शुभ दीपावली.
ही दीपावली व नवे वर्श आप णा सर्वांस सुखा समाधानाचे व आनंदाचे आरोग्याचे जावो.
कोणते दिवाळी अंक घेतलेत बाजारात आलेत.? ऑनलाइन अंक पाहिलेत का?
ह्या चर्चे साठी धागा.
मी येत्या काही दिवसात मॅजेस्टिक ठाणे ला जाणार आहे तर काही अंक मिळाले तर इथे लिहिते च.
चकली दही व दिवाळी अंक. सूख म्हणजे दुसरे काय असते.
काल स्टेशन पर्यंत गर्दीत चालत जाउन खालील अंक आणले. आता एक एक परीक्षण लिहीन सावकाश. एखादी माहीती हवी असल्यास प्रतिसादात विचारा.
उत्तम कथा रु. २५०.००
नवल रु. ४००.००
ग्रहांकित रु. ३००.००
मौज रु. ३००.००
माहेर रु. २५०.००
मेनका रु. २५०.००
मटा रु. १५०.००
आवाज रु. ३६०.००
साप्ताहिक सकाळ रु. १२०.००
व एबीपी माझा त्या विक्रेत्याने फुकट दिला रु. १५०.००
शतायुषी बंद झाला. धनुर्धारी दिसला नाही. चंद्रकांत किशोर मानि नी व्गैरे अंक पण आले आहेत.
किल्ली ह्यांनी दिलेली लिंक
https://drive.google.com/file/d/1_Rj2X1r9TjqCkoaaVDIt_ZgusWOwhBAF/view?u...
ह्यात माबो करांचे लिखाण आहे.
वाचकांना शुभेच्छा.
ऋतुरंग,नवल आणि मोहिनी
ऋतुरंग,नवल आणि मोहिनी पेपरवल्याला सांगितले होते.त्यापैकी मोहिनी यायचा आहे. ऋतुरंग वाचतेय.चांगला आहे."आजोळचे दिवस" विशेषांक आहे.
पद्मगंधा सांगायला विसरले.आता लायब्ररीत मिळेल तर बरे आहे.
ऑनलाईन अंक, किल्लीताईचा आहे स्पंदन म्हणून.
Link द्या online अंकाची.
Link द्या online अंकाची.
किल्ली,कुठे आहेस ग?
किल्ली,कुठे आहेस ग?
लिंक वाहून गेली वाहत्या धाग्यावर.मी तो अंक dalo kela मोबल्यावर.
किल्ली तुमच्या अंकाची लिंक
किल्ली तुमच्या अंकाची लिंक द्या. मी हेडर मध्ये अपडेट करेन.
किल्ली तुमच्या अंकाची लिंक
किल्ली तुमच्या अंकाची लिंक द्या. मी हेडर मध्ये अपडेट करेन.
मुशाफिरीचा अंक यंदाही आला
मुशाफिरीचा अंक यंदाही आला नाही आणि आता बहुतेक बंदच होणार आहे.
लोकसत्तेचा अंक चांगला वाटतोय. मी यंदा अक्षर घेणार नाहीये. गेले दोन तीन वर्ष फार तोचतोचपणा वाटला. पद्मगंधाचा अंकही यंदा चांगला वाटतोय. मागवेन बहुतेक.
किशोर, चंद्रकांत, हे अंक
किशोर, चंद्रकांत, हे अंक बुकगंगावर आहेत.
हल्ली बुकगंगावरून मागवल्यावर
हल्ली बुकगंगावरून मागवल्यावर आपल्याला पेमेंट वेगळे ( आपल्या बँक खात्यावर पेयी रेजिस्टर करून) फंड ट्रन्स्फर करून मग त्यांना कळवावे लागते आणि मग ते ऑर्डर प्रोसेस करतात असे समजते. कोणी ऑर्डर केले आहे का?
(हे करावे लागलाही हरकत नाही, किंमती अॅमेझॉनपेक्षा बर्याच कमी आहेत.)
