खाऊगल्ली - आजचा मेनू - (४)

Submitted by ऋन्मेऽऽष on 30 May, 2021 - 09:33
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

घरी बनवलेला सुंदरसा खाद्यपदार्थ आणि मोबाईल कॅमेरा

क्रमवार पाककृती: 

१. आपल्या आवडीचा कुठलाही खाद्यपदार्थ बनवा.
२. खाद्यपदार्थ सुबक पद्धतीने मांडा
३. फोटो काढा
४. अपलोड करा

मगच त्यावर तुटून पडा Happy

फोटो अपलोड कसा करावा हे ईथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/1556

आधीची खाऊगल्ली ईथे भरायची
https://www.maayboli.com/node/77265

हि सुद्धा तशीच तुडुंब भरू द्या Happy

वाढणी/प्रमाण: 
माहितीचा स्रोत: 
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Mast

म्हाळसा , respect !!
मला stuffed cheeze पराठा कधीच जमत नाही. नेहमी चीज बाहेर येऊन तवा आणि पराठा दोन्ही खराब होतात .

करंगळी शेजारच्या बोटाचं नख सांभाळा. झोपण्यापुर्वी त्यात थेंबभर जैतुन तेल सोडा नी किंचित दाब देवुन नखाला मालिश करा.
मुकामार लागला असेल तर ठीक होईल आपोआप.
(कोणाला कशाच तर बोढीला केसाचं)

जेबॉ प्लीज तेवढी आक्षेपार्ह म्हण काढून टाकावी.
बोडकीला केसाचं अशी म्हण आहे ती.
बोडकी म्हणजे नवरा गेलेली स्त्री जिचे केशवपन केले गेलेले आहे.

दिनेश यांच्या एका जुन्या पोस्टवरून बनवलेले उडदाचे घुटे. सोबत ज्वारीची भाकरी व लसणाची चटणी. साधा सोपा चविष्ट मेनू
3781D56D-BA07-4BD3-A651-28ACD7AEF22C.jpeg

पराठे आवडल्याबद्दल सर्वांना धन्यवाद.

नेहमी चीज बाहेर येऊन तवा आणि पराठा दोन्ही खराब होतात >> मी your food lab फॅालो करते .. ती छान छान ट्रिक्स सांगतो.. त्याच्या सगळ्याच रेसिपिज मस्त असतात.. तो सांगतो त्याप्रमाणे स्टफिंग भरल्यावर पीठ भुरभुरायचं आणि पराठा एकाच बाजूने लाटायचा.. शक्यतो लाटताना उलटायचा नाही.. मग नाही फुटत

मुकामार लागला असेल तर ठीक होईल आपोआप>> काळजीसाठी धन्यवाद पण तो मुकामार नाहीए, त्या एका नखाला इतर नखांपेक्षा वेगळ्या कलरची नेलपेंट लावलीए म्हणून तसं दिसत असावं
पण हो, नखे कापून दोन महिने झाले.. आता नखे कापायला हवीत .. किचनमधे काम करायलाही त्रासच होतो

त्या एका नखाला इतर नखांपेक्षा वेगळ्या कलरची नेलपेंट लावलीए म्हणून तसं दिसत असावं>>>>> मला वाटलंच होतं नेलपॉलिश असणार, कुठल्या दोन शेड्स आहेत ते पण दाखवा बरं Wink
पराठे मस्त.

त्या एका नखाला इतर नखांपेक्षा वेगळ्या कलरची नेलपेंट लावलीए>>> हो ते कळलचं आम्हा लेडीज ना.
दिनेश यांच्या एका जुन्या पोस्टवरून बनवलेले उडदाचे घुटे>>> मी पण बनवते हे घुटे. छानच.

नखांची चर्चा वाचून पुन्हा वर बघायला गेलो. तर पराठ्यांसोबत मागचा हातही दिसला. आधी नजर अर्जुनासारखी थेट पोपटाच्या डोळ्यावर पडावी तशी पराठ्यातील पनीरवर पडलेली.
पुन्हा खाली येताना तोच हात उलटा होत ती बहुचर्चित वाघीणनखेही दिसली.
आता फक्त ती अंगठी कुठल्या ग्रहाची शांती करायला आहे वगैरे ते ही सांगून टाका. म्हणजे सर्व शंका मिटतील Happy

अवांतर - आज मी मसाला डोसा जेवलो दुपारी. बायको माहेरी गेली की असा जुगाड करावा लागतो. या गोड क्षणांची आठवण म्हणून मसाला डोसियाचा फोटोही काढला. आता आठवले. चेक करतो कसा आलाय. आणि टाकतो ईथे.

वाघीणनखेही दिसली.
आता फक्त ती अंगठी कुठल्या ग्रहाची शांती करायला आहे वगैरे ते ही सांगून टाका. >> हो, त्या अंगठीतल्या ग्रहांनी माझीच शांती केली आहे म्हणून आज तुम्ही वाचलात

@ म्हाळसा, शांतीवरून आठवले एक धागा काढायचा पेंडींग आहे लवकरात लवकर..
तुर्तास मगाशी कामाच्या नादात टाकायचा राहिलेला मसाला डोसा..

1639518627911.jpg

जेबॉ प्लीज तेवढी आक्षेपार्ह म्हण काढून टाकावी.
सॉरी सामोजी.
आमच्यात केस विरळ झालेल्या स्रीला बोढी म्हणतात. (माझ्या मनात ते बोडकी कधीच नव्हतं)

Screenshot_20211216-164648_Gallery.jpg
मुगवडीची भाजी, पालक-मेथी पराठे, दही आणि गाजराची कोशिंबीर (घरी बागेत लावलेली गाजरं होती, लावून विसरून गेलो म्हणून अशी बाहेर निघाली पण कोशिंबीर चांगलीच लागली)
Screenshot_20211216-130719_Gallery.jpg

ताक, पोळी, घट्ट वरण फोडणी घालून, मेथीचा घोळाना, पनीर-पुदीना भात
Screenshot_20211216-165112_Gallery.jpg

Pages