जुनी कुटुंबपद्धती विरुद्ध आधुनिक कुटुंबपद्धती?

Submitted by ऋन्मेऽऽष on 15 November, 2021 - 10:25

आज मायबोलीवर आलो आणि दोन धागे नजरेस पडले.
दोन्हींचा सारांश असा होता की,
रात्रीच्या जेवणासाठी बऱ्याचदा अमुक तमुक पदार्थच केले जातात कारण त्याने वेळेची बचत होते.

पण ही वेळेची बचत का करावी लागते?

म्हणजे बॅचलर असाल तर ठिक आहे. दिवसभर काम करायचे आणि रात्री घरी आल्यावर पुन्हा जेवण बनवायचे, मग स्वयंपाकघर आवरायचे, भांडी घासायची, ती जागेवर लावायची वगैरे वगैरे.. आता चांगले कमावत असाल तर काही कामांसाठी मदतनीस ठेऊ शकतोच. पण त्यातही स्वयंपाकासाठी कोणी ठेवायचे म्हटल्यास सतरा अडचणी आणि प्रत्येकाच्या अठरा आवडीनिवडी असतात. त्यामुळे लोकं ईतर धुणीभांडी आणि साफसफाईला मदतनीस ठेवतात, पण स्वयंपाकाचे स्वतःच काहीतरी करण्याकडे कल असतो. त्यात सध्याच्या स्पर्धेच्या युगात आणि धकाधकीच्या आयुष्यात दिवसभर शारीरीक आणि मानसिक थकवा येणारे काम केल्यावर रात्री पुन्हा जाऊन स्वयंपाक करणे जीवावर येतेच.

आता या प्रॉब्लेमवर पूर्वी खूप सोपे सोल्युशन होते. छानपैकी लग्न करावे. जेवणाची चिंता बायकोवर सोडून द्यावी आणि घर चालवायला पैसे कमवायची जबाबदारी नवर्‍याने घ्यावी. दोघांनीही आपापले ईगो न कुरवाळता एकमेकांच्या कामाचा आदर करत मजेत राहावे. थोडक्यात याबाबतीत आपली जुनी कुटुंबपद्धतीच बेस्ट होती.

पण सध्या नवराबायको दोन्ही कमावू लागल्याने हे जेवणाचे हाल सुरू झालेत लोकांचे. दुपारचे एकवेळचे जेवण बाहेरच होते तर रात्रीच्या एकवेळच्या जेवणाला असे शॉर्टकट शोधावे लागतात. संध्याकाळी चहा कोण करणार यावरून मारामार्‍या होतात त्या वेगळ्याच.. रोजच्या पोहे, उपमा, घावणे, ईडल्या वगैरे नाश्त्याची बोंबच, बाहेरूनच वडे समोसे मागवले जातात किंवा पावाच्या दोन तुकड्यामध्ये कच्च्या भाज्या कोंबून काहीतरी पौष्टीक खातोय म्हणून मनाचे समाधान करावे लागते.

तरीही आधुनिकता जपायचीच असेल तर उलटे करावे. पत्नीने कमवायची जबाबदारी घ्यावी आणि पतीने स्वयंपाकघराचा ताबा घ्यावा. पण नाही. जो कमावतो त्यालाच या समाजात मान मिळतो अशी काहीशी भावना मनात असल्याने आणि चार बूकं शिकलोय तर ते शिक्षण न कमावता फुकट कसे घालवणार या विचाराने स्त्री किंवा पुरुष कोणीही याबाबत मागे हटायला तयार नसतो आणि मग जेवणखाण्याबाबत कॉम्प्रोमाईज करण्याला पर्याय उरत नाही.

याऊपर जेव्हा दोन माणसे घराबाहेर कमवायला पडतात तेव्हा दुप्पट वा जास्त प्रदूषण करतात, निसर्गाचे जास्त रिसोर्सेस वापरतात ते वेगळेच. पण हे करून मिळते काय? तर दुप्पट कमाई? पण एकवेळच्या जेवणाची घिसाडघाई? कुटुंब वाढल्यावर मुले झाल्यावर हे प्रॉब्लेम्स आणखी वाढतात. आता काय डिटेल देत बसणार. ही तर घर घर की कहाणी आहे.

