परत लिफाफे

Submitted by धनुडी on 1 December, 2021 - 01:54

परत एकदा लिफाफे करण्याची उर्मी आली. मध्ये दिवाळीसाठी केले तेव्हा फोटो स्टेटस वर टाकले. तर बऱ्याच जणांनी लिफाफ्यासाठी विचारलं. आणि एक मैत्रिण बजाजभवन मध्ये प्रदर्शन लावणार आहे साड्यांचे तर तिथे ठेव म्हणाली. म्हंटलं बघू तर जमतय का, तर चक्क 117 लिफाफे झाले करून दोन दिवसात.

1) 20211129_104521-COLLAGE.jpg

2) हे पण
20211201_112542-COLLAGE.jpg

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

सही लिफाफे धनुडी.
फुलाफुलांची नक्षीवाले मस्त.
भारी पेशन्स चं काम आहे ना हे.

धन्यवाद मृ, पेशन्स चं काम आहे, पण माझं आवडतं आहे त्यामुळे मजा येते. मी खुप एक्साइटेड असते.
धन्यवाद पिहू१४, अश्विनी ११. अश्विनी टिंटेड पेपर वापरलेत..
ममो, समाधानी धन्यवाद.

छन झालेत एकदम.
कसे बनवलेत सांगाल प्लीज्?मुलांच्या शाळेत ख्रिसमसला कार्ड्स /गिफ्ट कार्ड्स पाठवायला बनवेन ,मुलांना डेकोरेट करायला देईन,:)
मी भारताबाहेर आहे, पेपर्स चा ऑप्शन सुचवता येईल का? धन्यवाद खूप Happy

मानव, अस्मे,मंजूताई, सी, वृषाली, ssj धन्यवाद Happy
वृषाली मी प्रयत्न करते फोटो काढते स्टेप बाय स्टेप. हे टिंटेड पेपर आहेत. मी मोठ्या शीट्स आणते 30" बाय 23 वगैरे असतात. ह्या एका शीट मध्ये 9 लिफाफे बसतात. 9 बाय 7:20 असं माप आहे लिफाफ्याचं.

आधीचं आॅफिस होतं. मेकर चेंबर 6 मधे.
बजाज भवन सेलमधे नेहमीच जायचे. नंबर रजिस्टर आहे म्हणुन मेसेज येतात सेलचे.

Pages