Submitted by sneha1 on 3 November, 2021 - 13:09
नमस्कार मंडळी!
माझी लेक १५ वर्षांची आहे, बॅडमिंटन खेळताना गुडघ्याला इजा झाली. MRI मधे कळले की complete ACL tear and medial meniscus tear आहे. दोन ऑर्थोपेडिक डॉ. चे मत घेतले, दोघांच्या मते सर्जरी करणे फायद्याचे राहील, त्यांच्या मते वयस्क लोकांना असे झाल्यास सर्जरी नाही केली तरी चालते, पण हिचे वय बघता ते गरजेचे आहे. तर मला असे विचारायचे आहे,
१) सर्जनची निवड कशी करावी? एकाची स्वतःची प्रॅक्टीस आहे आणि तो सगळ्या प्रकारच्या सर्जरी करतो, मध्यम वयीन आहे. दुसरा आहे तो एका मोठ्या ऑर्थोपेडिक प्रॅक्टीस मधे आहे जिथे तसे अजून १३-१४ डॉक्टर्स आहे, आणि हा फक्त गुडघा आणि खांदा ह्याचीच सर्जरी करतो. त्याचे वय आणि अनुभव दोन्ही ही जास्त आहे.
२) ह्या सर्जरी बद्ल कुणाला अजून काही माहिती असेल तर शेअर करा प्लीज.
धन्यवाद!
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
नमस्कार sneha1,
नमस्कार sneha1,
मी वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित नाही आणि मला भारताबाहेरच्या वैद्यकीय व्यावसायिकांचा अनुभवही नाही.
माझे मुद्दे असे की ---
१. ती खेळाडू आहे.
तेव्हा फक्त उठणे, बसणे, चालणे या रोजच्या हालचालीं व्यतिरिक्त खेळाशी संबंधित असे कुठले स्नायू / सांधे कसे काम करतात (जे खेळागणिक बदलतील उदा सायकलिंग, फूटबॉल, टेनिस इत्यादि ) आणि या ऑपरेशनने त्यावर काय अनुकूल / विपरीत परिणाम होतील आणि ते कसे टाळायचे याचे ज्ञान असणारा सर्जन लागेल.
Sports medicine + Ortho असा + वय /अनुभव / नैपुण्य.
मागे (बहुतेक) हर्पेन यांनीच एका गुढग्याशी संबंधित त्रासाबद्दल एका डॉ विषयी लिहीले होते.
किंवा
डॉ कौशल मल्हान फोर्टीस, मुलुंड यांचा online guidance घेता येईल. केस पाहून कदाचित ते तुम्हाला तिकडचे सुयोग्य सर्जन सुचवूही शकतील.
दोन दिवस नेमकी दिवाळीची सुटी असू शकेल आता..... प्रयत्न करा, गुडलक.
kaushal.malhan@gmail.com
Phone : +91 9820175923
२. सर्जरीबद्दल माहिती नाही.
फक्त सर्जरीनंतर recovery साठी ज्या सूचना (आरामा संबंधी) दिल्या जातील त्या तिला पाळायला लावा.
लहान वयात पडून रहाणे / मंद हालचाली करणे रूचत नाही मुलांना. पण पूर्ण recovery + टिश्यूजचे deep natural healing साठी ते आवश्यक असते. ३ महिने विश्रांती सांगितली तर महिन्याभरात 'बरे वाटतेय पण आता मला' या सबबीवर हिंडते फिरते होऊ नये, ही विनंती.
माझ्या मैत्रिणीला भरतनाट्यम करताना गुढग्याचा त्रास उद्भवला होता. ६ महिने बाथरूम व्हिजीट सोडून बाकी सगळ्याला मनाई होती. महिन्याभराने हिने कुरकुर केल्यावर डॉ इतकेच म्हणाले -- मी सांगायचे ते सांगितले आहे. आता लगेच हिंडाफिरायाला लागून आयुष्यभर मुरलेली दूख + हालचालींवर बंधने हवीत की आता संयम पाळून आयुष्यभर मजेत नृत्य करायचे, हे तू ठरव.
