जुनी कुटुंबपद्धती विरुद्ध आधुनिक कुटुंबपद्धती?

Submitted by ऋन्मेऽऽष on 15 November, 2021 - 10:25

आज मायबोलीवर आलो आणि दोन धागे नजरेस पडले.
दोन्हींचा सारांश असा होता की,
रात्रीच्या जेवणासाठी बऱ्याचदा अमुक तमुक पदार्थच केले जातात कारण त्याने वेळेची बचत होते.

पण ही वेळेची बचत का करावी लागते?

म्हणजे बॅचलर असाल तर ठिक आहे. दिवसभर काम करायचे आणि रात्री घरी आल्यावर पुन्हा जेवण बनवायचे, मग स्वयंपाकघर आवरायचे, भांडी घासायची, ती जागेवर लावायची वगैरे वगैरे.. आता चांगले कमावत असाल तर काही कामांसाठी मदतनीस ठेऊ शकतोच. पण त्यातही स्वयंपाकासाठी कोणी ठेवायचे म्हटल्यास सतरा अडचणी आणि प्रत्येकाच्या अठरा आवडीनिवडी असतात. त्यामुळे लोकं ईतर धुणीभांडी आणि साफसफाईला मदतनीस ठेवतात, पण स्वयंपाकाचे स्वतःच काहीतरी करण्याकडे कल असतो. त्यात सध्याच्या स्पर्धेच्या युगात आणि धकाधकीच्या आयुष्यात दिवसभर शारीरीक आणि मानसिक थकवा येणारे काम केल्यावर रात्री पुन्हा जाऊन स्वयंपाक करणे जीवावर येतेच.

आता या प्रॉब्लेमवर पूर्वी खूप सोपे सोल्युशन होते. छानपैकी लग्न करावे. जेवणाची चिंता बायकोवर सोडून द्यावी आणि घर चालवायला पैसे कमवायची जबाबदारी नवर्‍याने घ्यावी. दोघांनीही आपापले ईगो न कुरवाळता एकमेकांच्या कामाचा आदर करत मजेत राहावे. थोडक्यात याबाबतीत आपली जुनी कुटुंबपद्धतीच बेस्ट होती.

पण सध्या नवराबायको दोन्ही कमावू लागल्याने हे जेवणाचे हाल सुरू झालेत लोकांचे. दुपारचे एकवेळचे जेवण बाहेरच होते तर रात्रीच्या एकवेळच्या जेवणाला असे शॉर्टकट शोधावे लागतात. संध्याकाळी चहा कोण करणार यावरून मारामार्‍या होतात त्या वेगळ्याच.. रोजच्या पोहे, उपमा, घावणे, ईडल्या वगैरे नाश्त्याची बोंबच, बाहेरूनच वडे समोसे मागवले जातात किंवा पावाच्या दोन तुकड्यामध्ये कच्च्या भाज्या कोंबून काहीतरी पौष्टीक खातोय म्हणून मनाचे समाधान करावे लागते.

तरीही आधुनिकता जपायचीच असेल तर उलटे करावे. पत्नीने कमवायची जबाबदारी घ्यावी आणि पतीने स्वयंपाकघराचा ताबा घ्यावा. पण नाही. जो कमावतो त्यालाच या समाजात मान मिळतो अशी काहीशी भावना मनात असल्याने आणि चार बूकं शिकलोय तर ते शिक्षण न कमावता फुकट कसे घालवणार या विचाराने स्त्री किंवा पुरुष कोणीही याबाबत मागे हटायला तयार नसतो आणि मग जेवणखाण्याबाबत कॉम्प्रोमाईज करण्याला पर्याय उरत नाही.

याऊपर जेव्हा दोन माणसे घराबाहेर कमवायला पडतात तेव्हा दुप्पट वा जास्त प्रदूषण करतात, निसर्गाचे जास्त रिसोर्सेस वापरतात ते वेगळेच. पण हे करून मिळते काय? तर दुप्पट कमाई? पण एकवेळच्या जेवणाची घिसाडघाई? कुटुंब वाढल्यावर मुले झाल्यावर हे प्रॉब्लेम्स आणखी वाढतात. आता काय डिटेल देत बसणार. ही तर घर घर की कहाणी आहे.

