विनोदी लेखन उपक्रम - मायबोली २४ तास -मानव

Submitted by मानव पृथ्वीकर on 21 September, 2021 - 12:44

(या उपक्रमात दोनच लेख आले. तेव्हा यात लिहिण्याचा विचार केला. परंतु तो धागा पाहिला असता त्यात ठरावीक विषय दिला असल्याची आठवण झाली. दूरदर्शन मालिका, चित्रपट या विषयी माझे ज्ञान अगाध असल्याने, विषयांतर करुन लिहीत आहे, त्याबद्दल क्षमस्व. )

नमस्कार, मायबोली २४ तास वर आपले स्वागत आहे.

आजच्या ठळक बातम्या.

मायबोली व्यवस्थापन मंडळाची आज बैठक झाली. त्यात काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले.
ते निर्णय असे आहेत.

१. येत्या एक ऑक्टोबर पासून, मायबोलीचे अ‍ॅडमिन, वेबमास्टर, नियंत्रक हे लोकशाही पद्धतीने निवडले जातील. निवडून आलेल्या चमूचा कालावधी दोन वर्षे असेल. यासाठी खुली मतदान पद्धती अवलंबली जाणार असून मतदान धाग्यात कुणी कुणाला मत दिले हे दिसणार असल्याने, पक्षपाताचा आरोप करण्यास वाव रहाणार नाही. जाणुन घ्या या पदांसाठी काय आहे पात्रता.

अ‍ॅडमिन: उमेदवाराच्या मूळ सदस्यनामाव्यतिरीक्त किमान दहा ड्युआयडीज असाव्यात आणि त्यातिल किमान चार खाती कारवाईत रद्द झालेली असावीत. तसेच किमान चार मायबोली सदस्यांचे खाते रद्द करवण्यात हातभार लावलेला असावा आणि इतर सदस्यांच्या प्रतिसादाचे किमान शंभर स्क्रीनशॉट्स सेव्ह करुन त्यांचा स्कोअर सेटलींगसाठी वापर केलेला असावा.

वेबमास्टर: उमेदवाराच्या मूळ सदस्यनामाव्यतिरीक्त किमान सहा ड्युआयडीज असाव्यात आणि त्यातिल किमान दोन खाती कारवाईत रद्द झालेली असावीत. तसेच किमान पंचवीस धागे भरकटवण्याचा अनुभव असावा आणि असंबद्ध गप्पा धाग्यात किमान शंभर सुसंबद्ध प्रतिसाद दिलेले असावेत.

नियंत्रक: उमेदवाराच्या मूळ सदस्यनामाव्यतिरीक्त किमान तीन ड्युआयडीज असाव्यात आणि त्यातिल किमान एक खाते कारवाईत रद्द झालेले असावे. तसेच सध्याच्या व्यवस्थापन मंडळावर किमान पंचवीस वेळा पक्षपाताचा आरोप केलेला असावा आणि गंभीर लेखांवर किमान पन्नास असंबद्ध प्रतिसाद दिलेले असावेत.

इच्छुक उमेदवारांनी "मी उभा/भी आहे - पदनाम- {सदस्यनाम}” अशा शिर्षकाचा बाफ़ काढुन त्यात आपली पात्रता सिद्ध करावी, आणि त्याच बाफमध्य़े प्रचार सुरु करावा. हा बाफच उमेदवाराची प्रवेशिका समजली जाईल. प्रवेशिका देण्याची अंतिम तारीख एक ऑक्टोबर आहे. सध्या अपात्र असणार्‍या इच्छुक उमेदवारांनाही पात्रता मिळवण्यास हा कालावधी पुरेसा आहे असे निवडणुक संयोजकांनी सांगीतले.

जरी वरील पदांवरील उमेदवार लोकशाही पद्धतीने निवडल्या जातील, काही ठरावीक कामांसाठी स्थायी समीती सुद्धा नेमण्यात आल्या आहेत.

