साहित्य:
उकडलेला बटाटा 1 छोटा
राजगिरा पीठ 1 छोटी वाटी
मीठ 1 चमचा
साखर चिमूटभर
शेंगदाणे कच्चे मूठभर
जिरे 1 टी स्पून
मिरच्या 3 मोठ्या(1 सजवायला)
खवलेले खोबरे 1 छोटी वाटी
तूप 2 छोटे चमचा एकदा परतायला एकदा वरून घ्यायला.एकच चमचा 2 वेळा वापरला तरी चालेल.
कृती
1.
गॅस जवळचा पसारा आवरून फोटो ला जागा करा.काचेची भांडी शोधून न फोडता त्यात कच्चा माल काढून फोटो काढा.
2. शेंगदाणे, जिरे आणि थोडे मीठ खरपूस भाजावे.
3. भाजल्यावर गॅस बंद करून गॅस वरून उतरवून तुमचा मिक्सर शहाणा सोशिक असेल तर तसेच गरम उरलेल्या 2मिरच्या घालून घुर्र करून घ्यावे.मिक्सर केन्स्टार,मर्फी रिचर्ड वगैरे परदेशी श्रीमंत घराण्यातील लाडावलेला असेल तर कढई पंखा 4 वर ठेवून पूर्ण गार करून मगच कंटेंट बारीक करावे.
4. गॅस वर कढई ठेवून अगदी उलीसे तूप टाकून खवलेले खोबरे,मीठ,साखर आणि बारीक केलेले शेंगदाणे जिरे मिरची मिश्रण मिसळून थोडावेळ चमच्याने हलवावे.
(या स्टेप चा फोटो काढायला मंडळ विसरलेले आहे.)
हे मिश्रण गर्रर्रर्र 4 वर पंखा लावून थंड होऊ द्यावे.आपणही थंड व्हावे आणि झाडावरचे सोनटक्का पान आणि फुल कापून आणावे.
5. आता पसरट थाळीत राजगिरा पीठ, मीठ,साखर,उकडलेला बटाटा घालून कोमट पाण्यात मळून घ्यावे.
6. हात 5 किंवा 6 वेळा ओला करून त्यावर या मळलेल्या राजगिरा पीठाचा गोळा घेऊन शक्य तितके पातळ करून आत चमच्याने खोबरा मिरची शेंगदाणे मीठ साखर जिरे वाले सारण भरावे(आता पंखा बंद करा)
7. कुकरच्या डब्यात सोनटक्का पाने रचून त्याला अगदी उलीसे तूप(आधीचा 1 चमचा तूप होतं त्याचे 2 उलीसे भाग करावे.फर्स्ट उलीसे कढईत आणि सेकंड उलीसे पानाला) चोळून त्यावर वळलेले मोमो रचून घ्यावे.आपलया मोमोला 22 कळ्या का नाहीत वगैरे शल्य कर्णाप्रमाणे बाजूला ठेवून पुढचे युद्ध लढायला घ्यावे.
8. कुकरच्या डब्यात करंगळी चे पेर बुडेल इतके पाणी घालावे(करंगळी आधी धुवून घ्यावी.)नवऱ्याच्या समाधानासाठी त्यात खालची छिद्र वाली प्लेट ठेवावी.पाणी उकळल्यावर त्यात हा डबा अलगद ठेवून 7 मिनिटांचे घड्याळ लावावे.
9. 7 मिनिटांनी आहट किंवा शू कोई है मध्ये सुंदर तरुणी दरवाजा उघडते तश्या धडधडत्या हृदयाने कुकर उघडावा.राजगिरा गोंद झाला असेल ही अनिष्ट शंका आणणारे मन ए हली!! ओरडून शांत करावे.सुदैवाने मोमो शाबूत आहेत.
10. प्लेटिंग मध्ये पदार्थात असलेले घटक वापरावे असा एक संकेत आहे. तरीहि आगाऊपणा करून सोनटक्का फुल पण ठेवावे.वरून उरलेला दुसरा चमचा(म्हणजे चमचा तोच, तूप दुसऱ्या वेळा) ओतून संपवावा.
प्लेट चा फोटो काढून झाल्यावर रविवारी लोळत सोफ्यावर पडलेल्या मेंबराना गिनीपिग बनवावे.उरलेल्या सारणाचे काय करू म्हटल्यावर तळलेले उपासाचे बटाटा पॅटिस अशी सुचवणी येईल ती नाक उडवून बाजूला करावी.आणि संध्याकाळी जेवण म्हणून फक्त उपास भाजणीचे थालीपीठ उपास नसताना खायचे अशी धमकीयुक्त घोषणा करून इथे लिहायला बसावे.
विशेष सूचना:
सोनटक्का फुल खाऊ नये
सोनटक्का पान खाऊ नये.
तूप ऑप्शनल
या चॅलेंज साठी बनवत नसल्यास राजगिऱ्यात कणिक मिसळली तरी चालेल
उकडलेला बटाटा ऑप्शनल
याला उऊमो(उपास उकडीचे मोदक) म्हणावे तर सुंदर सुबक कळ्या नाहीत.त्यामुळे उमोमो(उपास मोमो) किंवा उड(उपास डंपलिंग) म्हणा सरळ.
मी ते कधीपासून , उमोमो किंवा
मी ते कधीपासून , उमोमो किंवा उऊमो किंवा उड-मीअनु वाचतेय
मी पण
मी पण
भारी लिहिलीय अनु!
भारी लिहिलीय अनु!
फोटोही भारी.
उमोमो किंवा उऊमो किंवा उड -
उमोमो किंवा उऊमो किंवा उड - लयीच भारी लिहिलेय रेसिपी आणि फोटो पण
वाह!
