(या उपक्रमात दोनच लेख आले. तेव्हा यात लिहिण्याचा विचार केला. परंतु तो धागा पाहिला असता त्यात ठरावीक विषय दिला असल्याची आठवण झाली. दूरदर्शन मालिका, चित्रपट या विषयी माझे ज्ञान अगाध असल्याने, विषयांतर करुन लिहीत आहे, त्याबद्दल क्षमस्व. )
नमस्कार, मायबोली २४ तास वर आपले स्वागत आहे.
आजच्या ठळक बातम्या.
मायबोली व्यवस्थापन मंडळाची आज बैठक झाली. त्यात काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले.
ते निर्णय असे आहेत.
१. येत्या एक ऑक्टोबर पासून, मायबोलीचे अॅडमिन, वेबमास्टर, नियंत्रक हे लोकशाही पद्धतीने निवडले जातील. निवडून आलेल्या चमूचा कालावधी दोन वर्षे असेल. यासाठी खुली मतदान पद्धती अवलंबली जाणार असून मतदान धाग्यात कुणी कुणाला मत दिले हे दिसणार असल्याने, पक्षपाताचा आरोप करण्यास वाव रहाणार नाही. जाणुन घ्या या पदांसाठी काय आहे पात्रता.
अॅडमिन: उमेदवाराच्या मूळ सदस्यनामाव्यतिरीक्त किमान दहा ड्युआयडीज असाव्यात आणि त्यातिल किमान चार खाती कारवाईत रद्द झालेली असावीत. तसेच किमान चार मायबोली सदस्यांचे खाते रद्द करवण्यात हातभार लावलेला असावा आणि इतर सदस्यांच्या प्रतिसादाचे किमान शंभर स्क्रीनशॉट्स सेव्ह करुन त्यांचा स्कोअर सेटलींगसाठी वापर केलेला असावा.
वेबमास्टर: उमेदवाराच्या मूळ सदस्यनामाव्यतिरीक्त किमान सहा ड्युआयडीज असाव्यात आणि त्यातिल किमान दोन खाती कारवाईत रद्द झालेली असावीत. तसेच किमान पंचवीस धागे भरकटवण्याचा अनुभव असावा आणि असंबद्ध गप्पा धाग्यात किमान शंभर सुसंबद्ध प्रतिसाद दिलेले असावेत.
नियंत्रक: उमेदवाराच्या मूळ सदस्यनामाव्यतिरीक्त किमान तीन ड्युआयडीज असाव्यात आणि त्यातिल किमान एक खाते कारवाईत रद्द झालेले असावे. तसेच सध्याच्या व्यवस्थापन मंडळावर किमान पंचवीस वेळा पक्षपाताचा आरोप केलेला असावा आणि गंभीर लेखांवर किमान पन्नास असंबद्ध प्रतिसाद दिलेले असावेत.
इच्छुक उमेदवारांनी "मी उभा/भी आहे - पदनाम- {सदस्यनाम}” अशा शिर्षकाचा बाफ़ काढुन त्यात आपली पात्रता सिद्ध करावी, आणि त्याच बाफमध्य़े प्रचार सुरु करावा. हा बाफच उमेदवाराची प्रवेशिका समजली जाईल. प्रवेशिका देण्याची अंतिम तारीख एक ऑक्टोबर आहे. सध्या अपात्र असणार्या इच्छुक उमेदवारांनाही पात्रता मिळवण्यास हा कालावधी पुरेसा आहे असे निवडणुक संयोजकांनी सांगीतले.
जरी वरील पदांवरील उमेदवार लोकशाही पद्धतीने निवडल्या जातील, काही ठरावीक कामांसाठी स्थायी समीती सुद्धा नेमण्यात आल्या आहेत.
२. मायबोलीवर शुद्ध मराठीत लेखन व्हावे, इंग्रजी शब्दांचा वापर कमीत कमी व्हावा आणि लेखन देवनागरीतूनच व्हावे या करता सदस्यांवर जातीने लक्ष ठेवणे, समज देणे यासाठी एक स्थायी समीती स्थापन करण्यात आली आहे. राज व नानबा हे त्या समीतीचे सदस्य आहेत.
