विनोदी लेखन उपक्रम - मायबोली २४ तास -मानव

Submitted by मानव पृथ्वीकर on 21 September, 2021 - 12:44

(या उपक्रमात दोनच लेख आले. तेव्हा यात लिहिण्याचा विचार केला. परंतु तो धागा पाहिला असता त्यात ठरावीक विषय दिला असल्याची आठवण झाली. दूरदर्शन मालिका, चित्रपट या विषयी माझे ज्ञान अगाध असल्याने, विषयांतर करुन लिहीत आहे, त्याबद्दल क्षमस्व. )

नमस्कार, मायबोली २४ तास वर आपले स्वागत आहे.

आजच्या ठळक बातम्या.

मायबोली व्यवस्थापन मंडळाची आज बैठक झाली. त्यात काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले.
ते निर्णय असे आहेत.

१. येत्या एक ऑक्टोबर पासून, मायबोलीचे अ‍ॅडमिन, वेबमास्टर, नियंत्रक हे लोकशाही पद्धतीने निवडले जातील. निवडून आलेल्या चमूचा कालावधी दोन वर्षे असेल. यासाठी खुली मतदान पद्धती अवलंबली जाणार असून मतदान धाग्यात कुणी कुणाला मत दिले हे दिसणार असल्याने, पक्षपाताचा आरोप करण्यास वाव रहाणार नाही. जाणुन घ्या या पदांसाठी काय आहे पात्रता.

अ‍ॅडमिन: उमेदवाराच्या मूळ सदस्यनामाव्यतिरीक्त किमान दहा ड्युआयडीज असाव्यात आणि त्यातिल किमान चार खाती कारवाईत रद्द झालेली असावीत. तसेच किमान चार मायबोली सदस्यांचे खाते रद्द करवण्यात हातभार लावलेला असावा आणि इतर सदस्यांच्या प्रतिसादाचे किमान शंभर स्क्रीनशॉट्स सेव्ह करुन त्यांचा स्कोअर सेटलींगसाठी वापर केलेला असावा.

वेबमास्टर: उमेदवाराच्या मूळ सदस्यनामाव्यतिरीक्त किमान सहा ड्युआयडीज असाव्यात आणि त्यातिल किमान दोन खाती कारवाईत रद्द झालेली असावीत. तसेच किमान पंचवीस धागे भरकटवण्याचा अनुभव असावा आणि असंबद्ध गप्पा धाग्यात किमान शंभर सुसंबद्ध प्रतिसाद दिलेले असावेत.

नियंत्रक: उमेदवाराच्या मूळ सदस्यनामाव्यतिरीक्त किमान तीन ड्युआयडीज असाव्यात आणि त्यातिल किमान एक खाते कारवाईत रद्द झालेले असावे. तसेच सध्याच्या व्यवस्थापन मंडळावर किमान पंचवीस वेळा पक्षपाताचा आरोप केलेला असावा आणि गंभीर लेखांवर किमान पन्नास असंबद्ध प्रतिसाद दिलेले असावेत.

इच्छुक उमेदवारांनी "मी उभा/भी आहे - पदनाम- {सदस्यनाम}” अशा शिर्षकाचा बाफ़ काढुन त्यात आपली पात्रता सिद्ध करावी, आणि त्याच बाफमध्य़े प्रचार सुरु करावा. हा बाफच उमेदवाराची प्रवेशिका समजली जाईल. प्रवेशिका देण्याची अंतिम तारीख एक ऑक्टोबर आहे. सध्या अपात्र असणार्‍या इच्छुक उमेदवारांनाही पात्रता मिळवण्यास हा कालावधी पुरेसा आहे असे निवडणुक संयोजकांनी सांगीतले.

जरी वरील पदांवरील उमेदवार लोकशाही पद्धतीने निवडल्या जातील, काही ठरावीक कामांसाठी स्थायी समीती सुद्धा नेमण्यात आल्या आहेत.

२. मायबोलीवर शुद्ध मराठीत लेखन व्हावे, इंग्रजी शब्दांचा वापर कमीत कमी व्हावा आणि लेखन देवनागरीतूनच व्हावे या करता सदस्यांवर जातीने लक्ष ठेवणे, समज देणे यासाठी एक स्थायी समीती स्थापन करण्यात आली आहे. राज व नानबा हे त्या समीतीचे सदस्य आहेत.

