आलू साग-पुरीसाठी

Submitted by mrunali.samad on 21 November, 2021 - 08:46
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

● दोन मध्यम आकाराचे बटाटे
● तीन मध्यम आकाराचे कांदे उभे चिरून
● कडिपत्ता
● तीन-चार हिरव्या मिरच्या
● मोहरी
● चणा डाळ अर्धा छोटा चमचा
● मीठ
● हळद
● बेसन एक चमचा
● तेल
● कोथिंबीर

क्रमवार पाककृती: 

● कुकरमधे दोन चमचे तेल तापवून घ्या.
● तापलेल्या तेलात मोहरी,चणा डाळ, हिरव्या मिरच्या,
कडिपत्ता टाकून परतून घ्या
● आता चिरलेला कांदा टाकून पाच मिनटे छान परतून घ्या.
● चिरलेले बटाटे घालून परतून घ्या.
● हळद घाला आणि मीठ चवीपुरते.
● पाव ग्लास पाणी घाला.
● कुकरला तीन शिट्ट्या करून घ्या.
● एक चमचा बेसन आर्धी वाटी पाण्यात मिक्स करून घ्या.
● कुकर गार झाल्यावर, हे बेसन कुकरमध्ये घाला.
● आता पाच-दहा मिनटे बेसनाचा कच्चा वास जाईपर्यंत मंद
गॅसवर असू द्या.
● शेवटी कोथिंबीर बारीक चिरून वरून घाला.
● आता गरमगरम पुर्या तळा आणि आलु साग-पुरी चा
आस्वाद घ्या.
IMG_20211121_191006.JPG
आजच केले होते. पुर्या देखण्या नाहीएत.चालवून घ्या. Wink

वाढणी/प्रमाण: 
वरील प्रमाण दोन मोठी आणि दोन छोट्या माणसांच्या नाष्ट्याचे आहे.
माहितीचा स्रोत: 
जाऊबाई
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Mast recipe

वाव्ह छान स्वादिष्ट आलूसागपुरीभाजी. एक वेळ नाष्टा पर्याय सापडला.

वाव्ह छान स्वादिष्ट आलूसागपुरीभाजी. एक वेळ नाष्टा पर्याय सापडला........... +१.

माझ्या अंगात सुगरण आली आहे तोपर्यंत फोटो टाकत जाईन.. Proud थँक्यू मृ , अशी भाजी पहिल्यांदा केली, पुऱ्या तिखटामिठाच्या(+जिरे,ओवा, कसूरीमेथी) केल्या,सोबत दही +काकडी किसून +कांदा चिरून रायता. मस्तच झाला बेत !!
Screenshot_20211121-141553_Gallery.jpg

मस्त पुरीभाजी प्लेट.
इकडे हैद्राबादेत पाहिली ही डिश तेंव्हा बेसन पीठ असल्याने बटाट्याचे पिठले म्हटलेले पण चव घेतल्यावर आवडले होते. Happy

मस्त रेसिपी. बेसन माझ्यासाठी ही नवीन आहे. नक्की करून बघणार बेसन लावून . मी यु पी. स्टाईल च केलीय आत्ता पर्यंत आलू पुरी ची ब. भाजी. आता अस करून बघेन.

मृ अस्मिता , मस्त दिसतेय भाजी आणि एकंदर ताट ही.

मला ते बुलेट प पॉइंट प्रेझेंटेशन आ वडले. शिस्तीत लिहिली आहे रेसीपी.

मस्त रेसिपी. बेसन माझ्यासाठी ही नवीन आहे.. पूर्या देखण्या वगैरे नसल्या तरी चालतमाझ, मला खूप आवडतात . फक्त खूप तेलकट आणि जाड नसाव्यात Happy
अस्मिता , ताट बघून भूक खवळली . Sad

थँक्यु जिज्ञासा.

कृष्णा, मी पहिल्यांदा सासरी पाहिले तेव्हा, असंच वाटलेले बटाट्यात बेसन कसं लागेल पण खाल्ल्यावर आवडले होते त्यानंतर पासून पुरी सोबत अशीच भाजी करते. Happy

मनीमोहोर,अमा,अमुपरी,स्वस्ति धन्यवाद.

रश्मीताई, मी पार्वती नाही ओ.. त्या मतंग्या एरीशेरी धाग्यावरच्या आहेत Lol

छान रेसिपी...!
दोन्ही ताटातल्या पुर्‍या आणि भाजी मस्तच..!
ह्या रेसिपीप्रमाणे भाजी नक्की करेन...

म्रु, अस्मिता तोंपासू. ह्या पध्दतीने करीन. युपी स्टाईलमध्ये बेसन कांदा टमाटा परतल्यावर टाकायचा अशी बघितली खाल्ली आहे.

हायला, Proud ए सॉरी गं मृणाल, आज मायबोली फारच स्लो चालतीय. पार्वतीचा धागा मी दुसरीकडे ओपन केला होता, आणी इकडेच तिचे नाव टाईप झाले. Proud

छान आहे भाजी, विशेष म्हणजे सोपी आहे. बेसन कधी वापरले नव्हते.

छान.
मस्त असते ही भाजी. एकेकाळी मला ही खूप आवडली होती.
एकदा मी उप्र मध्ये पिलीभीत इथे राहीलो होतो. तिथे गेस्ट हाऊस जवळपास कुठेही गेले तरी सकाळ संध्याकाळ तिन्ही त्रिकाळ हीच भाजी आणि पुरी मिळायची. दुसरे काही खायचे असेल तर बस / शेअर टेम्पो पकडून गावात जावे लागे जे कामाच्या दिवशी शक्य नसे तेव्हा रविवारी तीन वेळा धक्के खात खाण्यासाठी गावात जायचो, पण इतर दिवस ही पुरी भाजी आणि उजडलेले अंडे. महिन्याभरात एवढा वीट आला की ही भाजी डोळ्यासमोर नको वाटू लागली.
तशात एकदा ईस्ट कोस्ट एक्सप्रेसने हैद्राबाद ते कलकत्ता गेलो. तेव्हा त्या गाडीला पॅन्ट्री कार नव्हती. दिवसभर ओडीसातून गाडीचा प्रवास, आणि तिथे फक्त हीच पुरी भाजी मिळत होती प्रत्येक स्टेशनवर. स्टेशन आले उतरून स्टेशन कँटीनवर धावत जाऊन पहा काय दुसरे मिळते का असे काही स्टेशन पर्यन्त केले, मग नाद सोडून दिला, बिस्कीट खाल्ले फक्त.

इथे हैद्राबादला बरेच जण कधी चेंज म्हणून घरी पोळी केली की ही भाजी करतात आणि काही शेजाऱ्यांनी पोळीवाले म्हणुन मुद्दाम बोलावले ते खायला. :D.

पण आता ही भाजी खाऊन पंधरा वर्षे तरी झाली असतील. आता परत खाऊन पहायला हरकत नाही.

मला जरा कल्पना करवत नाहीये बटाटा भाजीत बेसन, पण चांगली लागत असेल.
एकदा प्रसिद्ध ठिकाणची खाऊन पाहिली पाहिजे.

छान पाकृ! बटाट्याच्या भाजीत बेसन हे माझ्यासाठी नविन आहे आणि दोन्ही फोटो देखील तोंपासू आहेत तेव्हा नक्की करणार.

मस्त रेसिपी , फोटोही मस्त. अस्मिताचा फोटोही मस्त.

बटाट्याच्या भाजीत बेसन हे माझ्यासाठी नविन आहे >>> अगदी अगदी.

मीही अनुसारखी आधी बाहेर खाऊन बघेन.

Pages