३. सगळ्या लेखांवर लोक विषयाला धरुन गंभीर प्रतिसाद देतात की नाही, कोतबोमध्ये फसवे धागे निघत नाहीत ना यावर लक्ष ठेवण्यासाठी बोकलत यांची एक सदस्यीय स्थायी समीतीत नेमणुक करण्यात आली आहे.
आता काही खळबळजनक बातम्या:
४. व्यत्यय, हायझेनबर्ग, मानव हे त्रिकुट शनी शिंगणापूरच्या देवळात नवस करताना रंगे हात आढळुन आले. त्यांच्या बॅगेत स्तोत्रांची पुस्तके सापडली. घरात होणारा मृतात्म्यांचा त्रास, करणी, भानामती प्रकारांमुळे नोकरीत बढती न मिळणे, व्यवसायाची भरभराट न होणे, देवीच्या कोपामुळे
पसरणार्या कोव्हीड पासून सुरक्षा अशा कारणांसाठी विविध देवस्थानात ते नेमाने नवस करतात, मांत्रिकांची मदत घेतात असे चौकशी अंती निष्पन्न झाले.
५. नवी मुंबई जवळ मद्याचा अवैध साठा असलेले एक मोठे गोदाम सापडले आहे. भेसळ करणे, कर चूकवून लोकांना घरपोच मद्य पोचवणे, ड्राय डेच्या दिवशी मद्य विक्री करणे हे धंदे इथुन चालत असल्याचे लक्षात आले. या गोदामाचे मालक ऋन्मेष व मानव पृथ्वीकर असल्याचे कळते. एकीकडे उघडपणे मद्याच्या उदात्तीकरणाचा कठोर विरोध करत असताना दुसरीकडे लपुन छपुन अवैध मद्यविक्रीचा धंदा ही जोडगोळी करत असल्याचे निदर्शनास आले आहे.
६. एका धाग्यावर ऋन्मेष यांनी आपली चूक कबूल केल्याची बातमी व्हायरल झाल्याने मायबोलीवर मोठी खळबळ उडाली. चौकशी नंतर असे निदर्शनास आले की तो आयडी "ऋन्मेssष" नसून "ऋन्मेsssष" असा तोतया होता. याबाबत ऋन्मेssष यांच्याशी सम्पर्क केला असता "हे मला बदनाम करण्याचे षडयंत्र असुन यावर मी लगेच एक लेख पाड -माफ करा- लिहीणार आहे" असे ते म्हणाले.
धावत्या बातम्या:
७. "फल ज्योतिष्य, राशी भविष्य एक थोतांड" हा लेख मायबोलीवर लौकरच प्रसिद्ध होणार असून, तो सामो आणि रश्मी यांनी मिळुन लिहीला असल्याचे कळते.
८. मायबोलीवरील एक प्रसिद्ध व्यक्ती रोज रात्री वेषांतर करुन हल्दीराम आऊटलेट मध्ये जाउन गुलाबजाम, रबडी, बालुशाही, श्रीखंड, कलाकंद इत्यादि डिशेस आइसक्रीम सोबत खात असल्याचे तेथील एका कर्मचायाने मायबोली २४ तासला फोन करुन सांगीतले. मायबोली २४ तासने याचा शहनिशा केला असुन ती व्यक्ती सई केसकर असल्याचे निदर्शनास आले.
९. “आयुर्वेद तारी त्याला कोण मारी" हा पंचकर्म आणि मंत्रोच्चाराद्वारे शुद्ध केलेले धातु यांचे गंभीर आजारांवरील उपचारांचे महत्व पटवून देणारा लेख मायबोलीवर लौकरच प्रकाशीत होणार असून श्री आरारा हे त्याचे लेखक असल्याचे कळते.
१०. मायबोलीच्या एका गटग मध्ये एक त्रिकुट ऑन द रॉक्स स्कॉचचा आस्वाद घेत असताना, वारंवार बाजुच्या खोलीत जाउन ग्लास संपवून परतत असल्याचे आमच्या बातमीदाराने पाहिले. आधी ते धुम्रपानास जात असावेत असा त्याचा समज झाला. पण नंतर धुम्रपान कक्ष दुसरीकडे असल्याचे लक्षात आल्यावर तोही त्या खोलीत ग्लास घेउन त्यांच्या मागोमाग गेला असता हे त्रिकुट तिथे स्कॉचमध्ये पेप्सी टाकुन पीत असल्याचे दिसून आले. च्रप्स, आशुचॅंप व सोन्याबापू अशी त्यांची नावे असून, नीट पिणे फार अवघड असल्याने व चवही सहन होत नसल्याने नेहमी लपुन पेप्सी अथवा कोक घालुन पीत असल्याचे त्यांनी कबूल केले.
