"या देशात अग्निशामक किंवा एंब्युलंस पेक्षा डिलिव्हरी बॉय अधिक जलदगत्या येतात" असे एक उपहासात्मक अवतरण काही वर्षांपूर्वी व्हायरल झाले होते.
स्विगी झोमॅटो सारख्या सेवा सध्या फार लोकप्रिय झाल्या आहेत. आपल्यापैकी अनेकांनी त्यांचा लाभ घेतला आहे. पण त्यामध्ये काम करणारे बहुतांश तरुण हे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून आलेले असतात व जीवनाशी त्यांचा झगडा फार तीव्र असतो. अनेक होतकरू तरुण शाळा/कॉलेज/व्यवसाय सांभाळून उरलेल्या वेळेत हे काम करतात व आपल्या कुटुंबाच्या मिळकतीस हातभार लावतात.
"या मुलांना ऑर्डर पोहोचवायला उशीर झाला तर या कंपन्या त्यांच्या आधीच तुटपुंज्या असलेल्या पगारातून रक्कम कापतात आणि तीच रक्कम उशीर झाल्याबद्दल डिस्काऊंट म्हणून आपल्या ग्राहकांना देतात, त्यामुळे डिलिव्हरी बॉय ला उशीर झाला तर त्याचा नकारात्मक अभिप्राय कंपनीला देऊ नका" असा एक मेसेज मध्यंतरी फिरत होता. या सर्व कारणांमुळे या डिलिव्हरी बॉईज विषयी माझ्या मनात नेहमीच सॉफ्ट कॉर्नर राहिला आहे. जी शक्य ती मदत व सहकार्य मी त्यांना करत असतो व म्हणून शिक्षा म्हणून त्यांच्या विषयी नकारात्मक अभिप्राय मी कधीच आजवर कंपनीला कळवलेला नाही.
पण कालचा दिवस या सगळ्याला अपवाद होता ज्याला मदत केली त्याच डिलिव्हरी बॉय ने माझी फसवणूक केली. फसवणूक किती रुपयांची केली यापेक्षा, माझी काहीही चुकी नसताना व मी त्याला सर्वतोपरी मदत/सहकार्य करूनही त्याने मला अतिशय वाईट पद्धतीने फसवले याचे तीव्र शल्य मला बराच काळ वाटत राहिले. हा अनुभव मी इथे पोस्ट करत आहे ते केवळ व्यक्त व्हायचे म्हणून तसेच शेअर केल्याने शल्य कमी होईल म्हणून तसेच "असेही घडू शकते" हे इतरांना कळावे अशा बहुविध कारणांसाठी इथे मांडत आहे. हि घटना घडल्यानंतर यासंदर्भात स्विगी कंपनीला इमेल लिहून जे घडले ते तपशिलात मी कळवले. ती इमेल त्यातले व्यक्तिगत तपशील खोडून व मराठीकरण करून इथे चिकटवत आहे. ती वाचल्यावर काय व कसे घडले याचा उलगडा आपणास होईलच.
-------
नमस्कार,
एक ग्राहक म्हणून मी अनेक वर्षांपासून स्विगीसोबत आहे आणि आजपर्यंत स्विगीकडून खूप छान सेवेचा लाभ घेतला आहे. पण काल रात्री एका स्विगी डिलिव्हरी बॉय सोबत मला आलेला एक अतिशय अप्रिय अनुभव शेअर करण्यासाठी मी अत्यंत विषण्ण मनाने आपणास हा ईमेल लिहित आहे.
