लग्न पहावे करून आणि घर पहावे बांधून या उक्तीप्रमाणे लग्न व्यवस्थापन हा अतिशय कठीण विषय आहे त्यात आता पूर्वीच्या काळी व्हायचे तसे लग्न म्हणजे फक्त पारंपारिक रीती रिवाजानुसार होणारे राहिले नाही..
बदलत्या काळानुसार अनेक गोष्टी लग्नाच्या पूर्वी ते लग्नापर्यंत केल्या जातात जसे की प्रे वेडिंग शूट, theme wedding, destination wedding, नवरी नवरदेव आणि फॅमिली चा छान बसवलेला प्रॅक्टीस केलेला डान्स, नवरीचे ते हळदीचे फुला फुलांचे दागिने, जोडप्याने matching कपडे घालणं etc etc
ही यादी न संपणारी आहे..
तर मायबोलीकरांनो तुमच्याकडे लग्नाळू लोकांसाठी खास काही टिप्स असतील किंवा नवीन काही theme असतील तर येथे टाका सगळ्यांच्या ते उपयोगी येईल..
यात ज्वेलरी, कपडे, theme, decoration, best shopping centre, pre wedding ideas, photographer, destination wedding places असं आणि या प्रकारचं काहीही असू शकत..
तुमचे अनुभवाचे बोल सगळ्या लग्नाळू लोकांना नक्कीच कामी येतील..
सगळ्यांचे प्रतिसाद वाचून मी स्वतःसाठी एक यादी बनवली आहे (शॉर्टकट मधे) ती इथे संकलित करतेय यात मग प्रतिसादानुसार update करता येईल..
1)सामाजिक भान
2)दोघांचा छान कट आऊट सेल्फी पॉईंट
3)मेक अप day night different
4)daily use बॅग
-घरी घालायचे कपडे ३-४ सेट्स
-बाहेर घालायचे कपडे ६-७ सेट्स including साड्या, ब्लाऊज, परकर
- २ बेडशीट्स (हो. लागतात.)
- टॉवेल्स
-कॉस्मेटिक्स
-टूथब्रश-पेस्ट
-सेफ्टीपिन्स खूप सारे
5) लग्न बॅग वेगळी
म्हणजे आऊटफिट+ज्वेलरी+ सेफ्टीपिन्स+ accessories. ज्यावेळी जे कपडे घालणार त्यासोबत सगळ्या वस्तू एकत्र मिळतील.
6)हनीमूनला जाताना मिनिमम सामान घेऊन जा.
7)डेस्टिनेशन वेडिंग्ज-रिसॉर्ट
8)फोटोग्राफर
9)ब्राय्डल पूर्व तयारी: लग्नाच्या आधी सहा महिने वजन कंट्रोल डाएट, तीन महिए आधी ब्रायडल पॅकेज, स्किन व हेअर उत्तम डेली रुटीन.
10) प्लॅनिंग- साड्या कपडे व अॅक्सेसरीज,घरून न्यायच्य बॅग प्लॅन हनिमूनला न्यायचे कपडे नीट, हे सुंदर पण मजबूत बांधणीचे
11)एक एक आउट फिट प्लस परकर ब्लाउज व अॅक्सेसरीज पाउच
12)साडी ड्रेपिन्ग ला पार्लर वाली
13)मेहंदी चे फुलाचे दागिने
14)बैठकीचा गायनाचा कार्यक्रम विनोदी प्रहसने
15)hens party
16)मेकप गेटप ट्रायल
17)फेसबुक वर रेडिमेड रुखवत-
१) स्टीलचा भांड्यांचा सेट.
२) काचेच्या जरा जास्त नाजूक कप बश्यांचा सेट व किटली.
३) काचेच्या बर्ण्यां मध्ये भरलेले डाळ तांदूळ व धान्ये सहा बरण्या किंवा मालत्या गव्हले असे पाच प्रकारचे.
4) मुलीने भरतकाम केलेले टेबलक्लॉथ. विण लेली क्रोशा केलेली कव्ह रे, डबलबेड् शीट चा सेट. व पिलो दोन पिलो कव्हर. त्यावर दोन लाल गुलाब व स्वीट ड्रीम्स असे भरत काम केलेले.
६) सप्तपदीची वचने लिहिलेले ( नव वधूस गोड सूचना लिहिलेले) कार्ड शीट किंवा जाडा चांगला ड्रॉइन्ग पेपर येतो त्यावर स्केच पेन्स ने लिहिलेले. अशी सात पेपर ची पावले.
७) सुके खोबरे कोरुन बनवलेले आर्ट.