तुमच्या लेकीला पूर्ण अॅक्टीव्ह होऊन पुन्हा खेळू लागण्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा.
डॉ कौशल मल्हान फोर्टीस,
डॉ कौशल मल्हान फोर्टीस, मुलुंड यांचा ------- मी ही हेच लिहायला आले होते
वर कारवी यांनी हर्पेन यांच्या
वर कारवी यांनी हर्पेन यांच्या डॉक्टर बद्दल म्हटले आहे.
हर्पेनने डॉ. हिमांशु वझे यांची ट्रिटमेंट घेतली होती.
त्यांच्या प्रिस्क्रिप्शनवर त्यांची डिग्री, MBBS, M.D, Diploma in Sports Medicine (Germany) अशी आहे.
हे डॉक्टर सर्जरी शक्यतो टाळणे/ औषधं - कमीत कमी देणे यासाठी प्रसिद्ध आहेत. (मी पण यांना भेटलो होतो, हर्पेन कडुन नंबर घेऊन साध्या गुडघा प्रॉब्लेम साठी, पण मग नंतर छोटयाशा अपघाताने वेगळीच स्टोरी झाली, आता परत त्यांच्याकडे जाणार आहे एक दोन आठवड्याने.)
ACL tear बद्दल हा त्यांचा व्हिडिओ बघा. 31:30 पासून सुरू होईल, पुढे 7 मिनिट बघा.
तुमच्या मुलीची केस वेगळी असू शकते.
जर त्यांचं ओपिनियन घ्यावसं वाटलं तर त्यांच्या क्लिनिकचा कॉन्टॅक्ट नंबर: +91 20 25441512, 8408903434, 9850899211.
email: drhimanshuvaze@gmail.com
हे रिकमंडेशन नाही, त्यांचा उल्लेख आला म्हणुन माहिती देतोय.
गुडघे दुखीसाठी एकदा भेटलो, फायदा झाला एवढाच तो माझा अनुभव.
तुमच्या मुलीला पूर्ण बरे होण्यास शुभेच्छा.
धन्यवाद सगळ्यांना!
धन्यवाद सगळ्यांना!
कारवी, मी चुकीची लिहिले बहुतेक, पण माझी मुलगी मुळीही खेळाडू नाही. ती घरासमोर शेजार्यांच्या मुलींशी खेळत होती.
दोन्ही सर्जन्स स्पोर्ट मेडिसीन मधलेच आहेत. मी राहते त्या भागात तसेही फुटबॉल चे चांगलेच प्रस्थ आहे त्यामुळे असे डॉक्टर्स ही भरपूर आहेत.
मानव, मी बघीन व्हिडियो.
यांना एकदा भेटून पहाhttps:/
यांना एकदा भेटून पहा
https://www.jointandbones.in/
Common procedure आहे खूप...45
Common procedure आहे खूप...45 मिनिटात होऊन जाईल...spinal anaesthesia घ्यावा लागेल... ओव्हर the टाईम बॅक पेन वगेरे पण विचार करा...खूप खूप शुभेच्छा
तुमच्या मुलीला योग्य ते डॉ
तुमच्या मुलीला योग्य ते डॉ आणि उपचारासाठी शुभेच्छा!
शुभेच्छांसाठी धन्यवाद.
शुभेच्छांसाठी धन्यवाद.
शांत माणूस, मी अमेरिकेत आहे, त्यामुळे शक्य नाही. पण नाव ऐकले आहे.
हो, खूप लोकांनी सांगितले आहे की अगदी कॉमन प्रोसिजर आहे म्हणून!
मुळात सर्जरीची गरज आहे का?
मुळात सर्जरीची गरज आहे का? फिजिओथेरपीने उपयोग होईल का? हे विचारले का?
हो, आधी तेच विचारले.
हो, आधी तेच विचारले. लिगामेंटला थोडा tear असल्यास थेरपीचा उपयोग होईल, पण पूर्ण तुटली असल्यावर ती थेरपीने जुळू शकत नाही. तिचा लवचिक पणा पण राहत नाही.