तपशील खालीलप्रमाणे आहेत:
स्विगी ऑर्डर #12**********
डिलिव्हरी बॉयचे नाव: अ** भि** (हे नाव सं** भि** असेही असू शकते)
स्विगी नंबर ज्यावरून त्याने मला कॉल केले: +91**********
त्याचा वैयक्तिक संपर्क क्रमांक: +919*********
काल मी ही ऑर्डर दिली आणि डिलिव्हरी होण्याची वाट पाहत होतो. मग या डिलिव्हरी बॉयने मला कॉल केला (वर नमूद केलेल्या स्विगी फोन नंबरवरून). माझा पत्ता लवकर सापडू शकत नाही अशी त्याची तक्रार होती. वास्तविक मी माझा स्विगी मध्ये पत्ता अगदी स्पष्टपणे दिला आहे आणि त्यात माझ्या पत्त्याचे नकाशावरचे स्थानसुद्धा अचूकपणे नमूद केले आहे. याच पत्त्यावर मला यापूर्वी विनातक्रार ऑर्डर मिळाल्या आहेत. त्यामुळे त्याच्या तक्रारीचे मला थोडे आश्चर्यच वाटले. पण तरीही सद्भावनेने मी त्याला तो आता कुठे आहे विचारून पुढील दिशा सांगण्याचा प्रयत्न केला. पण काही वेळाने मला त्याच कारणासाठी त्याने पुन्हा फोन केला. दिशा सांगूनही तो मला सतत फोन करत राहिला. दिशा विचारण्यासाठी त्याने मला तब्बल ५ ते ६ वेळा फोन केला असेल. मी त्याला मार्गदर्शन करण्याचा माझ्या परीने सर्वतोपरी प्रयत्न केला. पण त्याचे समाधान झाले नाही आणि तो माझ्याशी उद्धटपणे बोलू लागला.
अखेर तो आला, खूप निराश दिसत होता. त्याने ऑर्डर माझ्याकडे सोपवली आणि माझा पत्ता शोधण्याच्या नादात त्याच्या इतर ऑर्डर चुकल्या असे तो सांगू लागला. आणि त्यासाठी तो मला दोष देऊ लागला. मी त्याला सांगितले की ही काही माझी चूक नव्हती. उलट मी त्याला दिशा शोधण्यात मदत केली आहे हे मी त्याच्या निदर्शनास आणून दिले. पण त्याला ते त्याला पटलेले दिसले नाही.
मग तो म्हणाला की त्याच्या नुकसानीसाठी मला त्याला पैसे द्यावे लागतील (त्याच्या इतर ऑर्डर हुकल्यामुळे). ते ऐकून मला धक्काच बसला. मी त्याला विचारले की मी त्यासाठी भुर्दंड का भरू? माझी काय चूक? मग त्याने विनंती केली कि मी थोडे सहकार्य केले तर त्याला स्विगीकडून नुकसानभरपाई मिळू शकेल. थोडेसे गोंधळून मी विचारले की हे कसे शक्य आहे? मग त्याने सांगितले कि त्याच्याकडे काही कूपन कोड आहेत. जर ते त्याने माझ्या Swiggy अॅपमध्ये एंटर केले, तर Swiggy मला रुपये 400/- परत करेल, जे मी त्याला देऊ शकेन. त्याने विनवणीच केली आणि मला पटवून दिले की यात माझे काही नुकसान नाही. फक्त त्याचा कुपन कोड नंबर माझ्या फोनद्वारे स्विगीला पाठवणे आवश्यक आहे इतकेच. मला माझा फोन त्याच्याकडे सोपवायला अडचणीचे वाटले. पण तो म्हणाला की तो फक्त स्विगी अॅप