शशक पूर्ण करा - गर्दी - प्राचीन

Submitted by प्राचीन on 16 September, 2021 - 05:13

शशक - गर्दी
काहीच सुचत नाहीय. सगळीकडे फक्त अंधारच अंधार. कानावर फक्त पाण्याचा आवाज पडतोय. मनाला एक अनामिक हुरहूर लागून राहिलीय. तेवढ्यात दरवाजा उघडला जातो >>>
' अंगावर जखमांचे लेणे असल्याने आम्ही प्रयत्नपूर्वक डोळे उघडतो..
गिलच्यांनी  केलेलं कोंडाळं बाजूला सारून कुणीतरी आलंय..
अगम्य भाषेत बोलणं सुरू आहे.. अर्थबोध व्हावा, इतक्याशा  उत्सुकतेनेदेखील मेंदू शिणतोय...
परंतु त्यायोगे असंबद्ध काहीतरी आठवतंय, 'कुंजपुरा, बुंदेले, दिल्लीविजय, गोलाची रचना,
चेहरेही  तरळताहेत  .. नाना, मल्हारराव, बापू,, बचेंगे तो और भी लडेंगें,' म्हणणारा दत्ताजी, आणि.. आणि..   जेमतेम मिसरूड  फुटलेला माझा लाडका.. अरेरे..
अश्रुपूर्ण नेत्रांनी उभी असलेली ही कोण?... पार्वती....
..  परत येण्याचं वचन निभावता येईल का आम्हांला ..

'भाऊ गिलच्यांच्या गर्दीत दिसेनासे झाले' वृत्त पुण्यात पोहोचले.

Group content visibility: 
Use group defaults

एकंदर कॉन्टेक्स्ट कळला. परंतु हा इतिहास आठवत नसल्याने नीट कळले नाही. पानिपतच्या युद्धाची पार्श्वभूमी असावी.
जबरदस्त प्रयत्न आहे.

छान..

वावे, निरु, जाई, सामो, धन्यवाद.
हो सामो. अंदाज बरोबर आहे. पानिपतच्या युद्धाची पार्श्वभूमी आहे. बाकी उकल इतर कुणी केली नाही तर नंतर करेन.. Happy