३. सगळ्या लेखांवर लोक विषयाला धरुन गंभीर प्रतिसाद देतात की नाही, कोतबोमध्ये फसवे धागे निघत नाहीत ना यावर लक्ष ठेवण्यासाठी बोकलत यांची एक सदस्यीय स्थायी समीतीत नेमणुक करण्यात आली आहे.

आता काही खळबळजनक बातम्या:

४. व्यत्यय, हायझेनबर्ग, मानव हे त्रिकुट शनी शिंगणापूरच्या देवळात नवस करताना रंगे हात आढळुन आले. त्यांच्या बॅगेत स्तोत्रांची पुस्तके सापडली. घरात होणारा मृतात्म्यांचा त्रास, करणी, भानामती प्रकारांमुळे नोकरीत बढती न मिळणे, व्यवसायाची भरभराट न होणे, देवीच्या कोपामुळे
पसरणार्‍या कोव्हीड पासून सुरक्षा अशा कारणांसाठी विविध देवस्थानात ते नेमाने नवस करतात, मांत्रिकांची मदत घेतात असे चौकशी अंती निष्पन्न झाले.

५. नवी मुंबई जवळ मद्याचा अवैध साठा असलेले एक मोठे गोदाम सापडले आहे. भेसळ करणे, कर चूकवून लोकांना घरपोच मद्य पोचवणे, ड्राय डेच्या दिवशी मद्य विक्री करणे हे धंदे इथुन चालत असल्याचे लक्षात आले. या गोदामाचे मालक ऋन्मेष व मानव पृथ्वीकर असल्याचे कळते. एकीकडे उघडपणे मद्याच्या उदात्तीकरणाचा कठोर विरोध करत असताना दुसरीकडे लपुन छपुन अवैध मद्यविक्रीचा धंदा ही जोडगोळी करत असल्याचे निदर्शनास आले आहे.

६. एका धाग्यावर ऋन्मेष यांनी आपली चूक कबूल केल्याची बातमी व्हायरल झाल्याने मायबोलीवर मोठी खळबळ उडाली. चौकशी नंतर असे निदर्शनास आले की तो आयडी "ऋन्मेssष" नसून "ऋन्मेsssष" असा तोतया होता. याबाबत ऋन्मेssष यांच्याशी सम्पर्क केला असता "हे मला बदनाम करण्याचे षडयंत्र असुन यावर मी लगेच एक लेख पाड -माफ करा- लिहीणार आहे" असे ते म्हणाले.

धावत्या बातम्या:

७. "फल ज्योतिष्य, राशी भविष्य एक थोतांड" हा लेख मायबोलीवर लौकरच प्रसिद्ध होणार असून, तो सामो आणि रश्मी यांनी मिळुन लिहीला असल्याचे कळते.

८. मायबोलीवरील एक प्रसिद्ध व्यक्ती रोज रात्री वेषांतर करुन हल्दीराम आऊटलेट मध्ये जाउन गुलाबजाम, रबडी, बालुशाही, श्रीखंड, कलाकंद इत्यादि डिशेस आइसक्रीम सोबत खात असल्याचे तेथील एका कर्मचायाने मायबोली २४ तासला फोन करुन सांगीतले. मायबोली २४ तासने याचा शहनिशा केला असुन ती व्यक्ती सई केसकर असल्याचे निदर्शनास आले.

९. “आयुर्वेद तारी त्याला कोण मारी" हा पंचकर्म आणि मंत्रोच्चाराद्वारे शुद्ध केलेले धातु यांचे गंभीर आजारांवरील उपचारांचे महत्व पटवून देणारा लेख मायबोलीवर लौकरच प्रकाशीत होणार असून श्री आरारा हे त्याचे लेखक असल्याचे कळते.

१०. मायबोलीच्या एका गटग मध्ये एक त्रिकुट ऑन द रॉक्स स्कॉचचा आस्वाद घेत असताना, वारंवार बाजुच्या खोलीत जाउन ग्लास संपवून परतत असल्याचे आमच्या बातमीदाराने पाहिले. आधी ते धुम्रपानास जात असावेत असा त्याचा समज झाला. पण नंतर धुम्रपान कक्ष दुसरीकडे असल्याचे लक्षात आल्यावर तोही त्या खोलीत ग्लास घेउन त्यांच्या मागोमाग गेला असता हे त्रिकुट तिथे स्कॉचमध्ये पेप्सी टाकुन पीत असल्याचे दिसून आले. च्रप्स, आशुचॅंप व सोन्याबापू अशी त्यांची नावे असून, नीट पिणे फार अवघड असल्याने व चवही सहन होत नसल्याने नेहमी लपुन पेप्सी अथवा कोक घालुन पीत असल्याचे त्यांनी कबूल केले.

