मायबोली गणेशोत्सव २०२१ घेऊन येतोय आपला लाडका खेळ - प्रकाशचित्रांचा झब्बू आणि आजचा विषय आहे 'पाळीव दोस्त '.
पाळीव दोस्त
तुम्हाला तुमच्याकडे असलेली जी प्रकाशचित्रं पूर्णपणे प्रताधिकार मुक्त करावयाची असतील, ती यात झब्बू म्हणून देणं अपेक्षित आहे.
१. ही स्पर्धा नसून खेळ आहे.
२. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे.
३. प्रकाशचित्र हे प्रताधिकारमुक्त असावे व संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे. प्रकाशचित्र कोलाज स्वरूपातले नसावे.
४. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.
५. सर्व प्रकाशचित्रे मायबोलीच्या 'प्रकाशचित्रविषयक धोरणा'चे पालन करणारी असावीत.
६. झब्बूंचा खेळ मायबोलीकरांचे स्वतःचे प्रकाशचित्रसंग्रह सादर करण्यासाठी तयार केला आहे. तेव्हा कृपया तुमच्या जवळची (मग ती तुम्ही अथवा तुमच्या कुटुंबीयांनी काढलेली) प्रकाशचित्रे सादर करा. आंतरजालावरून घेतलेली प्रताधिकारमुक्त चित्रे झब्बूमध्ये देऊ नयेत.
७.मायबोलीवरील प्रकाशचित्रांचे धोरण इथे पाहा -
अजून एक मस्त झब्बू विषय
अजून एक मस्त झब्बू विषय संयोजक !
ईथे डॉगीज ॲण्ड कॅटीजचे बरेच फोटो येणार आहेत. त्यामुळे आधी आपण आपला एक ससुल्या टाकून घेऊया
(No subject)
आमचा भू भू
माउई
माउई
मायबोलीवर फोटो टाकायचा दुसरा
मायबोलीवर फोटो टाकायचा दुसरा प्रयत्न ! हा ही दिसतोय की नाही ते कृपया सांगा (पहिला अयशस्वी प्रयत्न फार पूर्वी कधी तरी केला होता )
मी अजिबात pet lover नाही, मी
मी अजिबात pet lover नाही, मी खूप घाबरतेही, लांबून हाय करणाऱ्या गटातील, पण भाऊ बहीण, नवरा आहे प्राणीप्रेमी.
सध्या भावाच्या गॅलरीत मार्जार फॅमिली ठाण मांडून बसलीय, भाऊ बडदास्तही ठेवतोय, परवा काही फोटो काढलेत मी, ते देते.
या मातोश्री गुरगुरत होत्या माझ्यावर, खुन्नस एकदम. त्या नसताना पिल्लांनी छान फोटो काढू दिले, एक लाजाळू आहे, त्याचा सेपरेट काढता आला नाही. देईन एकेक सावकाश.
आधीचे सगळे फोटो गोड.
आधीचे सगळे फोटो गोड.
धन्यवाद अंजू
धन्यवाद अंजू
गुरगुरणाऱया मातोश्री
चंद्रा, भुभुज नाव काय आहे?
चंद्रा, भुभुज नाव काय आहे?
ऑफिसच्या बाहेर ऊन खात बसलेली
ऑफिसच्या बाहेर ऊन खात बसलेली मनी.
@ जाई ,
@ जाई ,
भू भूचं नाव स्नो आहे ( नाव मोठं लक्षण खोटं ). Spaniel breed. नक्की कुठली category ते आत्ता आठवत नाही आहे.
बागेत माती खणणे, क्वचित नजर चुकवून बागेतल्या स्प्रिंक्लरच्या पाण्यात भिजून येणे, पावसाच्या साठलेल्या पाण्यात मुद्दाम चालणे अशा नाना खोड्या अंगात असल्यामुळे यामुळे त्याला नावाप्रमाणे शुभ्र ठेवणे एक आव्हानच असतं!
इथले फोटो एकदम स्ट्रेस बस्टर
इथले फोटो एकदम स्ट्रेस बस्टर आहेत.
ही आमच्या सोसायटीतली अजिबात शी च्या मॅनर्स नसलेली माऊ.हिला आमच्याकडे सेनापती म्हणतात.(सेनापती, बॅटमॅन आणि गळ्यात लाल पट्टा बांधलेलं हॅन्डसम पाळीव मांजर सेलेब्रिटी.)सेनापती बरीच म्हातारी आहे.तशी मेन्टेन्ड आहे.चेहऱ्यावरून वयाचा अंदाज अजिबात येत नाही.
छान. संतूर वापरत असेल.
छान. संतूर वापरत असेल.
शेजारी आहे ते स्ट्रॉबेरी चं
शेजारी आहे ते स्ट्रॉबेरी चं झाड(त्याला आलेली पिकायला ठेवलेली लालभडक स्ट्रॉबेरी सुरवंटाने खाऊन टाकली .म्हणून पुढची स्ट्रॉबेरी सुखरूप मोठी व्हायला कुंडी गाडीवर ठेवलीय.)आता गाडीवर सुरवंट चढणार नाही ही आपली आमची अंधश्रद्धा.