११. आमच्या बातमीदाराने अॅमी यांच्याशी संपर्क केला असता इतर महत्वाच्या कार्यात गुंतल्यामुळे मायबोलीवर येणे शक्य होत नाही असे त्यांनी सांगितले. आजकालच्या स्त्रियांच्या डोक्यात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करण्याचे नसते खुळ शिरले असून त्यापायी केल्या जाणाऱ्या थेरांमुळे भारतीय समाज अधोगतीला लागला आहे अशी खंत त्यांनी व्यक्त केली. ही अधोगती रोखण्यास गावोगावी फिरून स्त्रियांना जागृत करण्याच्या कार्यात त्या व्यग्र आहेत. "होममेकर हीच खरी आदर्श स्त्री" व "रोजच्या स्वयंपाकात सोवळ्याचे महत्व" यावरील त्यांची गाजत असलेली व्याख्याने लौकरच मायबोलीवर लिखित रूपात प्रसिद्ध करण्यात येतील असे त्यांनी सांगितले.
१२. राजकारण हा गंभीर आणि महत्वाचा विषय असून त्यावर विचारांची देवाण घेवाण व्हायलाच हवी. परंतु फ़क्त देवाण करणारे काही लोक मायबोलीवरील सर्वच राजकारण धाग्यांत विषयाच्या पार्श्वभागावर लाथ घालुन तेच ते दळण दळत बसतात, एकमेकांवर वर्षा नु वर्षे तेच ते वैयक्तीक आरोप करत बसतात, इतर काही धाग्यावरही याचे पडसाद उमटत रहातात अशी खंत सध्याच्या व्यवस्थापन मंडळाने व्यक्त केली. यासाठी सदस्यांवर डोळ्यात तेल घालुन लक्ष ठेवण्यास, वेळीच तंबी देण्यास आणि तरीही न ऐकल्यास त्वरीत सदस्यत्व रद्द करण्यास एक स्थायी समीती नेमण्यात आली आहे. नगरवाले, वटवृक्ष, DJ, झम्पू दामले हे त्या समीतीचे सदस्य असून समीतीचे अध्यक्षपद वर्षातून सहा सहा महीन्यांकरता रश्मी व उदय यांना विभागून देण्यात आले आहे.
१३. पूर्वाश्रमीचे लिंबुटिंबु (सध्याचे कोण बरे?) आणि आरारा यांना मायबोलीचे टॉम अॅंड जेरी अशी उपमा एका सर्वेक्षण मंडळाने दिली आहे. परंतु यातील टॉम कोण व जेरी कोण याबद्दल त्यांनी काहीच खुलासा केला नसल्याने कोण खरा जेरी व कोण खरा टॉम, यावरुन दोघांत लौकरच जुंपणार असल्याच्या अंदाजाने पॉपकॉर्नच्या विक्रीत विक्रमी नोंद झाली असल्याचे कळते.
याबरोबरच आजच्या बातम्या संपल्या. पुन्हा येउ लौकरच मायबोली निवडणुकांचे लाइव्ह कव्हरेज घेउन. बघत रहा मायबोली २४ तास.
(हे केवळ गमतीने लिहिले असून यात उल्लेख आलेल्या सर्व सदस्यांनी कृपया दिवे घ्या ही नम्र विनंती. हे खेळीमेळीने घेतले जाईल ही अपेक्षा.)
बातम्यांमध्ये व्यत्यय यांनी घातलेली भरः
१४. सातच्या आत घरात या विषयावर सोनू यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. स्त्रियांनी संध्याकाळी एकटे भटकण्यावर बंदी आणावी या त्यांच्या मागणीची कारणमीमांसा या व्याख्यानात केली जाईल.