११. आमच्या बातमीदाराने अ‍ॅमी यांच्याशी संपर्क केला असता इतर महत्वाच्या कार्यात गुंतल्यामुळे मायबोलीवर येणे शक्य होत नाही असे त्यांनी सांगितले. आजकालच्या स्त्रियांच्या डोक्यात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करण्याचे नसते खुळ शिरले असून त्यापायी केल्या जाणाऱ्या थेरांमुळे भारतीय समाज अधोगतीला लागला आहे अशी खंत त्यांनी व्यक्त केली. ही अधोगती रोखण्यास गावोगावी फिरून स्त्रियांना जागृत करण्याच्या कार्यात त्या व्यग्र आहेत. "होममेकर हीच खरी आदर्श स्त्री" व "रोजच्या स्वयंपाकात सोवळ्याचे महत्व" यावरील त्यांची गाजत असलेली व्याख्याने लौकरच मायबोलीवर लिखित रूपात प्रसिद्ध करण्यात येतील असे त्यांनी सांगितले.

१२. राजकारण हा गंभीर आणि महत्वाचा विषय असून त्यावर विचारांची देवाण घेवाण व्हायलाच हवी. परंतु फ़क्त देवाण करणारे काही लोक मायबोलीवरील सर्वच राजकारण धाग्यांत विषयाच्या पार्श्वभागावर लाथ घालुन तेच ते दळण दळत बसतात, एकमेकांवर वर्षा नु वर्षे तेच ते वैयक्तीक आरोप करत बसतात, इतर काही धाग्यावरही याचे पडसाद उमटत रहातात अशी खंत सध्याच्या व्यवस्थापन मंडळाने व्यक्त केली. यासाठी सदस्यांवर डोळ्यात तेल घालुन लक्ष ठेवण्यास, वेळीच तंबी देण्यास आणि तरीही न ऐकल्यास त्वरीत सदस्यत्व रद्द करण्यास एक स्थायी समीती नेमण्यात आली आहे. नगरवाले, वटवृक्ष, DJ, झम्पू दामले हे त्या समीतीचे सदस्य असून समीतीचे अध्यक्षपद वर्षातून सहा सहा महीन्यांकरता रश्मी व उदय यांना विभागून देण्यात आले आहे.

१३. पूर्वाश्रमीचे लिंबुटिंबु (सध्याचे कोण बरे?) आणि आरारा यांना मायबोलीचे टॉम अ‍ॅंड जेरी अशी उपमा एका सर्वेक्षण मंडळाने दिली आहे. परंतु यातील टॉम कोण व जेरी कोण याबद्दल त्यांनी काहीच खुलासा केला नसल्याने कोण खरा जेरी व कोण खरा टॉम, यावरुन दोघांत लौकरच जुंपणार असल्याच्या अंदाजाने पॉपकॉर्नच्या विक्रीत विक्रमी नोंद झाली असल्याचे कळते.

याबरोबरच आजच्या बातम्या संपल्या. पुन्हा येउ लौकरच मायबोली निवडणुकांचे लाइव्ह कव्हरेज घेउन. बघत रहा मायबोली २४ तास.

(हे केवळ गमतीने लिहिले असून यात उल्लेख आलेल्या सर्व सदस्यांनी कृपया दिवे Light 1 Light 1 Light 1 घ्या ही नम्र विनंती. हे खेळीमेळीने घेतले जाईल ही अपेक्षा.)

बातम्यांमध्ये व्यत्यय यांनी घातलेली भरः

१४. सातच्या आत घरात या विषयावर सोनू यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. स्त्रियांनी संध्याकाळी एकटे भटकण्यावर बंदी आणावी या त्यांच्या मागणीची कारणमीमांसा या व्याख्यानात केली जाईल.