वापरेल, ते सुद्धा माझ्यासमोर. माझ्या फोनमध्ये सुरक्षेची सगळी तजवीज केली आहे. कोणतेही व्यवहार इतक्या सहजासहजी एका क्लिकवर होत नाहीत. गुप्त पिनकोड इत्यादी वगैरे द्यायला लागतो. त्यामुळे त्याचा कूपन कोड टाकण्यासाठी त्याला माझ्यासमोर स्विगी अॅप वापरू देणे मला ठीक वाटले. जर त्याला पैसे मिळत असतील आणि दिरंगाईची भरपाई मिळत असेल तर काय हरकत आहे असा विचार मी केला. मग त्याने माझा फोन घेतला, काही झटपट नोंदी केल्या आणि मला फोनवर एसएमएस आल्याचे दाखवले:
प्रिय स्विगी ग्राहक, NNN रुपयांच्या परताव्यासाठी तुमचा परतावा संदर्भ क्रमांक 13************* आहे. http://swig.gy/refunds
मग त्याने मला त्या परताव्याच्या रकमेचे पैसे त्याला देण्यास सांगितले. मला थोडे आश्चर्य वाटले की स्विगी मला इतकी रक्कम कशी परत करू शकते? आजवर कधीच असे झाले नव्हते. मी ऑर्डरसाठी भरलेल्या एकूण रकमेपैकी ते जवळपास निम्मे पैसे होते. पण नंतर मला वाटले की, स्विगीचा एम्प्लॉयी असल्याने त्याच्याकडे काही कूपन कोड इत्यादी असतील जे त्याने वापरले असतील. मी आधीच माझ्या ऑफिसच्या कामाच्या विचारात मग्न होतो आणि रात्र झाली होती आणि मला जेवायला उशीर होत होता, आणि हे पैसे मला स्विगीकडून मिळाले आहेत हे लक्षात घेता, जर त्याला मदत होत असेल तर ते त्याला देण्यास माझे कोणतेही नुकसान नाही. हा सगळा सारासार विचार करून Google pay वापरून मी त्याला रु. NNN/- ट्रान्सफर केले. (मी या पेमेंटची पावती या इमेलसोबत जोडत आहे. तुम्ही पावतीमध्ये पेमेंट संदर्भ 'swiggy' सुद्धा पाहू शकता).
पैसे मिळाल्यावर तो पटकन निघून गेला. आणि मग खरा धोका माझ्या लक्षात आला. मी प्राप्त झालेली ऑर्डर तपासली, तेव्हा त्यातील बरेच आयटम गहाळ झाले होते! मग मी घाईघाईने Swiggy मध्ये तपासले आणि लक्षात आले की त्याने माझ्या वतीने ऑर्डरमधून आयटम्स गहाळ झाल्याची खोटी तक्रार नोंदवली होती आणि अशा प्रकारे परतावा घेतला होता. आता त्याने काय फसवणूक केली आहे याची मला स्पष्ट कल्पना आली. त्याने मला पूर्ण ऑर्डर दिली नाही ते नाहीच शिवाय मला मिळालेल्या रकमेचा परतावा त्याने मला त्याला देण्यास सांगितले होते. मी पट्कन स्विगी एप मध्ये जाऊन त्याने सुरु केलेल्या खोट्या तक्रारीच्या धाग्याला पटकन उत्तर दिले की हि तक्रार खोटी आहे व ती मी नव्हे तर स्विगीच्याच डिलिव्हरी बॉयने माझ्या फोन वरून दाखल केली आहे. त्यावर स्विगीकडून प्रतिसादसुद्धा आला कि याची दखल घेतली आहे व यावर निश्चितपणे योग्य ती कारवाई केली जाईल.
