Submitted by गजानन on 10 April, 2014 - 04:59
मराठी पाठ्यपुस्तकातील धड्यांची चर्चा करण्यासाठी एक धागा जुन्या मायबोलीत होता.
आता इथल्या दुसर्या एका बाफावर अशी चर्चा सुरू झाली आणि त्या धाग्याची आठवण झाली, म्हणून हा धागा काढला.
जुन्या धाग्यावरही बरीच चर्चा आहे. तीही जरूर वाचा.
जुन्या धाग्याचा दुवा: http://www.maayboli.com/hitguj/messages/46/4554.html
तर ती चर्चा इथे चालू ठेवू.
इथे प्रताधिकाराचा भंग होईल असा मजकूर (कॉपी पेस्ट / चित्रे) प्रतिसादात देऊ नका.
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मला नक्की आठवतंय, सरपण फोडून
मला नक्की आठवतंय, सरपण फोडून घेणारे पाटील नव्हते.
http://www.arvindguptatoys
http://www.arvindguptatoys.com/arvindgupta/bal-bharti-2.pdf
http://www.arvindguptatoys
http://www.arvindguptatoys.com/arvindgupta/bal-bharti-3.pdf
अरविंद गुप्ता सरांनी
अरविंद गुप्ता सरांनी बालभारतीच्या पुस्तकाचे पण संकलन केले आहे? कमाल आहे तो माणूस! _/\_
>>>हाब, तुम्ही ७३ साली
>>>हाब, तुम्ही ७३ साली दहावीला होतात? तेव्हा दहावी एस एस सी होती की अकरावी? एवढ्या मागचं आठवणं कठीणच असणार.<<<
७३ साली अकरावी एस.एस.सी. होती.
माझ्या माहितीप्रमाणे १९७५ साल हे अकरावी एस.एस.सी. चं शेवटचं वर्ष आणि नवीन दहावी एस.एस.सी. चं पहिलं वर्ष..
आमच्या शाळेत जुन्या अभ्यासक्रमाच्या दहावी, अकरावीच्या मुलींना (ताया) निळ्या काठाची पांढरी साडी हा गणवेश होता.
पण दहावी एस.एस.सी. ला मात्र हा गणवेश लागू केला नव्हता..
त्यामुळे त्या जुन्या बॅचचं वेगळेपण/खासियत या गोष्टीमुळे नकळत लक्षात राहिली आहे..
80-90 मध्ये कुमारभारतीमध्ये
80-90 मध्ये कुमारभारतीमध्ये देशभक्ती म्हणजे काय यावर शिवराम महादेव परांजपे यांचा धडा होता. तो आजही तंतोतंत लागू पडतो.
कुणाला तो वाचायचा असेल तर या लिंकवर तो पाहू शकतो.
https://www.kheliyad.com/2019/02/what-is-pattriot-shivram-mahadev-paranj...
कुणाला तरी 'आम्रतरू' हि कविता
कुणाला तरी 'आम्रतरू' हि कविता हवी होती, म्हणून
आम्रतरू
आम्रतरू हा धरी शिरावरी कोमल नीज साउली
मृदुल कोमल शामल हिरवळ पसरे पायांतळी
आणिक पुढती झरा खळाळत खडकातुनी चालला
साध्या भोळ्या गीतामध्ये हा आपुला नित रंगला
काठी त्याचा निळी लव्हाळी डुलती त्यांची तुरे
तृनाकुरावर इवलाली हि उडती फुलपाखरे
खडा पहारा करिती भोवती निळे भुरे डोंगर
अगाध सुंदर नयनी शोभते माथ्यावर अंबर
(कृपया शुद्धलेखनाच्या चुका समजून घ्याव्यात)
मला एक धडा साधारण आठवतोय .
मला एक धडा साधारण आठवतोय ....एका शिक्षकांबद्दलचा होता. त्यात वर्गाची सहल ठरते. एक मुलगा खूप गरीब असतो आणि त्याला सहलीसाठी जेवण आणणं शक्य नसतं. मग ते शिक्षक आपल्या पत्नीला त्या मुलासाठीही पानगी करायला सांगतात ...असं काहीसं वर्णन आहे. आठवतोय का कुणाला हा धडा? कधी होता?
कोणती बॅच मामी ?
कोणती बॅच मामी ?