१५. खरे सिम्बा हे एक स्थुलप्रकृती (ढेरपोटे) असून ते सोशल मीडियावर टाकत असलेली प्रकाशचित्रे फोटोशॉप केलेली असल्याची खळबळजनक माहिती खात्रीलायक सुत्रांकडून मिळते. ही बातमी मिळाल्यावर हृदयभंग झालेल्या तरुणींनी दिलेल्या प्रतिक्रिया इथे देता येण्याजोग्या नाहीत
१६. आर एस एस च्या स्वप्नातले हिंदुराष्ट्र प्रत्यक्षात यावे यासाठी भरत यांनी महायज्ञ आयोजित केला आहे. लवकरात लवकर चातुर्वर्ण्य व्यवस्था पुनर्प्रस्थापित व्हावी हा उद्देशही त्यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना व्यक्त केला. या महायज्ञाच्या तांत्रिक बाजू श्री आरारा सांभाळतील.
१७. साती यांनी त्यांचा id परत घ्यावा म्हणून वेमा त्यांना फोन करून हॅरास करतायत अशी तक्रार दाखल केली गेली आहे.
१८. "एका भुभु द्वेष्ट्याची डायरी" हे नवीन सदर आशुचॅम्प सादर करतील. यामध्ये त्यांना अमा महत्वाची मदत करतील. हजारो वर्षांच्या मानवी उत्क्रांतीमुळे प्राण्याची भीती ही आपल्या जीन्समध्ये (पक्षी आपल्या रक्तात [पक्षी म्हणजे उडणारे नव्हे {सगळेच पक्षी उडू शकत नाही हे आम्हाला माहीत आहे}]) आहे त्यामुळे कुत्रे, मांजरी अशा हिंसक होऊ शकणाऱ्या प्राण्यांना दूर ठेवावे या मुद्द्यावर या दोघांचा भर असेल
१९. "ऋणं कृत्वा घृतं पिबेत" या शिर्षकाची मालिका घेऊन येत आहेत जिज्ञासा. "ग्लोबल वॉर्मिंग - एक थोतांड" या बेस्टसेलर पुस्तकाची लेखिका एव्हढीच जिज्ञासा यांची ओळख नाही तर "प्लास्टिक-एक वरदान" हा त्यांचा कार्यक्रम याआधी सगळे टीआरपी विक्रम तोडणारा ठरलेला आहे. पुढील पिढ्याना उद्देशून केलेल्या "तो मैं क्या करू?" या बिनतोड प्रश्नाला लहान बाळे आणि जन्माला न आलेली पिढी काहीच उत्तर देऊ न शकल्याने त्या सद्यपिढीच्या आयकॉन ठरल्या आहेत
२०. लसीकरणाचे तोटे डॉ कुमार त्यांच्या नवीन मालिकेत समजावतील. क्लिष्ट वैद्यकीय भाषेचा अतिरेक केल्यामुळे त्यांची लोकप्रियता उतरणीस लागली आहे. पण कॉन्स्पिरसी थियरी सिद्ध करण्यासाठी क्लिष्ट भाषा आवश्यक असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
२१. आपल्या चॅनेलच्या लोकप्रिय अँकर मी_अनु या उद्यापासून पुन्हा तुमच्या भेटीस येतील. "मांजर" या विषयावर उच्चशिक्षण घेण्यासाठी त्यांनी सब्बाटिकल रजा घेतलेली. पण शेपटीवालं मांजर की ऑफिसातलं मांजर (पक्षी मॅनेजर [पक्षी म्हणजे उडणारे नव्हे {सगळेच पक्षी उडू शकत नाही हे आम्हाला माहीत आहे}]) यामध्ये निर्णय होऊ न शकल्याने त्या दोनच दिवसात पुन्हा रुजू होणार आहेत.
Submitted by व्यत्यय on 23 September, 2021 - 14:37
कढिपाल्याची एक जुडी त्यांना
कढिपाल्याची एक जुडी त्यांना सव्वा लाखाला पडली ! >> विकु
दीड लाखाचं नुकसान टाळण्यासाठी
दीड लाखाचं नुकसान टाळण्यासाठी सीमंतिनी यांनी राग आवरा आवरी शिबीरात कालच प्रवेश घेतला. पण तिकडे शिबीरार्थींना उगा पिन मारू मारू सल्ले देऊन तिकडच्या (वेब)मास्तरांना त्यांनी वात आणला. एका शिबीरात नववधूची सासू आणि ती नववधू अशा दोघी होत्या. पण त्या एकमेकींच्या सास्वासुना असल्याचे माहित नसल्याने दोघींना सल्ले मिळाले. मग काय! दोन्ही कडून एक्सपेलिआर्मस, दोघींच्या हातातल्या जादूच्या काठ्या उडाल्या. त्या सीमंतिनींनी शिताफीने झेलुन उद्या पासून होणार्या गरब्याची सोय करुन घेतली अशी एक वदंता आहे.