अनु , भारी सोच
अनु , भारी सोच
ऋ सश्या पेक्षा मुलांकडेच जास्त लक्ष गेलं माझं. गोड आहेत दोघं ही.
पाळीव प्राण्यांना घरात ठेवणे वैगेरे आवडत नसले तरी फोटो मस्त आलेत सगळे
ही आमची कोकणातली रांगोळीत लोळून रंगीत झालेली मनी. रंगाच्या पिंपात पडलेल्या कोल्ह्याच्या गोष्टीची आठवण करून देणारी.
.
हा हा, भारी फोटो ममो!
हा हा, भारी फोटो ममो!
बापरे
बापरे
हिला स्वच्छ कसं केलं नंतर
की अशीच राहिली
इथले फोटो गोड आहेत फार
इथले फोटो गोड आहेत फार.गुरगुरणाऱ्या मातोश्री, स्थितप्रज्ञपणे टीव्ही बघणारा माऊई, जोई(हा दुसऱ्या धाग्यावर आहे),चंद्रा चे जुलफे वाले भुभु,रिन मध्ये धुतल्या सारखी पांढरीशुभ्र मनी, सुदृढ ससा,ममो ची रंगात लोळलेली रेनबो माऊ.
सगळेच मस्त.
मानव थांकू.
मानव थांकू.
हिला स्वच्छ कसं केलं नंतर
की अशीच राहिली >> थोडे दिवसांनी रंग गेला तिचा.
Actually, सुनबाईंनी एवढे कष्ट करून काढलेल्या रांगोळीची तिने पुरी वाट लावली होती. पण घरात मी सोडून बाकीच्यांना कुत्र्या मांजारां बद्दल अफाट प्रेम असल्याने कौतुकाने तिचे फोटो वैगेरे काढण्यात आले.
मोतीचे तर घरातल्या लहान मुला हुन ही अधिक लाड आणि कौतुक होतं आमच्याकडे.
ममो, मला माझ्या चिंग्याची
ममो, मला माझ्या चिंग्याची आठवण आली, तो कायम मी रांगोळी काढली की आरामात जाऊन बसायचा. माझा लेक मला चिडवायचा, "आता ओरड, दे फटके चिंग्याला "
सगळे फोटो मस्त अनुला मम
हि दुसरी मांजरी ,आमच्या कडे 2 बाळंतपणं झाली हिची. फोटोत घाबरगुंडी उडाली आहे.
स्नो,एकदम राजेशाही बसलाय.
.
स्नो,एकदम राजेशाही बसलाय.
स्नो,एकदम राजेशाही बसलाय.
माऊई एकदम निरागस दिसतोय.
तु अ,मुलांकडेच जास्त लक्ष गेले.
.मी अनु,हीच का ती माबोवरची धागाधिष्टितवाली माऊ?तुझी अंधश्रद्धा फळास येवो.परत कोणी धागा काढून सल्ला विचारला तर कामी येईल.
ममो,
Jai , अंजू छान फोटो.
Dhanudi, मस्त माऊ.कशाला एवढी
Dhanudi, मस्त माऊ.कशाला एवढी घाबरली आहे.
अरे वा , मस्तच आहे फोटो
अरे वा , मस्तच आहे फोटो सगळ्यांचे !!! सेनापती ची जुळी बहीण / भाऊ आमच्या सोसायटी मध्ये आहे . फोटो काढायला जमला तर देते इथे . कारण वावर येऊन - जाऊन आहे . कार च्या बॉनेट वर ऊन खायला येतात. ममो ची रंगीबेरंगी माऊ मस्तच !!
हीच ती(शी करणारी)
हीच ती(शी करणारी)
Neo
Neo
Vanila & Angel
कसले क्यूट क्यूट आहेत सगळे
कसले क्यूट क्यूट आहेत सगळे pets
माऊ आवडली ,थॅंक्यु सगळ्यांना.
माऊ आवडली ,थॅंक्यु सगळ्यांना.
आमचा कोकणातल्या घराचा गोठा कायम भरलेलाच असतो. आणि गोठ्यातली गुरं जवळ जवळ घरच्या सारखीच असतात. ही आमची एक गाय.
क्युट आहे डालमेशियन प्रिंट ची
क्युट आहे डालमेशियन प्रिंट ची गाय.
एकदम फॉरीन ची वाटतेय नेदरलँड वगैरे.
हो ही जरा हाय फाय आहे अनु.
हो ही जरा हाय फाय आहे अनु. मुद्दाम विकत वैगेरे आणलेली.
बाकी सगळ्या घरीच जन्मलेल्या ,तांबूस रंगाच्या , आकाराने छोट्याश्या अश्या आहेत
Dhanudi, मस्त माऊ.कशाला एवढी
Dhanudi, मस्त माऊ.कशाला एवढी घाबरली आहे.>>> काय माहित खिडकीतून बोका वगैरे दिसला असेल. मी विचारलं पण तिला काय एवढी टरकली तुझी? नुसतीच घाबरीघुबरी होऊन दोनतीन पोज दिल्या मला.
निओ, व्हॅनिला एंजल किती गोड.
ममो नाव काय गायीचं? खरंच डाल्मेशियन प्रिंट
Pages