स्पंदन दिवाळी २०२१
स्पंदन दिवाळी २०२१
शब्दांश प्रकाशन
इ अंक.
https://drive.google.com/file/d/1_Rj2X1r9TjqCkoaaVDIt_ZgusWOwhBAF/view?u...
ह्या अंकात माबोकार जाई,
ह्या अंकात माबोकर जाई, अस्मिता, सिद्धी चव्हाण, यतीन, अक्षय., नादिशा आणि सीमंतीनी ह्यांचे लिखाण प्रसिद्ध झाले आहे
आज मुं म ग्रं सं चे दिवाळी
आज मुं म ग्रं सं चे दिवाळी अंक इश्यू झाले. मी नेहमी दिवाळीनंतर सावकाश घेत असे. आज पहिल्यांदाच पहिल्या दिवशी अंक घेतला.
लोकसत्ता घेथलाय. बहुतेक उजव्या पानांवर जाहिराती आहेत, तेव्हा लवकर वाचून होईल.
आज लायब्ररीतून मौज मिळाला
आज लायब्ररीतून मौज मिळाला.चांगली अनुक्रमणिका आहे.
हो बुकगंगावर आधीसारखं पेमेंट
हो बुकगंगावर आधीसारखं पेमेंट अपसेट होत नाही लगेच, एक फोर्म भरावा लागतो. मी धनंजय घेतलाय, पण मजा नाही या वेळी असं वाटतेय. तोचतोचपणा पणा आहे. (गेली १५ वर्ष धनंजय नियमित वाचतेय म्हणून पण जाणवत असेल तोचतोचपणा, रोज उठून नवीन भयकथा कुठून आणणार ना?)
नवल : आनंद अंतरकरांना
नवल : आनंद अंतरकरांना श्रद्धांजली आहे. ही मुळा तूनच वाचा. रत्नाकर मतकरींची एक भयकथा आहे. ती पण अग्दी रायटिन्ग बाय नंबर्स सरखी अग्दी प्रेडि क्टेबल आहे.
ग्रहांकितः ह्यात आतिशय रंजक अशी नेपोलिअन प्रश्नावलि आहे. नाडी चक्रानुसार होणारे रोग, राशी भवि श्य, काल सर्प योग म्हणजे नक्की काय व्गैरे माहिती आहे.
माहेरच्या कव्हर वर ऐश्वर्या नारकर चा मस्त फोटॉ आहे हेविली फोटो शॉप्ड बट लुकिन्ग नाइस. एक मॉडर्न संसारात नवर्याबरोबर इन्टिम सी शोधणा र्या बाईची कथा आहे. टिपिकल दोन मुलांचा संसार रोजची गडबड वगिअरे. जाहिराती बाय डिफॉ ल्ट जास्त मनोरंजक आहेत व माहितीपूर्ण पण.
साड्या दागिने फराळ व एक वाजवी दर वृद्धाश्रम पण जाहिरात आहे.
मेनका कव्हर वर कोनतरी बाई आहे. स्लीवलेस वाली. तिचे क्ली वेज फोटो शॉप्ड आहे व अनैसर्गिक गोरा रंग हा पण फोटो शॉप्ड आहे. संबंधितांनी लक्षात घ्यावे. उगीच फार फँट्साइज करू नये.
सकाळ च्या कव्हर वर ओव्हर इगर तापसी पन्नु कुरळॅ केस पसरून आहे जरा अनहिंज्ड दिसते. आत तिची मुलाखत पण आहे भली मोठी व खूप फोटो वेग वेगळे ड्रेसेस मधले. पोझेस मधले.
एकांचे नेपा ळ चे प्रवास वर्णन आहे ते छान आहे. ते म्हण तात नेपाळला फक्त तीन कारणा साठी जावे, ऑफिसचे काम / पर्यटन / नाहीतर ट्रेक?!
नाहीतर इतर ठिकाणी पण क्शाला जातील लोक? मावशी राहते कि काय काठमांडूत की एवरेस्ट बेस कँपला चुलता भजी विकतो?१ कुच्च भी.