बघा अगदीच बेसिक आहे.
जसे क्रिकेटच्या संघात बॅटसमन आणि बॉलर दोन्ही आपापले काम चोख बजावणारे असतील तरच त्याला संतुलित संघ म्हणतात. सारेच प्लेअर बॅटींगला हावरे झाले आणि आम्ही रन्स बनवायचे कामच करणार असेच बोलू लागले. तर जगातले सर्वोत्तम अकरा फलंदाज घेऊनही ती टीम कधीच सामना जिंकू शकणार नाही.

आपली कुटुंबपद्धतीही या काळात अशीच होत चालली आहे. म्हणायला आपण म्हणतोय की प्रत्येकाने अष्टपैलू बनावे (कमवायला आणि स्वयंपाक करायला दोन्ही शिकावे), पण प्रत्यक्षात फॅक्ट हे आहे की सर्वांना फलंदाजीची (कमवायची) हाव सुटली आहे, गोलंदाजीची (स्वयंपाकाची) जबाबदारी कोणी खांद्यावर घ्यायला तयार नाही.

जर समाजात जगतानाही आपण आपले धान्य आपण पिकवत नाही, ते काम शेतकर्‍यांवर सोडतो. आपण आपला ईंजिनीअरींगचा जॉब करतो, आपल्या आरोग्याची काळजी करायची जबाबदारी डॉक्टरांवर सोडतो, मुलांना शिकवायची जबाबदारी शिक्षकांवर सोडतो, सार्वजनिक जागांची काळजी घ्यायला प्रशासनाची निवड करतो.... तर मग घर चालवताना, एक कुटुंब म्हणून जगताना अशी विभागणी टाळायचा अट्टाहास का दिसतो..

हो, आता अपवाद असतील. ते दाखवायची चढाओढही लागेल. पण थांबा. शांतपणे विचार करा. आणि प्रामाणिकपणे सांगा. आपली जुनी जीवनपद्धती, जुनी कुटुंबव्यवस्थाच योग्य नव्हती का? दोघांपैकी एकाने कमवावे, आणि एकाने घर सांभाळावे.. आणि आज जे आहे, तो आपला नाईलाज आहे, गोड मानून घ्यावे लागतेय.

तळटीप - धागा कोणीही वैयक्तिक घेऊ नये. कोणावर हे आरोप नाहीत. कोणाला यात दोष द्यायचा हेतू नाही. सध्या आजूबाजूला जे बघतोय आणि जे एकेकाळी जगलोय, त्यातील भेद प्रामाणिकपणे मांडायचा हा एक प्रयत्न आहे ईतकेच.

धन्यवाद,
ऋन्मेष

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हे मान्य आहे की नाही ??? >>> नाही..
आजकाल फक्त कपल, स्त्री + पेट, पुरुष + पेट या सुद्धा फॅमिली म्हणूनच consider होतात..

इथे किती लोकांना मुल च नाहीत.
हा एक प्रश्न ..
आणि दुसरा प्रश्न आई वडील ह्यांच्या एक रुपयाचा उपयोग न करता किती लोक स्वतःच्या पायावर उभी आहेत.
आणि उप प्रश्न आई वडिलांची संपत्ती जबाबदारी घेत नाही म्हणून किती लोकांनी ती सरकार नी ताब्यात घ्यावी असे प्रतीज्ञा पत्र सादर केले आहे.

एकदा कुटुंब कसे निर्माण होते हे माहीत झाले की समस्या काय येतील त्या वर चर्चा करता येईल. >>> मायबोलीवर? आयडी उडतील धडाधडा.

माहीती करून घ्यायचेच असेल तर थोर समाजसेवक कूंद्रा शेट यांनी भाबड्या लोकांसाठी बनवलेले अनुबोधपट पहा.

अती श्रीमंत आर्थिक गटात आई ,वडिलांची पूर्ण जबाबदारी घेतली जाते हे मी स्वतः बघितले आहे.
अती गरीब घरात पण घेतली जाते .
अब्जापती असणारा उद्योगपती आई ला रोज wheel chair var स्वतः फिरविणारा उद्योगपती मी बघितला आहे.
शेवटच्या क्षणी आई चे डोके mandi वर घेवून रात्र भर जागा राहणार कुबेर पुत्र मी बघितला आहे.
मध्यम आर्थिक गट असणाऱ्या समाजात च सर्व क्रांतिकारी आहेत.

