मायबोली गणेशोत्सव २०२१ घेऊन येतोय आपला लाडका खेळ - प्रकाशचित्रांचा झब्बू आणि आजचा विषय आहे 'पाळीव दोस्त '.
पाळीव दोस्त
तुम्हाला तुमच्याकडे असलेली जी प्रकाशचित्रं पूर्णपणे प्रताधिकार मुक्त करावयाची असतील, ती यात झब्बू म्हणून देणं अपेक्षित आहे.
१. ही स्पर्धा नसून खेळ आहे.
२. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे.
३. प्रकाशचित्र हे प्रताधिकारमुक्त असावे व संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे. प्रकाशचित्र कोलाज स्वरूपातले नसावे.
४. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.
५. सर्व प्रकाशचित्रे मायबोलीच्या 'प्रकाशचित्रविषयक धोरणा'चे पालन करणारी असावीत.
६. झब्बूंचा खेळ मायबोलीकरांचे स्वतःचे प्रकाशचित्रसंग्रह सादर करण्यासाठी तयार केला आहे. तेव्हा कृपया तुमच्या जवळची (मग ती तुम्ही अथवा तुमच्या कुटुंबीयांनी काढलेली) प्रकाशचित्रे सादर करा. आंतरजालावरून घेतलेली प्रताधिकारमुक्त चित्रे झब्बूमध्ये देऊ नयेत.
७.मायबोलीवरील प्रकाशचित्रांचे धोरण इथे पाहा -
किती छान फोटो आहेत सर्वांचेच.
किती छान फोटो आहेत सर्वांचेच. डोळे निवले.
ही आमची पाळलेली चिमणी बाळे..
ही आमची पाळलेली चिमणी बाळे..
खाण्यासाठी आ वासून आक्रोश करताना..
आणि ही त्यांची आई..
एका पिल्लाला भरवताना..
सुंदर फोटो
सुंदर फोटो
अगदी योग्य क्षणी टिपलेला.
ते दोन्ही भुभु पण मस्त आहेत.
निरू...class फोटो..एक नंबर
निरू...class फोटो..एक नंबर
बबली नाकेली आहे.
बबली नाकेली आहे.
निओ किती प्रेमाने बघतोय ब्लू कडे
चिऊताई आणि तिची हुशार पिल्लं मस्तच ( मला गोष्ट आठवली)
>>>>>>>धनगरी जात आहे..
>>>>>>>धनगरी जात आहे..
धनगरी कुत्री फार हुषार असतात असे ऐकुन आहे. शीप डॉग.
सगळ्या पाळीव दोस्तांचे फोटू
सगळ्या पाळीव दोस्तांचे फोटू मस्त आहेत. आवडले
वा वा फार फार आवडला आहे हा
वा वा फार फार आवडला आहे हा विषय
ब्लू हस्की आहे का?
वा वा फार फार आवडला आहे हा
वा वा फार फार आवडला आहे हा विषय
ब्लू हस्की आहे का?
(No subject)
हे नुकतेच घरी आणले असतानाची जोडगोळी.
किती क्युट आहेत दोघे.
किती क्युट आहेत दोघे.
दोन्ही बॉईज आहेत का?
नाही डावीकडची ब्राऊन ब्लॅक
नाही डावीकडची ब्राऊन ब्लॅक कॅलिको आहे ती फिमेल... पांढरा बोका![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
धनुडी, निओ प्रेमानं पाहात
धनुडी, निओ प्रेमानं पाहात नाहीये. थोडे असहाय असे भाव असावेत असं वाटतंय. की आता कोण हा नवा प्राणी बुवा? आणि कधी जाईल तो परत आपल्या घरी? वगैरे वगैरे...
हो सिंडरेला, ब्लू हस्की आहे. त्याला जन्मतःच डावीकडचा मागच्या पायाचा पंजा नाहीये. पण त्यामुळे त्याचं काही अडत नाही. घरभर नुसता धावत असतो सशासारखा. पकडावं तर हाती येत नाही. निळे डोळे असल्यानं नाव ब्लू ठेवलंय. प्रोस्थेटिकचे प्रयत्न सुरु आहेत.
अत्यंत मोहक फोटो आहेत सगळे.
अत्यंत मोहक फोटो आहेत सगळे.
नितु, तुमचा टारझन फारफार देखणा आहे व फोटोमधे सुपरमॉडेल वाटतोय. तुम्ही जबरदस्त फोटो काढलेत.
. थोडे असहाय असे भाव असावेत
. थोडे असहाय असे भाव असावेत असं वाटतंय. ......हो ना! मला माझी गादी देशील का असं केविलवाणे विचारतोय वाटतंय.
