Submitted by ऋन्मेऽऽष on 30 May, 2021 - 09:33
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
५ मिनिटे
लागणारे जिन्नस:
घरी बनवलेला सुंदरसा खाद्यपदार्थ आणि मोबाईल कॅमेरा
क्रमवार पाककृती:
१. आपल्या आवडीचा कुठलाही खाद्यपदार्थ बनवा.
२. खाद्यपदार्थ सुबक पद्धतीने मांडा
३. फोटो काढा
४. अपलोड करा
मगच त्यावर तुटून पडा Happy
फोटो अपलोड कसा करावा हे ईथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/1556
आधीची खाऊगल्ली ईथे भरायची
https://www.maayboli.com/node/77265
हि सुद्धा तशीच तुडुंब भरू द्या
वाढणी/प्रमाण:
माहितीचा स्रोत:
आहार:
पाककृती प्रकार:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
जागूताई च्या रेसीपी ने केलेले
जागूताई च्या रेसीपी ने केलेले लाडु.
माझ्यासाठी मेनू ठरला का ?
माझ्यासाठी मेनू ठरला का ? नैवैद्याचे ताट घेऊन माझ्यासमोर उभे राहू नका. तुम्हालासुद्धा पानं वाढायला घ्या.
या वेळी तुमच्याबरोबरच पंगतीत बसेन. मी येतोय लवकरच....
***** मायबोली गणेशोत्सव २०२१ *****
कुरडया ३/४ तास भिजत घालायच्या
कुरडया ३/४ तास भिजत घालायच्या.
<<
याला सोपा आल्टरनेटिव्ह आहे. तो म्हणजे शेवया 'वेळतात' तश्या कुरड्यांचे तुकडे /चुरा वेळून घ्यायचा. उर्फ, पास्टा शिजवतो, तसं उकळत्या पाण्यात टाकून सॉफ्ट झाल्या की पाणी निथळून, गार करायच्या.
कुरड्यांची भाजी ही साधारणत: लेट उन्हाळ्यात जेव्हा इतर भाज्या उपलब्ध नसतात, तेव्हा घरातल्या कुरडयांच्या साठवणीच्या बरणीत खाली उरलेला चुरा वापरून केली जाते. नागली/ज्वारी/तांदळाच्या पापडाचा उरलेला चुराही असा भाजीत वापरता येतो.
एकदा कुरडया वेळून घेतल्या की बेसिक कांदे पोह्यांची फोडणी करतो, तशी फोडणी द्यायची, (कढीपत्ता अन साखर मी घालत नाही) पोळीसोबत खाण्याची भाजी आहे म्हणून तिखट जास्त करायचे.
नेहेमीप्रमाणे डायरेक्ट पॅन
नेहेमीप्रमाणे डायरेक्ट पॅन मधून फोटो. भात. फरसबी स्टर फ्राय. चिकन.
चिकन आलं लसूण पेस्ट, हिरवी चटणी, दही, हळद मीठ लाल तिखट. मॅरिनेट.
चिकन एयर फ्रायर मधे. आतापर्यंत झीरो तेल.
पॅन मधे थोडं ऑऑ. १ चहाचा चमचा.
त्यात बारीक चिरून कांदा. परतून उरलेलं मॅरिनेड. थोडासा टोमॅटो सॉस. मस्त कांदे गळेपर्यंत थोडं पाणी/वाइन टाकून शिजवा.
त्या ग्रेव्ही/रिडक्शन मधे भात, बीन्स, चिकन.
चिकन मी थोडा वेळ चिमट्यात धरून डायरेक्ट गॅसच्या फ्लेमवर थोडं भाजलं.स्मोकी टेस्ट येते. एकदम भारी लागते.
या जेवायला!
खतरनाक..
खतरनाक..
आरारारा खतरनाक
आरारारा खतरनाक
झ क्का स
झ क्का स
फोटो पण असे तोंपासु असतात कि
फोटो पण असे तोंपासु असतात कि नै चिकन चे..भारीच.
लालूच्या रेसिपीने पांढरा
लालूच्या रेसिपीने पांढरा रस्सा
ओट्स चीला
या जेवायला.