बघा अगदीच बेसिक आहे.
जसे क्रिकेटच्या संघात बॅटसमन आणि बॉलर दोन्ही आपापले काम चोख बजावणारे असतील तरच त्याला संतुलित संघ म्हणतात. सारेच प्लेअर बॅटींगला हावरे झाले आणि आम्ही रन्स बनवायचे कामच करणार असेच बोलू लागले. तर जगातले सर्वोत्तम अकरा फलंदाज घेऊनही ती टीम कधीच सामना जिंकू शकणार नाही.

आपली कुटुंबपद्धतीही या काळात अशीच होत चालली आहे. म्हणायला आपण म्हणतोय की प्रत्येकाने अष्टपैलू बनावे (कमवायला आणि स्वयंपाक करायला दोन्ही शिकावे), पण प्रत्यक्षात फॅक्ट हे आहे की सर्वांना फलंदाजीची (कमवायची) हाव सुटली आहे, गोलंदाजीची (स्वयंपाकाची) जबाबदारी कोणी खांद्यावर घ्यायला तयार नाही.

जर समाजात जगतानाही आपण आपले धान्य आपण पिकवत नाही, ते काम शेतकर्‍यांवर सोडतो. आपण आपला ईंजिनीअरींगचा जॉब करतो, आपल्या आरोग्याची काळजी करायची जबाबदारी डॉक्टरांवर सोडतो, मुलांना शिकवायची जबाबदारी शिक्षकांवर सोडतो, सार्वजनिक जागांची काळजी घ्यायला प्रशासनाची निवड करतो.... तर मग घर चालवताना, एक कुटुंब म्हणून जगताना अशी विभागणी टाळायचा अट्टाहास का दिसतो..

हो, आता अपवाद असतील. ते दाखवायची चढाओढही लागेल. पण थांबा. शांतपणे विचार करा. आणि प्रामाणिकपणे सांगा. आपली जुनी जीवनपद्धती, जुनी कुटुंबव्यवस्थाच योग्य नव्हती का? दोघांपैकी एकाने कमवावे, आणि एकाने घर सांभाळावे.. आणि आज जे आहे, तो आपला नाईलाज आहे, गोड मानून घ्यावे लागतेय.

तळटीप - धागा कोणीही वैयक्तिक घेऊ नये. कोणावर हे आरोप नाहीत. कोणाला यात दोष द्यायचा हेतू नाही. सध्या आजूबाजूला जे बघतोय आणि जे एकेकाळी जगलोय, त्यातील भेद प्रामाणिकपणे मांडायचा हा एक प्रयत्न आहे ईतकेच.

धन्यवाद,
ऋन्मेष

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आर्थिक स्थैर्यासाठी अनेक गोष्टी आवश्यक असतात. त्यातली पहिली आवकीचे बहुविध मार्ग (उदा: दोघे जोडीदार मिळवते असणे, किंवा एक मिळवता/ती आणि अन्य पॅसिव्ह इंकम). मिळकतीचे मार्ग अनेक असले तरी खर्च कसा करावा हे योग्य अशा आर्थिक सल्लागाराकडून शिकणे जरूरी आहे. दोघांच्या इंकंम मध्येच काय तर, मुले कामाला लागली नि चौघांच्या इंकम मध्येही भागेनासे झाले असेही होऊ शकते. मात्र त्याला उत्तर मग एकाच्याच इंकम मध्ये भागवू नि गरम पोळी खाऊ हे ठरत नाही. मिळकतीचे मार्ग बहुविध असणे हितावह आहे.

मी अजून हक्काबक्का मोडमधेच आहे. पुन्हा एकदा -
१. कामाची विभागणी - इन्स्टंट स्वयंपाक की मदतनीस ?
२. की आधुनिक कुटुंब विरूद्ध पारंपारिक कुटुंबपद्धती ?
आता असे सांगितले आहे की नं २ हाच धाग्याचा विषय आहे. मग इन्स्टंट स्वयंपाक किंवा स्वयंपाकाचा कंटाळा आणि क्र. २ चा संबंध लक्षात आला नाही. कंटाळा तर दोन्हीकडे येतो.
कामाची विभागणी आणि स्त्री पुरूष समानता असा विषय आहे का ?
मग आर्थिक स्थैर्याचा विषय कुठून आला ?

एकता कपूरच्या मालिकेप्रमाणेच धाग्याचा विषय नेमका काय हे कळेनासे झाले आहे. कदाचित मला एकट्यालाच हा प्रॉब्लेम येत असेल. धागाकर्त्याने मोठ्या मनाने अज्ञानी बालक म्हणून समजावून सांगितले तर आभारी राहीन.