व्हिलचेअरवरुन फिरवायचं तर तीर्थश्रेत्रे अ‍ॅक्सेसिबल पाहिजेत. आमच्या मुंबईचे साधे फुटपाथ अ‍ॅक्सेसिबल नाहीत, पुण्यात तर फुटपाथच नाहीत. अब्जावधीला कावडीतून तीर्थयात्रा करताना बघितलं आहे का ते आधी सांगा! बरं कावडीतुन जायचं म्हणजे आई/ बाप दोघे पाहिजेत. एखादा गचकला की कावड उलटी! गोविंदा! ओह्ह्ह्ह... म्हातार्‍यांना एकटं सोडू नये म्हणतात ते का? हे आत्ता ध्यानात येतंय माझ्या! कावडीत लोड बॅलंसिंग हा आपल्या पूर्वजांचा पॉईंट ध्यानातच नाही आला.
बरं उद्या अर्धा लिटर जास्त घाला रतिबात!

var स्वतः फिरविणारा उद्योगपती मी बघितला आहे.
शेवटच्या क्षणी आई चे डोके mandi वर घेवून रात्र भर जागा राहणार कुबेर पुत्र मी बघितला आहे.>>> आमच्या ठेल्यावर येणाऱ्या एका पोलीसाने पण बंदोबस्तावर अनेक थोरा मोठ्यांना कुणा कुणाला मांडीवर घेताना पाहिले आहे.

अमितव
ती तुमची मध्यान वर्गीय मुंबई आहे.अती श्रीमंत लोकांची मुंबई वेगळी आहेत तिथे फूटपाथ पण आहेत आणि ते मोकळे पण आहेत
वेगळ्याच दिशेने तोंड करून चालणारे फक्त
काहीच लोक असतात.
ते खूप क्रांतिकारी विचाराचे,स्त्री मुक्ती,मुक्त समाज असल्या विचाराने प्रेरीत असतात.
त्यांचे पाठीराखे पण मर्यादित च असतात.
कुटंब व्यवस्था ही अत्यंत गरजेची आहे.कुटुंब व्यवस्था अयोग्य आहे असे जेव्हा जाणवेल तेव्हा मुलांना जन्म देणे हे वाईट समजले जाईल.
मुल च नको असा विचार करणाऱ्या लोकांची संख्या आता वाढत आहे .
ते त्याच कारणाने.
कुटुंब नको ह्या पेक्षा मुल च नको.
हा विचार जास्त योग्य आहे.
पृथ्वी वर असणारी माणसाची खोगीर भरती कमी होईल ..
माणसांच्या अती संख्येमुळे खूप समस्या निर्माण झाल्या आहेत त्या कमी होतील.मुक्ती वाल्या विचाराच्या लोकांनी मनात घेतले तर पृथ्वी मानव मुक्त होईल.
आणि बाकी प्राणी मत्रांचे भले तरी होईल.

मग नवर्‍याने घरी बसावे वगैरे शकली लढवल्या गेल्यात पण तसे होत नाही/ होणार नाही हे तुम्हालाही माहीत आहे.
>>>>

हा विश्वासच घातक आहे.
पुरुषांना पर्याय तर द्या की तुम्ही घरी बसा आणि घर सांभाळा. मी दोघांसाठी कमावते. पर्याय न देताच असा कोणी पुरुष तयार होणारच नाही असे कसे म्हणता? मी माझ्या स्वत:च्या अनुभवावरून सांगतो की मी एका पायावर नाचत नाचत तयार झालो असतो.

कुटुंब नको ह्या पेक्षा मुल च नको.
हा विचार जास्त योग्य आहे.
>>>

याबाबत प्रत्येकाचे अनुभव आणि मत वेगळे असू शकते.
मला बरेचदा वाटते की आपल्या समाजात नवरा बायको यांनी सोबत एकत्र राहण्यापेक्षा गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड या नात्यातच वेगवेगळे राहावे. पण तेच मुले मात्र चोवीस तास सोबत राहिली तरी मला काही प्रॉब्लेम नाही. ते आवडेलच.