ओट्स चीला
छान crispy दिसतोय चिला
छान crispy दिसतोय चिला
(No subject)
कडक ! खत्रा दिसतेय मिसळ एकदम
कडक ! खत्रा दिसतेय मिसळ एकदम
आ.रा.रा. काय टेंम्पटिंग आहे
आ.रा.रा. काय टेंम्पटिंग आहे हे... यम्म्म्म्म्म !!
मिसळ पण कातिल एकदम..
MazeMan .. wow..Sahi !!!
आरारा खतरनाक फोटो.
आरारा खतरनाक फोटो.
अमुपरी लाडू छान दिसताएत जागूच्या रेसिपी चे.
बाकीची पण ताटं छान. ओट्स चिला चिल कूल दिसतय मृ.
पांढरा रस्सा आणि मिसळ मस्त.
रव्याचे लाडू केले उद्या साठी. आणि ड्रायफ्रूट रोल
आणि
वाह रोल्स व लाडू मस्त.
वाह रोल्स व लाडू मस्त.
वा मस्त लाडु आणि रोल्स.
वा मस्त लाडु आणि रोल्स.
रोल्स ची रेसिपि सांगणार का? छान दिसत आहेत
(No subject)
लाल काकडी बीन्सची भाजी
छान ब्लॅक़कॅट. यमी.
छान ब्लॅक़कॅट. यमी.
मला वाटलं बीन्स बटाटा आहे.
मला वाटलं बीन्स बटाटा आहे.
लाल काकडी म्हणजे ती थोडी मोठी असते गोलाकार, बाहेरून हिरवी पिवळी तीच का?
तीच ,
तीच ,
मस्त होते,
फक्त जीरा मोहरी फोडणी , कांदा , लाल तिखट , हळद , मीठ , चिमूटभर साखर
लसूण नाय , बाकी कायपण नाय
मस्त होते
खाल्ली आहे.सासरी बनवतात. सुकी
खाल्ली आहे.सासरी बनवतात. सुकी भाजी-कांदा टोमॅटो घालून आणि कधी तुर डाळ घालून पण.
आम्ही पालक कॉर्न राईस केला
पालक कॉर्न राईस
बुंदी एपल रायता
सॉरी अमुपरी मी खुप उशीरा
सॉरी अमुपरी मी खुप उशीरा बघितला हा धागा, तुला ड्रायफ्रुट रोलची रेसीपी पाहिजे का? मी हेब्बर'किचन प्रमाणे केली
ब्लॅककॅट मस्त.
ब्लॅककॅट मस्त.
BC भाजी ची रेसिपी टाका की
BC भाजी ची रेसिपी टाका की
अमुपरी ड्रायफ्रुट च्या रोलची
अमुपरी ड्रायफ्रुट च्या रोलची रेसिपी घे:
काळे खजूर 15-18 बिया, ( सीडलेस असेल तर उत्तम) बिया काढून मिक्सर मधून फिरवायचे.
१ चमचा खसखस तुपावर भाजली, १चमचा तिळ, पाव वाटी सुकं खोबरं तुपावर भाजून घेतलं
अक्रोड, बदाम, काजु, पिस्ते , ( हे सगळं थोडं थोडं घेतलं, सगळं मिळून दिड वाटी) तुकडे करून तुपावर परतून घ्यायचं.बेदाणे पण घेतले, मग मिक्सरमधून काढलेला खजूर ह्या सगळ्या बरोबर तुपात परतून घ्यायचा. मग हाताने चांगलं एकत्र करुन रोल करायचे. सिल्व्हर फॉईल गुंडाळून फ्रिज मध्ये अर्धा तास ठेवायची मग फॉईल काढून वड्या कापायच्या
वरचे माझे रव्याचे लाडू पांढरट
वरचे माझे रव्याचे लाडू पांढरट दिसताएत. हे परत केले सासूबाईंचं वर्षश्राद्ध होतं तेव्हा.
खिचडी करतो तसेच करून त्यात
खिचडी करतो तसेच करून त्यात कॉर्न आणि पालक प्युरी घालून शिजवणे
पालक कॉर्न राईस
आज उकडहंडी करणार
आज उकडहंडी करणार
त्याच गर्दीत अळूवड्यापण करून घेणार , एकावर एक फ्री
Pages