लग्नासाठीची पूर्वतयारी

Submitted by अमृताक्षर on 1 October, 2021 - 09:03
Birds in love

लग्न पहावे करून आणि घर पहावे बांधून या उक्तीप्रमाणे लग्न व्यवस्थापन हा अतिशय कठीण विषय आहे त्यात आता पूर्वीच्या काळी व्हायचे तसे लग्न म्हणजे फक्त पारंपारिक रीती रिवाजानुसार होणारे राहिले नाही..
बदलत्या काळानुसार अनेक गोष्टी लग्नाच्या पूर्वी ते लग्नापर्यंत केल्या जातात जसे की प्रे वेडिंग शूट, theme wedding, destination wedding, नवरी नवरदेव आणि फॅमिली चा छान बसवलेला प्रॅक्टीस केलेला डान्स, नवरीचे ते हळदीचे फुला फुलांचे दागिने, जोडप्याने matching कपडे घालणं etc etc
ही यादी न संपणारी आहे..
तर मायबोलीकरांनो तुमच्याकडे लग्नाळू लोकांसाठी खास काही टिप्स असतील किंवा नवीन काही theme असतील तर येथे टाका सगळ्यांच्या ते उपयोगी येईल..
यात ज्वेलरी, कपडे, theme, decoration, best shopping centre, pre wedding ideas, photographer, destination wedding places असं आणि या प्रकारचं काहीही असू शकत..
तुमचे अनुभवाचे बोल सगळ्या लग्नाळू लोकांना नक्कीच कामी येतील..

सगळ्यांचे प्रतिसाद वाचून मी स्वतःसाठी एक यादी बनवली आहे (शॉर्टकट मधे) ती इथे संकलित करतेय यात मग प्रतिसादानुसार update करता येईल..

1)सामाजिक भान
2)दोघांचा छान कट आऊट सेल्फी पॉईंट
3)मेक अप day night different
4)daily use बॅग
-घरी घालायचे कपडे ३-४ सेट्स
-बाहेर घालायचे कपडे ६-७ सेट्स including साड्या, ब्लाऊज, परकर
- २ बेडशीट्स (हो. लागतात.)
- टॉवेल्स
-कॉस्मेटिक्स
-टूथब्रश-पेस्ट
-सेफ्टीपिन्स खूप सारे
5) लग्न बॅग वेगळी
म्हणजे आऊटफिट+ज्वेलरी+ सेफ्टीपिन्स+ accessories. ज्यावेळी जे कपडे घालणार त्यासोबत सगळ्या वस्तू एकत्र मिळतील.
6)हनीमूनला जाताना मिनिमम सामान घेऊन जा.
7)डेस्टिनेशन वेडिंग्ज-रिसॉर्ट
8)फोटोग्राफर
9)ब्राय्डल पूर्व तयारी: लग्नाच्या आधी सहा महिने वजन कंट्रोल डाएट, तीन महिए आधी ब्रायडल पॅकेज, स्किन व हेअर उत्तम डेली रुटीन.
10) प्लॅनिंग- साड्या कपडे व अ‍ॅक्सेसरीज,घरून न्यायच्य बॅग प्लॅन हनिमूनला न्यायचे कपडे नीट, हे सुंदर पण मजबूत बांधणीचे
11)एक एक आउट फिट प्लस परकर ब्लाउज व अ‍ॅक्सेसरीज पाउच
12)साडी ड्रेपिन्ग ला पार्लर वाली
13)मेहंदी चे फुलाचे दागिने
14)बैठकीचा गायनाचा कार्यक्रम विनोदी प्रहसने
15)hens party
16)मेकप गेटप ट्रायल
17)फेसबुक वर रेडिमेड रुखवत-
१) स्टीलचा भांड्यांचा सेट.
२) काचेच्या जरा जास्त नाजूक कप बश्यांचा सेट व किटली.
३) काचेच्या बर्ण्यां मध्ये भरलेले डाळ तांदूळ व धान्ये सहा बरण्या किंवा मालत्या गव्हले असे पाच प्रकारचे.
4) मुलीने भरतकाम केलेले टेबलक्लॉथ. विण लेली क्रोशा केलेली कव्ह रे, डबलबेड् शीट चा सेट. व पिलो दोन पिलो कव्हर. त्यावर दोन लाल गुलाब व स्वीट ड्रीम्स असे भरत काम केलेले.
६) सप्तपदीची वचने लिहिलेले ( नव वधूस गोड सूचना लिहिलेले) कार्ड शीट किंवा जाडा चांगला ड्रॉइन्ग पेपर येतो त्यावर स्केच पेन्स ने लिहिलेले. अशी सात पेपर ची पावले.
७) सुके खोबरे कोरुन बनवलेले आर्ट.
८) साखरेचे ताट व तांब्या भांडे.
९) फॅन्सी अन्न पदार्थ. मोठे लाडू रंगी बेरंगी करंज्या चिरोटे. असे ठेवलेला एक बोल
१०) रंगीत कागदावर सोनेरी बुट्टे व काठ पदर चिकटवून केलेली साडी व त्रिकोणी खण हे जाड पुठ्ठ्यावर लावलेले.
११) रुखवताच्या टेबलाला खाली जोडलेले विणलेले किंवा मण्यांचे तोरण.
18)कोणत्याही प्रकारे स्वतःची तब्येत कॉम्प्रो करून दुसऱ्याचा कम्फर्ट ही सवय लावणे आधीपासून टाळणे.
19)दागिने ठेवायची पेटी व व्हॅनिटी केस
20)खरेदीची लिस्ट बनवावी..प्रत्येक लहान सहान गोष्ट कॅटेगरीवाईज मानपानाची , वैयक्तिक सामानाची , रिटर्न गिफ्ट , विधीप्रमाणे कपडे, दागिने ,लग्नाची खरेदी .
21) हनिमून साठी comfortable shoes, artificial light weight jwellery आणि कपडेे
22)मेडिकल check-up
23) जियो और जीने दो पॉलिसी