एकतर ते एकाच पार्टनरसोबत आयुष्य काढणे हे तितकेसे नैसर्गिक नाही. एकापेक्षा जास्त व्यक्तींबाबत ओढा वाटतो मनुष्याला. म्हणजे हे नातेच मुळात एका बंधनासारखे आहे. त्यात चोवीस तास एकत्र राहणे याने नीरसता आणखी वाढत जाते.

कुटुंब नको ह्या पेक्षा मुल च नको.
हा विचार जास्त योग्य आहे.
>>>

याबाबत प्रत्येकाचे अनुभव आणि मत वेगळे असू शकते.
मला बरेचदा वाटते की आपल्या समाजात नवरा बायको यांनी सोबत एकत्र राहण्यापेक्षा गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड या नात्यातच वेगवेगळे राहावे. पण तेच मुले मात्र चोवीस तास सोबत राहिली तरी मला काही प्रॉब्लेम नाही. ते आवडेलच.

एकतर ते एकाच पार्टनरसोबत आयुष्य काढणे हे तितकेसे नैसर्गिक नाही. एकापेक्षा जास्त व्यक्तींबाबत ओढा वाटतो मनुष्याला. म्हणजे हे नातेच मुळात एका बंधनासारखे आहे. त्यात चोवीस तास एकत्र राहणे याने नीरसता आणखी वाढत जाते.

ऋनमेष.
लग्नच नको हा पण योग्य पर्याय आहे लैंगिक गरज स्त्री आणि पुरुष दोघांना आहे.
लग्नाचा पहिलं हेतू च लैंगिक भावना शांत करण्याची सोय करणे ही आहे
लग्न च नको .हे पटले.
मग ना पुरुषांचा स्त्री वर,स्त्री च्या संपत्ती वर हक्क असेल.
ना स्त्री चा पुरुषावर ना त्याच्या संपत्ती वर हक्क असेल.
दोघात फक्त शारीरिक संबंध ना मान्यता देणारा करार असेल
बाकी काहीच संबंध नसेल.
हे सर्वात योग्य.

कुटुंब चा मूळ पाया ही लैंगिक गरज भागवी म्हणून लग्न..
आणि मानव जात पुढे वाढावी म्हणून मुलांचे संगोपन करण्याची समाजमान्य व्यवस्था हा आहे.
लग्न आणि कुटुंब हे दोन्ही पर्याय नाकारले तर.
लैंगिक गरज भागविण्यासाठी करार किंवा कृत्रिम साधनांची निर्मिती हा पर्याय आहे.
मुलांचे संगोपन घेण्याची जबाबदारी कोणी घ्यायची हा गंभीर प्रश्न उभा राहू शकतो जेव्हा कुटुंब ही व्यवस्था नसते.
स्त्री ला पण मुल अडचण वाटतात आणि पुरुषांना पण अडचण वाटतात.
त्या मुळे मुल च नको.हे बेस्ट.

डोळे उघडे ठेवून बघितले तर समाजात ८० टक्के स्त्रिया कुटुंब व्यवस्था सर्व मान्य आहे ह्याचा फायदा घेवून पुरुषाच्या संपत्ती वर ऐश करत आहेत
.
एक वर्ष नाही झाले लग्न होवून की पुरुषाच्या संपत्ती मध्ये हक्क गाजवत आहेत
काहीच कामाची नसणारी कार्टी आईवडिलांच्या संपत्ती वर ऐश करत आहेत.
हे फक्त कुटुंब व्यवस्था आहे म्हणूनच शक्य आहे.
नाही तर बिलकुल शक्य नाही.
प्राचीन कुटुंब व्यवस्था ही आदर्श च होती.
मुल,वृध्द सर्वांची व्यवस्था त्या मध्ये लागत होतो.
गोऱ्या युरोपियन देशात १९७० च्या दरम्यान
फॅशन आली
कुटुंब फक्त नवरा आणि बायको ह्यांचेच.
त्याची फळं तिकडे मिळायला सुरुवात नक्कीच झाली असेल आणि काळ्या लोकं ना गोरे जे करतात ते मॉडर्न वाटत.म्हणून आपले भारतीय त्या दिशेने जात आहेत.
गोरे परत झटके बसल्यावर एकत्र कुटुंब कडे वळले की आपले भारतीय पण त्या नंतर ५० वर्षांनी एकत्र कुटुंब कडे येणार
.

