आपल्या सर्वांसाठी घेऊन आलो आहे एक रोचक खेळ !
खाली ६ शोधसूत्रे दिलेली आहेत. ती शास्त्रशुद्ध गूढ प्रकारची नसून एक प्रकारे गंमतगूढ आहेत. त्या प्रत्येकाच्या कंसामध्ये ओळखायच्या शब्दाची अक्षरसंख्या आहे.
तुम्हाला हे सर्व शब्द ओळखायचे आहेत. या सर्व शब्दांचे एक समान वैशिष्ट्य आहे, ते म्हणजे हे शब्द ही सर्व माबोवरची सदस्यनामे आहेत.
शोधसूत्रांमध्ये दिलेली भाषिक माहिती ही निव्वळ संबंधित सदस्यनाम ओळखण्यापुरतीच दिलेली आहे. कुठल्याही शोधसूत्राचा शब्दशः अर्थ कोणीही व्यक्तिगत घेऊ नये ही विनंती.
हा निव्वळ खेळ आहे. संबंधित सूत्र हे इथल्या कुठल्याही व्यक्तीचे वर्णन नाही याची नोंद घ्यावी.
ओळखायची सर्व नामे ही सलग आहेत; त्यात कुठेही खंड अथवा जोड नाही. सर्व अपेक्षित शब्द हे मराठी भाषेत व देवनागरी लिपीत आहेत. त्यात कुठेही अंक नाहीत.
सूत्रे :
१. हाताची बोटे मोजून अधिकार गाजवतो (५)
२. साधूला तोडून युक्तिवान झाला (४)
३. (५) तिथे भरारी मारल्यानंतर पावित्र्य मिळाले
४. जोडीने यात्रा करताय का राजे ! (५)
५. भटक्याने आडनाव लावले (५)
६. आवेशात पलंगावर टेकला)
(५
......
एखाद्याने ओळखलेला शब्द हा जर अपेक्षित उत्तरापेक्षा वेगळा असेल ,
तर संबंधिताने त्याचे शोधसूत्रानुसार स्पष्टीकरण द्यावे.
ते योग्य वाटल्यास पर्यायी उत्तर म्हणून बरोबर दिले जाईल. मात्र तुमचे उत्तर हे इथले सदस्य नाम हवेच
पुन्हा एकदा हे महत्त्वाचे
पुन्हा एकदा हे महत्त्वाचे लक्षात ठेवा :
ओळखायची सर्व नामे ही सलग आहेत; त्यात कुठेही खंड अथवा जोड नाही. सर्व अपेक्षित शब्द हे मराठी भाषेत व देवनागरी लिपीत आहेत. त्यात कुठेही अंक नाहीत.
कृष्णा बरोबर
कृष्णा बरोबर
दिलेले उत्तर हे माबोच्या संग्रहात असलेल्या सदस्य नामाशी अक्षर अन् अक्षर 'शुद्ध'लेखनासकट जुळले पाहिजे
उदाहरणार्थ
आकाशानंद व आकाशानन्द
एवढा सुद्धा फरक शोध सुविधेला नाही चालत !
डॉक्टरांनी एव्हडी कठीण कोडी
डॉक्टरांनी एव्हडी कठीण कोडी टाकलेत कि याच्यापेक्षा ऑप्शन बाईंग सोप्पी वाटायला लागले.
बोकलत
बोकलत
प्रयत्नांची दिशा सांगितलीत तर मदत वाढवता येईल.
ठीक आहे, आता ही बघावित.
ठीक आहे, आता ही बघावित.
सुधारित शोधसूत्रे :
१. घातल्यावर आराम. काढल्यावर तो गायब करतो (५)
२.
आजोबा बाळंत होत आहेत ! (४)
३.
मुक्त असलेला हल्ला करतो तरीपण त्याला सौम्य समजतात ! (५)४.
एक मुलगा आकाशाला शोभा देतो(५)५. अशुद्ध साधकाने कोरून केले पात्र (४)
…….
चला आता कोण देतेय ४ चे उत्तर चटकन ?
करा सुरुवात...
२. नानाकळा
२. नानाकळा
२ नानाकळा अगदी बरोबर छान
२ नानाकळा
अगदी बरोबर
छान
४. गगनभेदी ? क्ल्यू द्या ...
४. गगनभेदी ? क्ल्यू द्या ...
गगनभेदी चूक
गगनभेदी चूक
काल हे सांगितले होते ते वाचा:
"संपूर्ण शोधसूत्राचा एकाच शब्दात भावार्थ काढू नका
एव्हाना सूत्रांची रचना तुमच्या लक्षात आली असेल.
एका शब्दासाठी काही भिन्न कल्पना एकत्र केल्या आहेत"
...
मुलगा + आकाशाला शोभा देतो.
दोन्हींचा वेगळा विचार करून दोन शब्द जमवायचे आणि मग जोडायचे.
दोन पैकी एका कल्पनेसाठी जरी आपल्याला योग्य शब्द सुचला की मग त्यातून आपोआप माबोकराचे नाव कुठले असेल याचा अंदाज येतो.
