शुभ दीपावली.
ही दीपावली व नवे वर्श आप णा सर्वांस सुखा समाधानाचे व आनंदाचे आरोग्याचे जावो.
कोणते दिवाळी अंक घेतलेत बाजारात आलेत.? ऑनलाइन अंक पाहिलेत का?
ह्या चर्चे साठी धागा.
मी येत्या काही दिवसात मॅजेस्टिक ठाणे ला जाणार आहे तर काही अंक मिळाले तर इथे लिहिते च.
चकली दही व दिवाळी अंक. सूख म्हणजे दुसरे काय असते.
काल स्टेशन पर्यंत गर्दीत चालत जाउन खालील अंक आणले. आता एक एक परीक्षण लिहीन सावकाश. एखादी माहीती हवी असल्यास प्रतिसादात विचारा.
उत्तम कथा रु. २५०.००
नवल रु. ४००.००
ग्रहांकित रु. ३००.००
मौज रु. ३००.००
माहेर रु. २५०.००
मेनका रु. २५०.००
मटा रु. १५०.००
आवाज रु. ३६०.००
साप्ताहिक सकाळ रु. १२०.००
व एबीपी माझा त्या विक्रेत्याने फुकट दिला रु. १५०.००
शतायुषी बंद झाला. धनुर्धारी दिसला नाही. चंद्रकांत किशोर मानि नी व्गैरे अंक पण आले आहेत.
किल्ली ह्यांनी दिलेली लिंक
https://drive.google.com/file/d/1_Rj2X1r9TjqCkoaaVDIt_ZgusWOwhBAF/view?u...
ह्यात माबो करांचे लिखाण आहे.
वाचकांना शुभेच्छा.
विकु, मौज ऑनलाईन आहे का
विकु, मौज ऑनलाईन आहे का भारतातुन मागवला?
भारतातून मागवला , फराळा बरोबर
भारतातून मागवला , फराळा बरोबर.
मला बुकगंगावर ई-बुक स्वरूपात
मला बुकगंगावर ई-बुक स्वरूपात मिळाला
अरे वा ! ऑन लाईन ही आहे का ?
अरे वा ! ऑन लाईन ही आहे का ? पण तरीही फराळाबरोबर आलेल्या अंकाला लाडू /चकली /चिवडा असा वास येत असतो व तेलाचे डाग पडलेले असतात त्यामुळे मस्त वाटते. त्र्यं वि सरदेशमुख यांच्या वरचा लेखही मस्त. तमाशा कलावंताचे कोरोना नंतरचे हाल वाचताना वाईट वाटते.
पण तरीही फराळाबरोबर आलेल्या
पण तरीही फराळाबरोबर आलेल्या अंकाला लाडू /चकली /चिवडा असा वास येत असतो व तेलाचे डाग पडलेले असतात त्यामुळे मस्त वाटते>>>>>>>> हो ना ती मजा वेगळीच. पण काहीच्या काही शिपींग घेतात म्हणून ऑनलाईन.
लोकप्रभा दिवाळी अंक आणला होता
लोकप्रभा दिवाळी अंक आणला होता. पण त्या आठवड्यात वाचायला सवडच मिळाली नाही.
दुर्बुद्धी झाली आणि त्यातली एक कथा वाचली. लिव्ह -इन. मध्यवर्ती कल्पना, मुख्य पात्र हे सगळेच कायच्या काय. पण कथालेखनातही शिकावूपणा भरून राहिलाय. क्ष ही व्यक्ती ज्ञला भेटायला गेली. त्यांच्या भेटीचं सविस्तर वर्णन कथेत आहे. आता या भेटी बद्दल क्ष ने ह आणि ळ ला सांगताना ते सगळं वर्णन परत आलंय.
अंक ऑनलाइन उपलब्ध असेल आणि या धाग्यावर वाखाणलं गेलेलं लोकप्रभातलं लेखन तिथे वाचता येईल असं वाटलं होतं. पण अजूनत री ऑनलाइन नाहीए. त्यानंतरचे अंक आहेत.
किस्त्रीम
श्यामसुंदर मुळे हे किस्त्रीमचे इनहाउस इतिहास संशोधक आहेत का? गेली काही वर्षे त्यांचे लेख किस्त्रीममध्ये दिसतात. या अंकात "श्रीकृष्ण हे एक ऐतिहासिक पुरुष होता," हे दाखवायचा प्रयत्न केला आहे. त्यातलं एक लॉजिक - महाभारत किंवा कृष्णाशी संबंधित गावं प्रत्यक्षात आहेत.
चिनी साम्यवादाची शताब्दी - लोकसत्तेतील लेखांच्या अगदी उलट.