२. मायबोलीवर शुद्ध मराठीत लेखन व्हावे, इंग्रजी शब्दांचा वापर कमीत कमी व्हावा आणि लेखन देवनागरीतूनच व्हावे या करता सदस्यांवर जातीने लक्ष ठेवणे, समज देणे यासाठी एक स्थायी समीती स्थापन करण्यात आली आहे. राज व नानबा हे त्या समीतीचे सदस्य आहेत.

३. सगळ्या लेखांवर लोक विषयाला धरुन गंभीर प्रतिसाद देतात की नाही, कोतबोमध्ये फसवे धागे निघत नाहीत ना यावर लक्ष ठेवण्यासाठी बोकलत यांची एक सदस्यीय स्थायी समीतीत नेमणुक करण्यात आली आहे.

आता काही खळबळजनक बातम्या:

४. व्यत्यय, हायझेनबर्ग, मानव हे त्रिकुट शनी शिंगणापूरच्या देवळात नवस करताना रंगे हात आढळुन आले. त्यांच्या बॅगेत स्तोत्रांची पुस्तके सापडली. घरात होणारा मृतात्म्यांचा त्रास, करणी, भानामती प्रकारांमुळे नोकरीत बढती न मिळणे, व्यवसायाची भरभराट न होणे, देवीच्या कोपामुळे
पसरणार्‍या कोव्हीड पासून सुरक्षा अशा कारणांसाठी विविध देवस्थानात ते नेमाने नवस करतात, मांत्रिकांची मदत घेतात असे चौकशी अंती निष्पन्न झाले.

५. नवी मुंबई जवळ मद्याचा अवैध साठा असलेले एक मोठे गोदाम सापडले आहे. भेसळ करणे, कर चूकवून लोकांना घरपोच मद्य पोचवणे, ड्राय डेच्या दिवशी मद्य विक्री करणे हे धंदे इथुन चालत असल्याचे लक्षात आले. या गोदामाचे मालक ऋन्मेष व मानव पृथ्वीकर असल्याचे कळते. एकीकडे उघडपणे मद्याच्या उदात्तीकरणाचा कठोर विरोध करत असताना दुसरीकडे लपुन छपुन अवैध मद्यविक्रीचा धंदा ही जोडगोळी करत असल्याचे निदर्शनास आले आहे.

६. एका धाग्यावर ऋन्मेष यांनी आपली चूक कबूल केल्याची बातमी व्हायरल झाल्याने मायबोलीवर मोठी खळबळ उडाली. चौकशी नंतर असे निदर्शनास आले की तो आयडी "ऋन्मेssष" नसून "ऋन्मेsssष" असा तोतया होता. याबाबत ऋन्मेssष यांच्याशी सम्पर्क केला असता "हे मला बदनाम करण्याचे षडयंत्र असुन यावर मी लगेच एक लेख पाड -माफ करा- लिहीणार आहे" असे ते म्हणाले.

धावत्या बातम्या:

७. "फल ज्योतिष्य, राशी भविष्य एक थोतांड" हा लेख मायबोलीवर लौकरच प्रसिद्ध होणार असून, तो सामो आणि रश्मी यांनी मिळुन लिहीला असल्याचे कळते.

८. मायबोलीवरील एक प्रसिद्ध व्यक्ती रोज रात्री वेषांतर करुन हल्दीराम आऊटलेट मध्ये जाउन गुलाबजाम, रबडी, बालुशाही, श्रीखंड, कलाकंद इत्यादि डिशेस आइसक्रीम सोबत खात असल्याचे तेथील एका कर्मचायाने मायबोली २४ तासला फोन करुन सांगीतले. मायबोली २४ तासने याचा शहनिशा केला असुन ती व्यक्ती सई केसकर असल्याचे निदर्शनास आले.