त्यातल्या त्यात बरी गोष्ट अशी कि, मी त्याला Google pay वापरून पैसे दिले होते. त्यामुळे मला त्याचे नाव नंबर इत्यादी तपशील उपलब्ध झाले. GPay मध्ये, मला त्या व्यक्तीचे नाव अ** भि** असल्याचे आढळले, परंतु पेमेंटच्या पावतीवर मात्र त्याचे नाव सं** भि** असे दिसते. मी पटकन त्याला त्या नंबरवर कॉल केला आणि ऑर्डरमधून गहाळ झालेल्या पदार्थांबाबत विचारले. ज्यावर त्याने उडवाउडवीची उत्तरे देऊन "काहीही गहाळ वगैरे नाही. सगळे तुम्हाला दिलेले आहे" वगैरे म्हणू लागला. मी त्याला माझे पैसे परत करण्यास सांगितले, अन्यथा मी त्याच्या विरोधात स्विगीकडे तक्रार करेन असेही बोललो. पण त्याने फारसे लक्ष दिले नाही आणि हवी असेल तर तक्रार करा असे म्हणाला. हे सर्व अत्यंत धक्कादायक वर्तन होते. यामुळे मी अत्यंत व्यथित झालो. डिलिव्हरी बॉइज कठीण संघर्ष काळातून जात असतात असे अनेकदा वाचण्यात व ऐकण्यात आले आहे. त्यामुळे मी त्याला मदत करण्याचीच भूमिका घेतली. पण त्याने गैरफायदा घेऊन उलट माझीच फसवणूक केली. अत्यंत उद्विग्न करणारा असा हा अनुभव आहे. माझा विश्वासघात झाल्याची भावना मला झाली आहे. माफ करा, पण यापुढे स्विगी वरून जेवण कधीही ऑर्डर करू नये असे मला वाटू लागले आहे.
मला असाही संशय आहे की ऑर्डर केलेल्यापैकी काही अन्नपदार्थ या माणसाने वाटेतच खाल्ले असावेत आणि वेळ निभावून नेण्यासाठी माझा पत्ता सापडत नसल्यासारखे नाटक केले असेल. या कटू अनुभवाबद्दल मी आपणास लिहिण्याचा विचार केला, जेणेकरून तुम्ही या व्यक्तीवर आवश्यक ती कठोर कारवाई करावी. त्यामुळे भविष्यात इतर ग्राहकांची फसवणूक होणार नाही.
सादर,
अतुल
सेल: +91**********
कठिण आहे! काय एकएक जुगाड
कठिण आहे! काय एकएक जुगाड करतील!
खराब अनुभव ! तुमचीही चूक आहेच
खराब अनुभव ! तुमचीही चूक आहेच त्याला फोन सोपवण्यात. बाकी मी असतो तर एकदा त्याचा नाव फोन माहित झाल्यावर नंतर शिस्तीत चोपला असता पंटर पाठवून. once a cheater always a cheater
मी 2020 च्या लॉक डाउन मध्ये
खराब अनुभव..
वाईट अनुभव!
वाईट अनुभव!
काहीतरी शिकण्यासाठी फी द्यायला लागते हे खरे!
विचित्र अनुभव आहे.
विचित्र अनुभव आहे.
डिलिव्हरी पार्टनरला डिलिव्हरी पिक अप केल्यावर त्याचा फोटो काढून अपलोड करायला लागतो. हा बदल आताच झाला असेल तर कल्पना नाही.
माझ्याकडे एक मुलगी डिलिव्हरीला आली होती. तिचा पहिलाच दिवस होता म्हणाली.
ती फोटो अपलोड करायला विसरली होती. आमच्याकडे काढलेला फोटो अपलोड होईना कारण लोकेशन पिक अप पॉइंटहून दूर होते.
मग तिला फोन करून ते सॉर्ट करावं लागलं
Zomato वाले काढतात फोटो..
...
खराब अनुभव खरंच.
खराब अनुभव.
एकाने केले होते. जनरलायझेशन
एकाने केले होते. जनरलायझेशन टाळावे
सगळे delivery boys वाईट
...
खूपच धक्कादायक अनुभव अतुल.
खूपच धक्कादायक अनुभव अतुल.
भरत, बहुतेक नवीन उमेदवारांना पहिल्या दिवशी फोटो काढून अपलोड करावा लागतो. पुण्याला एकदा स्विगीवरून मागवलं जेवण तेव्हा त्या मुलाला आधी पत्ता सापडेना. मग तो बिल्डिंगच्या खालीच येऊन थांबला. आम्ही वाट पाहून फोन केल्यावर मग वर आला. मग फोटो काढायचाय म्हणाला. तिथे नेटवर्क मिळेना. घरात सगळ्यांना भूक लागलेली.. असा सगळा वैताग. पण त्याचा हा पहिलाच दिवस होता म्हणे.