(No subject)
आमचा चिंग्या![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
मी पोळ्या करायचे तेव्हा असा बाजूला बसून बघत बसायचा. मी त्याला म्हणायचे शिकून घे ,तुला मुली बघायच्या आहेत . आता लग्न करायचं बच्चु तुझं
किती छान फोटो आहेत सर्वांचेच.
किती छान फोटो आहेत सर्वांचेच. डोळे निवले. >>> अगदी अगदी.
(No subject)
मायेची ऊब जिंजर, चिंगी, मिंगीला.
(No subject)
आम्ही झाडं लावायला जातो तिथे असणारी जोडी.
ओह ब्लू बद्दल वाईट वाटलं
ओह ब्लू बद्दल वाईट वाटलं बिचारा
तेच मला वाटलं की adopt केलाय का
कारण मोठा दिसतोय आणि पहिला दिवस घरातला असे लिहलं होतं
प्रोस्थेटिकचे प्रयत्न सुरु आहेत.>>>>
खूप छान आवडलं अगदीच
निरू जी, टारझनचे हे फोटो
निरू जी, टारझनचे हे फोटो पाहून मला " रिश्ते मे तो हम तुम्हारे बाप लगते है" हाच डायलॉग आठवला![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सेनापती आजींचा अजून एक फोटो.
सेनापती आजींचा अजून एक फोटो.
![IMG_20210922_125125.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u60/IMG_20210922_125125.jpg)
हेहेहेहेहेहेहे सेनापती आजी,
हेहेहेहेहेहेहे सेनापती आजी, आम्ही एका कुत्र्याला नेहरू म्हणायचो ते आठवलं. गोल्डन कलरचा होता, छान होता दिसायला.
आशुचँप, वाईट वाटून घ्यायचं
आशुचँप, वाईट वाटून घ्यायचं कारण नाही आणि तो बिचारा पण नाहीये. भयंकर जोरदार ॲटिट्यूड आहे आम्हाला. तो निओला पाहून कदाचित म्हणतही असेल - हा चौथा पाय किती विचित्र दिसतोय नाही? ब्रीडर्स अतिशय चांगले लोक आहेत (एथिकल ब्रीडर्स). आणि आमच्याबद्दल दहा वेळा खात्री करूनच आम्हाला हे पिल्लू सोपवलंय त्यांनी. तो त्यांच्याकडेही लाडावला होता आणि आपल्याकडे तर काय तो ब्लू आइड बॉयच आहे!
हस्की भयंकर हुशार असतात. बेबी
हस्की भयंकर हुशार असतात. बेबी सिटिंगसाठी पण ट्रेन करतात म्हणे त्यांना.
पार्वती, एवढ्या तेवढ्यानं स्वतःला गरीब-बिच्चारं समजण्याची माणसांची सवय. हे सगळे हिरो आहेत, तो अॅटिट्युड दिसतोच त्यांच्या वागण्यात.
हो हस्की स्मार्ट तर असतातच पण
हो हस्की स्मार्ट तर असतातच पण फार क्यूट ही असतात आणि त्यांच्या ओनर्सशी अगदी लाडात वागतात. त्यांना वेगवेगळे आवाज काढायची सवय असते. ते बोलतायत असंच वाटतं
बर्याच अशा "बोलक्या" हस्कीज चे व्हिडिओ आहेत यू ट्ञूब वर ![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
(No subject)
कोकणातील मोठ्या दिरांचे सवंगडी, हे माझ्या गावी जास्त न जाण्याचे एक कारण आहेत
गादी घातली की लगेच ताबा घेतात.
अगं अंजू केवढे सवंगडी अगदी
अगं अंजू केवढे सवंगडी
अगदी एकसारखे आहेत
गोडच.
सगळ्या माऊज, भुभूज, पक्षी भयंकर क्यूट आहेत. ही जमात एकमेव अशी ज्यांच्यावर निस्वार्थी प्रेम करावं
टारझनच्या आधी आमच्याकडे
टारझनच्या आधी आमच्याकडे उण्यापुऱ्या आठवडाभरासाठी सिंबा आला होता. त्याला पाळणारे, गांवी जायचे होते म्हणून.
आल्यानंतर तिसऱ्याच दिवशी तो बाल्कनी बाहेरच्या फ्लाॅवरबेडच्या अरुंद कठड्यावर जाऊन बसला..
अगदी जोरदार जबडा विचकत. (हे गुरकावणं कबुतरांवर..)
आमची तर _ _ लीच..
एकतर दुसऱ्याचं बाळ....
पण तो मात्र एकदम आरामात होता.
With A Killer Look...
ती माऊ लोक कसली सारखी आहेत
ती माऊ लोक कसली सारखी आहेत.मला एकदम डोळे खराब झाले की काय माझे वाटलं![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
टारझन ची जांभई भीतीदायक आहे.
Pages