९. “आयुर्वेद तारी त्याला कोण मारी" हा पंचकर्म आणि मंत्रोच्चाराद्वारे शुद्ध केलेले धातु यांचे गंभीर आजारांवरील उपचारांचे महत्व पटवून देणारा लेख मायबोलीवर लौकरच प्रकाशीत होणार असून श्री आरारा हे त्याचे लेखक असल्याचे कळते.

१०. मायबोलीच्या एका गटग मध्ये एक त्रिकुट ऑन द रॉक्स स्कॉचचा आस्वाद घेत असताना, वारंवार बाजुच्या खोलीत जाउन ग्लास संपवून परतत असल्याचे आमच्या बातमीदाराने पाहिले. आधी ते धुम्रपानास जात असावेत असा त्याचा समज झाला. पण नंतर धुम्रपान कक्ष दुसरीकडे असल्याचे लक्षात आल्यावर तोही त्या खोलीत ग्लास घेउन त्यांच्या मागोमाग गेला असता हे त्रिकुट तिथे स्कॉचमध्ये पेप्सी टाकुन पीत असल्याचे दिसून आले. च्रप्स, आशुचॅंप व सोन्याबापू अशी त्यांची नावे असून, नीट पिणे फार अवघड असल्याने व चवही सहन होत नसल्याने नेहमी लपुन पेप्सी अथवा कोक घालुन पीत असल्याचे त्यांनी कबूल केले.

११. आमच्या बातमीदाराने अ‍ॅमी यांच्याशी संपर्क केला असता इतर महत्वाच्या कार्यात गुंतल्यामुळे मायबोलीवर येणे शक्य होत नाही असे त्यांनी सांगितले. आजकालच्या स्त्रियांच्या डोक्यात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करण्याचे नसते खुळ शिरले असून त्यापायी केल्या जाणाऱ्या थेरांमुळे भारतीय समाज अधोगतीला लागला आहे अशी खंत त्यांनी व्यक्त केली. ही अधोगती रोखण्यास गावोगावी फिरून स्त्रियांना जागृत करण्याच्या कार्यात त्या व्यग्र आहेत. "होममेकर हीच खरी आदर्श स्त्री" व "रोजच्या स्वयंपाकात सोवळ्याचे महत्व" यावरील त्यांची गाजत असलेली व्याख्याने लौकरच मायबोलीवर लिखित रूपात प्रसिद्ध करण्यात येतील असे त्यांनी सांगितले.

१२. राजकारण हा गंभीर आणि महत्वाचा विषय असून त्यावर विचारांची देवाण घेवाण व्हायलाच हवी. परंतु फ़क्त देवाण करणारे काही लोक मायबोलीवरील सर्वच राजकारण धाग्यांत विषयाच्या पार्श्वभागावर लाथ घालुन तेच ते दळण दळत बसतात, एकमेकांवर वर्षा नु वर्षे तेच ते वैयक्तीक आरोप करत बसतात, इतर काही धाग्यावरही याचे पडसाद उमटत रहातात अशी खंत सध्याच्या व्यवस्थापन मंडळाने व्यक्त केली. यासाठी सदस्यांवर डोळ्यात तेल घालुन लक्ष ठेवण्यास, वेळीच तंबी देण्यास आणि तरीही न ऐकल्यास त्वरीत सदस्यत्व रद्द करण्यास एक स्थायी समीती नेमण्यात आली आहे. नगरवाले, वटवृक्ष, DJ, झम्पू दामले हे त्या समीतीचे सदस्य असून समीतीचे अध्यक्षपद वर्षातून सहा सहा महीन्यांकरता रश्मी व उदय यांना विभागून देण्यात आले आहे.

१३. पूर्वाश्रमीचे लिंबुटिंबु (सध्याचे कोण बरे?) आणि आरारा यांना मायबोलीचे टॉम अ‍ॅंड जेरी अशी उपमा एका सर्वेक्षण मंडळाने दिली आहे. परंतु यातील टॉम कोण व जेरी कोण याबद्दल त्यांनी काहीच खुलासा केला नसल्याने कोण खरा जेरी व कोण खरा टॉम, यावरुन दोघांत लौकरच जुंपणार असल्याच्या अंदाजाने पॉपकॉर्नच्या विक्रीत विक्रमी नोंद झाली असल्याचे कळते.