हे सगळे वाचल्यावर (का)असे वाटते की, रुन्मेषला वेळ न जाण्याचा त्रास असावा. कोणीही काहीही मुद्दा लिहुदे तो फक्त तो मुद्दा खोडून काढण्यासाठी हातभर पोस्ट लिहितो आणि नवच काहीतरी पुढे ढकलतो.
माबो वापरणारे सगळे जण बऱ्यापैकी सुशिक्षित आणि आर्थिक दृष्ट्या स्थैर्य मिळवलेले आहेत, त्यांच्या घरात कोणी, कधी, कशी पोळी करावी आणि त्याचे साहित्य कोणी आणावे हे आपापल्या सोईनुसार जमवलेले आहे. त्यामुळे ह्या दळणाचा उपयोग कळला नाही.

Submitted by अमितव on 17 November, 2021 ->>+1 आख्खा प्रतिसाद पटला.

Submitted by अमितव on 17 November, 2021 ->>+1 आख्खा प्रतिसाद पटला. >> +७८६

जेव्हा मी करणार असेन तेव्हा मला कोणी गार खाल्लेली आवडत नाही. त्यामुळे बळजबरीने त्यांना गरम खायला घालतो.
>>>
स्पेशली हे,
मी सुद्धा जेव्हा मॅगी/पास्ता करतो वा गरमागरम चहा-कॉफी लोकांना देतो तेव्हा मलाही लोकांनी ते गरमागरम असतानाच खावे-प्यावे असे वाटते. आई काही काम करत असेल तर तिला हाताला धरून खेचून आणतो. हे बहुधा सर्वांशीच होत असावे. आपण कोणासाठी काही करतोय त्याचा समोरच्याने योग्य प्रकारे आस्वाद घेतला तरच आपल्या मेहनतीचे चीज झाले हा यामागे विचार असावा.
म्हणून याचाच उलटा विचार करून कोणी आपल्यासाठी जेवण करत असेल तर ते सुद्धा आपण गरमागरम खाणे हे आपले कर्तव्य आहे Happy

आर्थिक स्थैर्यासाठी अनेक गोष्टी आवश्यक असतात. त्यातली पहिली आवकीचे बहुविध मार्ग
>>>>
आपली सारी अंडी एकाच बास्केटमध्ये असू नयेत हा इन्वेस्टमेंटचा फंडा ईथेही लागू आहे हे मान्य. एकानेच कमावते असले तर तो सोर्स डगमगला तर अवघड होते. पण हेच एकाने कमावून ते सारे न उधळता त्यातील काही हिस्सा प्रॉपर इन्वेस्ट करून त्या इन्वेस्टमेंटलाच संकटकाळात मिळकतीचा दुसरा मार्ग बनवता येते. मी मुंबईला राहायचो तिथेही आणि आता ईथेही आजूबाजूचे बरेच गुजराती धंदेवाईक बघतो ते हेच करतात. सारेच कमवायच्या भानगडीत पडत नाहीत त्यांच्यात.

त्या बायकोने मदत केलेले पैसे परत नाही दिले? अजबच आहे! >>> कश्याला देईल, कुठून देईल, आणि कोण मागायला जाणार, आणि कोण ते चाळीस पन्नास जणांना कोणी किती दिले हे बघून परत करणार.
अर्थात मला यात काही पोटदुखी नाही. फक्त एक मुद्दा म्हणून जाणवले की आपले स्टेटस, आपल्या मुलांचे स्टेट्स आपणच बनवतो आणि त्या बेंचमार्कवर मग आपल्यावर गरीबी आलीय/आर्थिक संकट आलेय हे ठरते..

