Submitted by चैतन्य रासकर on 19 November, 2021 - 07:35
तुझ्या घरातले अनारसे
कधी खायला मिळतील?
माझ्या घरातले लाडू
आता कधीही फुटतील!!
तुझ्या त्या गोड शंकरपाळ्या
मला चहा बरोबर चालतील
आमच्या चिवड्यांचे डबे
आता रिकामेच राहतील
तुझे ते चिरोटे (२)
कायम लक्षात राहतील
माझ्या त्या कडबोळ्या
वातड होऊन जातील
तुझ्या या फराळाला
घरातले ही 'दात' देतील
उन्हात टेरेसवर वाळवून
वर्षभर पुरवून खातील...
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
नित्या आणि सात्विकची पहिली
नित्या आणि सात्विकची पहिली दिवाळी का? छान!
कैच्याकै
कैच्याकै
Welcome back चैतन्य !!
Welcome back चैतन्य !!
छान.
छान.
सुरुवातीला वाटलं की सासूबाईंकडून जावयाला अनारसे येणं आहे, त्याबद्दल कविता आहे की काय? (कोणे एकेकाळी मला ३३ अनारसे मिळाले होते, असे अंधुकसे आठवते).
पण मग हे वाचून
<< उन्हात टेरेसवर वाळवून
वर्षभर पुरवून खातील... >>
कळलं की दिवाळीच्या फराळाबद्दल आहे.
हे काय आहे ???
हे काय आहे ???
वेलकम बॅक चैतन्य.