अमा
अमा
अमा
अमा
थोडा अवांतर प्रश्न आहे पण
थोडा अवांतर प्रश्न आहे पण मासिक वाचक दिसताहेत म्हणून इथे विचारते. फक्त शब्दकोडी असणारे एखादे मासिक आहे का? घरी ज्ये नां ना आवड आहे. असं काही मासिक असल्याचं त्यांनी कुठेतरी ऐकलं पण नाव आठवत नाही. कोणाला ठाऊक असेल तर कृपया सांगावे.
पूर्वी मी महारा स्ष्ट्र
पूर्वी मी महारा स्ष्ट्र टाइम्स मधले शब्द कोडे नियमित सोडवले आहे. त्या अंकात असावे . उघ डून बघते.
आज मौज चा अंक वाचायला घेतला आहे. ओव्हर ऑल अंक मस्त व जबरदस्त हाय क्वालिटी कंटेंट आहे. जरूर घ्या व वाचा.
कव्हर वर एशर टाइप एक चित्र आहे. पण हे साल्वातोर दाली ह्यांचे आहे.
आशा बगे आदिनाद कथा: शैलीत्मक आहे. पण टिपि कल व हळवी बोअर अशी आहे. वाचयला छान वाट्टॅ पण एका मुलीची लहान पणा पासूनची कथा आहे ती मोठी होउन प्रेमात पडून वगैरे अशी कथा आहे. लेखन छान. इफ यु लाइक आशा बगे टाइप स्टफ प्लीज रीड.
लेख मस्त आहेत. काश्मिर वर आक्रमण हा नरेंद्र चपळ गावकर ह्यांचा, लेख अजून वाचयचा आहे. त्यांचे नेहरुंवर पुस्तक येत आहे त्यातील भाग आहे.
शिप ऑफ थिसस ह्या सिनेमा वर लेख आहे. हा ही चांगला वैचारिक स्वरुपाचा आहे.
लोक व्याभिचार का करतात हा सुबोध जाव डे करांचा लेख वाचायचा आहे. अरुणा ढेरे ह्यांचा संत मीरा वर लेख आहे ह्यात मीरेच्या जीवना मधील काही धक्कादायक प्रसंग दिले आहेत. पण एकूण शैली फार इरिटेटिन्ग लाडिक लिहीली आहे मैत्रीणीशी गळ्यात पडून गप्पा कराव्यात तशी आहे.
वॉल्डन - काठ व घर नावाची वसाहत हा राणी दुर्वे ह्यां नी वेग वेगळ्या घरावर लिहिलेला लेख छानच आहे आवड ला. सर्व लेख कथा भरपूर मोठ्या आहेत शब्दसंख्या प्रचंड आहे.
कार्तिकातले गव्हाळ उन्ह हा हात कणंगले कर ह्यांच्यावर विनय हर्डिकर ह्यांनी लिहिलेला लेख सुरेख आहे. नवीन माहिती मिळते
व्ही पी मेनन ह्यांच्यावर अंबरिश मिश्रा ह्यांनी लिहिलेला लेख ही माहिती पूर्ण व नीट लिहिलेला आहे तत्कालीन इतिहासाची पण चांगली माहिती मिळ ते एका वेगळ्या अँगल ने.
कविता से क्षन पण रिच आहे अगदी.
लोक कलाकारांवर विस्कट ली हारा आम्ही फुले हा परिसंवाद आहे. त्यात भारत कदम परशुराम गंगावणे बाळ कृ श्ण गोरे गुलाबराव वैद्य व रघुवीर खेडकर ह्यांचे मनोगत आहे.
व्यास क्रिएशन्स ह्यांचा सांजराई हा गुहागर स्थित जे ना प्रकल्प आहे त्याची जाहिरात लगेचच सुरुवतीलाच आहे. वेब साइट बघून चेक करण्ञाजोगे आहे. शिफ्ट व्हावे का गुहागरला? क्या बोलते दोसत?
मी रसिक वरून अमेरिकेत मागवत
मी रसिक वरून अमेरिकेत मागवत आहे,मौज, साप्ताहीक सकाळ, माहेर नक्की. आणखी नक्की घ्यावेत असे सुचवा, मेनका आवाज जत्रा नको. हे म्हणजे चार आण्याचा चिवडा व बारा आण्याचे काजू असे आहे, अंकाच्या किमतीच्या तिप्पट शिपिंग !