जपून पोस्टी टाक रे भावा, केक ऐवजी तूच ओव्हनमध्ये जायचा... Wink
>>>>

घाबरू नका ताई, मी जे मायबोलीवर पोस्टी टाकतो त्याला माझी बायकोही सिरीअसली घेत नाही Wink

जोक्स द अपार्ट>>> हा वाक्प्रचार जोक्स अपार्ट असा आहे यात द ची जरुरी नाही.

नाही..
आजकाल फक्त कपल, स्त्री + पेट, पुरुष + पेट या सुद्धा फॅमिली म्हणूनच consider होतात. >>+१००

मला वाढायच्या होत्या पण आधी चहा पोस्ट आली, लगेच खाली गुजराथी माणूस पोस्ट आली... म्हणलं तवा तापायच्या आत चॅनल बदलून जावं दुसरीकडे .... Happy

ह्याच धाग्यावर पुढील चर्चा-
गफे बॉफे म्हणुन रहाणे योग्य की कसे?
लग्न केल्याचे फायदे तोटे
मुलं जन्माला घातल्याचे फायदे तोटे
मुलं नसल्याचे फायदे तोटे

गरम चपात्या कमी कराव्या लागतील हा एक फायदा दिसतोय

थोडक्यात गरम चपात्या करायच्या आधी चर्चासत्र भरवणे मस्ट असल्याचे पटले.
चपात्या बनवण्यापूर्वी चपाती जुनी कि आधुनिक बनवायची, कुठल्या कुटुंबव्यवस्थेत चपाती छान बनते, कुठल्या कुटुंबव्यवस्थेत चपाती झटपट बनते, कुठल्या कुटुंबव्यवस्थेत चपात्या बनवण्याचा कंटाळा येत नाही या मुद्द्यांना हात घालण्याआधी..
कुटुंब म्हणजे काय हे निश्चित केले पाहीजे. कुटुंबात बाळाचा जन्म कसा होतो, लग्न म्हणजे काय, लैंगिक सुख आनि लग्न, लग्न हवे की मूल, दोन्ही नको असल्यास कोणते करार केले पाहीजेत.
हे एकदा माहीत झाले की कुटुंबाकडे वळावे. मग कुटुंबात कोण कोण सदस्य असू शकतात.
पेट सुद्धा सदस्य असतात तर गेंडा आणि पाणघोडा का नाही ?
अशा पद्धतीने नीरक्षीरविवेकाने चर्चा करून सगळं महाज्ञान मिळाले की मगच चपाती बनवायचा विचार मनात आणावा. एकदा का चपाती बनवायचे ठरले की मग कुणी बनवावी यावर खल करावा. जर एखाद्यावरच ती जबाबदारी पडणार असेल तर आधुनिक कुटुंब व्यवस्था की जुनी यावर खल करावा. आधुनिक व्यवस्था हवी असेल तर मग दोघांनीही चपाती करावी पण तिची चव एकसारखी असायला हवी.
एकदा का या पद्धतीचे स्टँडर्डायझेशन करून घेतले की मग..
हुश्श
कुणीतरी एकाने गरम गरम चपाती बनवावी आणि
सात दिवस उपासमारीने आनि चर्चेने गारठलेल्या कुटुंबाने ती खावी.

लग्न हे काही पतीची किंवा पत्नीची पूजा करण्यासाठी नसते. याबाबतीतले सर्वच गैरसमज दूर झाले आहेत.
अजूनही कुणाचे कुटुंब, लग्न याबद्दल गैरसमज असतील तर कळवा. इथले एक सदस्य फुल्ली चार्ज्ड आहेत.

तसेच मागच्या अशा विषयांवरच्या धाग्यांवर कुणाचे मुद्दे खोडून काढले गेले असतील, मुद्दे मांडायला भय वाटले असेल तर आपले ठसठसणारे मुद्दे मांडण्यासाठी या धाग्याचा लाभ घ्या. त्या वेळचे आयडीज अनुपस्थित आहेत किंवा उडाले आहेत. एकदाच काय ते मुद्दा मांडून खोडला न जाण्याचा आनंद घ्या.
धाग्याचा फायदा अशा सर्वांसाठीच.

Pages