खाऊगल्ली - आजचा मेनू - (४)

Submitted by ऋन्मेऽऽष on 30 May, 2021 - 09:33
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

घरी बनवलेला सुंदरसा खाद्यपदार्थ आणि मोबाईल कॅमेरा

क्रमवार पाककृती: 

१. आपल्या आवडीचा कुठलाही खाद्यपदार्थ बनवा.
२. खाद्यपदार्थ सुबक पद्धतीने मांडा
३. फोटो काढा
४. अपलोड करा

मगच त्यावर तुटून पडा Happy

फोटो अपलोड कसा करावा हे ईथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/1556

आधीची खाऊगल्ली ईथे भरायची
https://www.maayboli.com/node/77265

हि सुद्धा तशीच तुडुंब भरू द्या Happy

वाढणी/प्रमाण: 
माहितीचा स्रोत: 
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आ.रा.रा.
भाजलेला पापड आहे.
रेडीमेड आटा नाही आहे. लोकवन गहू आणतो. आणी दळतो.
बटाटे वडे.20211202_132004.jpg

बव खायची इच्छा झाली आणि मौसमभी है ... बेसन बटाटे दोन्ही इल्ले :(:-( 20211129_112149.jpg
प्रसादाचा शिरा : एका मैत्रीणीने अमरावतीहून लाकडी साचे आणलेत .... त्यांच उदघाटन

किती क्युट आकार !
ब वडे उचलून तोंडात टाकावेसे वाटताएत. उस का रस Proud कुठे प्यायलात मानव? ऊसाचा रस पिऊन जमाना झाला.

उसाचा रस आहे.
जुन्या घराजवळ गेलो होतो तिथे आहे हे केन एक्सप्रेस.

मला पण वेगळा ज्यूस वाटला आधी पण मागचे उसाचे शेत पाहुन उसाचा रस आहे कन्फर्म झाले.

मंजूताई मस्त.

शिऱ्याचे साचे मस्त आहेत. आमच्याकडे मुलांच्या क्ले चे साचे वापरून हे प्रकार चालूच असतात.

मला तो उसाचा रसच वाटला. मोसंबी रस किंचित वेगळ्या लाईट आणि ब्राईट रंगाचा असतो.
पण थंड हवामानामुळे थंड पेय नकोच.
बटाटाटावडे चालतील Proud पण आज नको. उद्या खाईन. काल पासून ऑफिसमध्ये वडापाव, सामोसे, घरी बटाटावडे, कांदाभजी, मूग डाळ भजी, शेजारणीने दिलेले रगडा पॅटीस हेच चालूय..

आज दुपारी चेंज म्हणून मग पिझ्झा मागवला..

1638462136487.jpg

IMG-20211203-WA0002.jpg
इथली चर्चा वाचून को आणून को वड्या केल्या.
कोथिंबीर ५ रु ला एक जुडी मिळाली
निशा मधुलिका च्या कृतीने.
वाफवलेले मिश्रण ढोकल्यासारखे लागत होते
पुढच्या वेळी last step करणारच नाही
को ढोकळा फक्त

फार जास्त बेसन आहे त्यात..---
निशा मधुलिका काकूंना follow केले
कुठली authentic पाकृ असेल तर सांगा
कमी बेसन वाली आणि मला जमण्यासारखी Happy

निशा काकूंनी टोमॅटो नाही का सांगितले को वड्यात?
त्यांच्या बऱ्याच रेसप्या पाहिल्या, टोमॅटो शिवाय होत नाहीत.

नाही ना सांगितले
हळद आणि सोडा एकत्र झाल्यामुळे batter लाल झालं
माझ्या नंतर लक्षात आलं ते

पोहे एकदम परफेक्ट. हळदीचा पिवळा रंग, कोथिंबिरीचा हिरवा, शेंगदाणे बघूनच चव जाणवली. दिसतायत् पण मऊसूत.

मीपण काल केल्या. कोथिंबीर बारीक चिरून घ्यावी. त्यात मावेल एवढे बेसन+तांदूळ पीठ+हवी असेल तर थालिपीठ भाजणी+ तिखटमीठ धने जिरेपूड +हवा तर कांदा लसूण मसाला+ तीळ ओवा हे घालून घट्ट मळून घ्यायचं. एक इंच व्यासाचे रोल करून वाफवायचे. मग अर्ध्या इंचावर कापून ते गोल तुकडे तळायचे किंवा कमी तेलावर परतायचे.
बटणासारख्या दिसतात म्हणून माझी मुलगी बटणवड्या म्हणते.
यात मिश्र पिठं न घालता नुसतं बेसन चालेल, पण मिश्र पिठं घातली की खमंग होतात. मी काल एक चमचाभर मैदापण ढकलून दिला तर क्रिस्पी झाल्या भारीच.

कोथिंबीर वड्या
मी अश्या करते . मस्तच होतात. दाण्याचं कूट हे कधी जनरली घातलं जात नाही को वड्यात पण मस्तच लागत. तळलेल्याच भारी लागतात शॅलो फ्राय पेक्षा.

Yummy पिझ्झा.

को वडीच्या पाकृ संदर्भासाठी आभारी आहे
Happy

पिझ्झा खतरनाक... घरगुती कसला, ईथे भारतात येऊन दुकान टाका.. मी तो ३० मिनिटात डिलीव्हरी करणारा पिझ्झाबॉय म्हणून काम करायला तयार आहे. उरलासुरला तुकडा बदल्यात मलाही देत जा

अर्चना, ची रूचकर मेजवानी चांगलं चॅनेल आहे. बेला पण चांगले होते. निशामधुलिकाचे बेला पिवळे कमी भाजलेले वाटले होते.
कोथिंबीर वडीत मी पण ९ सारख भाजणी घालते तांदूळ पिठी घालते. भाजणी छान लागते.
म्हाळसे यम्मी दिसतोय पिझ्झा. काय कलरफुल.

खरं तर पिझ्झा जळाला होता .. पण त्यामुळे जास्त खरपूसही लागत होता
सविस्तर लिही की!>> जीथून रेसिपि ढापली त्याची लिंक टाकते लवकरच

Pages