उपासाचा पदार्थ
........................
साहित्य:
बीट - ३ नग,
शुद्ध साजूक तूप -३ टे स्पून (more is better ),
साखर - ४ चमचे ( चवीनुसार व आवडीनुसार कमिजास्त करु शकता, दगडापेक्षा वीट मऊ हवी असल्यास गूळ वापरा. त्याची चव सुद्धा भन्नाट लागते. Natural sweetner आवडत असेल तर stevea वापरा [ मी कधी वापरला नाही त्यामुळे प्रमाण सांगता येणार नाही ]. हे explanantiom आणि पर्याय पदार्थ आरोग्यदायी करण्यासाठी सुचवले आहेत. नाहीतर साखर दिसली म्हणून बाद कराल ),
वेलची पूड चिमूटभर,
साय/ मलाई असेल तेवढी २ ते तीन चमचे,
सुकामेवा आवडीनुसार
क्रमावर पाककृती :
१. बीट किसून घ्या
२. कढईत तूप घाला. तुपावर बीटचा किस खमंग परतून घ्या
३. त्यावर झाकण ठेवा. वाफ येऊ द्या.
ही प्रक्रिया मंद आचेवर करायची आहे हे ध्यानात असू द्या
४. किस चांगला शिजला की साखर / गूळ घाला
५. मिश्रण पातळ होईल. ते हलवत राहा.
गॅस मध्यम असू द्या.
६. घट्ट झाले की त्यात मलाई / साय घाला
खवा सुद्धा घालू शकता
७. वेलची पूड, सुकामेवा घालून गरम गरम सर्व्ह करा
गार झालेला हलवा सुद्धा छानच लागतो
अरे वा! किल्लीताई जोरदार!
अरे वा! किल्लीताई जोरदार! हीपण पाककृती छानच.
छान पाककृती! करून बघायला हवी.
छान पाककृती! करून बघायला हवी.
३ फोटो टाका.
हे सुंदर प्रकरण दिसतय!!!
हे सुंदर प्रकरण दिसतय!!!
छान आहे. पण... जाऊ दे सांगतिल
छान आहे. पण... जाऊ दे सांगतिल बाकीचे..
कसा लागेल बीटाच्या किसाचा
कसा लागेल बीटाच्या किसाचा हलवा?
छान सोपी रेसिपी.. करून बघावा एकदा.
चांगली आहे रेसीपी आणि
चांगली आहे रेसीपी आणि नाविन्यपूर्ण.
बीट आणि गुळ कॉम्बिनेशन मनाला पटत नाही. साखर घालुन आवडेल. या हलव्याचा रंगही सुंदर येत असणार. फोटोमध्ये रंग छुन्दासारखा आणि थोडा पातळ दिसतो आहे, पण मला वाटतं गुलाबी आणि घट्टसर असावा.
धन्यवाद वावे, सोनाली, सामो,
धन्यवाद वावे, सोनाली, सामो, सी, मृणाली, मीरा
सीताई : काय गं, सांग ना?
मीरा : बरोबर आहे तुमचं
काल हलवा करताना घरात होता म्हणून मलई ऐवजी खवा घातला त्यामुळे फोटोत पातळ हलवा दिसत आहे.
चव छान आली होती.
बीटाची कोशिंबीर च खाल्ली आहे.
बीटाची कोशिंबीर च खाल्ली आहे. हलवा करुन बघायला पाहिजे. साखरही कमीच लागेल. मीरा म्हणतेय तसं मलापण थोडं पातळ वाटलं छुंद्यासारखं. सी काय गं पिल्लू सोडलंस
हो धनुडी कमीच लागते साखर
हो धनुडी कमीच लागते साखर
चव छान येते. बीट खूप असतील आणि कुणी खात नसेल तर संपवायचा मस्त उपाय आहे.
किसायचे कष्ट फक्त
धन्यवाद
क्यूबात बिटपासून साखर करतात.
क्यूबात बिटपासून साखर करतात. त्यात अजून साखर घालून काही करायचं नि आरोग्यपूर्ण म्हणायचं म्हणजे... तज्ञ लागतील पटवायला.
बाकी रंग झकास!! फार काही आरोग्यपूर्णची भोक्ती नसल्याने नक्की करून बघीन.
... तज्ञ लागतील पटवायला.>>
... तज्ञ लागतील पटवायला.>>
३ बीटात ४ चमचे साखर आहे. खूप नाहीए.
आमच्यात (म्हणजे सासरी बरं का
आमच्यात (म्हणजे सासरी बरं का हो) बीट उपवासाला चालत नाही म्हणे :भ्याआआ:
मी रेसिपी वाचून केवढी तरी आनंदले होते
क्यूबात बिटपासून साखर करतात -
क्यूबात बिटपासून साखर करतात - अय्या हो का? माहिती नव्हतं
बीट ईझ बेटर डॅन साबुदाणा, जाऊ दे
गोड मानुन खायचं
आणखी एक मार्ग आहे :
बिटचे cubes कापायचे, उकडून घ्यायचे आणि किंचित जिरे पूड व सैंधव ( मीठ ) भुरभुरून खायचे, सलाड सारखं होईल. तेही छान लागतं चवीला.