वाह!
भारीच आहे पाकृ creative आहे
तुमच्या खास शैली मध्ये लिहिलेली पाकृ वाचून मजा आली
उड मी अनु असं वाचलं मी पण
कावळा उड चिमणी उड खेळासारखे
कावळा उड चिमणी उड खेळासारखे
झाली का पूर्ण? मी तिनदा
झाली का पूर्ण? मी तिनदा डोकावून गेले. मला वाटलं DIY सारखं आपापले मोमो आता वळून घ्यायचे कि काय?
भारीच रेसिपी आणि लिहीलीये पण भारी अनुस्टाईल
छान आहे उपवास उमामो. पाकृ
छान आहे उपवास उमामो. पाकृ मजेशीर.
मी अनु शैलीतील मस्त पा.कृ.
मी अनु शैलीतील मस्त पा.कृ.
सोनटक्का पान आणि फुल कापून आणावे.>>>> हे वाचून परत वरच्या फोटोत पाहिले तर पान नव्हते.म नीट वाचले पानावर वाफवून घ्यायचे आहेत.आता परत फोटो पाहिला तर मोमो, पानावर विराजित आहेत.
लिहितेस भारी ..पाकृ ही मस्त
लिहितेस भारी ..पाकृ ही मस्त दिसतेय.
छान
छान
विशेष सूचनांसाठी विशेष आभार _
विशेष सूचनांसाठी विशेष आभार _/\_
नाही तर विशेष पौष्टिकतेसाठी सो. पा. फु. पण खायचे की काय असा विचार आला होता. .
बाकी भलतीच innovative पाककृती हो...
मस्त पाकृ. ह्यावरून आठवलं की
मस्त पाकृ. ह्यावरून आठवलं की टक्क्यांची पाने लहानपणी बरेचदा खाल्ली आहेत
भारी लेखन!
भारी लेखन!
काय मस्त लिहीतेस गं. खुसखुशीत
काय मस्त लिहीतेस गं. खुसखुशीत, पाकृ आवडली.
वेगळी आणि छान रेसिपी... !!
वेगळी आणि छान रेसिपी... !!
वेगळी आणि छान रेसिपी... !!
वेगळी आणि छान रेसिपी... !!
छान..
छान..
मस्त आहे ग रेसिपी!
मस्त आहे ग रेसिपी!
:-ड मलाही धनुडी सारखेच वाटले.
मलाही धनुडी सारखेच वाटले.
ते उड/उमोमो मधे कापून, २ शकलांचा फोटो राहिला की वो ताई.
हॅ हॅ, आता पुढच्या वेळी.
हॅ हॅ, आता पुढच्या वेळी.
आज दुपारी पडी टाकायची होती लवकर आवरून.त्यामुळे पटापट फोटो आणि धागा पाडला.
अवांतर : (त्याबद्दल माफ करा
अवांतर : (त्याबद्दल माफ करा पण फोटो पाहिल्यापासून राहावले नाही म्हणून लिहून टाकतो.)
५ व्या पायरीचा फोटो हा चंद्राच्या किंवा कसल्याश्या ग्रहाच्या पृष्ठभागाचा जवळून घेतलेला फोटो आणि ३ र्या पायरीचा फोटो हा कोणत्यातरी उपग्रहाने मंगळ किंवा तत्सम रक्तवर्णीय खगोलाच्या पृष्ठभागावरील गोळा केलेल्या नमुन्याचा फोटोसारखा दिसतोय.
अगदी.3ऱ्या पायरीचा फोटो मला
अगदी.3ऱ्या पायरीचा फोटो मला दाणेकूट मिरचीच दिसला.
पण पाचव्या पायरीचा फोटो 'बुध ग्रहावर सापडला मोठा प्लॅटिनम चा साठा' बातमी शेजारी द्यायला एकदम परफेक्ट आहे
अगदी साधे काढून पण सगळे फोटो 4 किंवा 5 एमबी मध्ये गेले होते.म्हणून इमेज ची लिमिट पाळायला कात्री घेऊन अगदी अंगासरशी कापावे लागले.
छान रेसिपी.
छान रेसिपी.
खास अनुटच खुसखुशीत भन्नाट लेखन.
छान वाटली पाककृती. मजेदार
छान वाटली पाककृती. मजेदार लेखन!
मस्त!! ह्याच्यावर कॉपीराईटचा
मस्त!! ह्याच्यावर कॉपीराईटचा सी टाकतात तो टाकून ठेव बरं. पता चला कल को कोई शेफ इसको 'डिकंस्ट्रक्टेड थालीपीठ' 'हिड्डन जेम्स' बोलके २-३ हजार पर प्लेट बेच रहा है.... झकास आहे.
छान आहे पाकृ आणि छान लिहिले
छान आहे पाकृ आणि छान लिहिले आहे. त्या २१ की बावीस कळ्यांपैकी ज्या अठरा की १९ मिसिंग आहेत त्या लिखाणात उतरल्या आहेत
अगदी साधे काढून पण सगळे फोटो
अगदी साधे काढून पण सगळे फोटो 4 किंवा 5 एमबी मध्ये गेले होते.म्हणून इमेज ची लिमिट पाळायला कात्री घेऊन अगदी अंगासरशी कापावे लागले.
>>>>>
स्क्रीनशॉट टाकायचा. लोड नाही घ्यायचा.
नावापासूनच पाकृ
नावापासूनच पाकृ
धन्यवाद सर्वाना
धन्यवाद सर्वाना
हे स्क्रीनशॉट चे काही सुचले नाही मला
पुढच्या वेळी बघेन.
नक्की करून पहा. आत खजूर बेदाणे घालून गोड व्हर्जन पण करता येईल.
Pages