लग्न पहावे करून आणि घर पहावे बांधून या उक्तीप्रमाणे लग्न व्यवस्थापन हा अतिशय कठीण विषय आहे त्यात आता पूर्वीच्या काळी व्हायचे तसे लग्न म्हणजे फक्त पारंपारिक रीती रिवाजानुसार होणारे राहिले नाही..
बदलत्या काळानुसार अनेक गोष्टी लग्नाच्या पूर्वी ते लग्नापर्यंत केल्या जातात जसे की प्रे वेडिंग शूट, theme wedding, destination wedding, नवरी नवरदेव आणि फॅमिली चा छान बसवलेला प्रॅक्टीस केलेला डान्स, नवरीचे ते हळदीचे फुला फुलांचे दागिने, जोडप्याने matching कपडे घालणं etc etc
ही यादी न संपणारी आहे..
तर मायबोलीकरांनो तुमच्याकडे लग्नाळू लोकांसाठी खास काही टिप्स असतील किंवा नवीन काही theme असतील तर येथे टाका सगळ्यांच्या ते उपयोगी येईल..
यात ज्वेलरी, कपडे, theme, decoration, best shopping centre, pre wedding ideas, photographer, destination wedding places असं आणि या प्रकारचं काहीही असू शकत..
तुमचे अनुभवाचे बोल सगळ्या लग्नाळू लोकांना नक्कीच कामी येतील..
सगळ्यांचे प्रतिसाद वाचून मी स्वतःसाठी एक यादी बनवली आहे (शॉर्टकट मधे) ती इथे संकलित करतेय यात मग प्रतिसादानुसार update करता येईल..
1)सामाजिक भान
2)दोघांचा छान कट आऊट सेल्फी पॉईंट
3)मेक अप day night different
4)daily use बॅग
-घरी घालायचे कपडे ३-४ सेट्स
-बाहेर घालायचे कपडे ६-७ सेट्स including साड्या, ब्लाऊज, परकर
- २ बेडशीट्स (हो. लागतात.)
- टॉवेल्स
-कॉस्मेटिक्स
-टूथब्रश-पेस्ट
-सेफ्टीपिन्स खूप सारे
5) लग्न बॅग वेगळी
म्हणजे आऊटफिट+ज्वेलरी+ सेफ्टीपिन्स+ accessories. ज्यावेळी जे कपडे घालणार त्यासोबत सगळ्या वस्तू एकत्र मिळतील.
6)हनीमूनला जाताना मिनिमम सामान घेऊन जा.
7)डेस्टिनेशन वेडिंग्ज-रिसॉर्ट
8)फोटोग्राफर
9)ब्राय्डल पूर्व तयारी: लग्नाच्या आधी सहा महिने वजन कंट्रोल डाएट, तीन महिए आधी ब्रायडल पॅकेज, स्किन व हेअर उत्तम डेली रुटीन.
10) प्लॅनिंग- साड्या कपडे व अॅक्सेसरीज,घरून न्यायच्य बॅग प्लॅन हनिमूनला न्यायचे कपडे नीट, हे सुंदर पण मजबूत बांधणीचे
11)एक एक आउट फिट प्लस परकर ब्लाउज व अॅक्सेसरीज पाउच
12)साडी ड्रेपिन्ग ला पार्लर वाली
13)मेहंदी चे फुलाचे दागिने
14)बैठकीचा गायनाचा कार्यक्रम विनोदी प्रहसने
15)hens party
16)मेकप गेटप ट्रायल
17)फेसबुक वर रेडिमेड रुखवत-
१) स्टीलचा भांड्यांचा सेट.
२) काचेच्या जरा जास्त नाजूक कप बश्यांचा सेट व किटली.
३) काचेच्या बर्ण्यां मध्ये भरलेले डाळ तांदूळ व धान्ये सहा बरण्या किंवा मालत्या गव्हले असे पाच प्रकारचे.
4) मुलीने भरतकाम केलेले टेबलक्लॉथ. विण लेली क्रोशा केलेली कव्ह रे, डबलबेड् शीट चा सेट. व पिलो दोन पिलो कव्हर. त्यावर दोन लाल गुलाब व स्वीट ड्रीम्स असे भरत काम केलेले.
६) सप्तपदीची वचने लिहिलेले ( नव वधूस गोड सूचना लिहिलेले) कार्ड शीट किंवा जाडा चांगला ड्रॉइन्ग पेपर येतो त्यावर स्केच पेन्स ने लिहिलेले. अशी सात पेपर ची पावले.
७) सुके खोबरे कोरुन बनवलेले आर्ट.