पण कोपर्यातून आत्ताच कानी आलेल्या आवाजावरुन, त्याच काठीचा धाक दाखवून त्यांनी (वेब) मास्तरांकडून शिबीराचे सर्टिफिकेट सगळ्या सहभागी शिबिरार्थींना देण्याचं आश्वासन ही मिळवल्याने सगळे शिबीरार्थी इनक्लूडिंग वधू विथ सासू त्यांच्यावर खूष आहेत. उद्याच्या गरब्यात दोन अकरा इंची, फिनिक्सचा केस वाल्या काठ्या एकमेकांवर आपटल्या की काय होतं याची उत्सुक्ता मात्र आता शिगेला पोहोचली आहे.
मी आता वाचला हा धागा, अशक्य
मी आता वाचला हा धागा, अशक्य धमाल आहे
एकसे एक पांचेस
निव्वळ अफलातून
हिंदीत शाहरुख तर मराठीत स्वजो
हिंदीत शाहरुख तर मराठीत स्वजो आणि सई हे ओव्हररेटेड कलाकार असून त्यांचे चित्रपट बघणे ही शिक्षा असल्याचे ऋन्मेष यांनी जाहीर केले. ते ऐकताच दुनियादारी 2 मध्ये भाऊ तोरसेकर याना मुख्य कलाकार म्हणून घेण्यात आल्याचे समजते.
या वयात नाचायला जमणार नाही म्हणून डॉन 3 ची आणि विचारधारेत बसत नाही म्हणून रावण 2 ची ऑफर त्यांनी नाकारली असल्याचेही विश्वसनीय सूत्रे सांगतात
खुशखबर! खुशखबर!! खुशखबर!!!
खुशखबर! खुशखबर!! खुशखबर!!!
काळा, पांढरा, लाल, निळा, पिवळा आणि हिरवा हे हृतिक रोशन च्या एका हाताच्या बोटावर मोजता येतील एव्हढेच रंग माहीत असणाऱ्यांसाठी खुशखबर!
आमचा "लग्नाची पूर्वतयारी" हा धागा वाचा आणि चिंतामणी म्हणजे कुठला रंग, mauve म्हणजे काय? चंदेरी हा रंगच नाही इत्यादी बहुमूल्य माहिती विनामूल्य मिळवा.
चिंतामणी हे नाव रंग म्हणून कधीपासून प्रचलित झाले यावर लवकरच चिनूक्स यांचे व्याख्यान होणार आहे. त्याजोडीला हीरा mauve रंगाला भारतात अधिकृत मान्यता कधी मिळाली याचे विवेचन करतील.
इशारा: "कॉपर शेड मधला रेशमी गुल्बट ईंग्लिश पिंक रंग" वगैरे वर्णन वाचून भंजाळलात, डोक्याचं भजं झालं तर मायबोली प्रशासन वैद्यकीय खर्च उचलणार नाही याची नोंद घ्या
(No subject)
सगळेच हहपूवा
सगळेच हहपूवा
फ्युशिया राहिला बरं व्यत्यय.मागे एका विद्वानांना हा रंग नसून किमोनोचा एक प्रकार वाटल्याचे स्मरते
अमितव, व्यत्यय
अमितव, व्यत्यय
(No subject)
जबराट आहे हा धागा!
जबराट आहे हा धागा!
सुटलेत सगळेच!
अमितव यांच्या "राग आवरा आवरी
अमितव यांच्या "राग आवरा आवरी शिबीर" बातमीवर वाचकांच्या आलेल्या प्रतिक्रिया:
सासु आणि सुन दोघींच्याही काठ्या अकरा इंची, फिनिक्सचा केस असलेल्या कशा असतील? लग्नात मुलगा-मुलगी च्या पत्रिका जुळवण्याऐवजी सासु-सुनेच्या काठ्या जुळवुन बघितलेल्या काय याचा खुलासा करावा.