८) साखरेचे ताट व तांब्या भांडे.
९) फॅन्सी अन्न पदार्थ. मोठे लाडू रंगी बेरंगी करंज्या चिरोटे. असे ठेवलेला एक बोल
१०) रंगीत कागदावर सोनेरी बुट्टे व काठ पदर चिकटवून केलेली साडी व त्रिकोणी खण हे जाड पुठ्ठ्यावर लावलेले.
११) रुखवताच्या टेबलाला खाली जोडलेले विणलेले किंवा मण्यांचे तोरण.
18)कोणत्याही प्रकारे स्वतःची तब्येत कॉम्प्रो करून दुसऱ्याचा कम्फर्ट ही सवय लावणे आधीपासून टाळणे.
19)दागिने ठेवायची पेटी व व्हॅनिटी केस
20)खरेदीची लिस्ट बनवावी..प्रत्येक लहान सहान गोष्ट कॅटेगरीवाईज मानपानाची , वैयक्तिक सामानाची , रिटर्न गिफ्ट , विधीप्रमाणे कपडे, दागिने ,लग्नाची खरेदी .
21) हनिमून साठी comfortable shoes, artificial light weight jwellery आणि कपडेे
22)मेडिकल check-up
23) जियो और जीने दो पॉलिसी
मस्त आहे
मस्त आहे
फक्त दुपट्टा नाही आवडला मला.डोळ्यांचा गोंधळ होतोय.
यावरमस्त प्लेन यलो शिफॉन किंवा फ्लोरल यलो शिफॉन दुपट्टा वेगळा घेऊन छान दिसेल.
आता असलेल्या दुपट्टयातच नक्षीची इतकी गर्दी झाली तर दागिने कसे उठून दिसणार?
मला वाटतं की या धाग्याचा
मला वाटतं की या धाग्याचा परिणाम म्हणून नवरी व्यतिरिक्त अजूनही बऱ्याच बाया लेहंगे विकत घेणार
मला वाटतं की या धाग्याचा
मला वाटतं की या धाग्याचा परिणाम म्हणून नवरी व्यतिरिक्त अजूनही बऱ्याच बाया लेहंगे विकत घेणार>>>>>> खरंच अनु, काल तुम्ही दिलेल्या लिंक पाहताना, कसंबसं आवरलं स्वतःला. आता काही गरज नाही म्हणून.
मला पण खूप इच्छा झाली.. पण
मला पण खूप इच्छा झाली.. पण मी तर लेहंगे नाही घेणार.. त्या लेहंगे च्या सुंदर रंगाच्या रफल साडी घेणार..
Submitted by सूर्यगंगा >> हा
Submitted by सूर्यगंगा >> हा सुद्धा पॅटर्न छान आहे पण असा एक lehnga आहे माझ्याकडे याच पॅटर्न मधला..हळदी साठी सिंपल plain lehnga घालून त्यावर सुंदर फुलांची किंवा sea shell jwellery घालावी असा विचार आहे..
लेहंगे च्या सुंदर रंगाच्या
लेहंगे च्या सुंदर रंगाच्या रफल साडी घेणार..
Submitted by श्रवु् >> ruffle साडी पण खूप सुंदर दिसते trending आहे सध्या..
मला वाटतं की या धाग्याचा
मला वाटतं की या धाग्याचा परिणाम म्हणून नवरी व्यतिरिक्त अजूनही बऱ्याच बाया लेहंगे विकत घेणार Happy
Submitted by mi_anu >> चांगल आहे की अनु इसी बहाणे शॉपिंग हो जाएगी माझ्या लग्नात घालायला म्हणून शॉपिंग करून टाका सगळेजण
हे पहा कसलं भारी आहे
हे पहा कसलं भारी आहे
वॉव
वॉव
सुंदर फ्लो आहे घागऱ्याला.
मुलीला फाउंडेशन जरा जास्त लावले आहे(मेकप जास्त काळ टिकावा म्हणून)
असे टायमिंग साधून फोटो काढणारे फोटोग्राफर सॉलिड.
मुलीला फाउंडेशन जरा जास्त
मुलीला फाउंडेशन जरा जास्त लावले आहे(मेकप जास्त काळ टिकावा म्हणून) >> अनु हे पक्क बसलय ना तुमच्या डोक्यात
गूगल फोटो आहे..असाच flared lehnga पाहिजे मला plain मस्त पण मला वाटतं असा भेटणारच नाही..शिवून घ्यावा लागेल
https://youtu.be/jtoScxUucXs
https://youtu.be/jtoScxUucXs
Ha video कमाल आहे
गळ्यात फार गर्दी केलीये
Otherwise आवडला मला
South style
परत एकदा लग्न करावं कि काय ?