८) साखरेचे ताट व तांब्या भांडे.
९) फॅन्सी अन्न पदार्थ. मोठे लाडू रंगी बेरंगी करंज्या चिरोटे. असे ठेवलेला एक बोल
१०) रंगीत कागदावर सोनेरी बुट्टे व काठ पदर चिकटवून केलेली साडी व त्रिकोणी खण हे जाड पुठ्ठ्यावर लावलेले.
११) रुखवताच्या टेबलाला खाली जोडलेले विणलेले किंवा मण्यांचे तोरण.
18)कोणत्याही प्रकारे स्वतःची तब्येत कॉम्प्रो करून दुसऱ्याचा कम्फर्ट ही सवय लावणे आधीपासून टाळणे.
19)दागिने ठेवायची पेटी व व्हॅनिटी केस
20)खरेदीची लिस्ट बनवावी..प्रत्येक लहान सहान गोष्ट कॅटेगरीवाईज मानपानाची , वैयक्तिक सामानाची , रिटर्न गिफ्ट , विधीप्रमाणे कपडे, दागिने ,लग्नाची खरेदी .
21) हनिमून साठी comfortable shoes, artificial light weight jwellery आणि कपडेे
22)मेडिकल check-up
23) जियो और जीने दो पॉलिसी
ओनीयन पिंक,फिका ग्रे, टिल
ओनीयन पिंक,फिका ग्रे, टिल ब्लु मधला अगदी फिका रंग हे अनपेक्षित रंग दिसतात पण चांगले >> मला सुद्धा असेच रंग आवडतात ग्रे ब्लॅक माझे सगळ्यात आवडते रंग.. पण लग्नात नाही घालू शकणार pastel shades तर सगळेच आवडतात..मस्त दिसतात
अमृताक्षर, दोन्ही लुक्स अगदी
अमृताक्षर, दोन्ही लुक्स अगदी मनभावन. महाराष्ट्रीय लुक लग्नासाठी (म्हणजे मंगलाष्टकं वगैरे) आणि राजपुताना लुक रिसेप्शन वगैरे किंवा तत्सम पार्टीसाठी मस्त दिसेल. माझाही सासरकडचा शालू फिका गुलाबी आहे आणि छानच दिसतो.आणि हो, फ्लोरल्सचीपण खूप चलती आहे. सुंदर दिसतो तोही लुक.
शॉपिंग ला जेवढी लोक कमी तेवढी
शॉपिंग ला जेवढी लोक कमी तेवढी नीट शॉपिंग होते अस माझं मत.. पण लग्नाची खरेदी म्हंटले की सगळ्यांनाच यायचं असतं मग दहा लोक दहा कपडे पसंत करतात आणि आपलं confusion अजून वाढत मग
दोन्ही लुक्स सुंदर आहेत.
दोन्ही लुक्स सुंदर आहेत.
आणि इथले सर्व शालू पण.
Awesome shaalu pradnya 9 my
Awesome shaalu pradnya 9 my favourite colour. Pl check my colouring threads . Very pretty couple. God bless.
Anushka Sharma wedding lehenga also very unique light mauve colour.
सगळ्यांना थॅन्क्स
सगळ्यांना थॅन्क्स
हेमाताई __/\__
मला हळदीची अॅलर्जी आहे जन्मापासूनच. जेवणात चालतेच, पण हळदीकुंकू असताना लावली तेव्हा प्रत्येक वेळी डोळे टुम्म सुजले. अगदी शुद्ध हळदीची पण अॅलर्जी येते. त्यामुळे लग्नात चंदनाची पावडर लावली होती आणि मुलीकडून हळद पाठवायच्या ऐवजी चंदन पावडर पाठवली होती आणि मुलाकडून पण तेच. त्याने मात्र रीतसर हळद लावली चंदन वगैरे सोपस्कार झाल्यानंतर.
मुलीकडून हळद पाठवायच्या ऐवजी
मुलीकडून हळद पाठवायच्या ऐवजी चंदन पावडर पाठवली होती Proud >>
unique light mauve colour.
unique light mauve colour.
Submitted by अमा >> हा रंग engagement साठी राखीव ठेवलाय
दोन्ही लुक्स सुंदर आहेत. >>
दोन्ही लुक्स सुंदर आहेत. >>
आणि इथले सर्व शालू पण. >> तुम्ही पण तुमचा शालू टाका ना..
Submitted by mi_anu
शोधत होते आताच गुगल फोटोज वर.
शोधत होते आताच गुगल फोटोज वर.