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अमृताच्या लग्नाचे थेट प्रक्षेपण माबोवर करायची वेमाना विनंती करावी सर्वांनी म्हणजे सगळे वऱ्हाडी जमतील लग्नाला... Happy

Submitted by कृष्णा >> Happy

...

Submitted by mi_anu >> wow अनु कसला सुंदर लेहंगा आहे हा..colour तर कसला unique आहे घेर पण किती मोठा मस्त आहे..खूप आवडला हा कथई रंग

माझी एक लंब्र इनंती हाये.
इथल्या कोणालाही लग्नाला बोलवु नका.
प्रत्येक स्टेप, प्रत्येक कपडा, प्रत्येक दागिना किंवा लग्नात तुम्ही जे काही कराल ते.....हे मीच सांगितल होत अमृताक्षरला हो....... हा जो कलर आहे ना तो मीच सजेस्ट आणी सिलेक्ट केला होता, ही केसांची स्टाईल मीच व्हाअ‍ॅ वर पाठवली होती. तो पाणी वाढतोय ना त्याच्या हातातल्या तांब्यावर जे डिझाईन आहे ते मीच दिले होते वगैरे वगैरे

अशाने तर ती फक्त मलाच बोलावायची नि बिदाईच्या वेळी "ताई, तू सांगितलंस पाच माणसात कर, पळून जाऊन कर... तुझं ऐकायला हवं होतं ग मी" करून माझ्याच गळ्यात पडून रडायची.... बाकीच्यांना वाटायची कितीच लळा बाई हिला माणसांचा................... Wink

सी Lol

Submitted by सीमंतिनी > Lol Lol माबोकरांचा तर लागलाय आता लळा..कितीही बिझी असली तरी दिवसाला एक चक्कर होतेच इकडे..