आपण स्वतः कोणत्याच सेवे विषयी
आपण स्वतः कोणत्याच सेवे विषयी पूर्वग्रह ठेवू नये.नेहमीच तपासून ,खात्री करूनच निर्णय घ्यावेत.सावधानता नेहमीच असली पाहिजे.
रोचक किस्सा आहे.
रोचक किस्सा आहे.
बहुधा त्याने तो जॉब असाच टाईमपासला धरला असावा, मन भरले असावे, वैतागून सोडायचा असावा वगैरे तर काहीतरी काण्ड करूय म्हणून केले असावे..
स्विगी वरुन ऑर्डर केली
स्विगी वरुन ऑर्डर केली नसल्याने अनुभव नाही. पण तुम्हाला आलेला अनुभव धक्कादायक नक्कीच आहे.
मला urbanclap च्या व्यक्तीकडून असा अनुभव आला पण कंपनीने
रिफंड केले 2000रु.
वाईट अनुभव. सध्या मदत करताना
वाईट अनुभव. सध्या मदत करताना सुद्धा सावधानता बाळगली पाहिजे.
विचित्र अनुभव आहे.
विचित्र अनुभव आहे.
सावधानता हवी
धक्कादायक नक्कीच आहे हे !! पण
धक्कादायक नक्कीच आहे हे !! पण पुढे स्विगी कडून त्या मुलावर खरेच कारवाई झाली का हे जाणून घेता आले तर किमान स्विगीला फारसा दोष ठेवायचे फारसे कारण उरणार नाही. कर्मचारी वाईट वागला तर त्यात मूळ कंपनीची काय चूक ? ( जर त्या गैर वर्तणुकीवर उचित आणि तत्पर कारवाई करण्यात आली असेल तर )
माझा प्रतिसाद या फसवणुकीविषयी
माझा प्रतिसाद या फसवणुकीविषयी नाही पण अशी फसवणूक किंवा पदार्थ मध्येच खाण्याचे प्रकार होऊ नयेत म्हणून मला मागेच एक कल्पना सुचली होती. येथील मायबोलीकरांपैकी कोणी Swiggy किंवा Zomato मध्ये उच्च पदावर कार्यरत असल्यास किंवा अशा कोणाशी ओळख असल्यास त्यांच्यापर्यंत ही कल्पना पोहोचावी या उद्देशाने लिहित आहे. (मला बरेचदा अशा नवीन नवीन कल्पना सुचतात पण त्या प्रत्यक्षात आणण्यासाठी आवश्यक असलेले ज्ञान नसल्याने त्या अशाच विरून जातात! येथे मायबोलीवर असलेल्या अनेक इंजिनिअर्स पैकी एखाद्याने त्यावर काम करून ती कल्पना प्रत्यक्षात आणली तरीही हरकत नाही!!! )
सद्यस्थितीत वरील दोन्ही कंपन्यांकडून Delivery boys ना डिलिव्हरीसाठी साध्या बॅॅग्स दिल्या जातात. त्याऐवजी कंपनीने एखाद्या इंजिनीअरकडून फायबर पासून बनवलेली IOT (Internet of Things) based intelligent bag बनवून घेऊन त्या delivery boys ना द्याव्यात!
IOT based intelligent food delivery bag ची माझ्या डोक्यात असलेली संकल्पना खालीलप्रमाणे :
१. ही एक फायबरपासून बनवलेली portable (पाठीवर किंवा स्कूटरच्या footboard वर सहज बसेल इतक्या) आकाराची, वजनाला हलकी (लिफ्ट नसलेल्या बिल्डिंगमध्येही चौथ्या मजल्यापर्यंत पाठीवरून / हातातून नेता येईल अशी) असावी. तसेच पावसाळ्यात आत पाणी जाणार नाही अशी तिची रचना असावी.
