शशक पूर्ण करा - भिंत - प्राचीन

Submitted by प्राचीन on 17 September, 2021 - 03:32

शशक - भिंत

काहीच सुचत नाहीय. सगळीकडे फक्त अंधारच अंधार. कानावर फक्त पाण्याचा आवाज पडतोय. मनाला एक अनामिक हुरहूर लागून राहिलीय. तेवढ्यात दरवाजा उघडला जातो >>>
एक प्रकाशरेखा तनमनातील  तिमिराला उजळून टाकते. 
पंढरीच्या सावळ्याने जो वेधु लावलेला आहे, तो ज्ञानोबापासून ते  माझ्यासारख्या, समाजातील  उतरंडीत सर्वात खालच्या थराला  असलेल्या पामरापर्यंत...
आम्हाला ना चंद्रभागेच्या पुण्यसलीलामध्ये स्नान करण्याचे भाग्य, ना  विटेवरील परब्रह्माच्या पायी डोई ठेवण्याचे..
तरीही त्याचा हार चोरल्याचा आळ यावा, त्यापायी  जनलोकांनी मजवर प्रहार करावेत,
मात्र त्याचे गोड नाम मुखी असताना जणु बासरीतून तो
अवघ्या घावांवर कृपेची फुंकर मारत असतो..
आता हुरहूर कशाला .. ..  भिंतीमध्येदेखील तोच तर भरलेला आहे .. विठूराया, या चोख्याला  आपल्यात सामावून घे रे..

Group content visibility: 
Public - accessible to all site users

चोखामेळा Sad
हार चोरल्याचा आरोप झालेला का त्यांच्यावरती? Sad गोष्ट माहीत नाही. गुगलते.

रुपाली, सामो धन्यवाद.
सामो, चोखा मेळा चरित्र जरूर वाच. मनाला भिडणारे आहे.

छान