कॉमेडी चित्रपट सुचवा फॅमिली मूवी नाइट साठी (लहान मुलांसोबत पाहता येतील असे)

Submitted by दिव्या१७ on 18 December, 2021 - 04:43

३१ डिसेंबर फॅमिली मूवी नाइट आणी खूप सारे स्नॅक्स ने सेलेब्रेट करायचा आहे, मुलं आहेत म्हणून मुलां सोबत पाहता येतील असे हिंदी, इंग्लिश, मराठी कॉमेडी चित्रपट सुचवा प्लीज.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

गोलमाल अमोल पालेकरचा
चलती का नाम गाडी
पडोसन
एक डाव भुताचा
अशी ही बनवाबनवी
गोंधळात गोंधळ
ऑंखें गोविंदाचा
अंदाज अपना अपना
अमीर खान अजय देवगण यांचा एक चित्रपट - नाव आठवत नाही.
हम है राही प्यार के
अंगूर - इथे एकदोन सीन्स मध्ये मुलांसमोर ऑकवर्ड वाटू शकेल. फाफॉ करा.
हंगामा
Baby's day out. यांचं सर्टिफिकेट १२+ आहे

थँक्स म्हाळसा, लोकडाऊन मध्ये हॅरी पॉटर ऑल पार्टस, श्रेक ऑल पार्टस , Ice age ऑल पार्टस, डिस्नी अल्मोस्ट सगळ्या मिकी, प्रिन्सेस, निमो ऑल पार्टस movies पाहून संपवल्यात, Honey, I Shrunk the Kids हि झाली पाहून,

Yes Day नाही बघितली अजून ती टाकते लिस्ट मध्ये.

Disney, Marvel, ह्या movies झाल्या पाहून आता मराठी आणी हिंदी movies पाहण्या वर भर आहे,

फाईन्डीन्ग निमो, फाईन्डिन्ग डोरी.. हे मी अजुनही बघते.
मटिल्डा - हा ही एक आवडता.

<<अमीर खान अजय देवगण यांचा एक चित्रपट - नाव आठवत नाही.<< इश्क... काजोल अन जुही आहेत यात.

थँक्स भरत.
यांचं सर्टिफिकेट १२+ आहे >>> ७+ हवंय चिल्लीपिल्ली आहेत ७,९, ११ (सगळी cousin गॅंग)
अमीर खान अजय देवगण यांचा एक चित्रपट - नाव आठवत नाही. - इश्क का?

दर वर्षी ख्रिसमसपासून होम अलोन सिरीज दाखवतात टीव्हीवर >>> झाली पाहून ऑलरेडी
बच्चा कंपनी ला नवीन हवे असते नेहमी नाही तर आता काय होईल पुढे हे सांगत bore करतात आणी भान्डत बसतात आपसात

हेराफेरी (पहिला)
चुपके चुपके (हिंदी भाषेची गंमत कळण्याइतकी मोठी मुलं असली पाहिजेत मात्र)
इश्कचा पहिला हाफ मस्त आहे. दुसरा हाफ गंडलेला आहे.
मराठीत सचिनचे आमच्यासारखे आम्हीच, आयत्या घरात घरोबा, गंमतजंमत, नवरी मिळे नवऱ्याला असे छान आहेत बरेच.

बच्चा कंपनी ला नवीन हवे असते नेहमी नाही तर आता काय होईल पुढे हे सांगत bore करतात आणी भान्डत बसतात आपसात>> त्यात जर Disney, Marvel, ह्या movies पाहून झाल्या असतील तर जुने मराठी, हिंदी movies जे आपल्याला कॅामेडी वाटतात, ते बघायला मुले बोअर होऊ शकतात

Dunston Checks In- एक बंदर होटेल के अंदर
Mousehunt
स्टुअर्ट लिटल

Vivo पण मस्त आहे
कोणाला The Miraculous Coat (करामती कोट) आठवतोय का? मला फार आवडलेला लहानपणी

