![उमोमो](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/article_images/2021/09/26/IMG_20210926_140950.jpg)
साहित्य:
उकडलेला बटाटा 1 छोटा
राजगिरा पीठ 1 छोटी वाटी
मीठ 1 चमचा
साखर चिमूटभर
शेंगदाणे कच्चे मूठभर
जिरे 1 टी स्पून
मिरच्या 3 मोठ्या(1 सजवायला)
खवलेले खोबरे 1 छोटी वाटी
तूप 2 छोटे चमचा एकदा परतायला एकदा वरून घ्यायला.एकच चमचा 2 वेळा वापरला तरी चालेल.
कृती
1.
गॅस जवळचा पसारा आवरून फोटो ला जागा करा.काचेची भांडी शोधून न फोडता त्यात कच्चा माल काढून फोटो काढा.
2. शेंगदाणे, जिरे आणि थोडे मीठ खरपूस भाजावे.
3. भाजल्यावर गॅस बंद करून गॅस वरून उतरवून तुमचा मिक्सर शहाणा सोशिक असेल तर तसेच गरम उरलेल्या 2मिरच्या घालून घुर्र करून घ्यावे.मिक्सर केन्स्टार,मर्फी रिचर्ड वगैरे परदेशी श्रीमंत घराण्यातील लाडावलेला असेल तर कढई पंखा 4 वर ठेवून पूर्ण गार करून मगच कंटेंट बारीक करावे.
4. गॅस वर कढई ठेवून अगदी उलीसे तूप टाकून खवलेले खोबरे,मीठ,साखर आणि बारीक केलेले शेंगदाणे जिरे मिरची मिश्रण मिसळून थोडावेळ चमच्याने हलवावे.
(या स्टेप चा फोटो काढायला मंडळ विसरलेले आहे.)
हे मिश्रण गर्रर्रर्र 4 वर पंखा लावून थंड होऊ द्यावे.आपणही थंड व्हावे आणि झाडावरचे सोनटक्का पान आणि फुल कापून आणावे.
5. आता पसरट थाळीत राजगिरा पीठ, मीठ,साखर,उकडलेला बटाटा घालून कोमट पाण्यात मळून घ्यावे.
6. हात 5 किंवा 6 वेळा ओला करून त्यावर या मळलेल्या राजगिरा पीठाचा गोळा घेऊन शक्य तितके पातळ करून आत चमच्याने खोबरा मिरची शेंगदाणे मीठ साखर जिरे वाले सारण भरावे(आता पंखा बंद करा)
7. कुकरच्या डब्यात सोनटक्का पाने रचून त्याला अगदी उलीसे तूप(आधीचा 1 चमचा तूप होतं त्याचे 2 उलीसे भाग करावे.फर्स्ट उलीसे कढईत आणि सेकंड उलीसे पानाला) चोळून त्यावर वळलेले मोमो रचून घ्यावे.आपलया मोमोला 22 कळ्या का नाहीत वगैरे शल्य कर्णाप्रमाणे बाजूला ठेवून पुढचे युद्ध लढायला घ्यावे.
8. कुकरच्या डब्यात करंगळी चे पेर बुडेल इतके पाणी घालावे(करंगळी आधी धुवून घ्यावी.)नवऱ्याच्या समाधानासाठी त्यात खालची छिद्र वाली प्लेट ठेवावी.पाणी उकळल्यावर त्यात हा डबा अलगद ठेवून 7 मिनिटांचे घड्याळ लावावे.
9. 7 मिनिटांनी आहट किंवा शू कोई है मध्ये सुंदर तरुणी दरवाजा उघडते तश्या धडधडत्या हृदयाने कुकर उघडावा.राजगिरा गोंद झाला असेल ही अनिष्ट शंका आणणारे मन ए हली!! ओरडून शांत करावे.सुदैवाने मोमो शाबूत आहेत.
10. प्लेटिंग मध्ये पदार्थात असलेले घटक वापरावे असा एक संकेत आहे. तरीहि आगाऊपणा करून सोनटक्का फुल पण ठेवावे.वरून उरलेला दुसरा चमचा(म्हणजे चमचा तोच, तूप दुसऱ्या वेळा) ओतून संपवावा.
प्लेट चा फोटो काढून झाल्यावर रविवारी लोळत सोफ्यावर पडलेल्या मेंबराना गिनीपिग बनवावे.उरलेल्या सारणाचे काय करू म्हटल्यावर तळलेले उपासाचे बटाटा पॅटिस अशी सुचवणी येईल ती नाक उडवून बाजूला करावी.आणि संध्याकाळी जेवण म्हणून फक्त उपास भाजणीचे थालीपीठ उपास नसताना खायचे अशी धमकीयुक्त घोषणा करून इथे लिहायला बसावे.
विशेष सूचना:
सोनटक्का फुल खाऊ नये
सोनटक्का पान खाऊ नये.
तूप ऑप्शनल
या चॅलेंज साठी बनवत नसल्यास राजगिऱ्यात कणिक मिसळली तरी चालेल
उकडलेला बटाटा ऑप्शनल
याला उऊमो(उपास उकडीचे मोदक) म्हणावे तर सुंदर सुबक कळ्या नाहीत.त्यामुळे उमोमो(उपास मोमो) किंवा उड(उपास डंपलिंग) म्हणा सरळ.
अभिनंदन अनु.
अभिनंदन अनु.
अभिनंदन अनु
अभिनंदन अनु
अभिनंदन अनु
अभिनंदन अनु![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
संयोजकांनी पदार्थाचे नाव सर्टिफिकेटवर लिहून त्याची शोभा वाढवलीय... ऊमोमो ऊऊमो
धन्यवाद सर्वाना.गोंडस
धन्यवाद सर्वाना.गोंडस सर्टिफिकेट आहे.मी सेव्ह करून ठेवलं.
हे मिश्रण गर्रर्रर्र 4 वर
हे मिश्रण गर्रर्रर्र 4 वर पंखा लावून थंड होऊ द्यावे.आपणही थंड व्हावे आणि झाडावरचे सोनटक्का पान आणि फुल कापून आणावे. >>>![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
पाककृती कदाचित करणार नाही, फार्फार तर सारण करून बघेन...पण पुन्हा पुन्हा वाचणार हे नक्की !
अभिनंदन अनु ! पु. पा. प्र. ...
धन्यवाद!! करून बघता येईल, फार
धन्यवाद!! करून बघता येईल, फार धोका नाही![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
फार फार तर हे सर्व एकत्र करून थालीपीठ थापून खाता येईल.
रोजची घरगुती कामं असो किंवा
रोजची घरगुती कामं असो किंवा कार्पोरेट जीवनातील प्रोफेशनल काम असो...त्यात निपुण असण्याबरोबरच त्याकडे मिश्किल नजरेतून बघण्याचा आणि जगण्याचा आनंद घेण्ययाचा निस्सीम पणा तुमच्या कडे आहे.. त्याला मनापासून सलाम !
रोजची घरगुती कामं असो किंवा
रोजची घरगुती कामं असो किंवा कार्पोरेट जीवनातील प्रोफेशनल काम असो...त्यात निपुण असण्याबरोबरच त्याकडे मिश्किल नजरेतून बघण्याचा आणि जगण्याचा आनंद घेण्ययाचा निस्सीम पणा तुमच्या कडे आहे.. त्याला मनापासून सलाम ! >> ++ 111 पशुपत
Pages