Submitted by गजानन on 10 April, 2014 - 04:59
मराठी पाठ्यपुस्तकातील धड्यांची चर्चा करण्यासाठी एक धागा जुन्या मायबोलीत होता.
आता इथल्या दुसर्या एका बाफावर अशी चर्चा सुरू झाली आणि त्या धाग्याची आठवण झाली, म्हणून हा धागा काढला.
जुन्या धाग्यावरही बरीच चर्चा आहे. तीही जरूर वाचा.
जुन्या धाग्याचा दुवा: http://www.maayboli.com/hitguj/messages/46/4554.html
तर ती चर्चा इथे चालू ठेवू.
इथे प्रताधिकाराचा भंग होईल असा मजकूर (कॉपी पेस्ट / चित्रे) प्रतिसादात देऊ नका.
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
१७ माझ्या मराठीची गोडी मला
१७ माझ्या मराठीची गोडी मला वाटते अवीट
हम लक्षात नव्हती पण
हम लक्षात नव्हती पण सांगितल्यावर आठवली.
२१ सृष्टी तुला वाहुनी धन्य
२१ सृष्टी तुला वाहुनी धन्य माते अशी रुपसंपन्न तू निस्तुला
ही अजिबात आठवत नाहीय. इतर
ही अजिबात आठवत नाहीय. इतर कवितांच्या काळातील पाठ्यपुस्तकातील असेल तर पार विस्मरणात गेली म्हणावे लागेल.
खूप आधीची असावी. मला नव्हती.
खूप आधीची असावी. मला नव्हती. ना वा टिळक
मी परत पहिल्यापासून वाचला हा
मी परत पहिल्यापासून वाचला हा धागा... छान वाटलं एकदम...
७ घाल घाल पिंगा वाऱ्या
७
घाल घाल पिंगा वाऱ्या माझ्या परसात,
माहेरीच्या सुखाची ग कर बरसात.
सुखी आहे पोर सांग आईच्या कानात,
आईभाऊसाठी परी मन खंतावते.
ही कविता अजूनही डोळ्यात पाणी आणते, माहेर जवळ असूनही. हे गाणंही रडवते.
२५
२५
अनाम वीरा जिथे जाहला तुझा जीवनांत
स्तंभ तिथे ना कुणी बांधला पेटली न वात.
ही कविता हे गाणंही डोळ्यात अश्रु आणते.
गायिका आशा भोसले, अत्यंत आर्तपणे गायलंय.
घाल घाल पिंगा वाऱ्या, सुमन कल्याणपुर. हेही आर्तपणे गायलंय. वावे थॅंक्स, हे गाणं कोणी गायलंय ते योग्य नाव सांगण्यासाठी.
२
२
या बाई या बघा बघा कशी माझी बैसली बया
फार गोड कविता.
१४
रंगरंगल्या सानसानुलया गवतफुला रे गवतफुला
असा कसा रे मला लागला,
सांग तुझा रे तुझा लळा.
भरत, सहावीची बालभारती
भरत, सहावीची बालभारती प्रथमावृत्ती १९७१ आणि पुनर्मुद्रण १९८१ मध्ये आहे ती कविता. शीर्षक - माझ्या जन्मभूमीचे नाव.
म्हणजे होती आम्हाला.
अन्जूताई, घाल घाल पिंगा
अन्जूताई, घाल घाल पिंगा वाऱ्या सुमन कल्याणपूर![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सृष्टी तुला वाहुनी धन्य माते
सृष्टी तुला वाहुनी धन्य माते अशी रुपसंपन्न तू निस्तुला
मलाही होती ही कविता. जरा जड जड शब्द होते. पण मला आवडायची तिच्या या वेगळेपणामुळे. जयोस्तुते सारखी वाटायची. इथे सापडली ही कविता : http://cart.ebalbharati.in/balbooks/pdfs/1601000001/Ch44.pdf
सृष्टी तुला वाहुनी धन्य माते अशी रुपसंपन्न तू निस्तुला
तू कामधेनू! खरी कल्पवल्ली! सदा लोभला लोक सारा तुला
या वैभवाला तुझ्या पाहुनिया मला स्फूर्ती नृत्यार्थ होते जरी
सामर्थ्य नामी तुझ्या आर्यभूमी असे पाहिले मी न कोठे तरी
माते महात्मे तुझे तत्ववेत्ते तुझे शूर योद्धे तुझे सत्कवी
श्रेणी ययांची सदा माझिया गे मना पूजनी आपुल्या वाकवी
त्यांची यशे ज्या नव्या सद्गुणांना मला अर्पिती ध्येय ते गे जरी
सामर्थ्य नामी तुझ्या आर्यभूमी असे पाहिले मी न कोठे तरी
तूझ्या महोदार सारस्वताच्या महासागरीचा जरी मीन मी
झालो तरी गे तृषा मन्मनाची कधीही कधीही न होणे कमी
आई गुरूस्थान अंती जगाचे तुझे यात शंका न काही जरी
सामर्थ्य नामी तुझ्या आर्यभूमी असे पाहिले मी न कोठे तरी
वारा तुझ्या स्पर्शने शुद्ध झाला मला लाधला भाग्य हे केवढे
माते स्वये देशी जे अन्नपाणी सुधा बापुडी कायशी त्यापुढे
तू बाळगीशी मला स्कंधी अंकी सुखाची खरी हीच सीमा पुरी
सामर्थ्य नामी तुझ्या आर्यभूमी असे पाहिले मी न कोठे तरी
- नारायण वामन टिळक
सामर्थ्य नामी तुझ्या आर्यभूमी असे पाहिले मी न कोठे तरी. >>> ही ओळ आमच्या पुस्तकात तरी 'सामर्थ्य नामी तुझे आर्यभूमी असे पाहिले मी न कोठे तरी' अशी होती असं वाटतंय.
अन्जूताई, घाल घाल पिंगा
अन्जूताई, घाल घाल पिंगा वाऱ्या सुमन कल्याणपूर >>> हो ग, thank u . एडिट करते, चूक सुधारते.
मर्ढेकरांची कविता
मर्ढेकरांची कविता
ह्या गंगेमधि गगन वितळले ...
फारच सुंदर .
अजूनही आठवते आणि पाठ आहे
सामर्थ्य नामी तुझ्या आर्यभूमी
सामर्थ्य नामी तुझ्या आर्यभूमी तसे पाहिले मी न कोठे तरी।
१०
१०
या बालांनो या रे या
लवकर भरभर सारे या.
बाबल्या चितेवरुन पळाला.
बाबल्या चितेवरुन पळाला.
मागच्या पानावरच्या
मागच्या पानावरच्या कोड्याताल्या कविता ओळखण्यासाठी मला बरीच खटपट करावी लागेल असे दिसतेय.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
विजय, बर्याच दिवसांनी दिसलात.
Pages