतर पुढे काही समस्या राहत नसेल ना.
@ हरचंद पालव, म्हाळसा धन्यवाद.
कम्युनिटेड म्हणजे दोनपेक्षा
कम्युनिटेड म्हणजे दोनपेक्षा जास्त - भरपूर तुकडे तुकडे झालेले फ्रॅक्चर
हे भरायला वेळ लागतो
(मला 2 वर्षे लागली होती)
@ Blackcat पण चालता येत असेल
@ Blackcat पण चालता येत असेल ना लवकर.
@हप, तुमचे गुडघे लवकर बरे
@हप, तुमचे गुडघे लवकर बरे व्हायला शुभेच्छा !
गुडघे आपले अत्यंत महत्वाचे अंग असल्याने तरुण मंडळींनी त्यांची विशेष काळजी घ्यायला हवी.
@ Blackcat पण चालता येत असेल
@ Blackcat पण चालता येत असेल ना लवकर.
<<
मी धाग्यात सुरुवातीला लिंक दिली आहे ना, धनगरी औषधाची? तो लेख लिहिणारे धागाकर्ते = एल गाटो नेग्रो उर्फ ब्लॅक कॅट.
यापूर्वीच तुमचा धागा वाचला
यापूर्वीच तुमचा धागा वाचला होता.लिहू की नको संभ्रमात होते.एक अनुभव म्हणून शेयर करते.
२०१०मधे माझ्या मिस्टरांचे गुडघ्याचे कम्प्रेस्ड फ्रॅक्चर झाले होते.त्यामुळे प्लॅस्टर नव्हते. मार लागल्यापासून ५-६ दिवसांत गुडघा ठणकायला लागला होता.हॉस्पिटलमधे जाऊन गुडघ्याच्या बाजूचे वाडगाभर खराब रक्त काढल्यावर त्याला बरे वाटायला लागले.(तिथल्या नर्सेसना थोडे आश्चर्य वाटले की रक्ताच्या गुठळ्या कशा झाल्या नाहीत म्हणून.
हळद्,तुरटी आणि रक्तचंदनाचा कोमट लेप लावायचे.माहित नाही कशामुळे ते)
एका डॉक्टरांनी सर्जरी सांगितल्यावर दुसर्याचे मत घेतले.त्यांनीही सर्जरीच सांगितली.माझे मिस्टर त्यासाठी मानसिकरित्या तयार नव्हते.शेवटी आमच्या एका डॉक्टर नातलगांना,पहिल्या डॉ़क्टरांशी बोलायला सांगितले.दोघांचे काय ते बोलणे झाले. त्यानंतर ऑर्थोंनी ऑपरेशन नाही केले तरी चालेल असे म्हटले.आमच्या नातलगांनी त्यावेळी काय ते कारण आम्हांला नंतर सांगितले.आता तर ते आठवतही नाही.
काही काल फिजियोथेरपी घेऊन सर्व काही ठीक झाले.
हप्,तुम्ही द्विधा होऊ नये म्हणून हे लिहिणे टाळत होते.फ्रॅक्चरच्या प्रकारावर पण अवलंबून असावे.दुसर्या डॉक्टरांचा सल्ला जरुर घ्या.बेस्ट लक.
दुसऱ्या डॉक्टरांनी पण ऑपरेशन
दुसऱ्या डॉक्टरांनी पण ऑपरेशन आवश्यक असल्याचे सांगितले. त्यामुळे ऑपरेशन करण्याचा निर्णय घेतला आहे. सर्वांचे धन्यवाद माहिती दिल्याबद्दल.
दुसऱ्या डॉक्टरांनी पण ऑपरेशन
दुसऱ्या डॉक्टरांनी पण ऑपरेशन आवश्यक असल्याचे सांगितले. त्यामुळे ऑपरेशन करण्याचा निर्णय घेतला आहे. सर्वांचे धन्यवाद माहिती दिल्याबद्दल.