.
धन्यवाद सोनाली, सी ताई, रिया
उपासाला काय चालतं आणि काय नाही ह्याचं logic प्रत्येक घरी वेगळं असतं बहुतेक
आमच्याकडे गाजर चालत नाही उपासाला, बीट चालतं
.
सोनाली, stepwise फोटो काढायला विसरले. स्पर्धेचे डोक्यात नव्हतं
कढईत ला फोटो आहे पण फार काही वेगळा नाही.
३ बीटात ४ चमचे साखर आहे. खूप
३ बीटात ४ चमचे साखर आहे. खूप नाहीए. >> तज्ञ आहेस...
@किल्ली तुम्हाला मायबोलीची
@किल्ली तुम्हाला मायबोलीची संपर्क सुविधा वापरून ईमेल केली आहे ती कृपया पहा.
ई-मेल पाहिली, धन्यवाद संयोजक
ई-मेल पाहिली, धन्यवाद संयोजक
तज्ञ आहेस.…
तज्ञ आहेस.…
बीट ईझ बेटर डॅन साबुदाणा, जाऊ दे>>>> हेच म्हणायचे आहे. आरोग्यपूर्ण ही फार रिलेटीव्ह टर्म वाटते.
मस्तच.
मस्तच.
बिटापासून साखर हे फार डन
बिटापासून साखर हे फार डन थिन्ग आहे तुमच्या ताईंनी सांगितले आहेच. पण रेसीपी छान आहे . नॉर्थ मध्ये काले गाजर का हलवा चुकं दर हलवा बनवतात. दिल्ली फूड वॉक्स लखनो भागा त दिसतील. बीट मध्ये भरपूर आयर्न अस्ते व स्त्रियांना क्रॉनिक आयर्न डेफिशिअ न्सी अॅनिमिआ असतोच त्यामुळे प्रेमळ पतिराजा भाईराजा बाबाराजांनी आपापल्या बाय को बहीण मुलगी ह्यांच्यासाठी बनवून खिलवावा त्यांना . सोपी व छान रेसीपी. बक्षिसासा ठी बेस्ट लक.
आमच्याकडे साबा बऱ्याच वेळा
आमच्याकडे साबा बऱ्याच वेळा बिटाचा हलवा करतात. मस्त लागतो. किल्लीसारख्या त्याही खवा घालून करतात. पण उपासाला गाजर वा बीट दोन्ही नाही चालत. मग बटाट्याच्या हलव्यावर तडजोड करावी लागते.
छान प्रचि व पाकृ.
धन्यवाद अंजू, अमा, प्राची
धन्यवाद अंजू, अमा, प्राची
अरे काय ईमेल केली आम्हालाही
अरे काय ईमेल केली आम्हालाही कळू देत
मस्त रेसिपी आहे ग!
मस्त रेसिपी आहे ग!
बिटपासून साखर करतात. >>>> माहीत आहे.पण सलाडमधे काकडी,बीट,गाजर असतंय ते कस्काय?
मला आपल्या उकडलेल्या बीटाच्या चकत्या आवडतात.बी.को, बोअरिंग प्रकार वाटतो.
मस्त लागतो हा हलवा. 2016 च्या
ड पो
मस्त लागतो हा हलवा. 2016 च्या
मस्त लागतो हा हलवा. 2016 च्या पाकृ स्पर्धेसाठी मी केला होता. म,य, ब, ल ह्यापैकी तीन अक्षराने सुरू होणारे घटक पदार्थ घेऊन पदार्थ बनवायचा होता. त्यामुळे बिट, लाल भोपळा हलवा केला होता.
पॅनकेक सँडविच इथे बघा.
>>>बी.को, बोअरिंग प्रकार
>>>बी.को, बोअरिंग प्रकार वाटतो.
का गं? दही , दाण्याचे कूट घालून केलीयेस की नाही बी को? काय अफलातून लागते.
तशीच केली होती.पण कचकच
तशीच केली होती.पण कचकच चावायला वैताग आला.उग्र लागते काच्चे बीट.
असो.या धाग्यावर अवांतर नको.
अगं उकडून करायची असते. कच्ची
अगं उकडून , किसून / हिरवी मिर्ची, हिंग+जीरे फोडण/ दाण्याचे कूट + दही + साखर + मीठ घालून करायची असते. कच्ची नाही.
---------
चल विपूतुन बोलू.
बीटची चव घालवेल.उगाच गोड
बीटची चव घालवेल.उगाच गोड कशाला करायचे.सलाड खावा गुमान
ही रेसिपी मतदानाच्या धाग्यावर
ही रेसिपी मतदानाच्या धाग्यावर दिसत नाहीये.
Pages