कॉमेडी चित्रपट सुचवा फॅमिली मूवी नाइट साठी (लहान मुलांसोबत पाहता येतील असे)

Submitted by दिव्या१७ on 18 December, 2021 - 04:43

३१ डिसेंबर फॅमिली मूवी नाइट आणी खूप सारे स्नॅक्स ने सेलेब्रेट करायचा आहे, मुलं आहेत म्हणून मुलां सोबत पाहता येतील असे हिंदी, इंग्लिश, मराठी कॉमेडी चित्रपट सुचवा प्लीज.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

बेबीज डे आऊट पण भारी आहे. लहान थोर सर्वांसाठी. वर नाव आलं असेल, मला दिसलं नाही चाळताना म्हणून लिहिलं.

अशोककुमारचा जुना खट्टा-मिठा, अमोल पालेकरचे सगळे, मराठीत सायकल(भाऊ कदमचा), एलिझाबेथ एकादशी,नाळ.
अमृता सुभाष व तिचा लहान मुलगा कोकणात रहायला येतात तो सिनेमा. नाव विसरले.

>> गोंधळात गोंधळ
ऑंखें गोविंदाचा>> i dont think these movies are for kids. For that matter, even ishq is not for kids

मी अमि,
मुद्दा अगदी पूर्ण बरोबर आहे. पण फार जास्त इंग्लिश बोलाय ऐकायची अजून सवय नसलेल्या मुलांना चांगले उत्कृष्ट इंग्लिश अ‍ॅनिमे पण लगेच आवडत नाहीत.

अश्या वेळी थोडे विनोदी बॉलीवूड पिक्चर किंवा बनवा बनवी सारखे मराठी पिक्चर बरे पडतात.तसंही फॅमिली टाईम किंवा थिएटर मध्ये सर्वांबरोबर नेता येईळ असे पिक्चर निवडायचे तर थोडे किस सीन किंवा डबल मिनींग विनोद मीठासारखे घेऊन सोडून द्यायला लागतात.

शिवाय पॅरेंटल गाईडन्स रेटिंग आहेच. म्हणजे पालकांबरोबर हे सिनेमे १०+१२+ ची मुलं बघू शकतात. त्यातल्या विसंगती, अचाटपणा हे आपण वेळोवेळी दाखवून देत असतोच.

मला स्वतःला बार्बी किंवा फ्रोझन चे पिक्चर्स लहान मुलांसाठी असले तरी विशेष आवडत नाहीत. बॉस बेबी गोड पिक्चर आहे. लहान मुलांसाठी आहे. आणि तरीही त्यातले बरेच बॉस किंवा अप्रेजल विनोद हे फक्त मोठ्यांनाच कळतील असे आहेत.

एण्टरटेणमेण्ट >>> थँक्स मी अनु.
मुलांचं वय, त्यांची आवड माहिती नाही.
माझ्या मुलांना जुना गोलमाल तीनदा दाखवण्याचा प्रयत्न केला. तिसर्‍या वेळी मुलीने पाहिला. मुलाला कंटाळा आला. त्यांना असे विनोद समजून घेता येत नाहीत. तयारी पण नाही. चेन्नई एक्स्प्रेस मात्र आवडला होता. एन्टरटेन्मेंट आवडला होता. निमो आवडलेला. पण दामाद आवडणार नाही हे आता समजून चुकलो आहे. चुपके चुपके तिसर्‍या वेळेस मुलीने पाहिला. आनंद आणि बावर्ची मात्र दोघांनाही आवडले.
साहेब मधला देवेन वर्माचा रोल आवडला. अंगूर आता काही वर्षांनी दाखवीन.
स्लॅपस्टीक कॉमेडी हा जॉनर असलेले सिनेमे मुलांना आवडतातच. लहान असतील तर चार्ली चॅप्लीन, लॉरेल हार्डी, टेरेन्स हिल बड स्पेन्सर हे आवडतातच. जॅकी चॅनचे जुने धमाल चित्रपट मुलांना आवडतात.
इथे विचारून ३१ डिसेंबरला सिनेमा खरंच निवडता येणार आहे का ? कुतूहल आहे.
कळवा कोणता निवडला ते.

आम्ही टोटल धमाल सगळे खूप वेळा बघतो आणि उलट सुलट हसतो.फक्त शेवटी जरा vfx किंवा जे काही प्राणी ग्राफिक आहे ते अति झालेय.पण बाकी पिक्चर पैसे वसूल आहे.
बाकी 3 स्टुजेस जुने ब्लॅक व्हाईट तेही आवडतं.पण त्यात खूप मारधाड असते.

Pages