ACL tear , meniscal injuries
ACL tear , meniscal injuries हे काय फार मोठे विकार नाहीत , ऑलरेडी एम आर आय निदान झालेले आहेच
कुणीही ऑर्थोपेडिक सर्जन जो दुर्बिणीतून सर्जरी करू शकतो , तो हे करू शकतो , सर्जरी डे केअरवरही करू शकतात किंवा फार फार फार तर 2 दिवस ठेवतील
गुढगावाला डॉकटरच्या दृष्टीने हे फारफार तर डोळावाल्याचा मोतीबिंदू असल्यागत आहे.
केशलेस व क्लेमपण सर्व पॉलिसीत एपृव्ह होते , आधी अप्रुव्हल घेऊन मग चार दिवसांनी देखील सर्जरी करू शकता
ओके... म्हणूनच मी लिहीले
ओके... म्हणूनच मी लिहीले होते की तिथल्या डॉच्या expertise combo बद्दल मला माहिती नाही.
वाचून मला वाटले की ती स्पर्धात्मक क्रीडाप्रकारात असावी....
मानव यांनी दिलेली डॉ वझेंची लिंक पाहिली.... ते म्हणतात तसा ACL tear असेल व जर विनासर्जरी केवळ व्यायाम + विश्रांती याने बरे होणे शक्य असेल तर उत्तमच. पण तिचा tear काय प्रकारचा आहे हे तज्ज्ञच सांगणार.
शुभेच्छा.
ACL injuries can either be
ACL injuries can either be complete or partial. While complete ACL tears almost always require surgery, partial ACL tears may be treated effectively with nonsurgical methods.
तुमचे निदानपण कम्प्लीट एसीएल टीअर आहे, लवकरात लवकर दुर्बिणवाला ओर्थोपेडिक सर्जन निवडावा.
पार्शल टीअर म्हणजे समजा पिशवीचा बंद अर्धवट तुटला आहे, पण अजुन बाकी आहे, कम्प्लीट टीअर म्हणजे बंद तुटुन दोन तुकडे झालेत. इथे दोन्हीची चित्रे दिली आहेत. https://medlineplus.gov/ency/article/001074.htm
The timing of ACL reconstruction has been controversial, with some studies showing worse outcomes when surgery is done immediately after injury, and others showing no difference in outcomes when surgery is done immediately compared to when surgery is delayed.[43][44] The American Academy of Orthopedic Surgeons has stated that there is moderate evidence to support the guideline that ACL reconstruction should occur within five months of injury in order to improve a person's function and protect the knee from further injury; however, additional studies need to be done to determine the best time for surgery and to better understand the effect of timing on clinical outcomes.
https://en.wikipedia.org/wiki/Anterior_cruciate_ligament_injury
Review of Dr Waze is very
Review of Dr Waze is very very bad...
Blackcat,
Blackcat,
पोस्टबद्दल धन्यवाद. असे मॉडेल घेउनच डॉक्टर आणि फिजिकल थेरपिस्ट ने समजावून सांगितले.
सर्जरीच्या आधी ३ आठवडे फिजिकल थेरपी सांगितली आहे.
https://www.ussh.in
https://www.ussh.in/orthopedic-surgery-in-mulund-mumbai/
हे पण बघा. अमेरिके त असाल तर व्हिडीओ कन्सल्ट करता येइल हॉस्पिटल माझ्या घराच्या जवळ आहे. काही काम असेल तर जरूर सांगा.
मला नी रिप्लेस मेंट सांगितली होती तेव्हा मी हे बघितले होते. रोबॉ टिक सर्जरी मध्ये स्पेशालिस्ट इथे आहेत.
सचिन तपस्वी डॉक्टर आहेत
सचिन तपस्वी डॉक्टर आहेत पुण्यात . माझ्या मित्राची सर्जरी केली त्यांनी . दुर्बिणीतून ते operate करतात