-- हॅरी पॉटरचा पंखा
काठ्या घेउन खेळतात त्याला दांडीया म्हणतात गरबा नव्हे ही बेसिक माहीती तुमच्या वार्ताहराला नसावी याचा खेद झाला. अशा उथळ पत्रकारीतेचा चिकुवाडी नवरात्र मंडळातर्फे जाहीर निषेध
-- क. से. पटेल, सेक्रेटरी, चिकुवाडी नवरात्र मंडळ
सीमंतिनी यांनी धाक दाखवुन शिबीराचे सर्टिफिकेट सगळ्या सहभागी शिबिरार्थींना देण्याचं आश्वासन मिळवले या बातमीचे उदात्तीकरण अजिबात आवडले नाही. अशा गुंड आणि समाजविघातक प्रवृत्तींना वेळीच आळा न घातल्याने आपणास समाजाचे नैतिक अधःपतन सर्वत्र बघण्यास मिळत आहे. मायबोली प्रशासन अशा बेदरकार वार्ताहरांना वेळीच वेसण घालेल काय?
-- चि. ड. लेले, मधली आळी, रत्नागिरी
सी, विकु, अमितव, व्यत्यय, अनु
सी, विकु, अमितव, व्यत्यय, अनु, आशुचॅंप
काल हॅरी पॉटरचा पंखा यांनी एक
काल हॅरी पॉटरचा पंखा यांनी एक महत्वाचा मुद्दा उपस्थित केला आहे. जेव्हा दोन व्यक्तींच्या काठ्या जुळतात तेव्हा त्या दोघात बरेच साम्य असते हे आपणा सर्वांना माहीत आहेच. तेव्हा आपल्या आईसारखीच काठी असणार्या मुलीशी लग्न करणे हे त्या मुलाच्या मनात सुप्तपणे असलेल्या इडिपस कॉम्प्लेक्सचे स्पष्ट लक्षण आहे याकडे दुर्लक्ष करता येणार नाही.
-- डॉ नाड्कर्णी, मनोवैज्ञानिक
मायबोलीवर ने माध्यम
मायबोलीने माध्यम प्रायोजकत्व स्वीकारलेले चित्रपट प्रदर्शीत होऊन एक दशक उलटल्यावर आता मायबोलीने स्वतःच पूर्ण चित्रपट निर्मिती करण्याची घोषणा केली आहे.
चित्रपटाचे सवांद लेखन, रंग आणि वेषभूषा यांची जय्यत तयारी सुरू झाली आहे.
चित्रपटाचे नाव आहे "#अमृकीशादी मे मायबोली दिवानी"
या चित्रपटातील संवादांची एक झलक :
"बाबू मोशाय, कलर चिंतामणी होना चाहिए, स्वभाव नही."
"माझा शालू तुझा, तुझा लेहंगा माझा ओम फट स्वाहा."
"आप हम से हमारी जिंदगी मांग लेते तो खुशी खुशी दे देते, पर आप ने तो हमारा ड्यूआयडी कौन है पूछ लिया!"
"कट आउट से डर नही लगता साब, 'बॉशे' से लगता है।'
"सजेशन्स पे सजेशन्स, सजेशन्स पे सजेशन्स, सजेशन्स पे सजेशन्स मिलते गये मिलॉर्ड! लेकिन डेस्टिनेशन नही मिला!"
"मेरे वेमा ऍडमिन आएंगे!"
"रंग दे तू मुझको फ्युशिया..."
"ये ढाई हजार की थाली जब खाता है ना, तो माबोकर उठता नही, सुडोमी हो जाता है!"
"इस बम को अब काकाभी डीफ्यूज कर नही पाएंगे.
हमने लाल, पिले और हरे रंग की वायरोंकी जगह अंजिरी, मॉव्ह और ओनीयन कलर की वायरे लगा दी है."
हे भयंकर भारी आहे
हे भयंकर भारी आहे
यात मॉव्ह आणि ओनीयन रंग न आणल्या बद्दल निषेध!!
मानव, हे फारच भारी!
मानव, हे फारच भारी!
जेम्स बाँड यांनी वेळात वेळ
जेम्स बाँड यांनी वेळात वेळ काढून,लोकाग्रहास्तव दागिन्यांच्या धाग्यावर आपला खजीना सामान्य जनतेस पाहण्यासाठी खुला केला.
त्यानंतर तेच गोल्डफिंगर असल्याचा संशय वेग वेगळ्या थरातून व्यक्त केला जात आहे.