परत एकदा लग्न करावं कि काय ? ( डोळे मिचकावणारी बाहुली )
श्रवू मलाही हेच वाटतं(मुलगा
श्रवू मलाही हेच वाटतं(मुलगा तोच, जो आहे तो perfect आहे ह्याची वारंवार खात्री पटत असतेच )
आपण आपल्या लग्नाच्या वेळी बावळट होतो असं वाटत राहतं.
Makeup साड्या jewellary आणि फोटो साठी पुन्हा एकदा होऊन जाऊ देत असं वाटत आहे
Makeup साड्या jewellary आणि
Makeup साड्या jewellary आणि फोटो साठी पुन्हा एकदा होऊन जाऊ देत असं वाटत आहे Lol
Submitted by किल्ली >> होऊनच जाऊ द्या..खूप लोकांना तस वाटतंय काल परवा अनु पण असच म्हणत होत्या..आजकाल 10 25 50 लग्नाच्या वाढदिवशी करतात लग्न..
Submitted by किल्ली >> कसला
Submitted by किल्ली >> कसला भारी व्हिडिओ आहे नवरीच्या बांगड्या i mean हातातील कडे किती सुंदर आहेत आणि नवरी नवरदेव कसले गोड आहेत.. engagement ला हाच south look ठेवावा म्हणते मस्त दिसेल..आणि त्यांनी जिथे लग्न केले ती place पण किती सुंदर आहे निसर्गरम्य शांत सुंदर.
मला इथे अहो जाहो म्हटलं नाही
मला इथे अहो जाहो म्हटलं नाही तरी चालेल
हा स्कर्ट पाहिला का?कायच्या काय महाग आहे.पण फोटोसेशन मध्ये खतरा दिसेल
80 कळी घागरा आणि 15 मीटर फॉल(असं ते म्हणातयत हां, मोजला नाही)
https://www.diariesofnomad.com/products/naachti-gaati-chanderi-skirt
तो व्हिडिओ पहिला.मस्त केलाय फोटोशूट आणि गेटअप.मुलगा लांबून अर्जुन कपूर चा लहान भाऊ वाटला, जवळून अजून चांगला वाटला.
(फाउंडेशन: त्या आधीच्या फोटोत मुलीला खरंच जास्त लावलंय )
काय सुंदर घेर आहे त्या स्कर्ट
काय सुंदर घेर आहे त्या स्कर्ट ला..आपण असा शिवून घेतला तर जमेल इथे खूपच महाग आहे
इथे एवढे दागिने, कपडे आणि
इथे एवढे दागिने, कपडे आणि साड्या दाखविल्या गेल्यात की त्या ढिगात हरवेल नवरी आणि मग नवरा बसेल वाट पहात विवाह वेदीवर.
Submitted by कृष्णा >> लग्न
Submitted by कृष्णा >> लग्न घर म्हंटले की पसारा आलाच
अहो कृष्णा.. नवरी राहिली
अहो कृष्णा.. नवरी राहिली बाजूला.. इथे सगळ्या ताईबाई परत लग्न करायचा विचार करतायत..
Submitted by श्रवु् >>
Submitted by श्रवु् >> लग्नाचं माहिती नाही पण सगळेजण परत एक चांगला ब्रायडल फोटोशूट नक्कीच करू शकतील.. आपल्याला हवे तसे कपडे आणि jwellery घालून..आणि नवरदेवाला सुद्धा जबरदस्ती आपल्याला हवं तसं तयार व्हायला सांगून (कुणा नवरदेवाची पण इच्छा राहिली असेल की असं तयार व्हायचं होत राहूनच गेलं तर ती पण पूर्ण होईल या निमित्ताने)
इथे सगळ्या ताईबाई परत लग्न
इथे सगळ्या ताईबाई परत लग्न करायचा विचार करतायत..>>>
Wedmegood वेबसाईट पाहा. तिथे
Wedmegood वेबसाईट पाहा. तिथे वेंडर लिस्ट सुद्धा मिळेल आणि लग्नाच्या थीम, घागरे, मेकप याच्या कल्पनासुद्धा मिळतील.
दिल्लीच्या शॉपिंग बद्दल
दिल्लीच्या शॉपिंग बद्दल विचारलं होतं ना?
करोलबाग ok आहे. आम्ही दिराचे लग्नाचे कपडे करोल बाग मध्ये घेतले होते चार वर्षांपूर्वी. एरवी चे कुर्ते, कधी ड्रेसेस पण घेतो. खूप प्रकार असतात. किमती काही खूप कमी वाटल्या नाहीत मला कधी. साड्या आणि लहेंगे कधी बघितले नाहीत मी, पण बरीच दुकानं आहेत.