१५. खरे सिम्बा हे एक स्थुलप्रकृती (ढेरपोटे) असून ते सोशल मीडियावर टाकत असलेली प्रकाशचित्रे फोटोशॉप केलेली असल्याची खळबळजनक माहिती खात्रीलायक सुत्रांकडून मिळते. ही बातमी मिळाल्यावर हृदयभंग झालेल्या तरुणींनी दिलेल्या प्रतिक्रिया इथे देता येण्याजोग्या नाहीत

१६. आर एस एस च्या स्वप्नातले हिंदुराष्ट्र प्रत्यक्षात यावे यासाठी भरत यांनी महायज्ञ आयोजित केला आहे. लवकरात लवकर चातुर्वर्ण्य व्यवस्था पुनर्प्रस्थापित व्हावी हा उद्देशही त्यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना व्यक्त केला. या महायज्ञाच्या तांत्रिक बाजू श्री आरारा सांभाळतील.

१७. साती यांनी त्यांचा id परत घ्यावा म्हणून वेमा त्यांना फोन करून हॅरास करतायत अशी तक्रार दाखल केली गेली आहे.

१८. "एका भुभु द्वेष्ट्याची डायरी" हे नवीन सदर आशुचॅम्प सादर करतील. यामध्ये त्यांना अमा महत्वाची मदत करतील. हजारो वर्षांच्या मानवी उत्क्रांतीमुळे प्राण्याची भीती ही आपल्या जीन्समध्ये (पक्षी आपल्या रक्तात [पक्षी म्हणजे उडणारे नव्हे {सगळेच पक्षी उडू शकत नाही हे आम्हाला माहीत आहे}]) आहे त्यामुळे कुत्रे, मांजरी अशा हिंसक होऊ शकणाऱ्या प्राण्यांना दूर ठेवावे या मुद्द्यावर या दोघांचा भर असेल

१९. "ऋणं कृत्वा घृतं पिबेत" या शिर्षकाची मालिका घेऊन येत आहेत जिज्ञासा. "ग्लोबल वॉर्मिंग - एक थोतांड" या बेस्टसेलर पुस्तकाची लेखिका एव्हढीच जिज्ञासा यांची ओळख नाही तर "प्लास्टिक-एक वरदान" हा त्यांचा कार्यक्रम याआधी सगळे टीआरपी विक्रम तोडणारा ठरलेला आहे. पुढील पिढ्याना उद्देशून केलेल्या "तो मैं क्या करू?" या बिनतोड प्रश्नाला लहान बाळे आणि जन्माला न आलेली पिढी काहीच उत्तर देऊ न शकल्याने त्या सद्यपिढीच्या आयकॉन ठरल्या आहेत

२०. लसीकरणाचे तोटे डॉ कुमार त्यांच्या नवीन मालिकेत समजावतील. क्लिष्ट वैद्यकीय भाषेचा अतिरेक केल्यामुळे त्यांची लोकप्रियता उतरणीस लागली आहे. पण कॉन्स्पिरसी थियरी सिद्ध करण्यासाठी क्लिष्ट भाषा आवश्यक असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

२१. आपल्या चॅनेलच्या लोकप्रिय अँकर मी_अनु या उद्यापासून पुन्हा तुमच्या भेटीस येतील. "मांजर" या विषयावर उच्चशिक्षण घेण्यासाठी त्यांनी सब्बाटिकल रजा घेतलेली. पण शेपटीवालं मांजर की ऑफिसातलं मांजर (पक्षी मॅनेजर [पक्षी म्हणजे उडणारे नव्हे {सगळेच पक्षी उडू शकत नाही हे आम्हाला माहीत आहे}]) यामध्ये निर्णय होऊ न शकल्याने त्या दोनच दिवसात पुन्हा रुजू होणार आहेत.

Light 1 Light 1 Light 1
Submitted by व्यत्यय on 23 September, 2021 - 14:37

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Rofl सगळेच !

विकुंच्या शेजारीच असलेल्या "दीपांजली ब्यूटी पार्लर" मध्ये कुणी येइनासे झाले. केसांची मेहेंदी वाळेपर्यंत गॉसिप मॅगेझिने वाचण्यापेक्षा विकुंच्या पार्लर मध्ये चेहेर्‍यावर स्टीम घेता घेता जावा स्ट्रीम्स वरचे विकुंचे लेक्चर ऐकणे फायदेशीर आहे असे नववधूंनही वाटले.