चक्क पूर्ण फोटोच नाहीये त्या शालूत नुसते भारंभार सेल्फी आहेत दिवाळी गणपती चे.लग्नाचा आल्बम माळ्यावर आहे.
हा सुंदर चिंतामणी कलर आहे.किंगफिशर बिअर किंवा किंगफिशर पक्ष्यात असतो तो निळा.जरही सिल्व्हर कडे झुकणारी आहे.खूप फंक्शन्स, खूप लग्नांमध्ये नेसून झाला.
सुंदर दिसतो हा चिंतामणी निळा.
सुंदर दिसतो हा चिंतामणी निळा..माझ्याकडे(आईची) पण एक साडी आहे पण तो हाच कलर का माहिती नाही..
माझ्या आईचा शालू अंजिरी
माझ्या आईचा शालू अंजिरी रंगाचा आहे. एकदम युनिक कलर आहे आणि खूप छान दिसतो. इथे नाहीये नाहीतर नक्कीच फोटो टाकला असता.
बाय द वे, अमृताक्षर, सासर मध्य प्रदेशात आहे तर एक चंदेरी साडी घ्याच. दिसायला अप्रतिम आणि पूजा किंवा इतर छोट्या फंक्शनला उत्तम, वावरायलाही हलकी. मी तर म्हणेन प्रत्येकीच्या बस्त्यामधे एक चंदेरी हवीच.
लोकं या धाग्यावर "लग्न"
लोकं या धाग्यावर "लग्न" लावुनच मानतील अस दिसतय !!!!
काय सुंदर शालू जमा झाले आहेत
काय सुंदर शालू जमा झाले आहेत इथे!! मस्त!!
मराठी आहे का ते माहिती नाही पण सोनाली कुलकर्णी ज्युनियरचा साखरपुडा लूक मस्त होता.
Anushka Sharma wedding lehenga >> बिपाशा के मेहंदी लूकसे ढापेला आयडिया था. पण अनुष्का कॅरिड इट ब्यूटीफूली...
अमृताक्षर दी, मेहंदी साठी
अमृताक्षर दी, मेहंदी साठी फ्लोरल ज्वेलरी बघणार असशील तर एकदा instagram वरचं हे अकाउंट नक्की बघ ... काहीतरी वेगळे....
https://instagram.com/the_vintage_snob?utm_medium=copy_link
https://www.youtube.com/watch
https://www.youtube.com/watch?v=Yn0jYyFYSY4
हा एक साधा सुधा लग्न समारंभ बघा. ब्राइड चा ड्रेस किती सुरेख आहे साधे डिझाईन. पण उत्तम फिटिन्ग. मग हलका घुंगट. आत सुरेख मुकुट. आणि हिर्याचे कानातले. साधासा बुके. व मेक अप फार नाही मुळचीच सुंदर आहे व आज स्पेशल सुखी दिसत आहे. नवृयाचे प्रेम किती दिसत आहे प्रत्येक हालचाली तून.
समारंभ गंभीर व धार्मिक आहे. सासू सासरे दूर उभे आहेत स्पेशल ग्यालरीत बाकी गेस्ट खाली उभे आहेत. जुने ऐतिहासिक चर्च. व हा समारंभ एक शतकानंतर होत आहे. तिचे कानातले बघा. ड्रेसचा पदर संभाळून घ्यायला किती तरी करवल्या आहेत. तलवारीचा मान सैन्य देत आहे.
रशियन राज्यक्रांती व पुढचा संहार परिवर्तने सर्व घड ल्यावर ही एक छान घटना घडते आहे. सो सो हॅपी फॉर द कपल. आपल्या सारखेच पाद्र्याने सांगि तले की क्रॉस करत आहेत. रशिअन ऑर्थो डॉक्स चर्च असल्याने मंत्र जुन्या भाषेत असतील.
बिदाईला रोल्स रॉइस घोस्ट का फँ टम कायती बुलेट प्रूफ असेल. अल्टिमेट रोमांटिक शादी. लग्नात जिलेबी मसाले भात मट्ठा असेल काय
बॅ चल रेट पार्टीला हे गाणे
बॅ चल रेट पार्टीला हे गाणे नक्की ठेवा.
कोरीन ग्रुपचे आहे ट्वा ईस नाव आहे सहज सापडेल.
अल्कोहोल फ्री: गाण् याचा अर्थ : साधारण मी अल्कोहोल फ्री आहे कारण तूच माझी शँपेन पिना कोलाडा मिमोसा इत्यादी.
व आपले फेवरिट मोरनी.