...
तसेही
गगनभेदी हे सदस्यनाम दिसत नाही.
उत्तर देण्याआधी मायबोलीकरांच्या सूचीत जाऊन खात्री करून घ्यावी
सेव्हेरस स्नेप
सेव्हेरस स्नेप
तुम्ही नानाकळा हे उत्तर छान विचार करून दिले आहे. त्याच धर्तीवर पुढे चला
4 इंद्रधनुष्य
4 इंद्रधनुष्य
४.इंद्रधनुष्य
४.इंद्रधनुष्य
याला पर्यायी म्हणून बरोबर देतो. नंतर सावकाश अपेक्षित उत्तर शोधले तरी चालेल.
४ नितीनचंद्र
४ नितीनचंद्र
४ नितीनचंद्र
४ नितीनचंद्र
अगदी बरोबर
हेच अपेक्षित होते
......
पर्यायी उत्तरे आल्यास आनंदच होईल.
त्यातून खेळाच्या पुढील विकासासाठी मार्गदर्शन होत राहील.
पण कुमार सर तुमच्याकरता फार
पण कुमार सर तुमच्याकरता फार वेळखाऊ व उर्जाखाउ खेळ आहे हा

तुम्हीदेखील एन्जॉय करत असाल तर ठीकच आहे. अन्यथा ....
मुक्त असलेला हल्ला करतो तरीपण
मुक्त असलेला हल्ला करतो तरीपण त्याला सौम्य समजतात ! (५)
अजातशत्रू
३. अजातशत्रू
३. अजातशत्रू
अगदी बरोबर !
...
सामो
माझा आवडता छंद आहे त्यामुळे मजा येत आहे !
सोडवायला खूप कठीण वाटले कि
सोडवायला खूप कठीण वाटले कि ठीक वाटले असा.>>>
फार कठीण नाही वाटली कालची.
पण आजची सकाळी वाचली तेव्हा कठीण वाटलेली.
छान खेळतायत मंडळी.
कुमार सर तुमच्याकरता फार वेळखाऊ व उर्जाखाउ खेळ आहे हा Sad>>> खरच वेळखाऊ आहे पण मजेशीर आहे.
धन्यवाद.
धन्यवाद.
आज कालच्यापेक्षा वेगळी मंडळी खेळात सहभागी झालेली आहेत ते पाहून आनंद वाटला.
यानिमित्ताने पूर्वीच्या शब्दखेळ धाग्या मधले काही जुने सहकारी सुद्धा पुन्हा भेटत आहेत हे छान .
खेळ योग्य गतीने चालू आहे.
आता दोनच राहिले आहेत
ते लवकर संपतीलच.....
चांगली चालना देताय डोक्याला
चांगली चालना देताय डोक्याला सर...
आतापर्यंत दिलेल्या
आतापर्यंत दिलेल्या उत्तरांमधून तुम्ही छान चमक दाखवली आहे. म्हणून आता शोधसूत्रांत मदत वाढवत नाही.
फक्त एक सांगतो.
आतापर्यंतच्या उत्तरामधली सदस्यनावे ही बर्यापैकी परिचित आहेत. राहिलेल्या दोनची नावे यांच्या इतकी परिचित नाहीत. तुमच्या विचारांची दिशा लिहायला हरकत नाही. त्यानुसार मार्गदर्शन करता येईल.
कुमार सर अशुद्ध साधु = बाबा
कुमार सर अशुद्ध साधु = बाबा असा शोध घेतला तरी सूचीत काही सापडले नाही.
बुवा असा घेतला तरी सापडले नाही.
--------------
काढल्यावर गायब करता गुल किंवा गुम असे वाटत होते परंतु काही क्लु लागत नाही.
ते अशुद्ध म्हणजे साधकाचा
ते अशुद्ध म्हणजे साधकाचा समानार्थी शब्द अशुद्ध लिहायचा असं असेल. योगी ऐवजी योगि असं काहीतरी
साधकाचा समानार्थी शब्द अशुद्ध
साधकाचा समानार्थी शब्द अशुद्ध लिहायचा असं असेल.
>>> होय, असेच.
+ कोरून पात्र
साधकासाठी शब्द शोधायला मराठी
साधकासाठी शब्द शोधायला मराठी भाषा चांगलीच समृद्ध आहे !
प्रयत्न चांगले चालू आहेत.
प्रयत्न चांगले चालू आहेत.
आता मी निघतो. उद्याच्या भारतीय सूर्योदयापूर्वी सर्व सुटलेले असेल या आशेसह शुभरात्री आणि शुभेच्छा !
गुड नाईट.
गुड नाईट.
कोरून पात्र तयार करण्यासाठी
कोरून पात्र तयार करण्यासाठी एखाद्या नैसर्गिक कवचाचा विचार करावा
भारी खेळलेत लोक.
भारी खेळलेत लोक.
1>> उबदार कपडे यासारख काही आहे का ??
१ साठी :
१ साठी :
कपडे नाही. पण शरीरावर आपण काय काय चढवतो या दिशेने विचार करावा.
Pages