किल्लीताईंचा ऑनलाईन दिवाळी अंक मस्तच !
फक्त शब्दकोडी असणारे एखादे
फक्त शब्दकोडी असणारे एखादे मासिक आहे का? <<<<<<
'मनोरंजन' आणि 'फुल टाईमपास' असे दोन अंक आहेत शब्दकोड्यांना वाहिलेले. माझ्या आजीलाही खूप आवडतात शब्दकोडी सोडवायला, तिच्यासाठी घेतले.
शैलीत्मक आहे. पण टिपि कल व
शैलीत्मक आहे. पण टिपि कल व हळवी बोअर अशी आहे...... खरंय aमा.
शिफ्ट व्हावे का गुहागरला? क्या बोलते दोसत?.......... बढती उमर के लोगोंने अपना सरौंडिंग नय छोडनेका.कित्ता भो अच्छा लगे दुसरा गाँव,फिर्भी nai Jane ka.idhar ka डॉकटर,हॉस्पिटल अपना पैचांका rehta है.मी तो बाबा ये सोचती हू.
https://www.bookganga.com
https://www.bookganga.com/eBooks/Books/details/5564987858757307605?BookN...
हे शब्दकोडी विशेषांक दिसत आहेत.
https://www.bookganga.com
प्रकाटाआ
रसिक वरून मला कसं काहीच दिसत
रसिक वरून मला कसं काहीच दिसत नाहीये. जुनाट अंक दिसतायत सगळे. बुकगंगावरून मागवीन म्हटलं तर लॉगिनचे काहीतरी लोचे होतायत. नवीन पासवर्ड द्या ला क्लिक केलं तर वर्षानुवर्ष प्लिज वेट ची विंडो येते ती मेली जातच नाही.
अॅमेझॉन्वरुन किंडल आवृत्ती घ्यावं तर ते इथून घेऊ देत नाहीये. (आधी झालं होतं)
कसं वाचावं माणसाने ? :राग आलेली बाहुली:
श्रद्धा आणि टवणे सर धन्यवाद!
श्रद्धा आणि टवणे सर
धन्यवाद!
नाहीतर इतर ठिकाणी पण क्शाला
नाहीतर इतर ठिकाणी पण क्शाला जातील लोक? मावशी राहते कि काय काठमांडूत की एवरेस्ट बेस कँपला चुलता भजी विकतो?१ कुच्च भी. >> अमा , पंच भारी मारता तुम्ही
बुकगंगाने परवा मागवलेले अंक
बुकगंगाने परवा मागवलेले अंक आज पोचते केले. मला वाटले होते किमान सोमवार तरी उजाडेल.
अक्षर दिवाळी अंक खूप आवडलाय.
अक्षर दिवाळी अंक खूप आवडलाय. अजून सगळा वाचून व्हायचाय.
डॉ. शीतल आमटे यांच्या आत्महत्येकडे झालेल्या प्रवासावरचा त्यांच्या पतीचा लेख आहे (गौतम करजगी). खूप स्पष्टपणे त्यांनी अनेक बाबी लिहिल्या आहेत. न लिहिलेल्या बाबी याहून जास्तही असतील. वाचून खूप वाईट वाटलं.
फेडरर, जोकोविच आणि नडाल यांच्याबद्दलचा 'तीन सम्राट' हा लेख मस्त आहे. अगदी आपल्याच भावना व्यक्त केल्या आहेत असं वाटलं.
कथाही चांगल्या आहेत.
स्टोरीटेल वर काही अंक आहेत का
स्टोरीटेल वर काही अंक आहेत का यावर्षी? मला सापडले नाहीत. गेल्यावर्षी मौज होता तेव्हा सबस्क्रिप्श्न घेतलं होतं ते आठवलं.
अक्षर आणि मौज हे दोन घेतो आता
अक्षर आणि मौज हे दोन घेतो आता
Pages