शाहरुखचा बादशाह
चष्म - ए- बद्दूर
जुडवा
दादा कोंडके चे सुरुवातीचे चित्रपट आंधळा मारतो डोळा
, पांडू हवालदार, एकटा जीव सदाशिव

अँग्री बर्ड 1 खूप छान आहे.मोठ्याना पण बघायला मजा येते.आम्ही हिंदी प्रेमी असल्याने हिंदी डबिंग बघतो.पण मुलांना इंग्लिश नीट कळत असेल तर मूळ भाषेत बघण्यात मजा आहे.
मराठीत अशी ही बनवाबनवी, हरिश्चंद्राची फॅक्टरी,पिकासो(प्रसाद ओक चा)
हिंदीत अंगुर, गोलमाल, छोटी सी बात,टोटल धमाल(मारामारी आहे मात्र),फारूक शेख चा चष्मेबद्दूर(थोडे फोटो आहेत तो भाग पळवता येईल)

Despicable me 1/2/3
Minions
Grinch ( old and new)
Christmas Chronicles 1/2

जुमांजी कदाचित चालेल.
मराठीत बोक्या सातबंडे, नवीन फास्टर फेणे, चिंटू (मी पाहिलेला नाही)
हिंदीत बजरंगी भाईजान, हम है राही प्यार के, गोविंदाचे दुल्हे राजा, दिवाना मस्ताना, जुन्यात परीचय, बावर्ची, अमर अकबर अँथनी

जुमानजी (जुना), nanny McAfee( 1,2) , coraline, trolls ( cartoon) movie, smurfs (1,2,3) charlie and chocolate factory, matilda, spiderwicks chronicles , bridge to teribethia, babe ( animals) , boss baby , chronicles of Narnia (1) , parent trap

Babe नक्की बघा आवडेल मुलांना
Gods must be crazy चे पहिले दोन भाग बघून आम्ही अक्षरशः जमिनीवर लोळून हसत होतो
Kung fu panda सिरीज पण छान आहे

जुने मराठी, हिंदी movies जे आपल्याला कॅामेडी वाटतात, ते बघायला मुले बोअर होऊ शकतात
+1

जुने मराठी, हिंदी movies जे आपल्याला कॅामेडी वाटतात, ते बघायला मुले बोअर होऊ शकतात
>>> + 1
अंगूर तर नक्कीच दाखवू नका... झोपतील उगाच..

1. Up
2. Coco
3. Inside out
4. Soul
5. Shazahm
6. Big Hero 6
7. National Treasure
8. Tommorrow land
9. Puss in the boots
10. The good dinosaur
11. Cars
12. Beauty and the beast (Animated)

आमच्या कडे काहीही पूर्व पब्लिसिटी न करता बनवाबनवी, अंगुर, छोटी सी बात मुलीला आवडले.आता लक्ष्या ला प्रत्येक टीव्हीवर लागलेल्या मराठी हिंदी पिक्चर मध्ये परश्या म्हणून ओळखणं आणि असराणी ला नागेश म्हणून ओळखणं चालू असतं. आणि सुधीर जोशी अगदी क्वचित दिसले की 'आनंदी आनंद गडे गाणारे आबा' म्हणून.

आपल्याला उत्कृष्ट वाटतात ते पिक्चर 10 मिनिटं दाखवून नक्की बघावे.कधीकधी जीन्स मध्ये येते आवड सुदैवाने Happy
याच न्यायाने दिल चाहता है आवडेल वाटलं होतं तो पहिल्या 15 मिनिटात बोअर झाला तिला म्हणून बंद केला.

हो, आमच्याकडे पण मोठ्याला अंगूर, परिचय, गोलमाल, हेराफेरी, सचिनचे सगळे पिक्चर्स (जे आम्ही दाखवले ते) आवडतात. शिवाय चक दे, स्वदेस, लगान. दिल चाहता है अजून दाखवला नाही.
धाकट्याला फक्त 'झपाटलेला' प्रचंड आवडला Lol

लहान मुलांकरता बनवले जाणारे - ती नावे मुद्दाम वगळली आहेत. बरीचशी वरती ऑलरेडी आली आहेत. हे खालचे जवळजवळ सगळे मोठ्यांकरता बनवलेले पण लहान मुलांनाही आवडणारे असे आहेत.