२. त्याला साधे बक्कल / lock न लावता Digital Safe ला असते तसे number keypad असलेले lock असावे, ज्यात सिम कार्ड टाकण्याची व्यवस्था असावी जेणेकरून इंटरनेटद्वारे ते lock Zomato/ Swiggy च्या सर्वरशी जोडलेले असेल.
३. संबंधित lock ला विद्युत पुरवठा करण्यासाठी त्यातच Li-Ion battery असावी आणि ती रिचार्ज करण्यासाठी Micro USB / Type-C usb port आणि (शक्य असल्यास bag वरच एखादे solar panel) असावे.
४. Delivery boys (riders) च्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून या bag चा रंग काळा न ठेवता लाल (Zomato) / केशरी (Swiggy) ठेवावा तसेच त्यावर reflective tape असावी.
आता ही bag कशी काम करेल ?
१. एखाद्या ग्राहकाने पदार्थाची order दिली की ती order संबंधित हॉटेलला जाते (पदार्थ तयार करण्यासाठी) आणि जवळच्या delivery boy ला जाते (order पिकअप करण्यासाठी)
२. Delivery boy हॉटेलमध्ये गेला की त्याने आपली IOT based bag हॉटेलच्या माणसाकडे द्यावी. हॉटेलचा माणूस त्यात व्यवस्थित pack केलेले पदार्थ ठेवून bag बंद करेल आणि आपल्या (हॉटेलकडे असलेल्या) app मध्ये 'Lock' पर्यायावर टच करेल. त्याने असे केले की ही lock ची order त्याच्या app मधून Zomato / Swiggy च्या सर्वरमार्फत bag ला मिळेल आणि bag lock होईल.
३. मग delivery boy ही lock झालेली bag घेऊन ग्राहकाच्या घरी (location वर) जाईल. बिल्डींगजवळ गेल्यावर संपूर्ण bag च उचलून ग्राहकाच्या घरी येईल. (त्यासाठी वजनाने हलकी पाहिजे).
४. इकडे ग्राहकाला त्याच्या मोबाईलवर app मध्ये ती bag unlock करण्यासाठी एक OTP आलेला असेल. (हा OTP फक्त ग्राहकालाच येणे अपेक्षित आहे, delivery boy ला नाही.) मग तो delivery boy ने आणलेल्या bag वरील keypad वर हा app मध्ये आलेला unlock otp टाईप करेल आणि तो जुळला की मगच ती bag unlock होईल. मग ग्राहक स्वतःच्या हाताने त्यातील पदार्थ काढून घेईल.
५. मग ती bag पुढची order संबंधित हॉटेलने bag मध्ये पदार्थ ठेऊन lock करेपर्यंत unlock असेल. त्या काळात delivery boy ती bag आतून पुसून वगैरे घ्यायची असेल तर ते करू शकेल. म्हणजेच bag इतर वेळी unlock असेल पण active order असतांना lock असेल व ज्याचा otp फक्त ग्राहकाला दिला जाईल.
६. यदाकदाचित delivery boy ला खूप प्रयत्न करूनही ग्राहकाचे घर सापडले नाही आणि ग्राहक फोन उचलतही नसेल, ग्राहकाशी कोणत्याही प्रकारे संपर्क होत नसेल (किंवा अपवादात्मक स्थितीत ग्राहकाने order स्वीकारण्यास नकार दिला) तर अशा वेळी delivery boy ने कंपनीला कळवल्यावर कंपनी आपल्याकडून ती bag unlock करेल आणि मग तो delivery boy त्यातील पदार्थ स्वतः सेवन करणे वा एखाद्या भिकाऱ्याला देणे आदी करू शकेल. (अशी त्यांना मुभा असते असे ऐकले आहे.)
अशा प्रकारच्या bag बनवल्या आणि वापरात आणल्या तर काही delivery boys कडून पदार्थ वाटेतच खाण्याचे प्रकार होतात ते टळतील तसेच ग्राहकांनादेखील अधिक विश्वासार्ह वाटेल.
वाईट अनुभव !
वाईट अनुभव !