याबरोबरच आजच्या बातम्या संपल्या. पुन्हा येउ लौकरच मायबोली निवडणुकांचे लाइव्ह कव्हरेज घेउन. बघत रहा मायबोली २४ तास.

(हे केवळ गमतीने लिहिले असून यात उल्लेख आलेल्या सर्व सदस्यांनी कृपया दिवे Light 1 Light 1 Light 1 घ्या ही नम्र विनंती. हे खेळीमेळीने घेतले जाईल ही अपेक्षा.)

बातम्यांमध्ये व्यत्यय यांनी घातलेली भरः

१४. सातच्या आत घरात या विषयावर सोनू यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. स्त्रियांनी संध्याकाळी एकटे भटकण्यावर बंदी आणावी या त्यांच्या मागणीची कारणमीमांसा या व्याख्यानात केली जाईल.

१५. खरे सिम्बा हे एक स्थुलप्रकृती (ढेरपोटे) असून ते सोशल मीडियावर टाकत असलेली प्रकाशचित्रे फोटोशॉप केलेली असल्याची खळबळजनक माहिती खात्रीलायक सुत्रांकडून मिळते. ही बातमी मिळाल्यावर हृदयभंग झालेल्या तरुणींनी दिलेल्या प्रतिक्रिया इथे देता येण्याजोग्या नाहीत

१६. आर एस एस च्या स्वप्नातले हिंदुराष्ट्र प्रत्यक्षात यावे यासाठी भरत यांनी महायज्ञ आयोजित केला आहे. लवकरात लवकर चातुर्वर्ण्य व्यवस्था पुनर्प्रस्थापित व्हावी हा उद्देशही त्यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना व्यक्त केला. या महायज्ञाच्या तांत्रिक बाजू श्री आरारा सांभाळतील.

१७. साती यांनी त्यांचा id परत घ्यावा म्हणून वेमा त्यांना फोन करून हॅरास करतायत अशी तक्रार दाखल केली गेली आहे.

१८. "एका भुभु द्वेष्ट्याची डायरी" हे नवीन सदर आशुचॅम्प सादर करतील. यामध्ये त्यांना अमा महत्वाची मदत करतील. हजारो वर्षांच्या मानवी उत्क्रांतीमुळे प्राण्याची भीती ही आपल्या जीन्समध्ये (पक्षी आपल्या रक्तात [पक्षी म्हणजे उडणारे नव्हे {सगळेच पक्षी उडू शकत नाही हे आम्हाला माहीत आहे}]) आहे त्यामुळे कुत्रे, मांजरी अशा हिंसक होऊ शकणाऱ्या प्राण्यांना दूर ठेवावे या मुद्द्यावर या दोघांचा भर असेल

१९. "ऋणं कृत्वा घृतं पिबेत" या शिर्षकाची मालिका घेऊन येत आहेत जिज्ञासा. "ग्लोबल वॉर्मिंग - एक थोतांड" या बेस्टसेलर पुस्तकाची लेखिका एव्हढीच जिज्ञासा यांची ओळख नाही तर "प्लास्टिक-एक वरदान" हा त्यांचा कार्यक्रम याआधी सगळे टीआरपी विक्रम तोडणारा ठरलेला आहे. पुढील पिढ्याना उद्देशून केलेल्या "तो मैं क्या करू?" या बिनतोड प्रश्नाला लहान बाळे आणि जन्माला न आलेली पिढी काहीच उत्तर देऊ न शकल्याने त्या सद्यपिढीच्या आयकॉन ठरल्या आहेत