शिवाय चक दे, स्वदेस, लगान. दिल चाहता है अजून दाखवला नाही. >>> वावे, दिचाहै बद्दल लक्षात नाही पण बाकी आवडतील. स्वानुभव Happy
जिंनामिदो व दिल धडकने दो - हे ही. यातील काही कथानके ही लहान मुलांकरता नसली, तरी यातील कलाकारांचे मॅनरिजम, संवाद, विनोदाची स्टाइल, त्यातील एकूण वातावरण हे लहान मुलांना आपल्यापेक्षा जास्त रिलेट होते. चक दे तर नक्कीच दाखवावा मुलांना. खेळाशी संबंधित - इक्बाल (नासिर आणि श्रेयस तळपदे), चेन कुली की मेन कुली की, सचिन - अ बिलियन ड्रीम्स, एम एस धोनी, आता रिलीज होत असलेला "८३" - हे सगळे एकत्र बघण्यासारखे आहेत. अजूनही आहेत - हॉकी वगैरे वर, पण मला जे लक्षात आहेत ते लिहीले.

चेन्नई एक्सप्रेस, सिंघम, रा-वन ई. चित्रपट सुद्धा आवडतील. कोठेतरी एखाद दुसरा सीन फॉरवर्ड करावा लागेल पण बहुधा तितकेही नाही. अमिताभचे अमर अकबर अँथनी, सत्ते पे सत्ता, शान सारखे "लाइट" पिक्चर्सही आवडतात.

मराठीत भरत यांनी वरती लिहीलेला "एलिझाबेथ एकादशी" नक्कीच. "टिंग्या" सुद्धा.

इंग्रजीत Freedom Writers, Akeelah and the Bee हे दोन्ही रेकमेण्ड करतो.

फारएण्ड, चक दे, स्वदेस, लगान दाखवले आहेत आणि आवडलेत Happy दिल चाहता है अजून दाखवला नाहीये.
(वरच्या प्रतिसादात दिल चाहता है च्या आधी पूर्णविराम आहे)
इक्बाल > येस.
दिल धडकने दो आणि जिंनामिदो मला खूप आवडतात पण बालमनावर उगाच काही तरी परिणाम होतील असं वाटतं म्हणून अजून मुलांना दाखवले नाहीयेत Lol उगाच प्रश्न निर्माण होतील आणि उत्तरं द्यावी लागतील. थ्री इडियट्स मधला थोडा पार्ट (आत्महत्येचा) फॉरवर्ड करून बाकी दाखवलाय.

याच विषयावर सिम्बानी धागा काढला होता मागे . तिथेपण बऱ्याच सिनेमांची नावं आली आहेत.
https://www.maayboli.com/node/65565

सांड की आंख
स्पेशल २६
बद्रीनाथ की दुल्हनिया
(मुले केवढी आहेत त्यावरून सुचवता येईल. हे ३ कुठल्याही वयोगटाला चालतील. )

धमाल
गोलमाल (नवीन)
धनक
जुना खूबसूरत
बेड टाईम स्टोरीज
जुमान्जी (दोन्ही)
झतुरा
नाईट at द म्युझियम (१ , २ ,३)
जंगल क्रुझ (pG 13)
प्रिन्सेस डायरीज
एला एन्चँटेड
स्पाय किड्स (१, २, ३)
मि. पॉपर्स पेन्ग्विन
वी बॉट अ झू
परस्युएट ऑफ happiness
हॉलिडे इन द वाईल्ड
कोको
अप
सोल
डायरी ऑफ अ विम्पी किड
रेक इट राल्फ
एन्चँटेड
राया द लास्ट dragon
मलेफिसन्ट
क्रुएला
मुलान
(रेटिंग्ज लक्षात नाहीत पण ही काही आवडलेल्या सिनेमांची यादी)

My neighbor Totoro
Spirited Away
हे कॉमेडी नाहीत, पण मुलामोठ्यांना हमखास आवडण्यासारखे आहेत.