मुळात डिलिव्हरी बॉय हे ना
मुळात डिलिव्हरी बॉय हे ना कॉन्ट्रॅक्ट employee असतात. ना कंपनीचे employees असतात.
त्यांची नियुक्ती करताना कमीत कमी कमिशन मध्ये काम करून घेणे हा एकमेव उद्देश असतो .
ग्राहकांच्या सुरक्षेशी काही देणे घेणे नसते.
त्या मुळे क्रिमिनल रेकॉर्ड असणारे पण delivery boy, कुरिअर किंवा स्विगी, किंवा बाकी आस्थापना च्या सेवेत असतात.
ओला,उबर मध्ये स्त्रियांविषयी गुन्हे झालेले प्रकार आपण बघतोच.
त्या मुळे क्रिमिनल रेकॉर्ड
त्या मुळे क्रिमिनल रेकॉर्ड असणारे पण delivery boy, कुरिअर किंवा स्विगी,
>>>>>
म्हणजे एखाद्या डिलीव्हरी बॉयने घरात घुसून खून चोरी वगैरे केले तर जबाबदार कोणी नाही...
तसे म्हटले तर आमच्याकडे दिवसातून किमान सात आठ वेळा कोणी ना कोणी डिलीव्हरीवाले येत असतातच. बरेच चेहरे तेच तेच ओळखीचे असतात. ते ही आम्हाला ओळखतात. गप्पाही मारतात. दरवाजा उघडायलाही बरेच घरात मुलेच पुढे पळतात. पण जर या डिलीव्हरीवाल्यांची जबाबदारी कोणी घेणारा नसेल तर हे रिस्की आहे. सावध राहायला हवे. आपली सुरक्षितता आपल्या हाती..
काळजी घेणे कधी ही महत्वाचे च.
काळजी घेणे कधी ही महत्वाचे च.
स्विगी, उबर इ. बॅकग्राऊंड
स्विगी, उबर इ. बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशन करतात.
मी गेल्या वर्षी पूर्ण वर्षभर
मी गेल्या वर्षी पूर्ण वर्षभर ओला उबर वापरली.
आणि नीट निरीक्षण केले आहे.
१) कित्येक ड्रायव्हर लोकांस गूगल मॅप बघतच येत नाही त्या मधील दिशा समजत नाहीत.
२) काही ड्रायव्हर व्यसनी होते.
३) काही cheater होते .
अनेक कंपन्यांचे ऍप वापरत होते आणि alternate app बंद करायचे.
भाडे टाळायचे असेल तर address सापडत नाही अशी कारण देवून उशीर करायचे.
४) चुकीच्या destination ल सोडायचे.
५) काही अत्यंत चांगले पण होते.
काही varrification होत नाही.
भारताचे आद्य डिलिव्हरी बॉय
भारताचे आद्य डिलिव्हरी बॉय पोस्ट मन आणि पोस्ट खाते ह्या वर मात्र माझा नितांत विश्वास आणि श्रद्धा होती.
Money ऑर्डर उशिरा देणे ह्या व्यतिरिक्त एक पण criminal गुन्हा ,किंवा फसवणूक केल्याची एक पण केस त्यांच्या वर भारतात नसेल.
असे मला वाटत.
भारताचे आद्य डिलिव्हरी बॉय
भारताचे आद्य डिलिव्हरी बॉय पोस्ट मन आणि पोस्ट खाते ह्या वर मात्र माझा नितांत विश्वास आणि श्रद्धा होती.
Money ऑर्डर उशिरा देणे ह्या व्यतिरिक्त एक पण criminal गुन्हा ,किंवा फसवणूक केल्याची एक पण केस त्यांच्या वर भारतात नसेल.
असे मला वाटत.
