प्रकाशचित्रांचा झब्बू क्र. २ - समई/दिवा

Submitted by संयोजक on 12 September, 2021 - 09:05

मायबोली गणेशोत्सव २०२१ घेऊन येतोय आपला लाडका खेळ - प्रकाशचित्रांचा झब्बू आणि आजचा विषय आहे समई/दिवा.

समई/दिवा.

तुम्हाला तुमच्याकडे असलेली जी प्रकाशचित्रं पूर्णपणे प्रताधिकार मुक्त करावयाची असतील, ती यात झब्बू म्हणून देणं अपेक्षित आहे.
१. ही स्पर्धा नसून खेळ आहे.
२. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे.
३. प्रकाशचित्र हे प्रताधिकारमुक्त असावे व संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे. प्रकाशचित्र कोलाज स्वरूपातले नसावे.
४. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.
५. सर्व प्रकाशचित्रे मायबोलीच्या 'प्रकाशचित्रविषयक धोरणा'चे पालन करणारी असावीत.
६. झब्बूंचा खेळ मायबोलीकरांचे स्वतःचे प्रकाशचित्रसंग्रह सादर करण्यासाठी तयार केला आहे. तेव्हा कृपया तुमच्या जवळची (मग ती तुम्ही अथवा तुमच्या कुटुंबीयांनी काढलेली) प्रकाशचित्रे सादर करा. आंतरजालावरून घेतलेली प्रताधिकारमुक्त चित्रे झब्बूमध्ये देऊ नयेत.
७.मायबोलीवरील प्रकाशचित्रांचे धोरण इथे पाहा -

Group content visibility: 
Use group defaults

सामो, अन्जू,ssj, सी, ममो थॅंक्यु Happy
अमृताक्षर रंगवलेल्या पणत्या, दिवे झकास दिसताएत.
Lol कल्लाकार च मी, पण सी sssssss ताई मत कहो ना.

खरंच ह्या धाग्यावर दिवाळी आलीय असच वाटतय. सगळे फोटो मस्तच.

अमच्याकडे खूप जुना हँडल असलेला पितळी लामण दिवा आहे . फोटोत दिसत नाहीये पण जिथे फ़ुलं व्हायलं आहे तिथे एक मोर आहे म्हणून हा मोराचा लामण दिवा. पूर्वी लग्नात रोवळी ला खण गुंडाळून त्यात हा दिवा ठेवत असत. ओवळायचं असेल तेव्हा हँडल धरून दिवा सहजी बाहेर काढता येत असे. दिवा रोवळीत एकदम सेफ रहात असे. हल्ली हॉल मध्ये लग्न असत त्यामुळे हा वापरला जात नाही.
पण म्हणून मी दीप पूजनासाठी दरवर्षी हाच दिवा लावते. त्या निमित्ताने वर तरी येतो आणि घासून पुसून चकचकीत ही होतो वर्षातून एकदा तरी. कोरोना कृपेने पूजेसाठी खऱ्या गुलाबा ऐवजी सॅटिन चे गुलाब वापरावे लागलेत. प्रसादासाठी केलेत कणकेचे गोड दिवेच.
FB_IMG_1632799057057.jpg

खाली text format options आहेत तिथे क्लिक करा मग अजून options दिसतील, त्यात आहे texture smiley

Pages