Submitted by जेम्स बॉन्ड >> Lol लग्नाला तर बोलावनार आहे मी सगळ्यांना..सगळेजण मदत करताय म्हणून तर सगळ इतकं भारी होताय.. Happy

ट्रायल साडी ड्रेप च्या निऱ्या पण प्रो केल्यात.

Submitted by mi_anu >> अनु ती साडीच खूप मस्त आहे मी.. खूप चोपून नीट बसते मी काही विशेष प्रयत्न केले नाही नॉर्मली जशा करतो तशा केल्या होत्या निऱ्या तरी सुद्धा इतकी नीट दिसत होती.. Happy

हा धागा खूपच उपयोगी आहे. मला अमृताक्षरची शॉपिंग बघण्याची खूप उत्सुकता आहे.

पण मलाही एक सल्ला विचारायचा आहे. मला लवकरच एक लग्न अटेंड करायचे आहे. त्यात मेहेंदी ला पूल पार्टी आहे. लाइट कलर्स, बीच कॅज्युअल वेअर , flowy ड्रेसेस, टॉप्स palazzo अशी थिम आहे. कोणी सांगू शकेल का की काय घालावे/कुठे मिळेल? लग्न असल्यामुळे अगदी साधे फॅब्रिक्सवाले (उदा मिन्त्रा वरचे) पण नको वाटत आहे.

पूल पार्टीला पलाझो नको. मिड-काफ किंवा तुम्हाला चालणार असेल तर नी लेंग्थ फिट ऍंड फ्लेअर ड्रेसेस पहा.
भारतिय फॅब्रिक्सपेक्षा शिफॉन, चिनॉन, जॉर्जेट, लेस, सीक्वेनमधे काही मिळाले तर पहा.

ड्रेस मनासारखा नाही मिळाला तर प्रिंटेड शिफॉन किंवा जॉर्जेट साडी नेसा. आठवा आल्प्समधे विहरणाय्रा यश चोप्रांच्या हिरॉईन्स.
ब्लाउजमध्ये स्लीवलेस, ऑफ शोल्डर, हॉल्टर नेक, तुम्हाला चालणार असेल तर बिकीनी किंवा ट्युब टॉप असे खूप एक्सपेरिमेंट करता येतील.

ज्वेलरी मोजकी आणि नाजूक वापरा.
ड्रेस आणि साडीचे काही सँपल

https://funkytradition.com/products/funkytradition-trendy-short-sleeve-f...

https://www.etsy.com/in-en/listing/1008911391/elegant-chiffon-off-should...

https://www.etsy.com/in-en/listing/1005251840/110-colors-chiffon-white-f...

https://www.etsy.com/in-en/listing/1023614414/cottagecore-dress-fairy-dr...

https://colorauction.com/baby-pink-hand-painted-pure-silk-chiffon-saree....

https://www.myntra.com/sarees/tikhi-imli/tikhi-imli-white--pink-organza-...

https://www.google.com/imgres?imgurl=https%3A%2F%2Fcolorauction.com%2Fme...

https://www.pinksaree.com/product/gossamer-pastel-georgette-fancy-resham...

https://www.google.com/imgres?imgurl=https%3A%2F%2Fcdn.shopify.com%2Fs%2...

https://www.google.com/imgres?imgurl=https%3A%2F%2Fcdn.shopify.com%2Fs%2...

https://www.google.com/imgres?imgurl=https%3A%2F%2F5.imimg.com%2Fdata5%2...

दोन्ही साड्या सुंदर आहेत अमृता Happy
गोड दिसणार तू लग्नात फार
तीट घे माझ्याकडून
आणि लिंबू मिर्चीपण Proud

व्हेन्यु डेकोरेशन बद्दल एक आयडिया अमृताक्षर ह्यांना हवी होती ती देत आहे. पण ही देशी पारंपारिक लग्न समारंभाला कितपत आव्डेल लोकांना माहीत नाही. मेंदी पार्टी किंवा बॅचलरेट ला घेता येइल

संदर्भः व्हँपायर डा यरी सिरीअल मधील अलारिकचे लग्नः

हे लग्न चर्च मध्ये होते. चर्च डार्क कलरच्या रोझवुड टाइप लाकडाचे आहे. त्यावर पिंक रंग ( साधा गुलाबी) च्या नेट किंवा ओढणीचे किंवा ट्विल कापड ह्याची सजावट केलेली आहे. भिंती वरून आपण खुंटीवरून ओढणी सोड तो तसे ठीक ठिकाणी सोडले आहे व मध्ये बो केलेले आहेत.