राजद्रोह काल आणि आज या लेखात राजद्रोहाचे नियम, कायदे यांचं समर्थन केलं आहे.
कृष्णाजी भास्कर ऐतिहासिक वास्तव या लेखात कृष्णाजीने महाराजांना हवी तशी अफझलखानाशी हवी तशी भेट घडवून आणली आणि नंतर तो महाराजांच्याच पदरी सरदार म्हणून होता असा शोध लावला आहे.
हिटलर वास्तव आणि विपर्यास - पराग वैद्य.
लेखाची सुरुवात - जितांचा इतिहास नेहमी जेते लिहितात, म्हणून.............. एखाद्या नराधमास महापुरुष आणि महापुरुषास माथेफिरू ठरवले जाते........," असं वाक्य असलेला परिच्छेद.
लेखकाने इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या ८००० "उत्कृष्ट आणि दुर्मिळ" पुस्तकांतून १८०० पुस्तके निवडून , अभ्यासून "अॅडोल्फ हिटलर आणि दुसरे महायुद्ध : सत्य आणि वास्तव " हे ७६८ पानांचे एक पुस्तक लिहिले . हा लेख म्हणजे त्या पुस्तकाचा सारांश. हिटलर विस्तारवादी नव्हता. ज्यू लोकांनी आणि ख्रिश्चन देशांनी कट करून जर्मनीवर हे युद्ध लादले. लेखात हिटलरचा उल्लेख आदरार्थी बहुवचनी आणि इतर देशांच्या प्रमुखांचे उल्लेख एकेरी आहेत. लेखात मांडलेले मुद्दे मात्र प्रथमदर्शनी खरे वाटावेत असे आहेत. रवि आमलेंच्या लोकसत्तेतीएल प्रचारतंत्रावरच्या लेखमालेत ब्रिटन आणि अमेरिकेत महायुद्धाच्या बाजूने जनमत वळवण्यासाठी वापरलेल्या कॢप्त्यांपैकी काहींचा उल्लेख या लेखात आहे.
लेखकाचे दुसरे पुस्तक ६०लाख ज्यूंच्या हत्याकांडाबद्दल असणार आहे.
आय आय टीचे प्रयोजन संपले! - विश्वास पिटके. शि व भा प करा -" आज परंय्त नोबेल पारितोषिक मिळालेला एकही भारतीय ना आय आय टी ना एखाद्या आय आय एमचा स्नातक." लेखातला प्रवेश परीक्षा - त्यासाठीचे महागडे कोचिंग क्लासेस यामुळे बुद्धिकौशल्यापेक्षा परीक्षा तंत्रावर अधिक भर दिला जातो हे एक मत पटण्यासारखे आहे.
राजकीय विसंगतीचे 'रेषीव भाष्य' - राहुल गोखले हा लेख या अंकात चुकून आला असावा.
अंकातील हास्यचित्रे , कथांदरम्यान छापलेली चित्रे अगदीच अॅमॅच्युअर आहेत. काही चित्रे प्रसिद्ध व्यक्तींशी साधर्म्य दाखवतात - जयवंत दळवी, कपिल सिबल, स्वप्नील बांदोडकर, अजित कडकडे, अवधूत गुप्ते. आता ही चित्रे कथांचा भाग आहेत की नुसतीच चित्र म्हणून छापलीत , कळत नाही.
अनुक्रमणिके शेजारी संपादक व संचालकांचे आडनाव लावणार्या चाणक्य लेले नावाच्या मुलाचा फोटो छापला आहे.
अंजलीच्या स्वयंपाकोपयोगी उपकरणांची जाहिरात दिसली. कित्येक वर्षांत दुकानात जाऊन यातलं काही घेतलेलं नाही. पण अंजलीची उत्पादने फ्लिप्कार्ट, अमेझॉनवर दिसली नाहीत. ब्रँडनेम देऊन शोधायला हवं.
अक्षर च्या अंकात शीतल
अक्षर च्या अंकात शीतल आमटेंच्या नवऱ्याचा लेख आहे गौतम करजगी. आनंदवनातील बऱ्याच आतल्या गोष्टींवर भाष्य केले आहे. हा कौस्तुभ आमटे कोण आहे? त्याच्यावर अप्रत्यक्ष रोख आहे लेखात. ह्या संस्थेबद्दल अजिबात अस काही असेल वाटलं नव्हतं. एकदम आदर कमी झाला लेख वाचून.
कौस्तुभ शीतलचा भाऊ
कौस्तुभ शीतलचा भाऊ
ओह. इथे माबोवर त्याचा कधी तरी
ओह. इथे माबोवर त्याचा कधी तरी उल्लेख झालेला आठवत आहे. मोठ्यांचे मोठे उद्योग.
Pages