My fair lady आणि Sound of Music हे ऑल टाइम फेव्हरिट्स.

माझ्या मुलीला हिंदीमध्ये ‘हम हैं राही प्यार के’ आवडला होता त्या वयात.

(वरच्या प्रतिसादात दिल चाहता है च्या आधी पूर्णविराम आहे) >>> ओह Happy आधी निसटला होता तो Happy

माझ्या मुलीला हिंदीमध्ये ‘हम हैं राही प्यार के’ आवडला होता त्या वयात. >> हो तो ही आवडतो मुलांना. मि. इंडिया सुद्धा.

मि. पॉपर्स पेन्ग्विन्स आणि इव्हान ऑलमायटी - हे दोन्ही अंडररेटेड धमाल पिक्चर्स आहेत असे माझे मत आहे Happy

फा +१
Evan Almighty+१ खरंच आम्ही दोनदा बघितला.
मॉर्गन फ्रिमन मला देवच वाटायला लागलाय _/\_ ( त्यात त्याने ती डॉक्यूही केली) आधी व्हुपी गोल्डबर्ग वाटायची. Lol

जग्गा जासूसही धमाल आहे.

असे धागे वरचेवर माबोवर निघतात. दरवेळी मस्त मस्त चित्रपटांची लिस्ट तयार होते. पण आपल्या पोरांना काय आवडेल याचा नेम नसतो हे ही तितकेच खरेय Happy
जुमांजी, मिस्टर ईण्डिया, हनी आय श्रंक द किडस, होम अलोन वगैरे कित्येक पिक्चर आमच्याकडे बोअर झालेत..
पण लक्ष्याचा झपाटलेला मात्र आवडला आहे. हम आपके है कौन, हम साथ साथ है सुद्धा आवडले आहेत. दंगल आवडला आहे.

कधीकधी जीन्स मध्ये येते आवड सुदैवाने Happy >>> याला +७८६ मुलगी टीव्ही चालू करते आणि शाहरूख खान मूवीज बोलून सर्च करते. त्यामुळे कित्येक शाहरूखपट पुन्हा पुन्हा बघून झालेत. Happy

चिल्लर पार्टी मात्र धमाल पिक्चर आहे. कोणाही लहान मुलाला आवडेल आणि आपल्यालाही आवडतोच.

पण ओवरऑल कॉमेडीपेक्षा लव्हस्टोरी आणि इमोशनल फॅमिली ड्रामा हिट आहे आमच्याकडे.
ईंग्लिश पिक्चर देखील बरेच बघणे होतात. पण त्यातले मला काही कळत नाही. म्हणजे ते सारे सुपरहिरोंचे असतात. मला बोअर होते. मुलांना आवडतात.

अरे हो. आपला बॉलीवूडचा सुपरहिरो क्रिश किंवा रोहीत मेहरा. सगळे पार्ट हिट झालेले आमच्याकडे.
रामायण महाभारत वगैरे मालिका टोटल फ्लॉप.

मुलांना हल्ली लहान मुलांचेच युट्यूब चॅनेल बघायलाही आवडतात. पण ते आपल्याला बोअर होऊ शकते. आयु पिहू शो, अनंत्या वगैरे हिट आहेत आमच्याकडे.

बाहूबली, हनी आय श्रंक द किड्स, होम अलोन ई. ‘नेहेमीच्या यशस्वी’ बरोबर मी थोडं धाडस करून मुलांना जुना ‘Murder on the Orient Express’ आणि रिमोट हातात ठेवून Titanic पण दाखवला होता आणि स्टोरी आणि भव्यतेमुळे ते मुलांना आवडले होते.