दिल्लीत खरेदी साठी खरे तर चांदनी चौक छान option आहे. १० वर्षांपूर्वी जावेचा लहेंगा घेतला होता लग्नाचा हेवी १५ हजाराला. त्याची करोल बागेतली त्यावेळची किंमत ३५ हजार होती आणि साऊथ दिल्लीतली किंमत ५० हजार होती म्हणे.
मी वर्षातून १-२ वेळा जाते चांदनी चौकात पण कपडे फारसे घेतले नाहीत कधी. चांदीचे दागिने घेते मी तिथून दरिबा कालान म्हणून त्या भागातून.
तिथेच किनारी बाजार म्हणून भाग आहे. वेगवेगळ्या लेसेस चे भांडार आहे हे ठिकाण. गेल्या आठवड्यात आम्ही गेलो होतो चांदनी चौक मध्ये. किनारी बाजार मधल्या एकाच दुकानात गेलो ( पराठेवाली गली च्या तोंडावरच आहे) दोन - तीन मजली दुकान फक्त लेस, लटकन नी भरलेले होते. करोडो चा माल असेल.
जाता येताना कितीतरी दुकानदार लहेंगा आणि साड्या घ्यायला दुकानात बोलावत होते. पण आम्ही गेलो नाही. दोन अडीच हजार ते पुढे ५०-६० हजार किंवा त्यापेक्षा जास्त किंमती चे लेहेंगे मिळतात. तुम्ही डिझाईन दाखवलं तर हुबेहूब बनवून पण देतात हवे तसे.
मुलाचा मोठा भाऊ नोएडा ला
मुलाचा मोठा भाऊ नोएडा ला राहतो त्यामुळे आमचं असं ठरतंय की शॉपिंग delhi ला करू (अजून confirm नाही) चांदणी चौक ऐकून आहे ब्रायडल lehnga साठी..
Delhi ला गेलो तर तुम्ही दिलेली माहिती लक्षात ठेवणार thank you
Wedmegood app डाऊनलोड केलंय
Wedmegood app डाऊनलोड केलंय
दिल्लीला शॉपिंग करणार असशील
दिल्लीला शॉपिंग करणार असशील तर मला मेल पाठव आधी. माझ्या ओळखीच्या एका बुटीक वालीच्या बऱ्याच ओळखी आहेत चांदनी चौकात. तिला किमान दुकानांची नावे विचारून ठेवेन. आम्ही जावे चा लेहेंगा तिच्याच ओळखीने घेतला होता.
थोडे आधी गेलात तर लेस घेता येतील, प्लेन ड्रेस आणि साडी ला लावायला. आणि चांदीचे दागिने पण सुरेख मिळतात. इतरही रुखवत किंवा सजावटीचे सामान, देवांचे कपडे पण खूप सुरेख मिळतात त्या किनारी बाजार मध्ये. किमान ३-४ तरी दुकाने असतील जिथे फक्त देवांचे दागिने आणि कपडे मिळतात.
Delhi ला गेलो तर तुम्ही
Delhi ला गेलो तर तुम्ही दिलेली माहिती लक्षात ठेवणार thank you Happy
चांदनी चौकातला शीशगंज गुरुद्वार्यात जायला विसरु नका. त्याच्यापुढे लाल किल्ल्याकडे जाताना डाव्या हाताला हल्दीरामचं आउटलेट आहे. व्हेजिटेरियन असाल तर तिथे अन्यथा जामा मस्जिद गेट नं १ च्या समोरच्या गल्लीत करीम्स मधे जायला विसरु नका.
बाकी अल्पना यांनी सांगितलेले आहेच. त्यात मी फक्त सरोजिनी नगरची भर घालतो. तिथे ही ट्राय करु शकता.
अल्पना चालेल निघायच्या आधी
अल्पना चालेल निघायच्या आधी तुम्हाला वीपू करेल Delhi shopping ची तशी पण काही आयडिया नाही मला..गोंधळ होण्यापेक्षा तुम्ही सांगाल तेवढ्या मोजक्या shop मधे जाईल मग.. thank you
Submitted by जेम्स बॉन्ड >>
Submitted by जेम्स बॉन्ड >> होय होय delhi shopping ची यादी update केली..मानव नी पण सुचवले होते त्याबद्दल ते सुद्धा add केले..लोकहो तुम्ही ग्रेट आहात माझं लग्न एकदम भारी होणार आहे
Pages