शशक पूर्ण करा - अधुरं प्रेम - हाडळीचा आशिक

Submitted by हाडळीचा आशिक on 11 September, 2021 - 09:26

काहीच सुचत नाहीये. सगळीकडे फक्त अंधारच अंधार. कानावर फक्त पाण्याचा आवाज पडतोय. मनाला एक अनामिक हुरहूर लागून राहिलीय. तेवढ्यात दरवाजा उघडला जातो.....
सभोवताली उजेड पसरला. क्षणार्धात एक लखलखतं हत्यार वेगानं आतमध्ये येत खस्सकन् पोटात खूपसलं गेलं. अपार वेदनेनं त्याचा जीव कळवळला. मीही डोळे घट्ट मिटून घेतले.

काही वेळानं जरासं घाबरतच डोळे उघडले. दरवाजा बंद होऊन सभोवताली पुन्हा काळोख पसरला होता. तो आता सुसह्य वाटला. थोडा सैलावलो तोच पुन्हा दरवाजा उघडला जाऊन माझ्यावरही प्राणघातक वार झाला. डोळे झाकण्याआधी तो चेहरा दिसला आणि संध्याकाळपासून कितव्यांदातरी मी तिच्या प्रेमात पडलो.
'देवा तिला माफ कर!'

जीव सोडण्याआधी तिचा सुमधुर आवाज ऐकला,

"मम्मीsss बटाटे उकडलेत !"

-हाडळीचा_आशिक

Group content visibility: 
Use group defaults

छान Lol

अस्मीतै, मानवकाका, धनुडी, ऋन्मेष, सामो, मृतै, देवकी, कविन, निरुदा, सितै प्रतिसादाबद्दल धन्यवाद ! Happy
Lol बटाटे Lol चटके नाही का बसले?>>>हो चटके बसले पण प्रेमात न बोलता तेवढे सहन करावे लागतात म्हणून लिहीलं नाही. Proud

मस्त Lol