आज आमच्या बातमीदाराने मायबोलीवरच्या एका लांबलचक धाग्यावर पहिल्या पानावरचे प्रतिसाद वाचल्यानंतर दुसऱ्या पानावर जाण्यासाठी टिचकी मारली असता पुढील पानावर मूळ लेख स्क्रोल करत न बसता थेट प्रतिसाद वाचता आले, ह्या अचाट आणि अतर्क्य गोष्टीची नोंद केली. मायबोली प्रशासनाने झाल्या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून हा प्रकार पुन्हा होऊ नये ह्याबद्दल वेमांना तंबी दिली असल्याचे कळते.

मायबोलीवर एका चांगल्या विनोदी धाग्यावर पांचट जोक्स टाकायला तुफान गर्दी... आधीच्याच्या पांचट जोक ला उगाच हसून पुढचा जोक टाकायला लोक पुढे... नवीन वाचक नक्की काय विनोदी यात हे न कळल्यामुळे हैराण परेशान...
आपल्या एकुलत्या एक चांगल्या धाग्याची वाट लागल्यामुळे मानव उपोषण करणार असे खात्रीलायक सूत्रांकडून कळते...

आधीच्याच्या पांचट जोक ला उगाच हसून पुढचा जोक टाकायला लोक पुढे... अर्रर्र Lol
पुढचा जोक टाकायचे मुद्दाम टाळले नसून, अभ्यास कमी पडल्याने आपोआप घडले आहे.

मायबोलीने नुकतेच पंचविशीत पदार्पण केल्याच्या प्रसंगाला आणि माबोकरांच्या सरासरी वयाला साजेसा बाफ "लग्नाची पूर्वतयारी" इथल्या ज्येष्ठ सदस्या अमृताक्षर यांनी काढला. अपेक्षेप्रमाणेच पहिल्याच पानापासून मानव पृथ्वीकर, सामो, विकु,अमा, अनु, ( चि. ऋन्मेष सुद्धा) अशा नवतरुण -तरुणींच्या किलबिलाटाने हा बाफ गजबजून गेलेला पहायला मिळाला. मात्र धागाकर्त्या अमृता या प्रत्येक सदस्या च्या पोस्ट ला पोचपावती किंवा रिप्लाय काहीच देत नसल्याची एक छोटुकली तक्रार तिथे बघायला मिळाली.
Happy

Lol मी ही खाली लिहीलेली बातमी घाबरून पोस्ट केली नाही.... धमाल पोस्ट मैत्रेयी.

#सोनमकीशादी व #गाझानंतर लग्नसराई आली तरी कुणीच लग्नाला न बोलावलेल्या मायबोलीकरांना #अमृकीशादीने मोठाच दिलासा मिळालेला आहे. वेधशाळेच्या अंदाजानुसार #अमृकीशादी मध्य-भारतात, मध्य-डिसेंबरात येऊन धडकेल व त्याने देश-विदेशात मोठी इसमसुनामि घडण्याची शक्यता आहे. मायबोली व मिपा ह्या संस्थळात रूखवताची देवाण-घेवाण वाढेल व इंस्टाग्रामचा बाजारभाव कडाडेल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. अमा, सामो, ऋन्मेष ह्या #लडकीवाले आयडींमार्फत मायबोलीच्या फ्रंटपेजलाच तोरण व फुलांचे डेकोरेशन करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे. मात्र हे लग्न माबो संस्थळावर न जुळल्याने वैतागलेले अ‍ॅडमिन function at() { [native code] }इ चा तातडीने बंदोबस्त करण्यात व्यस्त आहेत.

मी ही खाली लिहीलेली बातमी घाबरून पोस्ट केली नाही >>> मोगँम्बोला घाबरून की काय Proud

बाकी दोन्ही पोस्ट आणि पोस्टचा विषय Lol

Lol नाही, त्या function at() { [native code] }इ वरून जिथे-तिथे अ‍ॅडमिनला पिडते आहे. चिडून माझाच आयडी रद्द करायचे म्हणून...

>>एकूण एक प्रतिसादाला उत्तर देणे गरजेचे नाही. प्रत्येक पोस्टचे धन्यवाद मानणे तर बिलकुल गरजेचे नाही. आणि प्रत्येकवेळी भलीमोठी पोस्ट कोट करने तर त्याहून गरजेचे नाही. पुढे संदर्भासाठी धागा वाचायला फार किचकट होतो.