२०. लसीकरणाचे तोटे डॉ कुमार त्यांच्या नवीन मालिकेत समजावतील. क्लिष्ट वैद्यकीय भाषेचा अतिरेक केल्यामुळे त्यांची लोकप्रियता उतरणीस लागली आहे. पण कॉन्स्पिरसी थियरी सिद्ध करण्यासाठी क्लिष्ट भाषा आवश्यक असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

२१. आपल्या चॅनेलच्या लोकप्रिय अँकर मी_अनु या उद्यापासून पुन्हा तुमच्या भेटीस येतील. "मांजर" या विषयावर उच्चशिक्षण घेण्यासाठी त्यांनी सब्बाटिकल रजा घेतलेली. पण शेपटीवालं मांजर की ऑफिसातलं मांजर (पक्षी मॅनेजर [पक्षी म्हणजे उडणारे नव्हे {सगळेच पक्षी उडू शकत नाही हे आम्हाला माहीत आहे}]) यामध्ये निर्णय होऊ न शकल्याने त्या दोनच दिवसात पुन्हा रुजू होणार आहेत.

Light 1 Light 1 Light 1
Submitted by व्यत्यय on 23 September, 2021 - 14:37

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

# अमृकिशादी खरंच ट्रेंडिंग धागा आहे,, माबोवर. >> धागा जोरात धावतोय पण लग्न मात्र जिथल्या तिथे आहे.. ना engagement ची तारीख ना लग्नाचा vennue ना लग्नाची तारीख..काहीच फिक्स नाही Sad होणाऱ्या नवऱ्याला या धाग्याची लिंक पाठवते वाचून जरा फरक पडेल वाटते Wink

किती घाई... . Happy पितृपक्षात कोण काढतं लग्नाची तारीख??!! आता करतील. जितकं हळू चालेल तितके तुला तिकडचे स्वभाव समजतील. आता जरी तुला अपडेट्स नाही आले तरी पडद्यामागे आई-काकू, सासू-मामेसासू इ इ अशी अगणित डिस्कशन्स होतात. मग दोन्ही पार्टीजचे प्लॅन होईल.

आहे हे धागे तर एंजॉय कर...मग नंतर बाळ हिरवी ओनियन कलर शी करतं असले धागे काढशील... तू तेव्हा ते ही एंजॉय करशील पण आम्हाला हे चिंतामणी, मॉव्ह जास्त मजेचे वाटते आहे Lol

माबो २४ तास news channel बातमी देण्यासाठी सजग असले तरी प्रसिद्धीपरांमुख (शुले चुकलंय, कीबोर्डमुळे ) आणि अजिबात attention seeker नसणाऱ्या ऋणमेष ह्या आयडी ला जास्त फुटेज मिळाल्यामुळे सादर व्यक्ती अत्यंत चिडले आहेत, मला ( म्हणजे ऋ ला )माबोच्या कोपऱ्यात उगा शांत बसून राहू द्या अशी त्यांनी ताकीद दिली आहे.असे न केल्यास राडा करून वाड्यातील सभागृहाची मोडतोड करण्याची धमकीही त्यांनी दिली आहे.
ह्यावर माबो २४ तास च्या बातमीदाराने काहीही बोलण्यास नकार दिला आहे व आपला कॅमेरा दागिन्यांचे फोटो काढण्यात गुंतलेल्या जेम्स बॉण्ड ह्यांच्याकडे वळवला आहे असे समजते.
काय सांगशील ज्ञानदा ह्यावर?