चित्रपटाचे नाव आहे "
चित्रपटाचे नाव आहे "#अमृकीशादी मे मायबोली दिवानी"
बा मानवा तोडलस. काय ते डायलॉग आणी रचना वेमांनी खरच मनावर ना घेवो म्हणजे मिळवली
त्यानंतर तेच गोल्डफिंगर असल्याचा संशय वेग वेगळ्या थरातून व्यक्त केला जात आहे.
आई गं (गडाबडा लोळणारी बाहुली, बाहुला, बाहुले आणी इन्फिनिटी.....)
(No subject)
मानव ... महान आहे हे.
मानव ... महान आहे हे.
"मेरे वेमा ऍडमिन आएंगे!" >>>>>
तुफान चालू आहे हा धागा. सी,
तुफान चालू आहे हा धागा. सी, व्यत्यय, मानव भारी बातम्या देताय...
# अमृकिशादी खरंच ट्रेंडिंग धागा आहे,, माबोवर.
नुकताच ऋन्मेष यांनी नवीन धागा
नुकताच ऋन्मेष यांनी नवीन धागा काढल्यानंतर, त्यांचे एक नंबर चाहते, आशुचँप, यांनी नेहमीप्रमाणे प्रोत्साहनपर पहिला प्रतिसाद दिला. तसेच, शतकी प्रतिसादांसाठी अधूनमधून शाहरुख, स्वजो, सई यांचं कौतुक करणारे प्रतिसाद लिहिले. ऋन्मेषच्या धाग्यावर अधिकाधिक प्रतिसाद आले पाहिजेत, असे भावनिक आवाहनही त्यांनी इतर सभासदांना केल्याचे, गोपनीय सूत्रांकडून समजते.
धमाल चालू आहे इथे! माबो
धमाल चालू आहे इथे! माबो अभ्यास वाढवण्याच्या क्लासची पाटी पण लावायला हरकत नाही या धाग्याच्या शीर्षकात
चित्रपटाचे नाव आहे "
चित्रपटाचे नाव आहे "#अमृकीशादी मे मायबोली दिवानी"
बा मानवा तोडलस. काय ते डायलॉग +123456789012345
"#अमृकीशादी मे मायबोली दिवानी
"#अमृकीशादी मे मायबोली दिवानी"
उणे विद्यापीठाने आज काढलेल्या
उणे विद्यापीठाने आज काढलेल्या परिपत्रकानुसार इंजिनीयर्र्साठी आता ATKG आयुष्यभर उपलब्ध राहणार आहे. चार वर्षाच्या डिग्री शिक्षणात कधीही ATKT न मिळालेल्या विद्यार्थ्यांना एका मोठ्या शैक्षणिक अनुभवास मुकावे लागते. अशा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी पुढे Allowed to Keep Ganapati ही सुविधा देण्यात येत आहे. ही सुविधा घेणारे इंजिनीयर्स गणपती संपले तरी स्पर्धा घेणे, प्रशस्तिपत्रके देणे इ कामकाज वर्षाखेरपर्यंत करू शकतात. ढमुक इंजिनीयर्स असोसिएशन तर्फे या सुविधेचे स्वागत करण्यात आले तरी मायबोली संयोजक मंडळाने आपला युएसपी गेला म्हणून याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.
@मानव =)) भयाण विनोदी!!!
@मानव =))
भयाण विनोदी!!!
सजेशन्स पे सजेशन्स, सजेशन्स
सजेशन्स पे सजेशन्स, सजेशन्स पे सजेशन्स, सजेशन्स पे सजेशन्स मिलते गये मिलॉर्ड! लेकिन डेस्टिनेशन नही मिला!" >> मानव हसून हसून गडाबडा लोळणे वाली बाहुली भयंकर हसले काय अफाट लीहले आहे सगळे पंचेस एकसे एक
मला सुद्धा पहिल्यांदाच इतके
मला सुद्धा पहिल्यांदाच इतके colours माहिती झाले त्या धाग्यावरून..धागा काढण्याचे बरेच छुपे फायदे हळूहळू लक्षात येत आहे बर
चित्रपटाचे नाव आहे "
चित्रपटाचे नाव आहे "#अमृकीशादी मे मायबोली दिवानी"
बा मानवा तोडलस. काय ते डायलॉग आणी रचना वेमांनी खरच मनावर ना घेवो म्हणजे मिळवली Proud Proud Proud >> भारीच आहे की हे!
Pages