मामी, मी हा उतारा धडा म्हणून
मामी, मी हा उतारा धडा म्हणून नाही, वाचू आनंदे पुस्तकात वाचलाय. लेखक आठवत नाही, मास्तरांचं नावही आठवत नाही. विंदा करंदीकर असावेत का?
मास्तर शाळेत जाताना एकेका मुलाला हाक मारत मारत सगळा गोतावळा जमा करत जातात.
मास्तर सुपारीबागेत सहल नेणार असतात. कोण कोण काय काय आणणार अशा मुलांच्या गप्पा होतात.
मामी, मी हा उतारा धडा म्हणून
मामी, मी हा उतारा धडा म्हणून नाही, वाचू आनंदे पुस्तकात वाचलाय. लेखक आठवत नाही, मास्तरांचं नावही आठवत नाही. विंदा करंदीकर असावेत का?
मास्तर शाळेत जाताना एकेका मुलाला हाक मारत मारत सगळा गोतावळा जमा करत जातात.
मास्तर सुपारीबागेत सहल नेणार असतात. कोण कोण काय काय आणणार अशा मुलांच्या गप्पा होतात. >>>>>>>
हा हा .... बरोबर. सुपारीबागेचा उल्लेख आठवतोय.
कोकणातली शाळा असते बहुतेक.
कोणती बॅच मामी ? >> १९८३ ची
कोणती बॅच मामी ? >> १९८३ ची दहावी. डायनासॉर नुकतेच पृथ्वीतलावरून गायब झाले होते.
http://cart.ebalbharati.in
http://cart.ebalbharati.in/BalBooks/ChBalBooks.aspx?ItemId=1601000001
लेखक: श्री ना पेंडसे सहावी बालभारती
पण यात गरीब मुलाचा उल्लेख मात्र नाहीये.
मामी: ह्या धड्याची आठवण काढल्याबद्दल धन्यवाद !!
>>>http://cart.ebalbharati.in
>>>http://cart.ebalbharati.in/BalBooks/ChBalBooks.aspx?ItemId=1601000001
लेखक: श्री ना पेंडसे सहावी बालभारती
पण यात गरीब मुलाचा उल्लेख मात्र नाहीये.
मामी: ह्या धड्याची आठवण काढल्याबद्दल धन्यवाद !!<<<
छान वाटलं वाचून...
बालपणीचा काळ सुखाचा आठवला घडी घडी...
अच्छा हद्दपार कादंबरीतला
अच्छा हद्दपार कादंबरीतला उतारा आहे हा. मी वाचलेली नाही. एकंदरीत सुपारीबाग श्री.ना. पेंडशांच्या आवडीची दिसते
'कलंदर' मध्येही उल्लेख आहे.![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
वर मी म्हटलं आहे त्या वाचू आनंदे पुस्तकात हा सगळा उतारा नाही. सुरुवातीचा काही भाग आहे, मुलांचं एकमेकांशी बोलणं आहे, मास्तरांचं वर्णन आहे.
मास्तरांच्या गरिबीबद्दल वाचून विषण्ण वाटलं.
http://cart.ebalbharati.in
http://cart.ebalbharati.in/BalBooks/ChBalBooks.aspx?ItemId=1601000001
लेखक: श्री ना पेंडसे सहावी बालभारती >>>> धन्यवाद अनुदोन.
हो की, गरीब मुलगा गायब आहे. पण हीच ती गोष्ट. केशवराजला अनेकवेळा लहानपणी गेले आहे त्यामुळे डोळ्यापुढे येते ते वर्णन.
घबाड मिळाल्या सारखे वाटतय!
घबाड मिळाल्या सारखे वाटतय! भरत , अन्जू आणि स्वाती आंबोळे ने उल्लेख केलेले धडे कविता मलाही होत्या मी १९८२ ची दहावी. मला एक आरसा हसला आरसा रडला धडा आठवतोय, खुप लहानपणी होता
HSC ची कुमारभारतीची पुस्तके
HSC ची कुमारभारतीची पुस्तके ऑनलाईन कुठे मिळतील. एक गंगाधर गाडगीळांचा धडा होता. सायकल च्या कुलुपा बद्दलचा
माझी अमेरिकन सायकल. अकरावी की
माझी अमेरिकन सायकल. अकरावी की बारावीला होता. मस्त खुसखुशीत होता.
‘बाबल्या चितेतून पळाला’, हि
‘बाबल्या चितेतून पळाला’, हि वसंत सबनीस यांची विनोदी कथा कुणाकडे असेल तर कृपया पाठवा.