मुलाचा जन्म झाला की कुटुंब सुरू होते.
प्राथमिक स्तरावर आई,वडील आणि मुल हे कुटुंब असते.
मुलांची संख्या एक पासून पुढे पाच सहा पर्यंत पण असते.
मुली लग्न होवून सासरी जातात मुलांचे लग्न होवून सून घरी येते.
मुलांचे संगोपन हे खूप कष्टाचे काम आहे आई वडील करतात.
बाकी प्राण्यांची मुल जन्म झाल्या बरोबर जास्तीत जास्त सहा महिन्यात स्वतःच्या पायावर उभी राहतात ,.स्वलंबी होतात.
नालायक माणसाची मुल स्वावलंबी होण्यासाठी कमीत कमी २५ वर्ष लागतात.
तो पर्यंत ती पूर्णतः आई वडिलांवर अवलंबून असतात.
.
.
.आता पॉइंट.
१) भारतात ही समस्या नवीन आहे आता वीस पंचवीस वर्षे झाली असतील युरोपियन हवा भारतात पोचली आहे.
त्या अगोदर एकत्र कुटुंब नसले तरी एकत्र कुटंब व्यवस्था होती जबाबदारी घेतली जायची.
मुलांची पण आणि वृद्धांची पण.
मुल आणि वृद्ध ह्या मध्ये काही फरक नाही दोन्ही पण परावलंबी च असतात.
२) युरोपियन देशात ही समस्या निर्माण झाली त्याची करणे.
* मुली घर सांभाळत होत्या त्या कमावण्यासाठी बाहेर पडलीय.
स्त्री मुक्ती चे भूत.
* समलिंगी विवाह.
कोणी कोणाच्या आई वडील ची जबाबदारी घ्यायची हा प्रश्न इथे उभा राहतो.
* Single parents.
स्वतःच्या पार्टनर शिच मतभेद ( ही व्यक्ती सर्वात जवळची असते तिच्या शी शारीरिक संबंध येतात) त्या मुळे diverse .
सिंगल parent कुटुंबात आई वडिलांना कोण बघणार.
ह्या सर्व समस्या युरोप मध्ये १९७० दरम्यान सुरू झाल्या .
त्यांनी ह्या समस्या कशा सोडवल्या ते बघितले पाहिजे.
भारतात आता वीस वर्ष पासून ह्या समस्या आहे गोऱ्यांचे अनुकरण करणे हे कळ्यांचे सौभाग्य च असते.
लहान मूल आणि वृद्ध हे हवेत का?
लहान मूल आणि वृद्ध हवे असतील .
तर त्यांची जबाबदारी कोणाची?
वारसा हक्क कायदा पूर्ण रद्द करणे गरजेचे आहे का?,
अंबानी ची सर्व संपत्ती सरकार जमा होईल त्या संपत्ती वर मुलांना दावा करता येणार नाहीच.
पण त्यांना ती बिलकुल मिळणार पण नाही अशा प्रकारचे कायदे करणे काळाची गरज आहे.
वृध्द ही जर समस्या असेल तर वारसा हक्क कायदा पूर्ण बदलून प्रतेक पिढी ची संपत्ती मुलांना मिळणार नाही तर सरकार जमा होईल हा कायदा असणे गरजेचे आहे.
पंचवीस वर्ष पर्यंत करोडो खर्च करून मुलांना शिकवले जाते हेच उपकार आहेत ते स्वतः संपत्ती निर्माण करतील.

वृध्द लोकांची काळजी कोण घेणार?
हा प्रश्न असेल तर सोपा उपाय आहे.
EPFO सारखी संस्था सरकार नी निर्माण करावी
आणि संपत्ती चे हक्क फक्त एकच पिढी पर्यंत मर्यादित ठेवावेत त्या नंतर गरीब असो नाही तर अब्जो पती तो वृध्द झाल्या नंतर सर्व त्यांची संपती त्या संस्थेकडे जाईल आणि ती संस्था त्या बदल्यात वृद्धांचे संगोपन करेल.
नवीन पिढी शून्य पासून संपत्ती निर्माण करतील.
वारसा हक्क नी वयाच्या २५ वर्ष नंतर त्यांना एक पैसा पण मिळणार नाही
.
हाच ह्या समस्येवर उपाय आहे.

अरे वा ! वृद्धांनी पण उडी घेतली वाटतं मालिकेत. त्यांचं तरी काय चुकलं म्हणा ?
वळेल तशी वळतीय कथा.
कुटुंबव्यवस्था उद्धस्त होतेय का ?
लहान मुलांच्यात का वाढतोय हिंसाचार ? इथपासून ते
पती पत्नींच्या नात्याने का ओलांडले क्षणिक सुखासाठी उंबरठे
असा कोणताही विषय येऊ शकणारा महाधागा म्हणून या धाग्याचा गौरव होऊ शकतो.
आता तरी जो कुणी या मालिकेचा मूळ विषय सांगेल त्याला बालाजी टेलिफिल्म्सचे आजीवन सदस्यत्व फ्री !
सच्ची बात !

