खेळ: शब्दांचा झब्बू -३ : व्यक्ती विशेषण

Submitted by संयोजक on 18 September, 2021 - 21:34

गेल्या काही गणेशोत्सवांमधे लोकप्रिय झालेला : खेळ शब्दांचा !
आपण नेहमी वेगवेगळ्या प्रकारांचे झब्बू खेळत असतोच. कधी पत्त्यांचा , कधी गाण्यांचा तर कधी म्हणींचा. या वर्षीही आपण खेळणार आहोत शब्दांचा झब्बू. प्रकार सोप्पा आहे एकदम. दररोज एक विषय असेल. त्याला धरून आपण झब्बू खेळायचा आहे. या उपक्रमातून आपण खेळ तर खेळणार आहोतच त्याचबरोबर वापरात असलेले किंवा नसलेले असे मराठी शब्द वापरणार आहोत. काहींना सगळे शब्द माहिती असतील तर काहींना नवीन शब्द कळतील आणि त्यांचा आपल्या दैनंदिन जीवनात उपयोगही करता येईल.
काही नियम :
१) संयोजक दर दोन दिवसांनी एक विषय देतील.
२) त्या विषयावर आधारित पहिला क्लू देतील.
३) तो क्लू वापरून त्या विषयावर आधारित शब्द लिहायचा.
४) जो सगळ्यांत आधी बरोबर शब्द लिहील तो पुढचा क्लू देणार.

आजचा विषय : व्यक्ती विशेषण ( व्यक्ती/पाळीव प्राणी/ नाते संबंधी) यांना वापरायचे विशेषण
उदा. सासू म्हटली की हेच आठवणार
?ष्ट (उत्तर खाष्ट)

हा भामटा अंगात काय घालून येईल आणि कसा फसवेल सांगता येत नाही.
?फं?

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

अहो,
भक्तिमार्ग तर तुमच्या आवडीचा.
बघा बघा येईल Bw

असू शकेल.
परंतु जो कोण अशा अवस्थेला पोहोचू शकतो त्या कोणालाही लावता येईल...

भक्तीच्या समानार्थी शब्दसाठी विचार केला की योग्य दिशा मिळेल

यमनियम वाटत होत, किंवा शमदमादि ... असा मी अन्दाज लावत होते.
तुमच्या शब्दरंजनच्या धाग्यावर ही एक नजर टाका डॉक्टर Happy

पर्युत्सुक.
आता कोणीतरी झब्बु द्या बरं.

कृष्णा नाही
हे गती संदर्भात झालं.
आपल्याला वाकडेपणा म्हणजे शत्रुत्व या अर्थाने....

Pages