खालची कविता कोणाला माहिती आहे
खालची कविता कोणाला माहिती आहे का? बहुतेक बोरकरांची आहे. संपूर्ण कविता हवी आहे एकांना.
झाली थकून आडवी
अर्ध्या चंद्राची सावली
पांद चिखलकाट्यांची
हळू मागे मागे गेली
शितळाईच्या ओढ्याच्या
हातातली घुंगुरकाठी
खुळखुळखुळ वाजे
बैल उताराने जाती.
कळकीच्या बेटातून
वारा अलगूज वाजवी
चांदण्याचा कवडसा
पाण्यामध्ये गातो ओवी
१९८५ साली पहिलीत प्रवेश
१९८५ साली पहिलीत प्रवेश त्यामुळे वरील कविता आणी धड्यांबद्दल माहीत नाही
पण balbharti archive मध्ये असतील सर्व
मला 9 वी त ला 2004 च्या मराठी
मला 9 वी त ला 2004 च्या मराठी पाठ्य पुस्तकातला महापुरुषांचा पराभव हा धडा हवा आहे. कोणी pdf/image पाठवू शकेल का please?
पाड्यपुस्तकातल्या कवितांवर
पाड्यपुस्तकातल्या कवितांवर धागा आहे का?
हे whatsapp forward
मित्र मैत्रिणींनो खरं तर हे कोडं नाहीये. आपल्या शालेय जीवनात आपण ज्या कविता शिकलो, त्याच आहेत या. आणि सगळीच्या सगळी बरोबर उत्तरं कोण देतं हा उद्देशही नाही माझा. पण या कवितांच्या निमित्ताने आपल्या बालपणाशी निगडित काही आठवणींनी आपल्याला पुन्हा एकदा तो आनंद उपभोगता यावा हीच मनःपूर्वक इच्छा. म्हणून सगळयांनी
प्रत्येकी एकतरी कविता आठवा ही विनंती.
1--दे-तु-कि-सुं-आ
2-या-बा--ब-ब-क-मा-ब-ब
3-इ-इ-टि-टि-दे-घ-बा-उं
4-छा-कि-दि-फु
5-पि-तां-उ-को-प-चौ
6-ख-ज-टा-मा-जा-पु-चिं-उ-रा-रा-ए
7- घा-घा-पिं-वा-मा-प-
8-ला-बा-हो-मा-ए
9-ले-चा-जो-ले-चा-जो
10-या-बा---रे-या-ल-भ-सा-या
11-शिं-रं-बा-बां-हो-च-झु-ऐ
12-गा-पा-का-म्ह-आ
13- यु-मा-चा-यु-ही-क-कि-भा-वं-ही
14-रं-सा-ग-फु-रे-ग-फु
15-श्रा-ह-मा-हि-दा-चो
16-भे-ला-जी-ला-आ
17-मा-म-गो-म-वा-अ
18-गा-शी-ला-दि-उं-ती-ग
19-रा-जी-म-सौ-क-मि
20-ग-वा-बि-पि-चा-नु-का
21-सृ-तु-वा-ध-मा-अ-रू-तू-नि
22-मा-मा-रं-गा-हो-ति-खि-बै-जो-हो
23-कि-दि-ना-चां-गे-कि-दि-ना-न-डुं
24-गो-व-ति-ह-पा-प-डो
25-अ-जि-जा-तु-जी-स्तं-ति-ना-कु-बां-पे-न-वा
*****
सोडवलंय हे व्हॉट्सॅपवर. मस्त
सोडवलंय हे व्हॉट्सॅपवर. मस्त आहे हे कोडं.
बाबल्या चितेतून पळाला पाठवा
बाबल्या चितेतून पळाला पाठवा कुणी तरी
सुकेशिनी व वळीव दोन्ही धडे
सुकेशिनी व वळीव दोन्ही धडे आठवतात.
फार रम्य बाफ आहे हा. परत लहान झाले.
१३, १८, १८, १९, २०, २१, २४
६, १३, १७, १८, १९, २०, २१, २४ नाही कळल्या.
सांगाल का?
१३- युगामागुनी चालली रे युगे
१३- युगामागुनी चालली रे युगे ही करावी किती भास्करा वंचना
पृथ्वीचे प्रेमगीत.
अरे हो, ६ आणि १९, २० पण
अरे हो, ६ आणि १९, २० पण आल्या.
Pages