Submitted by कविन on 27 September, 2021 - 06:59
माझं चांदण्यांचं झाड, माझी कस्तुरमोगरी
तिचा सुगंधाचा पाश, तनामनास मोहवी
तन मन मोहरते, येता साजण ग दारी
स्वर चांदणे शिंपीते, त्याची जादुई बासरी
भान नुरते मी होते, पुरी बावरी बावरी
अंगभर फुलतसे, मग कस्तुरमोगरी
मीच चांदण्याचे झाड, मीच कस्तुरमोगरी
स्पर्श होता साजणाचा, सडा चांदण शिवारी
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सुंदर. इंदिरा संतांच्या
सुंदर. इंदिरा संतांच्या कवितांची आठवण झाली.
छान आहे.
छान आहे.
वाह.... तरल...
वाह.... तरल...
वाह, सुरेख.
वाह, सुरेख.
कस्तुरमोगरी हा शब्द खुप आवडला.
कविता सुरेखच अजून लिहीत जा
कविता सुरेखच अजून लिहीत जा कविता इथे. कस्तुरी( म्हणजे मस्क ) व मोगरा ( आपले जास्मिन/ मोगरा) म्हणजे आमचे फेवरिटच की म्हणून असे परफ्युम बनवले तर बरोबर द्यायला मस्त कविता आहे. आता शरदाचे चांदणे पडायला लागेल तेव्हा म्हणायला गोड.
छान आहे कविता.
छान आहे कविता.
बापरे! मामी इतके भारी कौतुक :
बापरे! मामी इतके भारी कौतुक :-). अर्थात हिमालय कुठे आणि आमची भोपर टेकडी कुठे याची जाणीव आहे मला. पण तरी खोट का बोलू गुदगुल्या झाल्या एक क्षण. त्यासाठी धन्यवाद
धन्यवाद सामो, शशांक, धनुडी, अमा, rmd
परफ्युम बनवले तर बरोबर द्यायला मस्त कविता आहे. >> अमा या सुगंधी प्रतिसादाकरिता पुन्हा एकदा धन्यवाद.
हि कविता सुचायला कारणही मैत्रिणीने शेअर केलेला फुलांचा सुगंधी फोटोच आहे
छान.
छान.
मला फार काही कळत नाही, त्यामुळे वृत्तवगैरे सगळं बसत असेल तर इग्नोर कर.
पण दुसर्या ओळीत 'मोहवी' च्या ऐवजी 'री' कारांत काही शब्द नको का? सगळीकडे यमक री आहे आणि एकाच ठिकाणी वी आहे ते वाचताना मला खटकलं म्हणून विचारतोय. तिच्या सुगंधाचा पाश, तनामनांच्या ग करी. असं काही? हे अगदीच री ला दुसरी री आणली आहे. पण असंच काही तरी.
कसलं गोड
कसलं गोड
खरच पद्मा गोळे, इंदिरा संत यांची आठवण झाली, जियो
रच पद्मा गोळे, इंदिरा संत
रच पद्मा गोळे, इंदिरा संत यांची आठवण झाली, जियो>> अवलताई तुम्ही पण मस्त कविता करता पण आजकाल इथे लिहीत नाही. मी फार कटकट केली का? लिहा हो.
आज मी जास्मिन मस्क परफ युम शोधेन लायब्ररीत.
धन्यवाद अवल
धन्यवाद अवल
हो की रे अमित, तुझ्या पोस्टमुळे माझ त्याकडे लक्ष गेलं. लयीत बसतय म्हणा मोहवी आणि त्या पुढच्या वाक्यालाही ते जोडून येतय अर्थाच्या दृष्टीने पण नक्कीच दुसरा री अंत्य असा अॅप्ट शब्द सुचला तर नक्की विचार करेन. थॅन्क्स.
अमा असं का बरं म्हणताहेत?
अमा असं का बरं म्हणताहेत?
पण थँक्यु. माबोवर कविता टाकून बरीच वर्ष झाली. आता मोस्टली वाचनमात्र
सुंदर कविता..!
सुंदर कविता..!
सुंदर आहे कविता.
सुंदर आहे कविता.
'कस्तुरमोगरी' शब्दाचे पेटंट
'कस्तुरमोगरी' शब्दाचे पेटंट लवकर घेउन टाका. चांदणझोका हा एक तसाच नितांत सुंदर शब्द.
Tana manas bharavi kase waste
Tana manas bharavi kase waste? Bhaarne .= Some type of jaadu.