वृध्द पणाची शेवटची दहा वर्ष आणि मुलांना स्वतःच्या हिम्मती वर जगण्यासाठी लागणारा कमीत काम काळ पंधरा वर्ष.
पहिली पाच वर्ष तर मुलांना अन्न पण मिळवणे मुश्किल आहे.
घर,पाणी,वीज,शिक्षण हे खूप दूर आहे.

काय दळण चालूये. मूळात २३-२५ + कुठल्याही व्यक्तीला स्वतःची काळजी स्वतः घेता यायलाच हवी. economically, personally आणि emotionally पण
मूल झाल्यावर ४-५ वर्षांसाठी हा मुद्दा येऊ शकतो, घरात काम जास्ती पडत; त्या काळात आई/वडील ऐकाला कमी काम किंवा ब्रेक घेता येऊ शकतो. ३० वर्षाच्या work span मंध्ये ४-५ वर्षाचा ब्रेकने फार फरक नाही पडत.
जश्या शाळा ETC सुरु होतात, मुलांना इंडिपेन्डन्ट केल तर खूप काम कमी होतात . ५ वर्ष +मुलांना भरवायची, कपडे घालण्याची, बॅग मधून डबा काढणे, SHOES ठेवणे या गोष्टी करण्याची गरज नसते. त्यांना स्वतःला हि काम करता येतात.
६० - ७०/७५ ची लोक पण असेंच स्वतःची बेसिक काम करू शकतातच. खार तर आता करतात सुद्धा.
खरं तर आपण इंडिपेन्डन्ट होत नाही हा खरा प्रॉब्लेम आहे. मग घरकाम खूप वाटत. तसही बेसिक कामांसाठी १-२ maids असतातच. स्वयंपाक ताजा आणि गरम असावा, पण कमी पदार्थ चालतात. पोळी,भाजी,सलाड/कोशिंबीर इकतच एका वेळेला आणि आमटी भात, भाजी दुसऱ्या अश्या TYP.........

दोन्ही प्रश्न एकच स्वरूपाचे आहेत.
१) कुटुंबातील वृध्द लोकांची जबाबदारी कोण घेणार..
२)कुटुंबं ह्या सज्ञे चा जन्म च मुलाच्या जन्माने होतो.
३) जन्म नाही तर कुटुंब पण नाही..
जन्म च झाला नाही तर कुटुंब अस्तित्वात असणार च नाही.

मानवी मुल स्वतःच्या हिमतीवर अन्न,पाणी,निवारा,शिक्षण ह्या सुविधा मिळवू शकत नाही.
फूट पथ वर ,रेल्वे स्थानकावर अनाध मुल असतात त्यांची अवस्था बघा.
हीच अवस्था मुलांची होईल.
पंचवीस वर्षे खाणेपिणे,राहण्याची व्यवस्था,सर्व सुख सोयी,शिक्षण साठी करोडो रुपये खर्च जी लोक करतात त्यांची पण काही अपेक्षा असते.
मुलांनी शेवटची दहा वर्ष त्यांचा सांभाळ करावा.
हाच जर प्रश्न असेल तर.
मुल च नकोत हा पर्याय बहु संख्य लोक नक्कीच स्वीकारतील.
मुलाचा जन्म आणि कुटुंब व्यवस्था निर्माण होणे ही एकच घटना आहे.
कुटुंब व्यवस्था नको तर नवीन मुलाचा जन्म पण नको.
हेच योग्य आहे.

इस्टेट सरकारजमा म्हणे

कशी करणार ?

40 वर्षे राबून अंबाणीने 100 करोड मिळवले
एखाद्या साध्या व्यक्तीने 2 च लाख शिलकीत ठेवले

दोघांचेही जमा करून मग उद्यापासून दोघांना सेम वरणभात का ?

एक माणूस संगोपनला ठेवला तर त्याचा पगार लागतो , त्यापेक्षा जर उत्पन्न जास्त कुणी मिळवत असेल तर तो तेच प्रेफर करेल

Black cat
थोडक्यात वारसा हक्कानी कोणालाच संपत्ती वर हक्क सांगता येणार नाही.
संपत्ती कमावणारा व्यक्ती मृत झाला की संपत्ती ची मालकी सरकार कडे .
मुल त्या संपत्ती ची मालक पण नाहीत आणि जो संपत्ती चा मालक आहे त्याच सांभाळ करण्याची पण त्याची जबाबदारी नाही.
असे मत व्यक्त करायचे आहे मला.