Submitted by सीमंतिनी >> खरंय तुमचं Lol आमच्या लग्नाच्या खूप वेळा खूप गोष्टी postpone झाल्या सुरवातीपासूनच पाहण्याच्या प्रोग्रामपासूनच..पण इथले धागे खरचं खुप एन्जॉय करतेय इथेच लग्न आधी लागतेय माझे असं वाटतंय..thanks to this माबो family Happy

चिंतामणी रंग या धाग्यावर बहुतेक मी आणला Wink

यानिमित्ताने एक आठवलं, "सुडोमि" हा शब्द मीच दिला मायबोलीला. न्यू जर्सी मधल्या एका गटगनंतर वृत्तान्त लिहिला तेव्हा वापरला होता, आ (ता) मी सुखाने डोळे मिटेन (आमीसुडोमि). आठवणीतील मायबोली मध्ये मी मायबोलीला काय दिलं हे लिहायला हवं होतं पण मुळातच तसं काही लिहायचा उत्साह राहिला नाही. Wink

अखेर हा हा म्हणता शालू खरेदीचा दिवस उजाडला. नवर्‍या मुलाने वाग्दत्त वधूला इम्प्रेस करण्यासाठी "चटणी कलर", "बैन्गन कलर" , "राणी कलर" शिकून घेतले होते. दुकानात जाताच केसांची झुल्फे मागे सारत शहरुख खान चे बेअरिंग पकडून " तुला चटणी कलर किंवा माव कलर छान दिसेल !" यार तिने "मला कि नै चिंतामणी कलर आवडतो" हा सिलॅबस च्या बाहेरचा कलर ऐकून त्याचा चेहेरा राजपाल यादव सारखा झाला.

काहीही चालुय इथे
तरी अजून किरमिजी आला नाही(ते निळं द्रावण किरमिजी व्हायचं ना).शिवाय फिरोजी राहिलाच.

बाबूराव, आपको किरमिजी और फिरोजी मालूम है?
नही रे बाबा. मैं संताजी और धनाजी छोड़के और किसी मावळे को नही जानता.

विकु Lol
गरजूंनी अंजीरी, माव, किरमिजी वर अडकून न रहाता रामा ग्रीन, सी ग्रीन, इंडिगो, लाइम ग्रीन, मिन्ट,कोबाल्ट ब्लू, टील ब्लू, इलेक्ट्रिक ब्लू, बेबी ब्लू, स्टील ग्रे, क्रिमसन, रुबी, वाइन, सामन , लायलॅक , लव्हेन्डर, वायोलेट, मॅजेन्टा वगैरे रंगाचाही अभ्यास करावा Happy

अरे बास रे बास.
ते तानापिहिनिपाजा महित होत त्यात ही इतकी खिचडी डोकं भंजाळायला होतं

हसायला तरी वेळ द्या Rofl Rofl फटकेबाजी सुरू आहे नुसती. पुड्या सोडताएत सगळे. मानव टु गुड Lol
रंगपंचमीच चालू झाली इथे.

यावर श्री माने यांना विचारणा करता त्यांनी काहीही उत्तर देण्यास नकार दिला. पण खात्रीलायक सूत्रांकडून असे समजले की लिंबू रंगाचा उल्लेख केला, पण इतर कोणत्या रंगाचा न केल्याने कोणाचे बॉडी शेमिंग होईल अशी त्यांच्या वोकनेस सल्लागाराने माहिती पुरवली. त्यावर बराच खल झाला की हा रंग साडीचा असून कोणाच्या अंगाचा नाही. पण "अंग कसं आहे?" या प्रश्नाला काही प्रसिद्ध व्यक्तिमत्त्वांनी "खूप गोरं आहे नाही?" अशी उत्तरे दिल्याचे बहुतेकांना माहीत असेलच. त्यामुळे लुगड्याचा रंग व अंगाचा रंग यात गोंधळ होउन अनेकांना यात आपले बॉडी शेमिंग झाले असे वाटू शकते अशी शंका आल्याने मान्यांनी यावर मौन पाळणेच पसंत केले. Wink

बाबूराव, आपको किरमिजी और फिरोजी मालूम है?
नही रे बाबा. मैं संताजी और धनाजी छोड़के और किसी मावळे को नही जानता. >>> फोनकडे पाहून इतकं हसताना पाहून घरच्यांना आता गैरसमज व्हायला लागलेत की Lol Lol हसून हसून पुरेवाट झाली

Pages