ह्याला साजेसे बो खुर्चीच्या पाठी वर व्हाइट कव्हर आहे त्याला मागे लावले आहेत. व टेबलावर पांढरे टेबल क्लॉथ असून मध्यभागी क्रिस्टल फ्लावर पाटात एक एक दिवा व गुलाबी पांढरे गुलाब/ ऑर्किड आहेत.

दोन मोठी क्रिस्ट ल झुंब रे पण आहेत ही पण काच का आतला दिवा पिंक आहे.

चर्च च्या दारावर पण पिंक फॅब्रिकचीच सजाव ट आहे. खाण्यापि ण्याचा तंबू वेगळा आहे तिथे हीच कलर स्कीम आहे.
खरे तर वेडिन्ग व्हेन्यु सजावट हे प्रचंड मोठे प्रकरण आहे व इन्स्टाग्राम पिंटरेस्ट वर भरपूर च आयडिया आहेत. तीन चार वर्शा पूर्वी मॅसन जार मध्ये
काय काय घालून ठेवायची फॅशन होती. वेडिन्ग प्लानर ठरवला तर आपण ब्रॉड कन्सेप्ट देउन त्यांना करू दिलेले बरे. आज काल कोणत्याही हॉल / कार्यालयात मिनिम म सजावट फुले वगैरे असतेच.

भारतीय पद्धतीत व्हाइट फुलांच्या माळा मध्ये झेंडू व इतर रंगाची फुले हिरवी पाने मस्त दिसते. लोक बोहोल्याला ऑर्किड ची सजावट पण करणारे आहेत.

रुखवताच्या जेव णास चांदीची ताटे असतात. व रांगोळी इत्यादि थाट असतो. मुलाकडची कोण कोण मानाची मा ण से बस्णार ते ही आधी विचारून घ्या.

दोन्ही साड्या सुंदर. पिंक फार खुलून दिसतेय. >> हो मला पण ती पाहिल्याबरोबर आवडली होती एकदम decent colour आहे मस्त

माझ्या साड्यांच्या बकेट लिस्टीत भर पडली आता >> Lol

Submitted by MazeMan >> thank you Happy

Submitted by आ_रती >> shopping झाली की टाकणार आहे इथे Happy

Submitted by देवकी >> लाल मला नको होती पण नवरी म्हंटले की एक तरी लाल साडी असावी म्हणून घेतली आणि खरेच छान दिसतेय ती साडी आता

दोन्ही साड्या सुंदर आहेत अमृता Happy
गोड दिसणार तू लग्नात फार
तीट घे माझ्याकडून
आणि लिंबू मिर्चीपण Proud

Submitted by किल्ली >> Blush thank you Happy थोड वजन कमी करते पण आता

Submitted by अमा >> YouTube ला ही क्लिप नाहीये का? असेल तर लिंक द्या ना पाहून पण घेते एकदा .चांगली वाटतेय theme हळदी ला ठेवता येईल

आ_रती, पूल पार्टीला वाटेल ते घालायचं पण विद्याबालनने 'पलपल हर पल' मध्ये केसांना वेट क्रिंपल्ड लुक दिला तो केला की सगंळ्ळ माफ... तिचा आने चार आने मधला पांढरा टॉप, ब्ल्यू स्कार्फ आणि मग वाटेल तो स्कर्ट हा लुक जमत असेल तर सोपा सुटसुटीत.

Pages