पाककृती स्पर्धा क्र १: उपासाचे पौष्टिक पदार्थ-उमोमो किंवा उऊमो किंवा उड-mi_anu

Submitted by mi_anu on 26 September, 2021 - 04:48
उमोमो

साहित्य:
उकडलेला बटाटा 1 छोटा
राजगिरा पीठ 1 छोटी वाटी
मीठ 1 चमचा
साखर चिमूटभर
शेंगदाणे कच्चे मूठभर
जिरे 1 टी स्पून
मिरच्या 3 मोठ्या(1 सजवायला)
खवलेले खोबरे 1 छोटी वाटी
तूप 2 छोटे चमचा एकदा परतायला एकदा वरून घ्यायला.एकच चमचा 2 वेळा वापरला तरी चालेल.

कृती
1.
IMG_20210926_141716.jpg

गॅस जवळचा पसारा आवरून फोटो ला जागा करा.काचेची भांडी शोधून न फोडता त्यात कच्चा माल काढून फोटो काढा.
IMG_20210926_141953.jpgIMG_20210926_142117.jpgIMG_20210926_142257.jpg

2. शेंगदाणे, जिरे आणि थोडे मीठ खरपूस भाजावे.
IMG_20210926_142520.jpg
3. भाजल्यावर गॅस बंद करून गॅस वरून उतरवून तुमचा मिक्सर शहाणा सोशिक असेल तर तसेच गरम उरलेल्या 2मिरच्या घालून घुर्र करून घ्यावे.मिक्सर केन्स्टार,मर्फी रिचर्ड वगैरे परदेशी श्रीमंत घराण्यातील लाडावलेला असेल तर कढई पंखा 4 वर ठेवून पूर्ण गार करून मगच कंटेंट बारीक करावे.
IMG_20210926_142900.jpg
4. गॅस वर कढई ठेवून अगदी उलीसे तूप टाकून खवलेले खोबरे,मीठ,साखर आणि बारीक केलेले शेंगदाणे जिरे मिरची मिश्रण मिसळून थोडावेळ चमच्याने हलवावे.
(या स्टेप चा फोटो काढायला मंडळ विसरलेले आहे.)
हे मिश्रण गर्रर्रर्र 4 वर पंखा लावून थंड होऊ द्यावे.आपणही थंड व्हावे आणि झाडावरचे सोनटक्का पान आणि फुल कापून आणावे.
5. आता पसरट थाळीत राजगिरा पीठ, मीठ,साखर,उकडलेला बटाटा घालून कोमट पाण्यात मळून घ्यावे.
IMG_20210926_143246.jpg
6. हात 5 किंवा 6 वेळा ओला करून त्यावर या मळलेल्या राजगिरा पीठाचा गोळा घेऊन शक्य तितके पातळ करून आत चमच्याने खोबरा मिरची शेंगदाणे मीठ साखर जिरे वाले सारण भरावे(आता पंखा बंद करा)
7. कुकरच्या डब्यात सोनटक्का पाने रचून त्याला अगदी उलीसे तूप(आधीचा 1 चमचा तूप होतं त्याचे 2 उलीसे भाग करावे.फर्स्ट उलीसे कढईत आणि सेकंड उलीसे पानाला) चोळून त्यावर वळलेले मोमो रचून घ्यावे.आपलया मोमोला 22 कळ्या का नाहीत वगैरे शल्य कर्णाप्रमाणे बाजूला ठेवून पुढचे युद्ध लढायला घ्यावे.
IMG_20210926_144137.jpg
8. कुकरच्या डब्यात करंगळी चे पेर बुडेल इतके पाणी घालावे(करंगळी आधी धुवून घ्यावी.)नवऱ्याच्या समाधानासाठी त्यात खालची छिद्र वाली प्लेट ठेवावी.पाणी उकळल्यावर त्यात हा डबा अलगद ठेवून 7 मिनिटांचे घड्याळ लावावे.
9. 7 मिनिटांनी आहट किंवा शू कोई है मध्ये सुंदर तरुणी दरवाजा उघडते तश्या धडधडत्या हृदयाने कुकर उघडावा.राजगिरा गोंद झाला असेल ही अनिष्ट शंका आणणारे मन ए हली!! ओरडून शांत करावे.सुदैवाने मोमो शाबूत आहेत.
10. प्लेटिंग मध्ये पदार्थात असलेले घटक वापरावे असा एक संकेत आहे. तरीहि आगाऊपणा करून सोनटक्का फुल पण ठेवावे.वरून उरलेला दुसरा चमचा(म्हणजे चमचा तोच, तूप दुसऱ्या वेळा) ओतून संपवावा.
प्लेट चा फोटो काढून झाल्यावर रविवारी लोळत सोफ्यावर पडलेल्या मेंबराना गिनीपिग बनवावे.उरलेल्या सारणाचे काय करू म्हटल्यावर तळलेले उपासाचे बटाटा पॅटिस अशी सुचवणी येईल ती नाक उडवून बाजूला करावी.आणि संध्याकाळी जेवण म्हणून फक्त उपास भाजणीचे थालीपीठ उपास नसताना खायचे अशी धमकीयुक्त घोषणा करून इथे लिहायला बसावे.
IMG_20210926_140950.jpg

