प्रकाशचित्रांचा झब्बू क्र. ८ - उंचावरून काढलेली छायाचित्रे

Submitted by संयोजक on 18 September, 2021 - 06:21

मायबोली गणेशोत्सव २०२१ घेऊन येतोय आपला लाडका खेळ - प्रकाशचित्रांचा झब्बू आणि आजचा विषय आहे 'उंचावरून काढलेली छायाचित्रे '.

उंचावरून काढलेली छायाचित्रे

तुम्हाला तुमच्याकडे असलेली जी प्रकाशचित्रं पूर्णपणे प्रताधिकार मुक्त करावयाची असतील, ती यात झब्बू म्हणून देणं अपेक्षित आहे.
१. ही स्पर्धा नसून खेळ आहे.
२. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे.
३. प्रकाशचित्र हे प्रताधिकारमुक्त असावे व संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे. प्रकाशचित्र कोलाज स्वरूपातले नसावे.
४. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.
५. सर्व प्रकाशचित्रे मायबोलीच्या 'प्रकाशचित्रविषयक धोरणा'चे पालन करणारी असावीत.
६. झब्बूंचा खेळ मायबोलीकरांचे स्वतःचे प्रकाशचित्रसंग्रह सादर करण्यासाठी तयार केला आहे. तेव्हा कृपया तुमच्या जवळची (मग ती तुम्ही अथवा तुमच्या कुटुंबीयांनी काढलेली) प्रकाशचित्रे सादर करा. आंतरजालावरून घेतलेली प्रताधिकारमुक्त चित्रे झब्बूमध्ये देऊ नयेत.
७.मायबोलीवरील प्रकाशचित्रांचे धोरण इथे पाहा -

Group content visibility: 
Use group defaults

अंजली तुम्ही व्हेसल वरती गेलाय? सध्या ते बंद आहे फॉर अ गुड रीझन. बर्‍याच आत्महत्या होतात तिथे. मध्ये एका १४ वर्षिय मुलाने तेही स्वतःच्या कुटुंबियांसमोर, आत्महत्या केली. मी असे ऐकले आहे की फार अन एन्डिंग आणि पर्पझलेस असा तो जिना मनावरती मळभ , सावट , भकासपणा आणत जातो आणि व्यक्तीला वैफल्याची, नैराश्याची भावना येउ लागते.
त्या जिन्यावरती तुमच्याशी बोलायला लोकंही तैनात असतात म्हणे. म्हणजे जेव्हा तो ओपन होता तेव्हा तैनात केलेले होते.

अंजली तुम्ही व्हेसल वरती गेलाय? सध्या ते बंद आहे फॉर अ गुड रीझन. >>>>>>>>>>>> हो सामो मागच्या वर्षी गेले होते. हो ना ती आत्महत्येची बातमी कळली. फार वाईट.

खूप मस्त फोटो येतायत.
25 सेमी उंचीवरून काढलेला फोटो तर अति सुंदर आहे.
असं वाटतं या फोटोंचं एक पिक्चर बुक बनवून जवळ ठेवावं.

हाहा! धन्यवाद. बायकोला प्रतिक्रिया दाखवतो.
पुढच्या वेळेस त्या काजूच्या वर दोन लवंगा टोचून पाहतो. स्माईलीसारखे दिसतील. फक्त पर लाडू २ करत गेलो तर इतक्या लवंगा फार होतील. एखाद्या लाडूत ठीके.

लाडू भारीच झालेत फोटो ही सुंदर काढलाय .
काजू आडवा लावायचा आणि वर दोन चारोळ्या आणि मध्ये नाक म्हणून बदामाचा उभा काप perfect स्मायली वाटेल.

काय सुंदर फोटो आहे बर्फ़ाचा.निर्वाणा निर्वाणा म्हणतात ते हेच.

हे उंचावरून राधानगरी जवळचं एक जलाशय.नाव आठवत नाही.खूप सुंदर पाणी होतं.
IMG_20210922_111803.jpg

काय सुंदर फोटो आहे बर्फ़ाचा.निर्वाणा निर्वाणा म्हणतात ते हेच. >>>> - ह्याही वर्षी जुने फोटो बघूनच समाधान मानावे लागत आहे.

लेहमधल्या शांतीस्तुपावरून घेतलेला फोटो

IMG_20170831_112543_HDR.jpg

gc.jpg
ग्रँड कॅन्यन

सर्वच फोटो मस्त. हर्पेन फार सुरेख आहे कांगरी बेस कॅम्पचे चित्र. रात्री आकाश किती सुंदर दिसत असेल आणि सूर्यास्तही.

२ वर्षांपूर्वी कोरोनापूर्व काळात.. आज फेसबूक मेमरीमध्ये आले
अंजीरवाडी माझगावचे बाप्पा आमच्या बिल्डींगखालून जाताना..
पहिला फोटो नियमानुसार ऊंचावरून काढलेला
दुसरा फोटो खास बाप्पांचे दर्शनासाठी..

FB_IMG_1632409808017.jpg
.
FB_IMG_1632409814878.jpg

मस्तच फोटो सगळेच.
ओंकारेश्वर ...नर्मदा मैय्या एका पुलावरून घेतलेला प्रचि.
DSCN1208-2.jpg

हा धागा मस्त आहे.एकदातरी इथे चक्कर मारतेच.
मला घाईत वाचताना या धाग्याचं नाव नेहमी 'उंटावरून काढलेले फोटो' असं दिसतं

Pages