बाकी मूळ मुद्द्याबद्दल बोलायचं असेल तर अर्थातच आधुनिक पद्धतीला मत. कुटुंबातील प्रत्येकाने आर्थिक आवक करण्यासाठी काम केलंच पाहिजे. आणि प्रत्येकाने गरम पोळ्या करायला (लिटरली म्हणतोय.. फिगर्टेव्ह मी स्वयंपाक करते तू बाकीचं आवर टाईप नाही) हातभार लावलाच पाहिजे. मी जेव्हा गरम पोळी एकदा खातो तेव्हा दुसर्‍यांदा इतरांना गरम मॅगी नाही तर पोळीच देतो. स्वयंपाक येत नाही कोणी म्हटलं तर मग 'शिक आणि ते करायचं नसेल तर रहा उपाशी' शिवाय पर्याय नाही.
स्त्रीने राबायला घरात थांबणे आणि ते आवड, इच्छा, पदरमोड, आळस, कॉप्रोमाईज इ. कुठल्याही सदरात टाकायला माझा ठाम आणि स्वच्छ विरोध आहे. कारण त्याचे नकळत फारच भयानक परिणाम होतात. त्या व्यक्तीवर, पुढच्या पिढीवर आणि समाजावर. तसंच पुरुषाने बाहेर काम करणे आणि घरात डायपर बदलतो, मॅगी करतो, पोरांचे दात घासतो आणि आंघोळ घालतो आणि मग त्याची शेखी मिरवत नामानिराळा होतो याचे ही वाईट संस्कार होतात.
सो नवे ते सोनेलाच मत.

बरोबर आहे.
घरातील स्त्री,पुरुष,मुल सर्वांनी घरातील प्रतेक कामाची जबाबदारी घेतली पाहिजे.
हे सर्व करून
पुरुष आणि स्त्री ह्यांनी स्वच्छंद राहवे.
पण घरातील वृध्द लोक म्हणजे करोडो रुपये खर्च करून डॉक्टर ,इंजिनिअर, ज्यांनी बनवले आहे सर्व सुख सोयी फुकट दिल्या आहेत.
त्यांची शेवटच्या काही वर्षाची जबाबदारी नाकारता येणार नाही.
हाच तर प्रश्न आहे.
सर्व प्राणी जगतात मानवी मुल हे आधार शिवाय दोन दिवस पण जगू शकत नाही.
माणसाच्या मुलाला वीस ते पंचवीस वर्ष दुसऱ्यावर म्हणजे जन्म दात्यावर अवलंबून राहावे लागते.
मुल म्हणजे स्त्री जातीचे आणि पुरुष जाती चे दोन्ही त्या मध्ये आले.

धागा काही कळला नाही पण गरम पोळीचा बऱ्याचदा उल्लेख वाचून दादा कोंडकेच ”लाल लाल लाल तापलाय तवा, सांग पोरी चपाती भाजू कव्हा” हे असले काहीतरी गाणे आहे ते आठवले.

मी जेव्हा गरम पोळी एकदा खातो तेव्हा दुसर्‍यांदा इतरांना गरम मॅगी नाही तर पोळीच देतो.
>>>>
हे ऐकायला टिळकांच्या बाणेदार वाक्यासारखे छान वाटते पण मग त्या पोळीचा दर्जाही तोच राखता यायला हवा. जे प्रॅक्टीकली शक्य नाही. म्हणजे लग्न ठरवतानाच जितकी छान पोळी मी करतो/करते तितकीच छान तू सुद्धा करतेस/करतोस का हे बघूनच मग पुढे जावे लागेल.

पोळी हे एक उदाहरण आहे. हे प्रत्येक बाबीत लागू. पुरणपोळीच्या बदल्यातही पुरणपोळीच द्यावी लागेल तूपपोळी चालणार नाही.

किंवा मग घरात प्रत्येकाने आपापला स्वयंपाक करावा. काही गरज नाही एकमेकांसाठी करायची Happy

ऋन्मेष सर, आपका प्रॉब्लेम क्या है नक्की ? आपको क्या नेमके म्हणणेका हय वो एक बार म्हणो. म्हणजे फिर बाकीके लोग भी विषय को धरके म्हणेंगे. इधर क्या म्हणणेका वोच पत्ता नही, फिर भी लोग लिख रहे है वोच्च मेहरब्बानी हय रे बाबा. उसमे तुम गलती ढूंधरेला, उसका भी बेसच पता नही लग रहा.