तुमची एंट्री मोरनी गाण्याव र करा.
https://www.youtube.com/watch?v=8YLVaMaAfSM
मनीमोहर ने लिहीले आहे
मनीमोहर ने लिहीले आहे त्याप्रमाणे लोक आहेर आणत असतातच म्हणून मग आमच्या लग्नात आम्ही फक्त कॅश आहेर आणा असे सांगितले. मग त्यात आमचे पण पैसे टाकून ते सगळे एका निवासी शाळेला देणगी म्हणून दिली. त्या शाळेच्या व्यवस्थापकांना लग्नाला बोलावून त्यांच्या हातात सगळी रक्कम ठेवली. लोकांचा आहेर झाला आणि शाळेला मदत झाली
हे भारी आहे !
हे भारी आहे !
छान युक्ती धनि.
छान युक्ती धनि.
आभार अमा आणि अमृता.
आभार अमा आणि अमृता.
प्रज्ञा शालु खूप च सुंदर रंग आणि पदर पण मस्त.
२ प्रचि पैकी मराठी लूक जास्त छान आहे.. नव्वारी पण निवडू शकतेस किंवा आवड असेल तर नव्वारी सत्य नारायण पूजेसाठी राखीव ठेवतात.
हल्लीच्या ट्रेंड नुसार पेस्टल फ्लॉरल डिझाईन्स रीसेप्शन ला शोभून दिसतील..
अनू इतक्या सुंदर साडीत तू एक ही फुल सेल्फी काढला नाहिस? पाप केलेस तू
एक चंदेरी साडी घ्याच>>>> १००% अनुमोदन, खूप नाजूक लूक येतो, माझी ५ पैकी १ चंदेरी यलो साडी होती. अजूनही आहे.
हे असेच काही लुक्स(हे असं
हे असेच काही लुक्स(हे असं होतं लग्न घरात सकाळचं आवरायचं सोडून गुगल वर)
या ताईंना डोक्याचा भाग जरा कमी आहे गाण्यात.ओढणी कारमध्ये अडकल्यावर दार न उघडता ओढाओढी करून त्यात 4 इंच डायमिटर चे भगदाड पाडतात.
या गाण्यात लकी ड्रॉ पद्धतीने छोट्या दिराची बायको निवडली जाते.
माझाही सासरकडचा शालू फिका
माझाही सासरकडचा शालू फिका गुलाबी आहे आणि छानच दिसतो.आणि हो, फ्लोरल्सचीपण खूप चलती आहे. सुंदर दिसतो तोही लुक.
Submitted by पार्वती >> Reception ला घालेल फ्लोरल लेहंगा..म्हणजे सगळे लूक करून होईल.. तुमच्या शालूचा फोटो टाका ना
असेच काही लुक्स(हे असं होतं
असेच काही लुक्स(हे असं होतं लग्न घरात Happy सकाळचं आवरायचं सोडून गुगल वर) >> तो पहिला ऑफ व्हाइट baby पिंक lehnga look कसला सुंदर आहे..खूप आवडला
बाय द वे, अमृताक्षर, सासर
बाय द वे, अमृताक्षर, सासर मध्य प्रदेशात आहे तर एक चंदेरी साडी घ्याच >> चंदेरी साडी कशी असते माहिती नाही(आईकडे असेल पण हीलाच चंदेरी म्हणतात हे माहीत नाही) पण साड्या भरपूर घेणार असल्यामुळे घेईल एक दोन चंदेरी सुद्धा..
Submitted by वाचिका >> पाहिले
Submitted by वाचिका >> पाहिले मी दागिने..खूप unique आणि सुंदर आहेत..जमल्यास संपर्क करते त्यांना..
Submitted by अमा >>बघते अमा
Submitted by अमा >>बघते अमा लग्न सोहळा.. एन्ट्री साठी गाण्याचा विचारच नव्हता केला आणि एन्ट्री साठी पण आजकाल खूप न्यू concept आल्यात ते पण decide करावं लागेल
लोकांचा आहेर झाला आणि शाळेला
लोकांचा आहेर झाला आणि शाळेला मदत झाली Happy
Submitted by धनि >> चांगला initiative आहे हा.. आम्ही सुद्धा काही रक्कम एका अनाथालयात donate करायचं ठरवलंय होणाऱ्या नवऱ्याला सुद्धा ही कल्पना आवडली आहे..
माझी ५ पैकी १ चंदेरी यलो साडी
माझी ५ पैकी १ चंदेरी यलो साडी होती. अजूनही आहे.
Submitted by aashu29 >> फोटो हवाच आता
ताई, हा बघा एक पीस... कसा
ताई, हा बघा एक पीस... कसा वाटला सांगा...
Pages