I just skimmed through these comments, बऱ्याच classic / christmas movies ऑलरेडी सुचविल्या आहेतच. पण हे माझे $0.02, सर्वच कॉमेडी नाहीत. पण you can use for your next family movie night. Happy

  • The Blind Side
  • The Lord of the Rings trilogy
  • Rise of Planet Of The Apes Trilogy
  • Night at the Museum
  • Grown Ups
  • The Martian
  • Journey to the Center of the Earth
  • Luca
  • Jungle Cruise

अजून आठवेल तसे add करेन.

जुने 90ज चे पिक्चर, इश्क, हम है राही प्यार के,मोहब्बतें वगैरे पण आवडले मुलीला."आई ती बघ ती पांढऱ्या साडीतली बाई नुसती मागे वाकली आणि मेली.खाली पडलेली पण दाखवली नाही."
अक्षय कुमारचे चित्रपट भुलभुलैया, वेलकम(1),एंटरटेनमेन्ट,ते धमाल सिरीज मधले चित्रपट(विनय आपटे मोठं नाव सांगतात तो) हेही लोकप्रिय. मला व्यक्तीशः एंटरटेनमेन्ट अजिबात आवडत नाही.तो भुभु सोडून प्रत्येकाने अमाप ओव्हर ऍक्टिनन केलीय.
वेलकम 2 लहान मुलांना आवडतो पण त्यात अतिशय घाणेरडे डबल मिनींग डायलॉग आहेत.तो लहान मुलांना दाखवावा असं मला वाटत नाही.
तुम्हारी सुलू पण आवडला.

101 Dalmatians - मला आतिशय आवडलेला. अजुन एक डॉगीवर सिनेमा आहे. नाव आठवत नाही.

अरे हो
जॉनी इंग्लिश रिबोर्न
धमाल आहे.हा मुलांना दाखवायला हरकत नाही
शेवट पर्यंत फुल कल्ला आहे.(शेवटाला 10 मिनिटं असताना मोठा किसिंग सीन आहे, तो पळवता येईल.)

दरवाजा , खूनी चुडैल हे सुद्धा विनोदी आहेत. माझा मुलगा खूप हसतो. पण हे नको असतील तर ( Timepass)
Dirty Rotten Scoundrels (1988)
Witches
Alladin
Hotel Transylvania 2
Mask
The Big
पुष्पक (कमल हसनचा)
अप्पू राजा
अक्षय कुमारचा एक कुत्र्याचा सिनेमा आला होता. नाव लक्षात नाही.

वरच्या हॉलिवूडपटांच्या यादीत आला नसेल तर बेब १९९५ add करा. लहान थोर सगळे आवडीने पाहतील. कॉमेडी अट शिथिल करता आली तर मियाझाकीचे जवळपास सगळे ॲनिमेशन सर्वोत्तम पर्याय आहे. इतरही छान छान ॲनिमेशन मूव्ही आहेत. त्यातील थोडी नावे वर आलेली आहेत. हॉलिवूड, ॲनिम् यांची सवय असणारी मुलं वरच्या यादीतील किती बॉलिवूडपट पाहतील याची शंका आहे. धागाकर्ती घाईत दोन ओळी खरडून निघून गेल्या आहेत. मुलांचे वयोगट, आवडी, त्यांनी आधी पाहिलेल्या चित्रपटांची माहिती, सध्या जवळ/अव्हेलेबल असणारे प्लॅटफॉर्म याविषयी अधिक भाष्य केले असते तर कदाचित अजून योग्य सल्ले मिळाले असते.

कालच्या प्रतिसादात वयं दिली आहेत - चिल्लीपिल्ली आहेत ७,९, ११ (सगळी cousin गॅंग)
काल सुचवलेल्यांतले कोणते चित्रपट पाहिले तेही लिहिलंय.
त्यांना आता मराठी हिंदी चित्रपट दाखवायचे असतील.

आजचे प्रतिसाद अजून वाचले नसतील.

Pages