मी एकदा पुण्याहून ठाण्याला
मी एकदा पुण्याहून ठाण्याला कॅब ने चाललो होतो
ओला उबरपेक्षा oneway cab अशी एक सर्व्हिस स्वस्त वाटली म्हणून ती घेतली
बुक करतानाच पूर्ण रक्कम पे केली
नंतर एक्स्प्रेस हायवेला लागण्याआधीच ड्रायव्हर म्हणाला पेट्रोल भरून घेतो आणि नंतर त्याचा कार्ड चा काहीतरी प्रॉब्लेम झाला म्हणाला
मला विचारलं आता तुम्ही कॅश द्याल का 1500रु मी तुम्हाला गुगल पे करतो म्हणलं ठिके
त्याप्रमाणे मी रोख दिले आणि नंतर पुढे त्याने मला पैसेपाठवले पण मला आलेच नाहीत
मी त्याला मोबाईल दाखवला तर म्हणाला माझ्याकडून गेलेत तुम्हाला येतील नक्की
म्हणलं अरे असं कसं चालेल
म्हणाला माझ्याकडे एवढेच होते आता कायकरू
मी असाही भांडण करणारा नसल्याने म्हणलं ठिके पोचेपर्यंत आले तर ठीक नैतर काहीतरी बघू
मग त्याचे त्यालाच वाईट वाटलं त्याने गाडीतच तुफानी फोनाफोनी केली, याला त्याला फोन लावून अकाउंट ला पैसे पाठवायला लोकांना सांगायला सुरू केलं
रक्कम इतकी मोठी नव्हती आणि त्या साठी त्याची धडपड बघून मलाच कानकोंडे व्हायला झालं
शेवटी घर आले तसे त्याने गाडी थांबवून आलेले पैसे बघितले आणि परत मला ट्रान्स्फर केले
नशिबाने या वेळी आले म्हणलं चला सुटलो
तर दुसरे दिवशी भाऊ चा परत फोन, म्हणे तुम्हाला दोन वेळा गेलेत
म्हणलं मला एकदाच आलेत तर म्हणे प्लिज चेक करा
मी पाहिलं तर मेसेज तर काही नव्हता, गुगल पे पण आधीची रक्कम पेंडीग दाखवत होता मला मग फसवणूकीची शंका आली
त्याचा दरम्यान दोन वेळा फोन येऊन गेला
म्हणलं थांब मी बँक स्टेटमेंट चेक करतो आणि मग त्याप्रमाणे केलं तर दोन रक्कम जमा झाल्या होत्या
म्हणलं मग ठिके, खरं बोलतोय हा
आणि त्याला मग जास्तीचे आलेले परत पाठवून दिले
पण तोवर जाम वैताग झालेला त्याचे फोन वर फोन आल्याने
तुमच्या कडे पण १५०० कॅश नसती
तुमच्या कडे पण १५०० कॅश नसती तर बिना पेट्रोल ठाण्याला कशी पोचली असती cab.
खूप लोक कॅश ठेवत नाहीत.
एका मोठ्या उद्योगपती ची स्टोरी ऐकली होती त्याच्या ड्रायव्हर कडून .
मुंबई पुणे करताना टोल भरायचा कॅश नसल्या मुळे परत मुंबई ला यावं लागले होते.
तेव्हा हे g pay वैगेरे नव्हतं.
फक्त atm हाच आधार.
कॅश नसती तर कार्ड पेमेंट
कॅश नसती तर कार्ड पेमेंट करायचा पर्याय होता, त्या पेट्रोल पंप वर जीपे, भीम वगैरे सुविधा बंद होती म्हणे
कार्ड पण नसते तर मग काय केलं असतं देव जाणे
जितके असते तितक्याचे भरले असते बहुदा
मला पण असे अनुभव आले आहेत
मला पण असे अनुभव आले आहेत.गाडीत बसून दरवाजा लावत नाही तो पर्यंत sahab 'गॅस भरणा पडेगा' म्हणजे तिथे पंपावर अर्धा तास जाणार.
उभे असताना ही लोक गॅस,पेट्रोल का भरत नसतील.
कठीण आहे.
कठीण आहे.
Pages