विशेष सूचना:
सोनटक्का फुल खाऊ नये
सोनटक्का पान खाऊ नये.
तूप ऑप्शनल
या चॅलेंज साठी बनवत नसल्यास राजगिऱ्यात कणिक मिसळली तरी चालेल
उकडलेला बटाटा ऑप्शनल
याला उऊमो(उपास उकडीचे मोदक) म्हणावे तर सुंदर सुबक कळ्या नाहीत.त्यामुळे उमोमो(उपास मोमो) किंवा उड(उपास डंपलिंग) म्हणा सरळ.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

अनु, माझ्या डोक्यात होती ती इथेच टाकते.
लिट्टी: राजगीरा पीठात मोहन, मीठ घालून भिजवायचे व सारण हेच पण त्यात बटाट्याच्या फोडी व बारीक चिरलेलं आलं घालायचं. पारीत हे सारण भरून गोळे करायचे (कळ्यांची भानगड नाही) गोळ्यांचा साईज आपल्या कडच्या आप्पेपात्रात बसेल एवढे करायचे. तूप सोडून खरपूस भाजून दह्यातल्या चटणी बरोबर खायचे.

उड-mi_anu >>> मलाही आधी हेच नाव वाटलं रेसिपीचं Lol

रेसिपी आणि लेखनस्टाईल दोन्ही झकास!!

अगं एवढी हसलेय... रेसिपी बाजूलाच राहिली ना? असं नको करू बै Lol
मस्त पण ... हे तुला सुचल्याबद्दल दंडवत...

रेसिपी नाव Proud

पा.कृ. हा माझा आवडता प्रांत नाही तरी मला कुठेतरी वाटलं तुम्ही विनोदी शैलीत लिहाल म्हणून वाचले...मजा आली...
उमोमो च्या आतलं सारण भन्नाट विनोदी चवीचं....मस्तंच...

हाहा…. चांगली आहे. काम दिसतंय. बरंच. राजगिरा पीठ आमच्याकडे मिळेल अस वाटत नाही. ती पहिल्या फोटोतली मिरची बरी सापडली तुला. Lol

ती मिरची तीच आहे जिचा कर्व्ह मटेरियल फोटो मध्ये लपला आहे.
(नाहीतर लोकहो म्हणाल की एक मुलगी दाखवली आणि दुसरीच मुलगी अंतरपाटामागे उभी केली.)

बटाट्याची चकती, साखर, पीठ... डोळ्यात झूम लेन्स बसवली असं झालं की! Proud
फोटोला कात्री लावायच्या ऐवजी फोटो चाळणीत टाकून चाळून घ्यायचा, पक्षी रेझोल्युशन कमी करायचे/ रीसाईझ करायचा. ही सुविधा एमएस पेंट पासून कुठल्याही अ‍ॅप मध्ये असतेच, असते. कात्री फक्त पसारा आवरायला पर्याय म्हणून लावायची. Wink

ऑ मॅडम. छान लिहिलय तुम्ही. पण माझा प्रश्न असा आहे की ही खरोखरीचीच पाककृती आहे ना?. असल्यास मी ट्राय करेन.
मधे एका ताईंनी ज्वारीच्या पिठाचा केक मला बनवायला लाउन माझा पोपट केला होता. तेंव्हा पासून चांगल्या लेखिका आणि त्यांच्या तोपासू आणि विनोदी "पाक"लिखाणाकडे बघायचा माझा दृष्टीकोन थोडा तिरका झालाय. Happy म्हणून विचारतोय.
तज्ञ मंडळींना सांगितल तर त्या मला पहिले सोनटक्क्याची पान आणायला सांगतील.(त्याच्या ऐवजी काय?) म्हणून तो बेत कॅन्सल. मीच करीन.
धन्यवाद.

अगदी खरी पाककृती आहे.आम्ही सगळ्यांनी आवडीने खाल्ली म्हणजे बघा Happy
महाशिवरात्री वगैरे उपासाला आपण राजगिरा भाकरी खातो.हे मोमो अजून खुसखुशीत करायचे असतील तर वाफवण्या ऐवजी ओव्हन मध्ये बेक करता येतील.बरोबर दाणे आमटी(दाणे यात पण आणि त्यात पण नको असतील तर सारण फक्त खोबरं मिरची जिरे असं ठेवता येईल.)
इंफाईनाईट कस्टमायझेशन पॉसीबीलिटीज यु नो.

विक्रमसिंह Lol बघ म्हाळसा कानफाट्या नाव झालं कि असं होत. ( आहे कुठे म्हाळसा गणेशोत्सवात दिसली नाही)

मस्तच. (Not my cup of tea though Happy माझे नक्की दड्ड, फेकून मारण्यासारखे , अनअपेटायजिंग होणार. )

Pages