Submitted by ऋन्मेऽऽष on 2 October, 2021 - 16:3 >>
काय! काय!! काय!!! भल्याची दुनिया राहिली नाही.
सुडोमि! Wink

च्रप्स, मैत्रेयी, सीमंतिनी Lol
अमितव Wink

माझ्या करता ते रुढार्थी उपोषण हास्यास्पद होणार नाही, दिवसातून पाच सहा वेळा चमचमीत व गोड आग्रह करवून खाणे असले सुपोषण करवून घ्यायला लागेल माझ्याकडून.

मायबोलीने नुकतेच पंचविशीत पदार्पण केल्याच्या प्रसंगाला आणि माबोकरांच्या सरासरी वयाला साजेसा बाफ "लग्नाची पूर्वतयारी" इथल्या ज्येष्ठ सदस्या अमृताक्षर यांनी काढला. अपेक्षेप्रमाणेच पहिल्याच पानापासून मानव पृथ्वीकर, सामो, विकु,अमा, अनु, ( चि. ऋन्मेष सुद्धा) अशा नवतरुण -तरुणींच्या किलबिलाटाने हा बाफ गजबजून गेलेला पहायला मिळाला. मात्र धागाकर्त्या अमृता या प्रत्येक सदस्या च्या पोस्ट ला पोचपावती किंवा रिप्लाय काहीच देत नसल्याची एक छोटुकली तक्रार तिथे बघायला मिळाली. >> Proud
Happy

Submitted by maitreyee >> ही बातमी होणाऱ्या नवऱ्याला forward केलीय दोघांची हसून हसून पुरेवाट झाली Lol त्याला वाटतंय मी कुणीतरी खूपच फेमस personality आहे ( त्याचा हा गोड गैरसमज मी काही दूर करणार नाही) thanks to all माबोकर Happy

नुकत्याच हाती आलेल्या वृत्तानुसार मायबोलीवरील गणेशोत्सवाची सांगता झाली. अवसेला प्रशस्तिपत्रकाचा योग नसल्याने प्रशस्तिपत्रके घटस्थापनेनंतर देण्यात येतील. मायबोली २४ तास ह्या चॅनेलने २४ तासx10 दिवस बातम्या देऊनही समारोपात चॅनेलचा अनुल्लेख करण्यात आला. नेशन वाँट्स टू नो.... आज पूरा भारत ये जानना चाहता है .... संयोजकने ये चॅनल क्यूं नही देखा? या फिर देखकर अनदेखा कर दिया?? क्या गहरे राझ छुपे है इसके पीछे??? एक बडा खुलासा तो बनता था... क्या ६ घंटेके आउटेज में मार्कसाब और संयोजककी कोई मिलीभगत बन गयी और मायबोली २४ तास पर साधा सिधा निशाना - घट गया एक बडा अनुल्लेख... आज पूरे देशने दिखा किस तरह एक छोटे आम आदमी के चॅनल को विदेशी ताकतोंकेसाथ मिलकर संयोजक ने कुचल डाला... ऐसीही और सनसनीखेज खबरों केलिए देखते रहिए मायबोली २४ तास हिंदीमे.....

ह ह पु वा आहेत सगळ्याच बातम्या Lol
छोटे आम आदमी के चॅनल को विदेशी ताकतोंकेसाथ मिलकर संयोजक ने कुचल डाला..>>> Lol
सीमंतिनी, मराठी माणसाच्या साध्यासुध्या चॅनल वर एकदम मधूनच हिंदी बातम्या , जोर / जोश यायला का Proud

Lol सी

Lol Lol

@ सीमंतिनी
काय भन्नाट anchoring...
Rofl

सीमांतीनीजी आपल्या नव्या आयफोन वरून भाजीवालीला मेसेज करत असताना 1 bunch of kadhipattaa च्या ऐवजी 1 bunch of kadhip
function at() {
[native code]
}
असे उमटल्याने त्यांनी रागाने आपला आयफोन भिंतीवर फेकून मारला ! कढिपाल्याची एक जुडी त्यांना सव्वा लाखाला पडली !

Rofl function at() { [native code] }इ पत्ता कळल्यावरच कढीपत्त्याचे जोक्स सुचतात बरे....

Pages