पोळीची चव सर्वांची एकसारखी होण्यासाठी महत्वाच्या टीप्स.

नुकत्याच आलेल्या आदेशानुसार पोळी, पुरणपोळीची प्रत्येकाची एकसारखीच असायला हवी हे बंधनकारक झाल्याने सर्वत्र खळबळ उडालेली आहे. आदेशात म्हटल्याप्रमाणे एक सारखी चव जमत नसेल तर कुणीही स्वयंपाक बनवू नये. यामुळे सामान्य माणसापासून ते चितळे आणि हॉटेलवाले सुद्धा हैराण झाले आहेत.

यावरचा उपाय म्हणजे मेकिंगचे स्टँडर्डायझेशन करणे. पोळी बनवण्याच्या पद्धतीचे मानकीकरण झाल्यास सर्वांच्या हाताला एकच चव येईल. यासाठी एक केंद्रीय पद्धत अंमलात आणावी.

पुरणपोळी बनवण्याची मानकीकृत पद्धत

सर्व प्रथम एक पाणघोडा घ्यावा. जर आपली कुटुंबव्यवस्था जुनी असेल तारा त्याला जात्यावर दळावे. जर आधुनिक असेल तर मिक्सर ग्राईंडर / घरघंटी किंवा पिठाच्या गिरणीत जाऊन दळून आणावे. गिरणीत दळण दळणा-या ऋन्मेषला पाणघोडा जरा बारीक दळायला सांगावे.
आता गेंड्याची चटणी करतात त्याचप्रमाणे या पिठाचे पुरण बनवावे.

यानंतर गव्हाच्या पिठाची कणीक बनवावी. आता एक गेंडा घ्यावा. गेंडा कणकेच्या गोळ्यांवरून पुढे मागे रोल करावा. त्यामुळे पोळ्या पटापट लाटल्या जातात. एकदा गोल शेप आला की त्यात पाणघोड्याचे पुरण घालावे.
या पुरणपोळ्या मग शांमा यांच्या चुलींवर शेकून घ्याव्यात. झाली स्टँडर्ड पुरणपोळी तयार. याची चव व्यक्तीगणिक बदलत नाही.

>>>>>>>त्या आर्थिक मदतीचा विचार करता जाणवले की काही मध्यमवर्गीय फॅमिलीजकडून एका श्रीमंत फॅमिलीला ती सुद्धा मध्यमवर्गीय होऊ नये म्हणून ती मदत केली गेली. ईज ईट फेअर? तेच पैसे या मित्रांनी त्यांच्या ग्रूपमधील सर्वात गरीब मित्राच्या फॅमिलीला देत त्याचे हालाखीचे राहणीमान ऊंचावणे फेअर नसते का ठरले?

तुमच्यावर बळजबरी झाली होती का?

सेव्हिंग हा वेगळा मुद्दा आहे त्यावरती दुसरा धागा काढता येइल. पण आपले राहणीमान काय असावे हा संपूर्ण निर्णय त्या त्या जोडप्याचा असतो. आपण कोण तो डिक्टेट करणारे? फक्त एक कमावता असणारी जो डपी निम्न रहाणिमान असणारी नसतात आणि डिम्क कप्ल्स उच्च रहाणिमानाची असतात असेही नसते.

तुम्ही मुद्द्यांची गल्लत करताय. दोघांनी नोकरी करु नये वगैरे विचार प्रतिगामी आहेत. मग नवर्‍याने घरी बसावे वगैरे शकली लढवल्या गेल्यात पण तसे होत नाही/ होणार नाही हे तुम्हालाही माहीत आहे.

या असल्या भाकड चर्चांनी होत काही नाही. उगाच आपली मेंटल उर्जा वाया जाते. जओ तो आपल्या निर्णायाला पूरक दावे लिहीत बसतो. हेमाशेपो.

एक एक पॉइंट घेवुया.
*मुलाचा जन्म होणे हीच कुटुंब व्यवस्थेची सुरुवात आहे .
हे मान्य आहे की नाही ??? नसेल तर का मान्य नाही .
एकदा कुटुंब कसे निर्माण होते हे माहीत झाले की समस्या काय येतील त्या वर चर्चा करता येईल.

Pages